महर्षी अत्री जीव नाडी
विंग कमांडर (नि)शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१0४९.
नाडी ग्रंथ भविष्य ही संज्ञा आता मराठी लोकांना गेल्या १०-१५ वर्षांच्या काळात थोडीफार परिचित झालेली आहे. दक्षिण भारतात तमिळ भाषेत ताडपत्रावर कूट लिपितून कोरलेले भविष्य आता महाराष्ट्रातील अनेक शहरात पहायला उपलब्ध आहे. रामायण, महाभारत, भागवत या धार्मिक ग्रंथांतून सामान्यपणे उल्लेखलेल्या अनेक महर्षींच्या नावाने या नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्या उपलब्ध आहेत. त्यापैकी अगस्त्य, महाशिव, कौशिक म्हणजेच विश्वामित्र, वसिष्ठ, शुक, भृगु, काक भुजंदर (भुशुंडी) आदि महर्षींची नावे असलेल्या नाड्या सध्या जास्त प्रचलित आहेत.
ज्यांना नाडी ग्रंथ भविष्याची काहीच माहिती नाही त्यांच्या सोईसाठी[1] थोडक्यात असे सांगता येईल की या महर्षींनी आपल्या प्रज्ञाचक्षूंच्या सामर्थ्यावर अनेकांचे जीवनपट पाहिले व आपल्या निर्देशनाखाली शिष्यगणांकडून त्याची काटेकोरपणे नोंद केली व अनंत काळपर्यंत मानवाला उपयोगी पडणाऱ्या नाडी ग्रंथ भविष्याची निर्मिती केली.
नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी पुरुषांना उजव्या व स्रियांना डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा त्यावरील सर्व रेषा ठळक व व्यवस्थित दिसतील अशा बेताने उमटवून द्यावा लागतो. त्या रेषांच्या ठेवणीवरून महर्षींनी १०८ विभाग पाडलेले आहेत. नाडीकेंद्रात त्यापैकी उपलब्ध पट्यांशी त्या ठशांना पडताळून त्यांच्याशी जुळणाऱ्या पट्यांचे पॅकेट आणले जाते. नंतर त्यातील एकएक पट्टीतील थोडा थोडा मजकूर वाचून तो जातकाच्या माहितीशी जुळतो का, ते पाहिले जाते. बऱ्याच न जुळणाऱ्या पट्या बादकरून शेवटी एक अशी पट्टी येते की त्यातील सर्व माहिती जातकाशी तंतोतंत जुळते. उदाहरणार्थ स्वतः नाव, आई-वडिलांचे, पती-पत्नीचे नाव, जन्मतारीख, वार, महिना, साल, व त्यावेळची आकाशस्थ ग्रहांची स्थिती, शिक्षण. नोकरी-व्यवसाय, भावाबहिणींची, मुलाबाळांची संख्या व अशी काही माहिती जी केवळ त्याच व्यक्तीला ताडता येऊ शकते. त्यानंतर जेंव्हा व्यक्ती आपणहून मान्य करते की पट्टीतील सर्व माहिती १००टक्के जुळते आहे. तेंव्हाच त्या पट्टीतील कूट तमिळ लिपितील मजकूर एका ४० पानी वहीत सध्याच्या तमिल भाषेत उतरवला जातो. त्यावरून भाषांतरकाराच्या मदतीने एकएक वाक्याचा सावकाश अर्थ लाऊन ते सर्व एका ऑडिओ कॅसेटमधे रेकॉर्ड करून मग ती वही व कॅसेट ग्राहकाला सुपुर्त केली जाते व मग मेहनताना पूजारुम मधील शिव-पार्वतीच्या, महर्षींच्या फोटो समोर ठेवायला सुचवले जाते.
कुंडलीताल बारा स्थाने व्यक्तीच्या जीवनातील महत्वाच्या अंगांचा विचार करतात. त्याच धरतीवर लग्न स्थानाच्या भविष्याला जनरल किंवा पहिल्या नंबरचे कांडम असे म्हटले जाते. त्यात सर्व स्थानांचे त्रोटक भविष्य कथन केले जाते. एखाद्याला कोणा एका विशिष्ठ स्थानाचे जास्त भविष्य जाणून घ्यायचे असेल तर उदा. विवाह विषयक ७ नंबरचे, नोकरीसाठी १० नंबरचे कांड काढून त्यातून विशेष माहिती मिळवता येते. नाडी ग्रंथ भविष्याचा पाया पुनर्जन्म व कर्मविपाक सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे पुर्वजन्मातील पाप-पुण्यांच्या कमीजीस्त प्रमाणात व्यक्तीला विविध मंदिरांना भेटी तेथे पुजा-अर्चना, अन्न-वस्त्र-जलदान, अपंगांना मदत करण्याला सुचवलेले असते. शिवाय जपसाधनाही सुचवली जाते. सध्याच्या धामधुमीच्या जीवनरहाटीत तो जप करण्याचा भार आपण नाडी केंद्राला सांगून करवून घेता येतो. त्याच्यासाठी वेगळा मेहनताना घेतला जातो.
हा झाला नाडी भविष्य जाणण्याचा सामान्य प्रकार. या शिवाय जीव नाडी असा एक विशेष नाडीचा एक प्रकार आहे.त्यात महर्षींशी आपण सद्यपरिस्थितीत आपल्या समस्या कथन करून त्यावर सल्ला-विचार विनिमय करून त्यातून वाट शोधू शकतो. सामान्य नाडी पट्टीतील मजकूर वाचून त्याचे भाषांतर करून सांगताना अनेकदा तात्कालिक समस्यांवर महर्षी काही भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांचा विरस होतो. नाडी ग्रंथ भविष्या बद्दल नाही नाही त्या शंका येऊ लागतात. जीवनाडीतून अशा समस्यांचे-शंकांचे समाधान होते.
अत्री जीव नाडी पहाण्ची पद्धत
अशीच एक जीव नाडी पुण्याच्या केंद्रात उपलब्ध आहे. ती म्हणजे महर्षी अत्रींची जीव नाडी. या जीव नाडी भविष्याच्या ताडपट्या दिसायला साधारण अन्य नाडी ग्रंथ भविष्याच्या पट्ट्याप्रमाणेच दिसतात. अत्री जीव नाडीच्या साधारण १०० ताडपट्ट्या तीन पॅकेटमधे विभागून एका दोरीने ओऊन घट्ट बांधून ठेवलेल्या असतात. एवढ्याच ताडपट्ट्यातून सर्व उत्तरे दिली जातात.
प्रार्थनाः जातकाने १२ कवड्यांचे दान टाकण्या आधी हात जोडून महर्षींची मनोमन प्रार्थना करावी की, “हे महर्षी अत्री आणि माता अनुसूया मी आपल्या चरणांवर माथा टेकून विनम्र होऊन, मला सध्या पडलेल्या समस्येवर, काळजीवर, वैचारिक गोंधळावर मार्गदर्शन करावे अशी विनंती करतो. ”
या नंतर जातकाने कवड्याचे दान टाकून, आपले म्हणणे भाषांतरकाराला थोडक्यात आपल्या भाषेत सांगावे. तो ते नाडी वाचकाला तमिळमधे सागंतो. त्यानंतर नाडीवाचक तीन पैकी एका पॅकेमधील एक ताडपत्र पडलेल्या दानाच्या अनुशंगाने काढून वाचायला लागतो. त्यानंतर त्या वाचनातून सांगितला जाणारा मतितार्थ, भाषांतरकार आपणास समजाऊन सांगतो.
महर्षी अत्री व माता अनुसूया सत-चित-आनंदमय शिवतत्वाला वंदन करून उत्तर देताना अनेकदा माता अनुसूया त्यांच्याशी संभाषण करतात. त्यातून अनेक वेळा जातकाचा प्रश्न जास्त समर्पक शब्दात अत्रींना पुन्हा विचारतात तेंव्हा आपल्या मनातील शंका की नाडीवाचकाला प्रश्न नीट कळला असावा किंवा नाही ही शंका दूर होते. सामान्यपणे समाधानकारकच उत्तर मिळते. कधी कधी महर्षींच्या उत्तरातून अनपेक्षितपणे कारणमिमांसा ऐकून थक्क व्हायला होते. अनेकदा जातकाच्या अपेक्षेच्या विपरीत पण त्याला हितकारक सल्ला दिला जातो. त्यामुळे तात्कालिक खट्टू व्हायला होते. पण शांतपणे विचार करून आपले विचार-मत तपासून पाहण्याची संधी मिळते.
एखाद्याला घाटातील रस्त्याने जात असताना पुढील वळणांचा, धोक्यांचा अंदाज येत नाही तेंव्हा जर उंच उडणाऱ्या हेलिकॉप्टरमधून पहाणी करणाऱ्याने त्याला वरून पाहून, “ रस्ता निर्धोक आहे किंवा मार्गात पुढे अडथळा आहे. परत फीर किंवा मार्ग बदल ” असा इशारा द्यावा, असाच काहीसा सल्ला महर्षींच्याकडून मिळतो. सामान्यपणे शांती-दीक्षा करण्याच्या कठीण व खर्चिक अटी सांगितल्या जात नाहीत. पण कधी जर अनिवार्य असेल तर मात्र ते उपायही सांगितले जातात.
माता अनुसूया देवींचा करुणापुर्ण भूमिकेमुळे अनेकदा असे पाहण्यात आले आहे की जातकाला पडलेल्या कठीण समस्यांची करुणा येऊन आईच्या ह्रदयाने माता अनुसूया, पती अत्रींची विनवणी करून काही उपाय सुचवावा अशी गळ घालतात. त्याला साद देत एरव्ही थोडे कठोर मुनी त्या जातकाला उपायांची सोडवणूक देतात. प्रश्न वैयक्तिक असतात. त्यासाठी कधी कधी बरोबरच्या व्यक्तींना, अगदी पती वा पत्नीलाही बाहेर पाठवले जाते. तर कधी छोट्या कथेने उत्तराची सुरवात होते. अंती त्याचा संदर्भ प्रश्नांशी कसा लागतो ते ध्यानात येते. जातकाची नियत, भावना व गरज आदी सर्व बाबी उत्तरातून कळून येतात. नाडी वाचकाने जर काही उत्तर देताना गफलत केली तर त्याचा वा जातकाचा कान पकडायला महर्षी कमी करीत नाहीत. त्यामुळे कधी कधी हे वाचन काही काळापुरते बंदही असते. अनेकांनी या जीव नाडीचा अनुभव घेतला आहे. आलेल्या अदभूत अनुभवामुळे कुठलेही कार्य करताना अत्रीमहर्षींचा सल्ला, आशीर्वाद घेऊन सुरवात करण्याचा काहींचा प्रघात आहे. माझ्यासारखा एका विशिष्ठ दिवशी महर्षींना फुले व दीप दर्शवण्याचा परिपाठ करतो.
अति श्रीमंतांपासून गरीब सामान्यांपर्यंत, नट-नट्यांपासून ज्योतिषशास्त्रांपर्यंत अनेक थरातील, वर्गातील, व्यवसायातील व्यक्तींनी आजपर्यंत जीननाडीचे अनुभव घेतलेले आहेत. ही जीव नाडी थेरगाव येथील डांगे चौकातील लक्ष्मीतारा कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील श्री. ईश्वरन यांच्या नाडी केंद्रात उपलब्ध आहे. प्रत्येक प्रश्नाला रु.१००. प्रमाणे एकावेळी पाच प्रश्न विचारण्याची सोय आहे. फोन – ०२०-२७२७४२४७. सोमवारी बंद.
नाडी ग्रंथ भविष्याची वेब साईट (naadiguruonweb.org) सुरु करण्याची प्रेरणा याच जीवनाडी वाचनातून श्री. उदय व सौ. प्रिती मेहता कुटुंबियांना मिळाली. आज त्यांच्या वेबसाईटचा लाभ परदेशातील लोकही घेऊ शकतात.
लेखक – विंग कमांडर (नि) शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१४९.
फोटो १ - सौ.प्रिती मेहता जीवनाडीच्या तीन पॅकेट्स व १२ कवड्यांसमावेत प्रश्न विचारण्याच्या मुद्रेत
फोटो २ – महर्षी अत्री.
फोटो – १ फोटो - २
.[1] ‘नाडी ग्रंथ भविष्य- चला नवग्रह यात्रेला’ या मासिकाच्या आकारातील पुस्तकात (पाने- ५६, किंमत ५० रुपये) सविस्तर माहिती, महाराष्ट्रातील सर्व नाडी केंद्रांचे पत्ते, फोन नंबर, फी व अन्य माहिती दिलेली आहे. इच्छुकांनी लेखकाशी संपर्क करावा.