Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

रविवार, ३ मे, २०१५

भृगुसंहितेच्या शोधात... 2 मेरठ, प्रतापगढ़, लखनौ

भृगुसंहितेच्या शोधात... 2  मेरठ, लखनौ, प्रतापगढ़

मित्र हो,
या यात्रेतील महत्वाचा भाग होता की मेरठ, लखनौ, प्रतापगढ व साहरनपुरला भेट देऊन तेथील भृगुशास्त्रीकडील संहिता पत्रांची माहिती व जमल्यास गोडीगुलाबीने त्यांच्याकडील पट्ट्यांचे फोटो काढून पट्ट्यांचे करायला प्रवृत्त करणे. सहारनपुरच्या केंद्रात केदारनाथ प्रभाकर यांच्या मुलाने 'सध्या रामनवमीमुळे वडील भेटू शकणार नाहीत' म्हटल्यावर पालम विमानतळावरून सरळ आम्ही मेरठच्या डब्बा गाडीत बसायला आयएसबीटी वरून चढलो. ही गर्दी, घाम येणारी गर्मी, त्यात गावागावातून झुंडीच्या झुंडी आसपासच्या गावात लागलेल्या मेळ्यात जायला ट्रॅक्टरचे ट्रेलर भरभरून जाताना पाहून रामनवमीच्या गर्दीचा हिसका आम्हाला कळून आला. पुढे अयोध्या रेल्वेस्टेशनात गाडी थांबायचा अवकाश असे लोंढे आत येऊन मला खाली उतरायला शक्य झाले नाही! इतके की मी उलट्या बाजूने उतरून शेवटी इंजिनाला फेरी मारून ओकसरांना भेटू शकलो. या सर्वात ते शिताफीने उतरून माझ्याकडून जड सामानाची बॅग घेऊन उतरले म्हणून मला उरलेले सामान आणायला सोईचे गेले!
एका स्टँड जवळच्या हॉटेलवाल्याला विपिन दिक्षितांनी फोन लावून, बोलून सोय केली होती म्हणून झटपट खोलीमिळून एसीच्या थंड हवेत आम्हाला दमणूक झालेल्या दिवसाची सांगता करता आली... त्या दिवशी सानू थापांनी बाय केल्यावर असा प्रचंड पाऊस पडला असे निमित्त होऊन आमची फ्लाईट 2 तास उशीरा सुटली होती.
दुसऱ्या दिवशी हनुमान मंदिर दर्शनानंतर समोरच्या घरातील मजला चढून बेल दाबल्यावर आता आमचे स्वागत कसे होईल असा सरांना जरा पेच होता. कारण त्यांच्या आधीच्या भेटीत उत्साहवर्धक वातावरण नव्हते. ते सर्वीस मधे होते तेंव्हा एका आर्मी ऑफिसरला केंद्रात भेटल्यावर त्यांनी सरांना त्यांचे हिन्दीतील पुस्तक म्हणून एक चोरून प्रकाशित झालेले नाडीवरील पुस्तक सप्रेम भेट दिले होते! शिवाय आर्मी कर्नलच्या वतीने सर विपिनजींशी बोलताना गरम वातावरण झाले होते म्हणे.
यावेळचा अनुभव अगदी उलट होता. आई, पत्नी व मुलासमोर त्यांचा आम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा हार देऊन केलेला सत्कार भावला होता. त्यांनी आनंदाने राशी मिलान यंत्र, ताडपत्रावर पाली भाषेतून लिहिलेल्या पट्ट्यांचे पॅकेट बासनातून काढले. एक सुरवातीचे भृगुफल वाचून दाखवले. गर्ग संहितेची पाने उलगडून दाखवत त्यांच्या आजोबांनी घालून दिलेल्या शिस्तीमुळे सर्व पट्ट्या आणि ग्राहकांना दिलेली टाईप करून दिलेल्या कागदांच्या फाईल्स वगैरे कसे व्यवस्थित केलले होते याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी हातातल्या मोबाईलमधील टॉर्चचा वापर करून पट्टीवर फिरवत वाचायची सोय करून दिली.
10 ला पोहचलेलो आम्ही 2 वाजेपर्यंत त्यांच्या घरी रमलो होतो. पट्टी सापडली तर कुटुंबासह तिथे जायचा विचार मी करत माझी कुंडली त्यांना दिली आहे. पाहू केंव्हा बोलावतात ते.
रात्रीच्या ट्रेनचे आयत्यावेळीचे तात्काल एसीचे रिझर्वेशन मिळाल्याने रात्रीचा प्रवास संपवून आम्ही लखनौचा नबाबी ब्रेकफास्ट करून रेल्वेक्लोकरूममधे जड बॅगा देऊन नाडीकेंद्राकडे मो्चा वळवला... मात्र त्याआधी संडारीवाल्या भृगुशास्त्रींनी आधी ठरवले असून ही 'आज नही कल आना' असे म्हणून आम्हाला बुचकळ्यात टाकले... त्यावर ओक सरांनी शक्कल लढवून लखनौमधील नाडीवाल्याची भेट घ्यायला फोन घुमवला.'विनयखंड मधे या' म्हणून फोन बंद झाला... ती हकीकत पुढील वेळी...
1
1. पं. विपिन दीक्षित ताडपट्ट्या दाखवताना
3
2. एका ताडपट्टीतील मजकूर व पालीलिपी दर्शन
4
3. राशी-इष्टकाल करेक्शन यंत्र
4
4.टाईप केलेले कोणाएकाचे फल
6
5. विपिन दीक्षितांचा सत्कार करताना
6
6. कागदी भृगु फल दर्शन
7
7. गर्ग संहितेचे एक पान

नेपाळ सध्या धरणीकंपाच्या कचाट्यात आहे. एक महिन्यापुर्वी 23 ते 26 मार्चमधे आम्ही काठमांडौला असताना घेतलेल्या काही फोटोत ज्या इमारती पाहिल्या होत्या त्यांची विदारक चित्रे आजकाल पेपरमधे पाहून मन विषण्ण होते आहे...
दरबार हॉल
१. दरबार हॉल - एका झाडाच्या काष्ठापासून तयार केलेल्या या वास्तूवरून काष्ठमंडप? - 'काठमांडौ' हे नाव पडले म्हणतात. ओकसर व सानु थापा पुढील भेटीविषयी चर्चा करताना..
त्रिचंद्र कॉलेजजवळचा क्लॉक टॉवर
२. त्रिचंद्र कॉलेजजवळचा क्लॉक टॉवर इथे मी व ओकसर प्रो. शरणांना भेटायला गेलो होतो... आता कसा उभा आहे न कळे!
सुईत काय आहे
३. सुरईत काय आहे? भारत पुस्तकालयापाशी ही मर्कटाची मुर्ती भगव्या वस्त्रात काय करते आहे हा प्रश्न पडतो. ती तरी शाबूत आहे कि नाही शंका आहे.
पशुपती नाथाच्या मंदिरातील काही जुन्या इमारती
४. म्हणतात पशुपती नाथाच्या मंदिरातील अशा काही इमारतींना बरेच नुकसान झाले आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: