Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

गुरुवार, २० मे, २०१०

खुले मन आणि नाडी ग्रंथ -उपक्रमवरील संवाद

अर्थ

प्रमोद यांच्या वाक्यांचा अर्थ मी असा काढला.

'एकच गोष्ट कधी कणात तर कधी तरंगात असते' क्वांटम मेकॅनिक्समध्ये आपल्या रोजच्या आयुष्यापेक्षा वेगळे परिणाम बघायला मिळतात. फोटॉन आणि क्रिकेटचा चेंडू यांच्या वागण्यात फरक असतो. फोटॉन कधी कण असतो तर कधी प्रकाशलहरी. क्रिकेटचा चेंडू मात्र आपल्याला नेहेमी चेंडू म्हणूनच दिसतो. (तत्वतः त्याच्याही लहरी असतात पण त्या मोजता येणार नाहीत.) एकच वस्तु मधे मार्ग नसताना दुसरीकडे जाते. बहुधा प्रमोद क्वांटम टेलेपोर्टेशनबद्दल बोलत असावेत. (ही संकल्पना वर्म होललाही लागू पडावी.) वाक्य संदिग्ध आहे हे मान्य.

--

होय पण डिडक्शनचा संबंध काय?

आपल्या रोजव्यवहारात न दिसणारी कित्येक प्रमेये डिडक्शनने प्रमाणित करता येतात.

उदाहरणार्थ : काही आजारांमध्ये रोजव्यवहारात न-दिसणारे जंतू सूक्ष्मदर्शिकेखाली शरीरद्रवात दिसतात दिसतात. जगातील प्रचंड बहुसंख्य लोकांनी आजपर्यंत रोजव्यवहारात "स्ट्रेप्टोकॉकस" जंतू सूक्ष्मदर्शिकेखाली बघितलेला नाही. तर हे डिडक्शन घेऊया :

सामान्यनियम : जेव्हा जेव्हा र्‍हुमॅटिक ताप चालू असतो त्याच्या आदल्या दोन आठवड्यांतल्या घशाच्या द्रवाला सूक्ष्मदर्शिकेखाली घातल्यास स्ट्रेप्टोकॉकस हा जंतू आढळतो. (जेव्हा जेव्हा मानव असतो, तेव्हा तेव्हा मर्त्य असतो.) विवक्षित उदाहरण : श्री. जॉन डो यांना र्‍हुमॅटिक ताप चालू आहे. (सॉक्रेटीस मानव आहे.) अनुमान : श्री जॉन डो यांच्या गेल्या दोन आठवड्यांतल्या घशाच्या द्रवाला सूक्ष्मदर्शिकेखाली घातल्यास स्ट्रेप्टोकॉकस हा जंतू आढळतो. (सॉक्रेटीस मर्त्य आहे.)

हे तर रोजव्यवहारात नसलेले डिडक्शन आहे. लुई पास्तरने काही शतकांपूर्वी जंतूंबाबत सिद्धांत सांगितला. तेव्हा त्याचा सिद्धांत आणि त्याची निरीक्षणे रोजव्यवहारापेक्षा खूपच वेगळी होती. मग या बाबतीत क्वांटम मेकॅनिक्सचे काय विशेष आहे?

क्वांटम मेकॅनिक्सने विज्ञानाचा तार्किक पाया बदललेला नाही याचे चांगले वर्णन रिचर्ड फाइनमन यांनी केलेले आहे (मराठी भाषांतराचा दुवा).

खुले मन आणि नाडी ग्रंथ

काही जण सजीवांना देखील डिटर्मिनिज्ममधे गोवतात. (त्यात चूक आहे असे मला वाटत नाही.) त्यांच्यासाठी सामाजिक-मानसिक कृती देखील कारण शब्दाशिवाय सांगता येतील.

आपली माहिती सिमीत असताना आपण र्‍यांडमनेस असतो असे मानतो. तेंव्हा कारण शब्द अर्थपूर्ण रित्या वापरू शकतो.

कारण शब्द वापरायची दुसरी वेळ म्हणजे आधी -नंतर संबंध. आधी आग लागली मग धूर झाला. हे वाक्य ' धुराचे कारण आग आहे.' मधे कारण शब्दाने परिवर्तित होऊ शकते. यात ऑकमचा वस्तरा कसा लागेल मला समजत नाही. अशा वेळी कारण शब्द आधी काय घडले हे सांगत असतो. कित्येकदा आधी घडणारी क्रिया ही नंतर घडलेल्या क्रियेसाठी एक आवश्यक क्रिया असते. उदा. धूर येणे हे आगीशिवाय होत नाही असे मानले तर धुराचे कारण आग आहे हे जास्त सयुक्तिक वाटते.

मी सायन्सचा विद्यार्थी नाही. वरील धाग्यातून जे थोडे फार समजले त्यातून मनाला वाटले त्याबद्दल लिहितो. आग व धुराचे नाते आधी व नंतरचा संबंध दर्शवते. जसे धुराचे अस्तित्व आगी शिवाय उत्पन्न होऊ शकत नाही हे जितके खरे आहे. तसे व्यक्ती जन्माला आल्याशिवाय त्याचे भविष्य निर्माण होऊ शकत नाही हे ही तितकेच खरे आहे. आता जर नाडीग्रंथांत व्यक्तीच्या जन्माच्या आधी त्याचे भविष्य लिहिलेले असेल तर कार्य कारण भावाचा अर्थ कसा लावायचा. सजीवांना डिटर्मिनिझनचे तत्व लागू होते का नाही यावरही नाडी ग्रंथांतून प्रकाश टाकला जाऊ शकतो. डॉ. अरसे कुलरत्ने यांनी या संदर्भात एक प्रबंध सादर केला आहे. त्यात क्वांटम सिद्धांताची तुलना त्यांनी नाडी ग्रंथांच्या व्यक्तीच्या पुर्वआयुष्याच्या कथनाला क्वांटम सिद्धांतातील कणाचे (मॅटर)रुप मानता येईल तर आणि व्यक्तीच्या जीवनातील नंतरच्या भविष्य कथनांना लहरीचे (वेव्ह) रुप मानता येईल असे सुचवले आहे. त्यांनी डॉ.एस.संबंधम यांच्या सह त्या आधी सादर केलेल्या २ प्रबंधांतुन नाडी ग्रंथांवर भरपूर केसेसचा संदर्भ देऊन व नाडी पट्टयातील लिखाणाचे लिपि, भाषा यासह अनेक कोनांतून विश्लेषण करुन प्रबंध सादर केलेले आहेत. प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी नुकत्याच लिहिलेल्या "The Scientific Basis of Naadi Granthas" या इंग्रजी लेखातून ते ही असेच प्रतिपादन करताना दिसतात. त्याचा विचारही करता येईल.

नाड़ी ग्रंथ प्रेमी शशि ओक.

मुद्दा काय आहे?

नाडी ग्रंथांतून प्रकाश टाकला जाऊ शकतो.

टाका ना! केसेसचे संदर्भ नको. आमची आव्हाने स्वीकारा. आपण एक मत 'विकत' आहात. तेव्हा कृपया ते आमच्या गळी उतरवता येईल असे पुरावे सादर करा.

BTW, "आम्ही खुले मन बाळगतो त्यास आपण आक्षेप घेता का?" असे मी आपणास विचारले होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: