Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

मंगळवार, २१ एप्रिल, २०१५

पुस्तक परिचय -
 बोध अंधश्रद्धेचा
अर्थात नाडी भविष्यानी केला अंनिसचा पराभव!
लेखन व संकलन 
विंग कमांडर शशिकांत ओक (नि)

 ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ही एक सर्कस आहे. त्यात विविध तऱ्हेचे अंधश्रद्धेच्या विरुद्ध खेळ खेळले जातात व सभोवताली जमलेल्यांचे त्याद्वारे मनोरंजन केले जाते. अर्थातच अंनिससर्कस मधील खेळाडू विविध (मखलाशीपूर्ण) कसरती करण्यता तरबेज असतात. नंतर हुकमी टाळ्या मिळवण्याच्या तंत्रात अत्यंत प्रवीण असतात.
सर्कसचे सर्वात मोठे आकर्षण हे त्यांचा ‘जनावरखाना’ असून त्यांना रिंगणात आणून हातातील जबरदस्त आसूडाद्वारे सर्व हिंस्त्र व क्रूर श्वापदांना आपल्या हुकुमावर नाचवायचे जोखमीचे व दिमाखाचे काम त्या सर्कसचा कार्यवाह – “रिंगमास्टर” करतो. या रोलमधे आपण स्वतः रिंगणात हजेरी लावता व आसूडाच्या व काठीच्या दरडावणीने अवघड व जीवघेण्या कवायती लीलया करवून टाळ्या मिळवता. आत्ता पर्यंतचा हा आपला अनुभव असल्याने आणि आपणच या सर्कसचे रिंमास्टर असल्याने, ‘माझा रिंगणात या, मग मी तुम्हाला कसे लोळवतो ते पहा’ असा आपला पवित्रा तुमच्या दृष्टीने शास्त्रीयपायावर आधारित पण भविष्यकाळात कसेही करून अंग काढून पसार होण्यास सोईचा आहे.
तथापि ‘नाडी भविष्य’ हा काही तुमच्या पिंजऱ्यात बाळगलेला सिंह नाही. त्यामुळे त्याने ‘गपगुमान’ तुम्ही रचलेल्या रिंगणात यावे व चुपचाप तुमच्या तालावर नाचावे असे स्वप्न बाळगून असाल तर ती आपली घोर चूक आहे.
या इथे ‘नाडी भविष्यकर्ते महर्षी’ हे “रिंगमास्टर” आहेत. भविष्याच्या आसूडाला तो ‘थोतांड’ म्हणून आव्हान देऊन आपण रिंगणात उतरला आहात. वर्तमानपत्रातून परिपत्रके व लेख लिहून व मला मधे घालून, ‘पहा या रिंग मास्टरची कशी ऐशी की तैशी करतो. नाहीतर 5 लाख देतो’ असे डरकाळ्या फोडणारे आवाज आपण वेळोवेळी करता. या सर्व परिस्थिती मी रिंगणात कसा? नाडीकेंद्रे जेथे आहेत तेथे कूटलिपी वाचणारे उपलब्ध आहेत. अशा विविध केंद्रांना भेटून एकच पट्टी विविध नाडीवाचकांनाकडून वाचवून घेऊन त्यातील मजकुरातील सत्यता, अर्थवत्तता अचूक व तात्काळ काढता येते. हे आपणांस चांगलेच ठाऊक आहे. एरव्ही मीच रिंग मास्टर, माझीच सर्कस, माझेच रिंगण आणि माझेच टाळ्या पिटू प्रेक्षक याच कूपात राहून मग शास्त्रीय संशोधनाचे नाटक कशाला?
याचे साधे कारण हे की नाडी केंद्रास भेट देण्यास यायचे नाही व अंनिसचे तोंडकाळे करून घ्यायचे नाही. आपल्या अंनिस सर्कसचे चालायचे दिवस आता फार जिकिरीचे झाले आहेत. प्रवीण कसरतपटू शिष्यगण आपणांस सोडून गेले आहेत. इतर शिलेदारांनाही आपल्या आसुडाचा बेगडीपणा लक्षांत आला आहे. वर्तमानपत्रवाले एकजात आपल्या विविध क्लुप्त्यांना आपल्या मागे कुत्सितपणे हसून नावे ठेवतात, मात्र तोंडावर व वर्तमानपत्रातून नावे ठेवायला आपल्या सर्कसचा दरारा मोठा असल्याने टाळतात. पण जे आपल्या कल्पनाविश्वात तल्लीन असतात अशा आपणांस हे लक्षात आलेले नाही.

मित्रांनो, 
कदाचित आपण वरील शीर्षका व मजकुरावरून अंनिस विरुद्ध मुद्दाम रचलेले काहीतरी कुभांड असावे असे समजलात तर नवल नाही. कारण अख्ख्या भारतात अंनिसचा दबदबा व  सन्मान बराच मोठा आहे.
ओकांना त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर वाटत होता. परंतु नाडीग्रंथ भविष्याच्या संदर्भात त्यांच्याशी झालेल्या संपर्कावरून त्यांचे मत बदलायला लागले. ते कसे व का याचा आपणास शोध घ्यायचाअसेल तर हे पुस्तक वाचा.
 ओक म्हणतात, अंनिसची हेतुपु्र्वक बदनामी मला करायची नाही. माझा तो अधिकारही नाही. पण त्यांच्या कार्यप्रणालीतील त्रुटी व खोटेपणा, रेटून आपलेच खरे म्हणून मांडण्यामागील आंधळा बुद्धिवाद  या गोष्टी मला खटकत होत्या.'
'पंरंतु अशा प्रथितयश समाजाभिमुख असल्याचे भासवणाऱ्या समितीच्या खोटेपणाला  उघड करून दाखवणारे कोण असेल का?' असे त्यांना वाटत असता ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉ विजय बेडेकरांशी झालेल्या चर्चेत त्यांनी नाडी ग्रंथांच्या संदर्भातील  अंनिसचा बुद्धिवादी तर्क कसा तोकडा आहे हे त्यांना माहित असूनही  पु्र्वग्रहांमुळे  तो सोडणे त्यांनाअशक्य झाल्याने त्यांची कशी फरकट होते याचे विदारक चित्र पदर दर पदर सांगितले जावे. भविष्य काळात अंनिस वाल्यांशी झालेला आपला प्रदीर्घ पत्रव्यवहार एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून जपला जावा असे वाटून  ड़ॉ. विजय बेडेकरांनी आपणहून माझ्या जवळील सर्व पत्रव्यवहार मागवून पुस्तक रूपात प्रकाशित करून सादर केला आहे.'
'पुरावा द्या तर मानू' असे साधारणपणे बुद्धिवादी लोकांचे म्हणणे असते नव्हे, तसा आग्रह असतो. देव, भुते, ग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम वगैरे बाबतीत ते नेहमी पुराव्यासाठी अडून बसतात व तो नसल्याने मोठ्या रकमेची आव्हाने देत 'आम्ही जिंकलो' असे वेळोवेळी प्रसिद्धिमाध्यमातून जाहीर करताना आपण वाचले असेल. मात्र हीच अंनिस जेंव्हा नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यातील नावांचा पुरावा  सादर  केला की त्याच्याकडे सोईस्करपणे काणाडोळा करून जणू काही तो पुरावा नाहीच असे मानून 'आपल्याकडून माहिती काढून तीच नाडी पट्टीतून सांगितली जात असते'  ही एकच आणि एक रेकॉर्ड लावून आपला एक साथीदार कसा गेला व त्याने नाडीचा भांडाफोड कसा केला याचे सुरस वर्णन करण्यात मश्गूल होते. अशा व्यक्तींनी केलेला भांडाफोड किती व  कशी तकलादू आहे असे साधार दाखवून देखील त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष करायची मखलाशी अंनिस रीतसर करते तेंव्हा त्यांचा बुद्धिवादी पायाच निखळून पडतो.   
नाडीग्रंथांच्या पट्ट्यातील मजकुराचे  पुरावे स्वतः अनुभव घेऊन सादर न करता,  'आम्ही  देऊ त्या अंगठ्यांच्या ठशांचे नाडी भविष्य ओकांनी शोधून काढावे' असा हट्ट मुद्दाम ओकांना घोळात घेऊन, 'ओक सहकार्य करायला कुचराई करतायत' असा मुद्दाम बहाणा करायचे तंत्र अंनिसचे कार्यवाह स्वतःच्या हाताने लिहिलेल्या पत्रातून करताना दिसत असतात, 'अंनिसला जर नाडी ग्रंथांना खोटे ठरवायचे असेल तर  ओकांना मधे पाडायचे कारण काय? उलट ओकांना आपण खबरदारीपु्र्वक दूर ठेवायला पाहिजे' असे खणकून म्हटले गेले. कारण  अंगठ्याचे ठसे त्यांना पाठवून त्यांच्याकडून नाडीपट्ट्या शोधायला भाग पाडून 'नाडी भविष्य खरे ठरवण्यात ओकांचा हात होता' असा कांगावा करायचा असे त्यांच्या चालीवरून कोणालाही सहज लक्षात येईल. ओक अशा सापळ्यात अडकत नाही असे पाहून ओकांची व्यक्तिगत बदनामी करायला काही अंनिस प्रेमींनी सुरवात केली होती. परंतु ओकांच्या खमक्या भूमिकेमुळे त्यांना ते ही करता आले नाही. दै पुढारीतून आलेल्या त्यांच्या लेखांना लक्ष्य करून डॉ जयंत नारळीकरांची साक्ष काढून  खोटे ठरवणारे लांबलचक  लेख छापले गेले, मात्र ओकांची बाजू मांडायच्या वेळी अन्य महत्वाचा मजकूर असल्याने दुर्लक्ष करून टाळले जाणे व त्रोटकपणे ते सादर करताना दिशाभूल होईल असे संपादन करणे अशा मखलाशा पहायला मिळाल्यावर अंनिसचा पर्दाफाश करायला हवा असे ओकांना वाटणे साहजिक आहे. नाडी ग्रंथासाठी पुण्यातील मा.स. रिसबुड व प्रकाश घाटपांडे यांनी पुढाकार घेतला होता. विेशेषतः त्यांनी अद्वयानंद गळतगे यांच्याशी उभा दावा मांडला होता.  त्यांनी कानडीतून पोस्टकार्डाद्वारे हीन शब्दात नालस्ती करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तो  सर्व भाग 'विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन'  या प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या पुस्तकात सविस्तरपणे दर्शवला गेला आहे. 'आम्ही म्हणतो ना की नाडी भविष्य हे थोतांड आहे मग ते आहे' असे प्रत्यक्ष तपासणी न करताच अंनिसवाले जाहीर करतात तेंव्हा त्यांच्या विज्ञानवादाच्या खोट्या बुरख्याला फाडायची गरज वाटते.
नेमके तेच काम या पुस्तकाने केले आहे.
पुस्तकाच्या मोजक्या  प्रती बुकगंगा. कॉम वर उपलब्ध.
किंमत 250  पाने 260.