Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

शुक्रवार, २ जुलै, २०१०

गुरु आले शिष्याच्या भेटीला एक दिवशी नाडी पट्ट्या माझ्या हातात येतील असे मार्टीन तू म्हणाला होतास ना मग घे ह्या ताडपट्टीचे पॅकेट. हातात धर. ...यात तुझी नाडपट्टी नाही पण दुसऱ्या पॅकेटात इरु सुळी मेरू रेहा वाल्या पॅकेटात ती मिळेल. MARTIN KOLA WITH SHASHIKANT ON PRAGUE AIRPORT. BON VOYAGE अगस्त्य महर्षी आपल्या देशात येताहेत याचे कारण त्यांना आपल्या देशातील काही लोकांसाठी आदेश द्यायचे आहेत. असे पॉवेलचा मित्र मार्टीन त्याला म्हणाला होता. आमचा विसा नाकारला गेला तेंव्हा पॉवेल फार निराश झाला होता. त्याला लोकांचे फोन आले की नाडीग्रंथवाले लोक येणार नसतील तर आपचे रजिश्ट्रेशन कॅन्सल करा वगैरे. त्यावेळी मार्टीन कोला नावाच्या त्याच्या मित्राने सांगितले होते काळजी नको. पुन्हा प्रयत्न कर. ते नक्की येतील. मार्टीनचे बोल काही महिन्यात खरे ठरले. जसे त्याने पावेलला काही वर्षापुर्वी सांगितले होते की नाडीग्रंथ म्हणून काही अदभूत प्रकार भारतात असतो. काही काळानी पावेलच्या वाचनात थॉमस रिटरचे पुस्तक आले. तो त्यांच्या बरोबर भारतात आला. चेन्नईला वगैरे नाडीकेंद्रात आपले भविष्य पाहून झाले. तरीही समाधानी नव्हता. नंतर त्याने ओशोंच्या आश्रमात प्रवेश घेतला. त्या नंतर त्याला एक नाडीग्रंथ केंद्र कोरेगाव पार्क भागात असल्याचे सहज कळले. म्हणून तेथे तो आपले नाडी भविष्य पलनी नामक नाडी वाचकाकडून पाहून आला. प्रभावित झाला. नंतर तो पलनीच्या बरोबर शांतीदीक्षा करायला तमिलनाडूभर फिरला. पलनी व शिवषण्मुगम यांच्या घरी राहून आला. पुढे माझ्याशी ओळख झाली वगैरे... पुर्वी पॉवेलशी नाडीबद्दल बोलताना मार्टीन त्याला म्हणाला होता, मी भारतात जाणार नाही पण एक दिवस नाडी ग्रंथ माझ्या हातात येतील. ते बोलणे तसे राहीले... ... एक दिवशी संध्याकाळी प्रागच्या नाडी केंद्रात एक जण बराच वेळ वाट पहात बसल्याचे माझ्या लक्षात आले. मी बाहेरच्या वेटींगरुममधे बसून आलेल्या लोकांशी चर्चा करत असे. पॉवेलच्या लक्षात आणून दिल्यावर त्याने त्या दिवसाच्या वेळापत्रकात पाहून सांगितले की यांचा नंबर आता येईल. त्या वेळी तुम्ही आत या. त्याप्रमाणे त्यांचे वाचन चालू झाले. एक बाई त्याच्यासाठी झेकमधे भाषांतर करायला होती. वाचन चालू झाले. एका नाडीग्रंथ ताडपट्टीच्या पॅकेटातील शेवटच्या ताडपट्ट्च्या पानावर नाडीवाचक शिवषण्मुगम वाचता वाचता थांबला व ते पॅकेट अचानक मार्टीनच्या हातात देत त्याला म्हणाला, ते ताडपट्ट्यांचे पॅकेट तसेच हातात धरा असा आदेश या शेवटच्यापानावर आला आहे.. नंतर त्याने खुलासा केला की अगस्त्य महर्षींचा आदेश आहे की याला या ताडपट्टीचे पॅकेट त्याच्या हातात द्यावे. या पॅकेटात तुझी नाडीपट्टी सापडणार नाही पण दुसऱ्या ईरुसुळू मेरुरेहा आंगठ्याच्या ठसेवाल्या पॅकेटात ती मिळेल. त्याप्रमाणे पुढील पॅकेटात त्याची पट्टी सापडली. त्यात त्याचे नाव मार्टीन. तेच त्याच्या वडिलांचे नाव. आईचे नाव एना. पत्नीचे नाव मोनिका (जी भाषांतराचे काम करत होती) असेल असे म्हटल्यावर त्याने सगळ्या नावांना मानेने हो म्हणून मान्यता दिली. पुढे त्या पट्टीत म्हटले होते, ' अरे तू माझा शिष्य, पुर्वजन्मीचा मच्छमुनींचा अवतार आहेस. तुला भेटायसाठी मी येथे आलो आहे. तुझी इच्छा होती ना की माझ्या नाडी ग्रंथ पट्ट्या तुझ्या हाती याव्यात म्हणून. ती तुझी इच्छा पुर्ण करायला मगाशी मी नाडी वाचकाला त्या नाडीपट्टीचे पॅकेट आवर्जून तुझ्या हाती द्यायला सांगितले होते.' या शिवाय अनेक घटनाक्रम सांगून महर्षी म्हणाले, 'पॉवेलसह त्याने सदुरगिरीला जावे. तेथे त्याला मी प्रत्यक्षरुपात दर्शन देईन.' मला माझ्या सदुरगिरीच्या अदभूत यात्रेची आठवण झाली. त्यानंतर वेदारण्यमच्या अगस्ती महर्षींच्या मंदिरात त्यांचे झालेले दर्शन आठवून रोमांच उभे राहिले. नंतर मार्टीन वेळोवेळी भेटत राहिला. अगदी प्राग एअरपोर्टहून निघताना पर्यंत. भाषेचा अडसर असल्याने तो खुणांनी आमच्याशी विशेषतः रवीशी बोलत असे. प्राग विमानतळावर निरोप देताना त्याने मला माझ्या ह्रदयाला स्पर्ष करून हातानी थोपटत होकारार्थी अंगठा वरकरून आणि नंतर माझ्या डोक्याला हात लावत नकाराची खुण करून आता तुझे पुढील कार्य आस्था, श्रद्धा, प्रेम भावाने करावे. बुद्धीच्या वाटेने आडकाठी होऊन महर्षींचे कार्य करता येणार नाही. असे जणु खुणांनी सुचवले, मध्यंतरी एकदा त्याने शक्तिपात करून हस्तस्पर्षाने मला समाधीचा आनंद घडवला. ते पुढील कथनात सविस्तर येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: