कार्यशाळा 2013 मधील एक प्रांजळ मुलाखत
शशिकांत ओक श्री. चडचणकरांची मुलाकत घेताना म्हणतात, 'नाडी ग्रंथांनी तुम्हाला काय दिले? असे विचारले तर पटकन उत्तर देणे शक्य होत नाही. पण श्री. चडचणकांनी दिलेले यावरचे उत्तर समर्पक व प्रतिनिधिक स्वरूपाचे होते. ते म्हणाले की त्या मंदिरांच्या वातावरणात मनाला अत्यंत आनंद व मानसिक समाधान लाभले. असे ते फोन वरून बोलताना म्हणाले होते. याचा आवर्जून उल्ळेख केला होता. ते म्हणतात, मला कर्मधर्म संयोगाने श्री जाजू म्हणून स्नेही नवग्रहयात्रेला सोबत म्हणून मिळाले. पण असे अनेक नाडीप्रेमी आहेत की त्यांना नवग्रह मंदिरांना भेटी द्यायची फार इच्छा असते. घरच्या नातलगांसाठी शांती दीक्षा करायची असते पण दूरचा प्रवास, भाषेची अडचण व योग्य सोबत नसल्याने त्यांचा विरस होतो. अशांसाठी काही यात्रा कंपन्यांनी पुढाकार घेतला तर चांगले होईल. ओकांनी म्हटले की आणखी एक नमूद करावेसे वाटते. अने्कना नाडी म्हटले की तिटकारा वाटतो. काहींना ओकांचे चऱ्हाट वाटते तर काहींना मेजवानी वाटते एक वाचक म्हणून श्री. चडचणकर म्हणतात कि या विषयातील सर्व माहिती ते रस शोषून घेतल्या प्रमाणे ते वाचन करतात.