Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

शुक्रवार, ३ जून, २०११

नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली..... | mr.upakram.org

नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली..... | mr.upakram.org: "द्राविड भाषाभ्यासक पंडित डॉ. जी. जॉन सॅम्युएल यांची भेट ..
प्रेषक शशिओक (गुरू, 06/02/2011 - 13:54)

'सध्या सर तमिळभाषेला जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा मान मिळवून देण्यासाठी संशोधन कार्य करतायत, त्यात अत्यंत व्यस्त आहेत. तुमची अपॉईंटमेंट आहे का? काहीही झाले तरी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काही मिळणार नाहीए.' आम्हाला रिसेप्शनवरच कडकडत्या तमिळमिश्रीत इंग्रजी उच्चारांमधून समज दिली जाते. 'हो हो, तेवढी मिळाली तरी चालेल ना.' असे म्हणून आम्ही इकडे तिकडे पहात, ह्या ठिकाणाहून चाललेल्या कामाचा आवाका समजावून घेण्याचा प्रयत्न करतो....

चेन्नईहून साधारण २० किमी दूर, सोलिंगनल्लूर जवळच्या चेम्मणचेरी नावाच्या उपनगरातली एक भव्य आणि आधुनिक वास्तू. इन्स्टिट्यूट ऑफ़् एशियन स्टडीज असा भलामोठा बोर्ड आपले स्वागत करतोय. वास्तूच्या चोहोबाजूंनी झाडी लावलेली असल्याने मधे शिरताच उत्साहवर्धक थंडावा आपल्याला प्रफुल्लित करून जातो... ह्या इमारतीत पहिल्या मजल्यावर तिचे मालक आणि संचालक डॉ. जी. जॉन सॅम्युएल बसतात... एक द्राविड भाषाभ्यासक पंडीत म्हणून जॉन सॅम्युएल आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त आहेत. विशेषत: द्राविड भाषा, त्यांच्या लिपी ह्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी प्रसिद्ध केलेले भलेमोठे प्रबंध नुसते अभ्यासायचे म्हटले तरी काही वर्षे जातील. त्यांचे अनेक शोधग्रंथ आत्तापर्यत प्रकाशित झालेले आहेत. भिंतीवरती सगळीकडे जॉन सॅम्युएल यांनी विविध देशात गाजवलेल्या सेमिनार्स मधले फोटो टांगले आहेत. अमेरिका, जर्मनी, कॅनडा, मलेशिया, इंग्लंड, कोरिया, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, श्रीलंका अशा विविध देशातल्या भाषाभ्यासकांशी चर्चा करताना, तेथील सभा संमेलने गाजवतानाचे त्यांचे ते फोटो तमिळ घरातील देवघराची आठवण करून देतील इतक्या दाटीवाटीने सगळीकडे लावलेले दिसतात. पदका-पारितोषिकांचे तर पेवच फुटले आहे, ज्यावरून अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील सभा-संमेलनात त्यांचा गौरव झाल्याचे सहज कळावे.

भव्य काचेच्या खोलीमधे भल्या मोठ्या चकचकीत एग्झिक्युटीव्ह टेबलामागे डॉ. जी. जॉन सॅम्युएल विराजमान असतात. एका बाजूला ते जागतिक महत्त्वाच्या कामात गढलेत, दुसर्या बाजूला त्यांचा स्टाफ विविध कामाचे आदेश घेण्यास येरझार्याम मारतोय. त्यांचे पी.ए. मधूनच त्यांच्या मोबाईलवर ऍपोंईंटमेंट्स फिक्स करतायत. आपल्या सरांना काय हवे, काय नको याची सेवाभावाने यथोचित काळजी घेतली जातेय. त्याच वेळेला, आगंतुक पाहुण्यांनी त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून हटकले जातेय, बाहेरच थांबवून आत साहेबांचा मूड कसा आहे ते पाहून थोडा वेळ भेटीकरता आत सोडले जातेय. 'काय आहे, कित्येक नवखे अभ्यासक सरांच्याकडे स्वत:चे निबंध वगैरे आणून देतात. त्यांच्या टेबलावर अनेक तमिळ, इंग्लिश, जपानी व अन्य भाषेतील प्रकाशित - अप्रकाशित ग्रंथांच्या चवडीच्या चवडी सरांची नजर पडावी म्हणून खोळंबलेल्या असतात. ते तमिळ भाषेचे तज्ज्ञ मान्यवर आहेत ना, ते म्हणतील ती पूर्व दिशा'. त्यांच्या कार्याची प्रारंभिक ओळख करून द्यायला त्यांचे शिष्य तत्पर असतात.

मी डॉ. सॅम्युएल आणि माझ्यासोबत असलेल्या एका व्यक्तीची एकमेकांशी ओळख करून देतो. हळूहळू त्या दोघांचे संभाषण इंग्रजीऐवजी तमिळमधून होऊ लागते. तमिळमधून बोलणे साधल्याने संभाषणात आणखी रंग भरतोय असे वाटते. शब्दांवरून मी अंदाज लावतोय, बहुतेक प्राचीन तमिळ वाङ्मयापासून सुरुवात करून तिरुकुरल, संगम तमिळ, चोळा तमिळ, अशी विविध काळांमधे घडलेली भाषेची स्थित्यंतरे चर्चिली जाताएत. तमिळ भाषेचा दक्षिण पूर्व आशियाई देशांतील प्रचलित भाषा आणि त्यांचा इतिहास, लिपीवर पडलेला प्रभाव, तमिळ देशाच्या इतिहासाचे भारताच्या इतिहासातील महत्त्व, द्राविड देशांची भौगोलिक रचना आणि संस्कृती आदि त्यांच्या आवडत्या विषयांवर आधारित चर्चा रंगलीए. एकमेकांना विविध भाषेतील उदाहरणे वगैरे दिली चालली आहेत.. एकमेकांच्या मतांचे यथेच्छ खंडन-मंडन चालल्यासारखेही वाटते, एकमेकांशी संदर्भांची देवाणघेवाण चाललीए. एकूणात डॉ. जी. सॅम्युएल आणि ती व्यक्ती दोघेही रंगलेली दिसतात.

दिलेली १५ मिनिटांची वेळ संपूनही एखाद-तास होऊन गेला असावा. तेवढ्यात डॉ. जी. सॅम्युएल पाणी, कॉफी वगैरे आदरातिथ्याखातर मागवतात. अव्वल मद्रासी कडक्क कॉफीपान चाललेले असतानाच, स्वत:चा नुकताच प्रकाशित झालेला एक ग्रंथ पुढे करत डॉ. जी. सॅम्युएल म्हणतात, 'हे बघा ह्या विषयावरचे माझे नवे पुस्तक. अशोककालीन समाजात, तमिळ लोकांचा व्यापार उद्यम सार्याय जगात पसरलेला होता असे म्हणतात ते कशावरून ते मी यात दाखवले आहे.' त्या व्यक्तीने पुस्तक हातात घेतले, आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या शिलालेखाच्या चित्राला उद्देशून म्हटले, 'हीच मी मगाशी सांगितली ती ब्राह्मी लिपी.' असे म्हणत ती व्यक्ती एकदम त्यातील अक्षरे वाचायला सुरुवात करते.... 'सम्राट अशोकाच्या सुप्रसिद्ध शिलालेखाचा हा एक भाग आहे... बहुधा कलिंग युद्धानंतर तिथले काही लोक दक्षिणेत आले त्या काळातला असावा... बघा ना, त्या अक्षरांत निव्वळ ब्राह्मीच नाही तर कल्याणी, ग्रंथ लिपींमधलीही काही वळणे आहेत... बघा मी दाखवतो...'

एव्हाना डॉ. सॅम्युएलांचे डोळे मोठ्ठे झालेले असतात. ते स्वत:च त्या पुस्तकाचे लेखक असूनही त्याचे मुखपृष्ठ जणू काही पहिल्याप्रथमच पाहत आहेत असा निरागस चेहरा करून म्हणातात, 'ही लिपी ब्राह्मी असावी, पण त्यात नेमके काय म्हटले आहे, हे मला आज तुमच्यामुळे ज्ञात होत आहे.' माझ्याकडे वळून डॉ. जी. सॅम्युएल म्हणतात, 'येस्स, कमांडरा, यिट यिस्स् यिण्डीड भ्रामी आन्ड ग्रंतम् स्क्रिप्ट्... बट्ट वर्डींङ्स् व्यार नॉट्ट क्ळ्यार टु मी... ऐयाम् ळऽर्निंङ् यिट् फ़ार् फ़र्स्ट् टैम् टुडे...!!' असे ते म्हणत असतानाच, ती व्यक्ती 'सर, देऽर यिस्स् सम्थिङ् मोऽर् वेऽयिटिङ् फ़ार् यू टुडे...' असे म्हणत, स्वत: लिहिलेला एक शोधप्रबंध त्यांच्यासमोर ठेवते. हात न उचलता केलेले लेखन तमिळभाषेतही आहे; हे दाखवणारा, तमिळ भाषेच्या आतापर्यंत माहिती नसलेल्या एका लिपीप्रकारावरचा तो विस्तृत शोधप्रबंध मग विविध उदाहरणांसह चर्चिला जातो.

डॉ. जी. सॅम्युएल आनंदलेले असतात. लगोलग त्यांच्या इंडॉलॉजीवर काम करणार्याव उपसंस्थेचे सदस्य होण्यासही सुचवतात. रीतसर कॉफीपान झाल्यावर खूष झालेले डॉ. सॅम्युएल त्यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ़् एशियन स्टडीजने विविध अंगांनी केलेल्या अभ्यासावर आधारित अनेक ग्रंथ-पुस्तके मागवतात. त्यातली काही पुस्तके सप्रेम भेट म्हणून बरोबर नेण्याचा आग्रह धरतात. पुढील आंतरराष्ट्रीय तमिळ साहित्य संमेलनाचे निमंत्रण पाठवण्यासाठी म्हणून आमचे पत्ते लिहून घेतात.

...नंतर काही काळाने ताडपट्ट्यांवरील तमिळ भाषेतील कूटलिपीलेखन - अन्वयार्थ ह्या नावाने एक थिसिस पेपर २०११ सालच्या आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी सादर करण्यासाठी पाठवला जातो. नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे... असा अभिप्राय त्यातून मांडला जातो.

...हे सर्व शोधकार्य करणारी, डॉ. जी. जॉन सॅम्युएलना भेटलेली, भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांचा खंदा समर्थक असलेली ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नाडीग्रंथातील भाषा-लिपींच्यावर अभ्यासकार्य करणारे.... हैयो हैयैयो होत....
»

* प्रतिसाद

चान
प्रेषक आनंद (शनि, 05/28/2011 - 11:36)

ही ओळख हैयो हैयैयोंची च असणार हे सुरवातीलाच लक्षात आल होत.
पुढच्या ओळख लेखाचा इंतजार आहे.
»

* प्रतिसाद
* आनंद यांना व्यनि पाठवा

दुकान
प्रेषक धम्मकलाडू (शनि, 05/28/2011 - 13:01)

इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीजची साइट. साइटवरून बरेच काही लक्षात येते आणि बरेच काही कळत नाही. कपिला वात्स्यायन आणि न्यायमूर्ती कृष्ण अय्यर ही नावे निगडित आहेत. असो. पण दुकान बरेच मोठे आहे. ह्या हैयो हैयैयो ह्यांच्या ह्या संशोधनाबद्दल अधिक माहिती द्यावी.

'येस्स, कमांडरा, यिट यिस्स् यिण्डीड भ्रामी आन्ड ग्रंतम् स्क्रिप्ट्... बट्ट वर्डींङ्स् व्यार नॉट्ट क्ळ्यार टु मी... ऐयाम् ळऽर्निंङ् यिट् फ़ार् फ़र्स्ट् टैम् टुडे...!!'
म्हणजे काय? कमांडर म्हणजे कोण? फार हसलो.

'तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?'
'तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?'
»

* प्रतिसाद
* धम्मकलाडू यांना व्यनि पाठवा

..... सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा....
प्रेषक शशिओक (रवि, 05/29/2011 - 05:45)

..... वो तो है अलबेला हजारो में अकेला ....

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९
»

* संपादन
* प्रतिसाद

धन्यवाद
प्रेषक रिकामटेकडा (रवि, 05/29/2011 - 13:32)

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. कृष्ण अय्यर यांची कारकीर्द नॉटविथस्टँडिंग, त्यांना पंचवीस वर्षांपूर्वी असेही वाटे की महेश योगी उडू शके. आता तर त्यांचे वयही झाले आहे. दुकान मोठे आहे याच्याशीही सहमत.
»

* प्रतिसाद
* रिकामटेकडा यांना व्यनि पाठवा

??
प्रेषक सहज (शनि, 05/28/2011 - 13:25)

...नंतर काही काळाने

म्हणजे पहीली भेट कधी झाली?
मधल्या काही काळात कितीवेळा गाठीभेटी झाल्या?
हा थिसीस पेपर स्पॉन्सर केला गेला आहे का?
»

* प्रतिसाद
* सहज यांना व्यनि पाठवा

वा
प्रेषक धनंजय (शनि, 05/28/2011 - 14:20)

व्यक्तीची ओळख छानच. शोधकार्याची ओळखही द्यावी, ही विनंती.

ता. क. : शीर्षक आणि मजकूर यांच्या ताळमेळात काही तफावत आहे काय?
»

* प्रतिसाद
* धनंजय यांना व्यनि पाठवा

कुटलिपी वरील लेख
प्रेषक शशिओक (सोम, 05/30/2011 - 11:42)

धनंजयजी,

हैयोंच्या ह्या विषयावरच्या शोधकार्याची जुजबी ओळख उपक्रम दिवाळी अंकातील लेखनकार्यातून झालीच असेल. त्यात वेळोवेळी चर्चेत आलेले विविध मुद्दे विचारात घेऊन विविध शोधसंस्थांच्या कार्याला पुरक असे बदल करून त्यांनी त्यांचा शोधप्रबंध इंग्रजी व तमिळमधे मांडला आहे. नाडीग्रंथात आढळून येणारी लिपीच नव्हे, तर भाषाप्रकार या दोन्हीहीबद्दल शास्त्रीयरीत्या वस्तुनिष्ठ माहिती मांडण्याचा त्यांचा मानस आहे. त्यातूनच नाडीग्रंथातील काव्याचा आस्वाद वाचकांना - अभ्यासकांना घेता येईल ही झाली दुय्यम बाब.

हैयोंच्या अभ्यासकार्यावर तमिळभाषाशास्त्राच्या अंगाने आपल्या व प्रियाली यांच्या परदेशातील संपर्कातील भाषातज्ज्ञ, शरद सारख्या मराठी भाषातज्ज्ञ व येथील काही तमिळ भाषींकडून वैचारिक आदानप्रदान, अन्य भाषा-लिपीतील वाङ्मय यावर चर्चा अपेक्षित आहे.

...ओक अणि नाडी असेल तर धागा न वाचताच पुढे ढकलला जाण्याची शक्यता असते. म्हणून शीर्षकात वैचित्र्य. इतकेच.

नाडीग्रंथ काव्यातून जे कथन केले जाते त्यातून काय निष्पन्न होते याचा अभ्यास नंतर केला जावा. अभ्यास कार्यानंतर लोकांना उपरती होईल किंवा ते नाडीमहर्षींच्या कथनांकडे आकर्षित होतील असा ओकांचा समज अजिबात नाही. नाडी ग्रंथ कर्ते महर्षीच्या कथनाची फोड करून सांगण्याची कला ती भाषा अवगत असलेल्यांकडून व्यवसाय म्हणून कथनांचा वापर जुन्या काळापासून केला जात आहे. ओकांच्यामुळे त्यांचे व्यवसाय चालतात असे मुळीच नाही. ओकांनी अभ्यासून पुस्तकांतून अनुभव सांगितले म्हणून कोणी नाडीग्रंथांना पहायला जाणार किंवा जाणार नाही असे अजिबात ठरत नाही. ज्याची नाडी पट्टी लिहिली गेली आहे तो, ती वाचून घ्यायला जातो असा अनुभव येतो. ओकांची नाडीग्रथांशी ओळख होण्याआधी ही केंद्रे चालत होतीच. जसा अन्य व्यवसाय चालतो तसाच नाडी कथनाचा चालतो. व्यवसायात कालांतराने काही अपप्रवृत्ती येतात. म्हणून महर्षींच्या प्राचीन कामाला त्यामुळे हीन वा कमी लेखायचे कारण नाही.

ओकांवर नाडीतून अर्थार्जनाचे लांछन लाऊन, त्यांच्यावर व्यक्तीगत पातळीवर हीन आणि हिणकस निंदा, शक्यतो पाणउतारा करून नाडीग्रंथांना खोटे ठरवता येणार नाही. हे आपल्यासारखे विचारवंत जाणता. वैयक्तिक आकस व वैचारिक बैठक यामुळे काहींना नाडी ग्रंथांची सत्यता मान्य करायला जड जाते आहे. ठीक आहे. त्यांना मान्य नाही तर नाही. त्याची चिंता ओकांना अजिबात नाही.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९
»

* संपादन
* प्रतिसाद

हैयो हैयैयो
प्रेषक राही (शनि, 05/28/2011 - 14:28)

हैयो हैयैयो यांची विद्वत्ता त्यांच्या जालीय लिखाणावरून लक्षात आली होतीच.मुळात लिपीशास्त्र हे अत्यंत किचकट शास्त्र आहे.त्यातून प्राचीन लिप्यांचे वाचन करताना अनेक भाषांचे आणि त्यात कालानुसार झालेल्या स्थित्यंतराचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असते.लिपीच्या वस्तुनिष्ठ चिकित्सेसाठी कोणतेही साहित्य वर्ज्य मानण्याचे काहीच कारण नाही.भारतीय प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास करताना त्यात धार्मिक वाङ्मय फार मोठ्या प्रमाणावर असल्याचे जाणवते. देव,धर्म,ज्योतिष्य, भविष्य ,तंत्र अशा विषयांनी साहित्याचा फार मोठा भाग जर व्यापलेला असेल तर प्राचीन समाजव्यवस्थेचा अभ्यास करणार्‍याला तो दुर्लक्षून चालणार नाही. हैयो हैयैयो सारखे विद्वज्जन उपक्रमावर वावरत आहेत हे आमच्यासारख्या वाचकांचे भाग्यच आहे.
जाता जाता : डॉ. जी. जॉन् सॅम्युएल् हे प्राचीन-अर्वाचीन द्राविड भाषांचे तज्ञ असूनही त्यांना ग्रंथलिपी आणि ब्राह्मी लिपी वाचता येत नव्हती हे काहीसे खटकले.
»

* प्रतिसाद
* राही यांना व्यनि पाठवा

हैयो हैयैयो सारखे विद्वज्जन उपक्रमावर वावरत आहेत हे आमच्यासारख्य
प्रेषक शशिओक (रवि, 05/29/2011 - 05:41)


डॉ. जी. जॉन् सॅम्युएल् हे प्राचीन-अर्वाचीन द्राविड भाषांचे तज्ञ असूनही त्यांना ग्रंथलिपी आणि ब्राह्मी लिपी वाचता येत नव्हती हे काहीसे खटकले.

.....तसे आम्हाला देखील खटकले.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९
»

* संपादन
* प्रतिसाद

हैयो हैयैयो
प्रेषक राही (शनि, 05/28/2011 - 14:30)

दोनवेळा पाठवला गेल्याने प्र.का.टा.आ.
»

* प्रतिसाद
* राही यांना व्यनि पाठवा

प्रकाटाआ
प्रेषक राही (शनि, 05/28/2011 - 14:35)

प्रकाटाआ
»

* प्रतिसाद
* राही यांना व्यनि पाठवा

अर्धाच परिचय!
प्रेषक चित्रा (रवि, 05/29/2011 - 02:30)

हैयो हैहैयो यांचे नाव न देता हा परिचय काहीसा अर्धवट वाटतो.
अशा प्रकारचा काहीसा नाट्यमय (पडदा उघडल्यासारखा) परिचय पूर्वी काही पाठ्यपुस्तकात काही विशिष्ट आदरणीय व्यक्तींबद्दल असे - जसे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक इ. म. गांधी आणि लो. टिळक हे सर्वांना त्यांच्या इतर कार्यामुळे माहिती आहेत, वास्तविक आयुष्यात त्यांची नावे अनुक्रमे मोहनदास करमचंद गांधी आणि बाळ गंगाधर टिळक अशी आहेत हे मुलांना व्यवस्थित माहिती असे. तरी ह्या नाट्यमयतेने अशा व्यक्तींचे एक वेगळेच दर्शन घडत असे, मनावर ठसत असे. अशा प्रकारचे दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. पण त्याचबरोबर हैयो यांचे खरे नावही (त्यांच्या संमतीने) कळवायला हवे होते असे वाटले.
»

* प्रतिसाद
* चित्रा यांना व्यनि पाठवा

नाट्यमयतेने अशा व्यक्तींचे एक वेगळेच दर्शन घडते, मनावर ठसते
प्रेषक शशिओक (रवि, 05/29/2011 - 05:35)

नाव न देता हा परिचय
हैयोहैयैयो येथे सदस्य आहेत. आपला परिचय ते योग्य वेळी करून देतील अशी आशा करू या.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९
»

* संपादन
* प्रतिसाद

हय्यो
प्रेषक प्रियाली (रवि, 05/29/2011 - 11:18)

हय्योंची वेगळी ओळख आवडली. अन्यथा ते उपक्रमावर नाडीप्रेमी आहेत, तमिळ भाषेचे जाणकार आहेत, फुकट वकीली बाणा दाखवून वेळ वाया घालवण्यात आणि खरडीतून भांडाभांडी करण्यात धन्यता मानतात अशी माझी कल्पना होती.
»

* प्रतिसाद
* प्रियाली यांना व्यनि पाठवा

हय्योंची वेगळी ओळख आवडली.

नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे...
प्रियालींना ओळख आवडली...
चला. हे ही नसे थोडके!
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

ग्यानबाचे तर्कट

सिद्ध करा: क > १०००
उपलब्ध माहिती: क > ख
गृहीतकः ख ≡ ० (mod ७)
∴​ क > १०००, QED
--
बाकी, भारतीय ज्ञानाची आणि तिच्या अभ्यासाचा दावा करणार्‍या हैयो हैयैयो यांची महती बाटग्यांच्या प्रमाणपत्रामुळे मान्य करतील अशा सुडोसेक्युलर मनोवृत्तीचे कोणीही उपक्रमींमध्ये नसावेत असा माझा अंदाज आहे.

वा!

नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे... असा अभिप्राय त्यातून मांडला जातो.
अभिप्राय महत्त्वाचा वाटला!
बाकी वर श्री. राही म्हणतात त्याप्रमाणे "हैयो हैयैयो यांची विद्वत्ता त्यांच्या जालीय लिखाणावरून लक्षात आली होतीच" त्याला बळकटी मिळाली. श्री. हैयो हैयैयो यांची ओळख करून देण्याची 'इश्टाईल' आवडली! :)
श्री. हैयो हैयैयो यांना 'वस्तुनिष्ठ' संशोधनासाठी शुभेच्छा!
एक शंका मनात आली: पुढे कालांतराने, श्री. हैयो हैयैयो यांना अभ्यासाअंती समजले (सिद्ध झाले) की नाडीमधे पुरातन तमि़ळ असली तरी त्या आधारे चाललेला भविष्य कथनाचा धंदा ही मिथ्या असून तो एक लोकांना लुबाडण्याचा धंदा आहे तर श्री ओकांची भुमिका काय असेल?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अभ्यासविषय

>>एक शंका मनात आली: पुढे कालांतराने, श्री. हैयो हैयैयो यांना अभ्यासाअंती समजले (सिद्ध झाले) की नाडीमधे पुरातन तमि़ळ असली तरी त्या आधारे चाललेला भविष्य कथनाचा धंदा ही मिथ्या असून तो एक लोकांना लुबाडण्याचा धंदा आहे तर श्री ओकांची भुमिका काय असेल?
नाडी आधारे चाललेले भविष्यकथन हे हैयो हैय्यैयो यांच्या अभ्यासाचा विषय आहे याविषयी साशंक आहे. हैयो हे बहुधा फक्त लिपीविषयीच अभ्यास करीत आहेत.
(उलट हैयोंच्या अभ्यासातून "अ" ही गोष्ट सिद्ध झाली तर "ब" ही आपोआप सिद्ध समजण्याचा ओक यांचा हेतू असावा. नाडीमधली लिपी कोणती हा खरेतर एकूण नाडी या विषयावर असलेल्या आक्षेपांपैकी क्षुल्लक आक्षेप आहे. त्या आक्षेपाला अवास्तव महत्व देऊन आणि त्याबाबत वारंवार लिहून ओक मोठ्या/मूळ आक्षेपांना बगल देऊ पहात आहेत).
नितिन थत्ते

+१

सहमत आहे.
खुद्द हैयो हैयैयो यांनीच दिवाळी अंकात लेख लिहून असली काहीशी सुरवात केली होती असे वाटते.
यानिमित्ताने धनंजय यांचा हस्तलिखित साखळीपत्रांतील लिपी आणि आकड्यांची कूट-नोंद - लेख पुन्हा वाचायला मजा आली.

अरेरे

नाडी आधारे चाललेले भविष्यकथन हे हैयो हैय्यैयो यांच्या अभ्यासाचा विषय आहे याविषयी साशंक आहे. हैयो हे बहुधा फक्त लिपीविषयीच अभ्यास करीत आहेत.
असे असल्यास हैयो हैय्यैयो यांना विनंती आहे की याद्वारे सत्यासत्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून किमान लोकांची चाललेली लुबाडणूक थांबवावी.
श्री हैय्यैय्यो,
सदर अभ्यास हा प्रताधिकाराच्या अधिन असेल का? नसल्यास तो तसा ठेवावा ही विनंती जेणेकरून त्याचा भविष्यातील असा दुरूपयोग / परवानगीवाचून केलेल्या उपयोगावर काहितरी करता येईल. शिवाय तुमच्यावर असा लेख लिहिण्याची / तुमचा अभ्यासविषय उघड करण्याची परवानगी तुम्ही श्री ओक यांना दिली नसल्यास हे त्यांनी परस्पर जाहिर करणे हेच मुळात अशिष्ट आहे असे मला वाटते.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

लेख कळला नाही

मला हा लेख कळलाच नाही. ह्या लेखात जन्माने भारतीय नसलेल्या एका भाशा अभ्यासकाने भारतातील एका भाशेचा अभ्यासक म्हणून मोठे वलय प्राप्त केले आहे. पण त्या व्यक्तीच्या अभ्यासाचे क्शेत्र 'प्रांतिय अस्मिते' मुळे संकुचित आहे. ह्याला बहुदा कारण त्या व्यक्तीला सुरवातीला (विद्यार्थी दशेत असताना) ज्या व्यक्तीकडून (शिक्शकाकडून) शिक्शण मिळाले ती व्यक्ती 'प्रांतिय अस्मिते' मुळे संकुचित दृश्टीची होती, असे वाटते.
पण ह्या गोश्टीचा श्री. हैयैयो ह्यांच्या काय संबंध कसा लावला गेला? तर, त्या परदेशी व्यक्तीने त्यांना कमांडर म्हटले, कॉफी पाजली, आत्मियतेने संभाशण केले.
श्री. हैयैयो यांचा ब्राह्मी लिपीवरील लेख माझ्या वाचनात अजून तरी आलेला नाही. उपक्रमवर असेल तर तो कृपया त्याचा दुवा द्यावा. नसेल तर, त्यावर त्यांनी लवकरच लेख लिहावेत, अशी मी त्यांना विनंती करतो. 'इंद्राचे व्याकरण' हे काय लफडे आहे? ते मला कळलेले नाही आहे. तसेच, त्याचा तमिळ भाशेशी काय? व कसा संबंध आहे? तेही कृपया समजवावे.

'इंद्राचे व्याकरण' हे काय लफडे आहे?

सतीशजी,
१) आपण लिहिल्यापासून मी तेच लेखात शोधतोय !
२) हैयोंनी ब्राह्मीवर उपक्रमसाठी पुढील दिपावली अंकासाठी लेख लिहिवा अशी मी त्यांना विनंती करतो.
३) डॉ. सॅम्युएल विदेशी नाहीत. आनंद व विजय अमृतराज प्रमाणे तमिळ ख्रिश्चन आहेत.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

चुकलेच! ते लफडे माझेच होते.

अर्ध मनात राहिले व अर्धे लिखाणात उतरले. याबद्दल माफि असावी. मी स्वत: ब्राह्मी लिपी काय आहे?, तिची पार्श्वभूमी काय आहे? तीचे व्याकरण कसे होते? इत्यादी गोश्टी सध्या समजून घेण्याचा इटुकला-पिटुकला प्रयत्न करीत आहे.
काही ठिकाणी महेश्वराचे व्याकरण, ब्रह्स्पतिचे व्याकरण, 'इंद्राचे व्याकरण', बोपदेवाचे व्याकरण असे उल्लेख वाचायला मिळाले होते. त्या विशयीची माहिती शोधत आहे. श्री. हैयैयो यांना ब्राह्मी लिपीची सखोल माहिती आहे, असे तुमच्या लेखातून व्यक्त होत आहे. हे कळताच मी वरील सगळी माहिती मनात गृहित धरली व थेट (आयतेच मिळतेय म्हणून हावरटासारखे, मॅनर्स न पाळताच, ) विचारले, 'इंद्राचे व्याकरण' काय आहे? कारण ते मला कळले कि, त्यानंतर ब्रह्स्पतीचे व त्यानंतर महेश्वराचे व्याकरण समजून घेण्याची माझी मनिशा आहे. पाणिनीला नंतर बघून घेईन.
Graamatic kaartika या ग्रंथात खालील पदे आहेत असे एका इंग्रजी लेखात आढळले. मी माझ्या परीने त्याचे मराठिकरण केले आहे.
समुद्रवत् व्याकरणं महेश्वरे। - समुद्रासमान व्याकरण महेश्वराचे।
तदर्ध कुंभौद्धरणं बृहस्पतौ। - त्याचा अर्थ मडक्यात मावेत इतका केला बृहस्पतीने
तद्भागाच्चशतं पुरंदरे। - त्याचे (ही) एक शतांश केले पुरंदराने (इंद्राने)
कुशाग्र बिंदुत्पतितौ हि पाणिनौ।। - त्याचे गवताच्या पात्याच्या अग्रावर मावेल इतके (सुक्श्म) केले पाणिनीने
या सार्‍यांचा ब्राह्मी व त्याआधीच्या लिपी, दक्शिणेतल्या लिपींशी संबंध आहे हे जाणून होतो. महेश्वरी संकेतपद्धतीतून ब्राह्मी व दक्शिणेच्या लिपी विकसित होत गेल्या. तमिळ मला कळत नाही. तिचे व्याकरण, लिपीचा पूर्व-इतिहास याबद्दल माहिती हवी आहे. श्री. हैयैयो यांकडून ती मिळाली तर माझा खूप वेळ व परिश्रम वाचतील, असे वाटले होते.
-आळशीराम

पांघरुणे

लेख जरा उशीराने वाचला. सहसा तुमचे लेख वाचल्यावर हाती तथ्य बरेच कमी लागते. याचे कारण अनेक गोष्टींवर पांघरुणे घातली असतात.
हैयो हैयेयो यांच्या परिचयाचा लेख वेगळ्या शीर्षकाखाली देणे हा त्यातीलच प्रकार. (एखाद्याचा परिचय त्याच्या चरित्राने, नावाने न देण्याचा प्रकारही त्यातलाच असावा.)
श.ओ., है.है. आणि जॉनसाहेबांची भेट कधीची ? इन्स्टिट्युट ऑफ् एशियन स्ट्डीज नामक संस्था सरकारी का खाजगी? त्यांचे कार्य काय? ब्राह्मी लिपीशी काही संबंध असावा का?
इन्स्टिट्युट आणि जॉन यांचे पूर्ण नाव दिल्याने थोडे तथ्य हाती लागले. धम्मकलाडूंनी दुवा दिल्यावर काम अधिक सोपे झाले. पण अधिक माहिती मिळायला हवी असे वाटले.
पहिली गोष्ट म्हणजे ही इन्स्टिट्युटा सरकारी अनुदानावर चालते. अशावेळी तिचे मालक म्हणून जॉन यांचा उल्लेख गैरलागू आहे. जॉनसाहेब हे तामिळभाषेतले जाणकार व संशोधक.
ही भेट २००७ साल पूर्वीची असायला हवी. कारण २००७ साली हेच जॉनसाहेब पुण्यातील नाडीपरिषदेसाठी आले होते.
संस्थेचा उद्देश हस्तलिखितांचे पुस्तकात तेही संगणकीय स्वरुपात (युनिकोड) आणणे. हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. याच उद्दीष्टात नाडीग्रंथाचे असे परिवर्तन हे देखिल उद्दिष्ट आहे (असावे. ज्योतिषशास्त्रविषयक ग्रंथ हे त्यांच्या उद्दीष्टांपैकी एक आहेत.) हे ग्रंथ या स्वरुपात आले तर त्यातील माहितीचा शहानिशा हा कुणा नाडीकेंद्राला पैसे न देता करता येईल असे धरतो.
हैयो हैयेयो यांनी एक शोधनिबंध लिहिला होता हे आपण ऐकतोच. हा शोधनिबंध कुठे आला असे विचारले असता त्यांनी तो जाम्बुद्वीपक शास्त्राभ्याससंस्था असा केला होता. हे दुसरे तिसरे काहीही नसून इन्स्टिट्युट ऑफ एशियन स्टडीजचे भाषांतर आहे. एखाद्या विशेष नामाचे असे चुकीचे भाषांतर करणे हे गैर आहे. हाही पांघरूण घालण्याचा प्रकार असावा असा संशय येतो.
नाडीग्रंथवाले दुकानदार आपल्या व्यावसायिक कारणासाठी नाडीग्रंथांना लोकांच्या हाती लागू देत नाही हे आपण जाणतोच. अशी पांघरुणे घालणे, नेमक्या माहितीचा उल्लेख गाळणे हे अशाच व्यावसायिकतेचा भाग असण्याची शक्यता वाटते.
प्रमोद

+१

पूर्ण सहमत.
अमक्या प्रसिद्ध व्यक्तिला भेटून तमक्या प्रकारे आवाक् केले हे सांगण्यामागे काय उद्देश आहे बरे. ना संशोधनाची ओळख ना संशोधकाचे खरे नाव.

उपक्रमाचे धोरण

हा लेख मुख्यत्वे कुठल्या ज्ञात व्यक्तीचा परिचय देत नाही. (लेख शीर्षकातील व्यक्तीबद्दल नाही. शीर्षकातील व्यक्ती काम करते, त्या संस्थेबद्दल नाही, आणि लिपिशास्त्राबद्दल नाही.)
"माहिती" म्हणून हा लेख पटत नाही. एक तर उपक्रम सदस्याबाबत व्यक्तिगत टिप्पणी तरी आहे, नाही तर हा काल्पनिक तरी आहे. बहुधा व्यक्तिगत टिप्पणी आहे.
व्यक्तिगत टिप्पणी प्रशंसा करणारी आहे, हे चांगलेच आहे. (व्यक्तिगत असूनही उपक्रमावर चालू शकते.) अधूनमधून आपण सर्वच एकमेकांची प्रशंसा करतो. पण स्वतंत्र लेख म्हणून नव्हे, तर हैय्यो हैहैय्यो यांच्या एखाद्या धाग्याखाली हा प्रशंसेचा धागा हलवण्यात यावा.
सुप्रसिद्ध (किंवा अप्रसिद्ध) व्यक्तीबद्दल वस्तुनिष्ठ माहिती देणारा लेख श्री. शशिकांत ओक यांनी जरूर लिहावा. आजकाल मराठीमधून ललित लेखन करण्यासाठी कितीतरी संकेतस्थळे उपलब्ध आहेत. अशा कुठल्या ठिकाणी श्री. ओक यांनी हे लेखन द्यावे.

खुसपटे

उपक्रमवरील माहितीच्या देवाणघेवाणीचा ट्रॅफिक इतर कोणत्यातरी संस्थळाकडे वळविण्याचा हा खोडसाळ प्रयत्न आहे काय? इतरत्र याच लेखाला १७ किंवा अधिक प्रतिसाद न मिळाल्यास प्रगल्भतेच्या शर्यतीत ते 'इतर' संस्थळ मागे पडू शकेल अशी भीती धनंजय यांना असावी की काय?
तांत्रिक सबबींच्या वापराने अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या कुटिल डावाचा निषेध. त्यापेक्षा शब्दकोष लिहावा, जीमेल गॅजेट बनवावे, विकिपीडियावर मराठीच्या संवर्धनात मदत करावी!

हाहा

गमतीदार. हा धागा हलवावा, ही माझी सुचवणी गंभीरपणे केलेली आहे. म्हणून या हसर्‍या दादीनंतर हा गंभीर उपप्रतिसाद :
स्वतंत्र लेखांसाठी उपक्रम संकेतस्थळाचे "माहितीविषयक" निकष थोडे कडक आहेत, आणि प्रतिसाद-धाग्यांसाठी ढिले आहेत. असा अनुभव आहे. धागा स्वतंत्र न ठेवता उपधागा म्हणून हलवला, तर धोरण चांगले पाळले जाते आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यही.
शोधून बघता असे दिसते आहे, की श्री. ओक यांनी हा लेख अन्यत्रसुद्धा दिलेला आहे. त्यामुळे माझा अनाहूत सल्ला द्यायची खरे तर गरज नव्हती - तो मार्ग श्री. ओक यांनी आधीच अंगीकारला होता.
वेगवेगळ्या संकेतस्थळांवरची रहदारी त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे वेगवेगळी असते. एखाद्या लेखाला अन्य स्थळ सुचवले तर रहदारी कमी-अधिक होणारच, पण तो प्रकार आनुषंगिक आहे.
उद्या कोणी म्हणेल की कॉलेजच्या वर्गात नाटक करणार्‍याला मी "रंगशाळा बरी" असा सल्ला दिल्ला, तर मी रंगशाळेतील वाहातुक वाढवायचा प्रयत्न करत आहे. आता माझा हेतूलासतो की कॉजेजच्या वर्गात अधिक शैक्षणिक प्रक्रिया व्हावी. पण हा माझा हेतू साधायच्या सल्ल्याने रंगशाळेतील वाहातुक वाढली तर मी काय करू?

धन्यवाद

कोलॅटरल डॅमेज म्हणून रहदारी घटली तर ते ठीकच आहे. तुमचा उद्देश लबाड नव्हता हे मला माहितीच आहे. उलट, ओकांचा लेख प्रकाशित होणे हेच मी डॅमेज मानतो, वर्दळ इतरत्र गेली तर ते उपक्रमसाठी कोलॅटरल रिपेअरच ठरेल.
ओकांच्या जाहिरातींना मी अभिव्यक्तीस्वातंत्र्यात गणत नाही. किंबहुना, ओकांच्या जाहिरातींची गंभीर चर्चा करताना त्यांच्या प्रचारस्वातंत्र्याचा निषेध हा एक मुद्दा अपरिहार्य असावा असेही मला वाटते.

वाहातुक वाढली तर मी काय करू?

मित्र हो,
धागा खाली पाडून त्याची रंगत वाढली आहे. नविन वाचकांना अधिक माहिती मिळेल.
वेगवेगळ्या संकेतस्थळांवरची रहदारी त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे वेगवेगळी असते. एखाद्या लेखाला अन्य स्थळ सुचवले तर रहदारी कमी-अधिक होणारच, पण तो प्रकार आनुषंगिक आहे.
धनंजय म्हणतात ते अगदी बरोबर आहे. अन्य संकेत स्थळांची वाहतूक वाढावी म्हणून त्यांनी वरील प्रतिसाद दिला असे म्हणता येणार नाही.
'हा धागा 'घालवावा'. असा त्यांचा अभिप्राय नाही.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९


- Sent using Google Toolbar"