Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

सोमवार, १६ जुलै, २०१२

टोकाचा "प्रत्यक्ष-बघा"-वाद दिसतो आहे.

धनंजयचे प्रश्न आणि माझी -हैयोयैयोंची- उत्तरे






Inbox
X





Reply
|
हैयोहैयैयो
show details 4 Sep
लेखक: धनंजय, शुक्र, 09/04/2009 - 15:45
हा जरा कठिण प्रकार दिसतो. उत्तरे घाटपांडे देतील, पण हा थोडा वेगळा विषय आहे, म्हणून वेगळे विचारतो आहे.

> आपले चिकित्साकार्य हे शास्त्रीय असल्याचे सिद्ध झालेच तर ...
"अमुक" चिकित्सा शास्त्रीय आहे, याची कुठली सिद्धता तुम्हाला मान्य आहे? कदाचित तसे शब्दांकन कठिण असेल, पण अधिक सार्वत्रिक असे कुठले उदाहरण देऊ शकाल का? ("सार्वत्रिक" म्हणजे वेगवेगळ्या देशांतही सहज सापडू शकेल असे कुठलेसे चिकित्साकार्य, जे तुमच्या मते शास्त्रीय आहे. आणि त्या उदाहरणाचे विवेचन करून सिद्धता समजावून सांगावी.)
तुमच्या लेखनात कुठलातरी टोकाचा "प्रत्यक्ष-बघा"-वाद दिसतो आहे.
भारतीय न्यायशास्त्रात (गौतम ऋषींच्या - ज्याला आपण आजकाल "लॉजिक" म्हणू), तसेच वेगवेगळ्या देशांतल्या लोकांनीही प्रमाणांबद्दल चर्चा केलेली आहे. प्रत्यक्ष (स्वानुभव)/अनुमान (डिडक्टिव, इंडक्टिव लॉजिक)/उपमान (इंडक्टिव लॉजिक आणि ऍनॅलॉजी)/शब्द (विटनेस) या वेगवेगळ्या प्रमाणांबद्दल चर्चा झालेली आहे.
"अनुमान" हे प्रमाण तुम्हाला मान्य नाही काय? अनुमानाचे प्रमाणत्व मान्य केले नाही तर त्याचे तोटे शंकराचार्यापासून हल्लीच्या लोकांपर्यंत कित्येकांनी विवरण करून सांगितले आहेत. मला तरी "अनुमान" या प्रमाणाचा उपयोग झालेला आहे, आणि ते नसते तर माझा रोजचा व्यवहारच कुंठित झाला असता. (म्हणजे खोलीत थोडासा उजेड दिसू लागला, म्हणजे सकाळ बरीच झाली आहे, असे अनुमान प्रमाण मानून मी ताडकन उठतो. माझ्या बिछान्यावर थेट सूर्य येत नाही - म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदर्शन कधीच होत नाही. तसे प्रत्यक्ष सूर्यदर्शन झाल्याशिवाय, "उजेड->सूर्योदय" असे अमान्य केल्यास माझे वेळेवर बिछान्यातून उठणे बिघडेल. दिवसभरात असे आडथळे पदोपदी येतील!)
प्रयोगशाळेतल्या संशोधनात तरी असे काही तत्त्व आहे : "तुल्यबल अनुमानांमध्ये विरोध असला, तर प्रत्यक्ष हेच प्रमाण त्या दोहोंपैकी योग्य अनुमानपद्धती सांगते." अहो, प्रत्येक प्रात्यक्षिक प्रयोगाचा पैशाच्या आणि मनुष्यबळाच्या दृष्टीने मोठा खर्च असतो. म्हणून अनुमाने साशंक असली तरच प्रात्यक्षिक करण्यास अनुदान मिळते. नाहीतर कुठलाही शोध पुढे सरणारच नाही. कारण एखादा प्रयोग पुन्हापुन्हा केल्यानंतरही, जगातील प्रत्येक प्रश्नकर्त्याला प्रयोगशाळेत आणून तोच तो प्रयोग पुन्हा करावा लागेल. (कारण त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय निष्कर्ष त्यांना अमान्य आहे!)
अनुमान प्रमाण म्हणून अमान्य केल्यास असे भयंकर तोटे होतात असे तुम्हाला पटत नाही का?
----------------

नमस्कार,

समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केल्यास हा प्रकार अजिबात कठीण नाही.

> "अमुक" चिकित्सा शास्त्रीय आहे, याची कुठली सिद्धता तुम्हाला मान्य आहे?

ह्या प्रश्नाचे उत्तर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून द्यावयाचे झाल्यास, जोपर्यंत त्रुटी आढळतात तोपर्यंत चिकित्सापूर्ति झाली असे मला सामान्यतः वाटत नाही. एखाद्या शास्त्रीय सिद्धांतात आपणांस त्रुटी आढळल्या, तर आपण तो शास्त्रीय सिद्धांत मान्य कराल काय? त्या विषयाचा सर्वांगपरिपूर्ण अभ्यास केला गेल्याशिवाय तो त्रुटीपूर्ण सिद्धांत मान्य करणे कोणत्या शास्त्रीय निकषांस मान्य आहे ह्याचे आणि त्या उदाहरणाचे विवेचन करून सिद्धता समजावून सांगावी.

> तुमच्या लेखनात कुठलातरी टोकाचा "प्रत्यक्ष-बघा"-वाद दिसतो आहे.

येथे काही वाद आहे असे मला वाटत नाही, आणि वाद असलाच, तर तो टोकाचा नाही. आपण ज्याला 'वाद' असे म्हणतां त्याला मी 'आग्रह' असे म्हणतो. चिकित्साशास्त्र प्रत्यक्ष अनुभूतिस अमान्य करते असे आपले म्हणणे आहे काय?

येथे एक प्रश्न आपणाकरिता : लेखकाची मते वैयक्तिक असती तर आपणांस आपण म्हणतां तसे वाटले असते काय? येथे अनेक सदस्यांनी आपापली वैयक्तिक मते मांडली आहेत, आणि मी त्यांच्या त्या वैयक्तिक मतांबद्दल एक चकार शब्ददेखील बोललेलो नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. प्रत्येक मनुष्याची सर्वच्या सर्व मते एकसारखी असणे शक्य नाही हा सिद्धांत मी जाणून आहे.

>"अनुमान" हे प्रमाण तुम्हाला मान्य नाही काय?

ह्याचे उत्तर 'मान्य आहे' असे आहे. अनुमानास प्रमाण म्हणून अमान्य केल्यास भयंकर तोटे होऊ शकतात ह्याबद्दल कोणाचे दुमत असू नये. परंतु हे प्रमाण सर्वसकट लागू करतांना समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून एका गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, प्रयोगशाळेतली तत्त्वे ही प्रयोगशाळेबाहेर (विशेषत: समाजशास्त्रात) सर्वसकटरित्या लागू होत नाहीत. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून (आठवा : जनहितार्थ) चिकित्सा करताना समाजशास्त्रीय तत्त्वे विचारात घेणे अधिक सयुक्तिक ठरते. असो.

जोपर्यंत आपले सिद्धांत त्रुटीपूर्ण आहेत, तोपर्यंत ते सर्वमान्य होणे शक्य नाही हे लक्षात घेवून आपल्या वैयक्तिक अनुमानास 'चिकित्सा' अथवा 'सिद्धांत' असे शब्दप्रयोग करून संपूर्ण समाजावर आग्रही रीतिने लादणे हे योग्य नव्हे. आपल्या सिद्धांतातल्या त्रुटी जर कोणी दाखवून दिल्या, तर पलायनवाद स्वीकारणे हेही योग्य नव्हे. आपल्या मतांमध्ये-सिद्धांतांमध्ये कमतरता असेल, आणि जर कोणी तसे दाखवून दिले, तर लेखकाने ते प्रांजलपणे मान्य केलेच पाहिजे, कारण चिकित्सा ही आग्रही नसते. येथे तर मला केवळ दुराग्रह दिसतो आहे. आपण पाहिलेच असेल माझ्या प्रश्नांकडे कसे चक्कन् दुर्लक्ष करण्यात आले होते ते!

असो. लेखकाने 'नाडिशास्त्र थोतांड आहे' हे आपले वैयक्तिक मत आहे असे प्रतिपादन केले असते तर त्यांचे मत विचारात घेण्याचे काहीएक कारण नव्हते. परंतु 'चिकित्सा' हा शब्दप्रयोग आणि पुस्तक लिहिणे - मते मांडणे - नारळीकरांसारख्या मान्यवरास बोलावून परिक्षण लिहून घेणे असे कर्म ह्यामुळे चिकित्सेवर चिकित्साविचार करणे भाग पडते.

मला एक विशेष आश्चर्य राहून राहून वाटते ते असे, की नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाला सुद्धा मला पडतात तसे साधेसरळ प्रश्न पडले नसतील काय? अर्थात, आपणांस पडद्यामागच्या हालचालींचा नुसता वेधच घेता येतो! पण प्रत्यक्षात दिसतात त्या गोष्टीही काही कमी बोलत नाहीत!!!

Thanks,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: