Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण | mr.upakram.org

काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण | mr.upakram.org: "मला वादात रस नाही नवीन प्रेषक शशिओक (सोम, 12/06/2010 - 13:44) मित्र हो, मिसळपाव वर वा अन्य ठिकाणी वाद घालायला मी नाडी ग्रंथांचा विषय काढला नाही. मला वादात रस नाही. कारण कसेही करून आपल्यासारख्यांचे मत परिवर्तन करावे हा माझा उद्देश नाही. मला आलेला अनुभव इतरांसाठी शेअर करावा असा माझा दृष्टीकोण होता व आहे. आपल्या सारख्यांनी त्याला पुरोगामी विचारांविरुद्ध असावे असे वाटून नाडीग्रंथांवर एकांगी लिखाणाला वाचून आपले मत बनवले आहेत असे वाटले म्हणून नाडीग्रंथांचे मला झालेले दर्शन सचोटीने अभ्यास करून मांडून दाखवण्याचे कार्य मी करत आहे. नाडीग्रंथांचा विविध पद्धतीने अभ्यास करून मला झालेले आकलन मी सादर करायचे ठरवले आहे. आपल्या सारख्या विचारकांनी देखील नाडीग्रंथांचा सर्वांगांनी अभ्यास करावा असे म्हणण्यात वादाचा प्रश्न माझ्याकडून आला कुठून? उलट विविध विचारधारांच्या व्यक्तींनी, तज्ज्ञ शोधकर्त्यांनी एकत्र येऊन नाडी ग्रंथांतील भाषेच्या, लिपीच्या मधून व अन्य अंगांनी जे काही कथन आपल्याला नाडीवाचकांकडून दिलेल्या वह्यातून दिले जाते, मिळते त्याचा एकत्रित विचार केला जावा असा मित्रत्वाचा व मदतीचा हात मी पुढे करत आहे. असे करत असताना मला आपणासारख्यांनी जरी हिणवलेत वा बोल लावलेत तरी मला त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही. महर्षींच्या लेखनाला पहायची उचित वेळ आलेली नाही इतकेच क्षणभर वाटेल. - Sent using Google Toolbar"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: