अदभूत
घटनांची रेलचेल जानेवारी - फेब्रुवारी २०१४ची दक्षिण भारत यात्रा - भाग
1
"असे ती कामना पूर्ण करण्या येथील मित्र, गुरु, आणि अनोळखी अकस्मात"
यात्रेत घडलेल्या
ऑटो रायटींगमधील संदेश
पुढील काळात
या यात्रेतील घटनांच्या संदर्भात काय
काय घडले याची नोंद असावी म्हणून हे लेखन...
1.
चेन्नईतील कार्यशाळा
जानेवारीत २०१४ सालची कॅलेडर्स भिंतीवरती लटकली. मोबाईलवर काही तरी चाळा करत असता एकदम डॉ. महालक्ष्मी
हे नाव समोर आले.
कोण बरं या? असा
विचार आला. आठवले...
या
बाईंचा परिचय आपण चेन्नई ताडपत्रावरील लेखनावरच्या कार्यशाळेत झाला.
त्यावेळी
त्यांना हैयो हैय्यैयो यांच्या अभ्यासाचा तमिलभाषेमधील विषयवस्तु लेख
वाचायला
दिला होता.
त्यांनी
डॉ. जी
जॉन सॅम्युएल यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज संस्थेने व मिनिस्ट्री ऑफ
कल्चर च्या नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स त्यांच्या एकत्रित सहयोगाने आखलेल्या
आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत एका
नाडी पट्टीतील श्लोकाची फोड करावी
असे
वाटले म्हणून विनंती केली होती. त्यातील
चार ओळींच्या एका श्लोकावर दहा मिनिटे भाष्य त्यांनी केले होते! नंतर
आम्ही तुम्हाला तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून
नाडीग्रंथातील भाषा व लिपी वरील
आमच्या
कार्यशाळेत बोलावले तर याल का?
असे
विचारले असता, हो जरूर मी म्हणालो होतो....
...नंबर
कॉलची घंटी वाजायला लागली. अरेच्या फोन चुकून लागला वाटतं म्हणता म्हणता, ‘हॅलो, सोलांगा...’ असा बाईचा आज कानी आला. मी त्याच
असाव्यात असे वाटून नववर्षाच्या शुभेच्छा म्हणून वेळ साजरी केली. त्यांना इंग्रजीत
संभाषणाला कष्ट पडतात हे जाणून, मी कोण वगैरे सांगून, सध्या काय चाललय असे मोघम
विचारले. त्या म्हणाल्या, ‘मी सध्या
कार्यशाळेच्या आखणीत गुंतलेय’. त्याबाबत
मी विचारणा केली तर त्या म्हणाल्या, ‘अहो
तुम्हाला नाही का मी सांगितले होते की आमची इन्स्टिट्यूट मॅन्युस्क्रीप्टवर कार्यशाळा
घेणार आहे म्हणून त्याची. 20 ते 31 जानेवारीला आमच्या इन्स्टिट्यूटच्या ऑफिसात ती होईल.’
‘मी आलो
तर चालेल का?’ असे मी आपले आधीच्या बोलण्याच्या
संदर्भात विचारले. त्या म्हणाल्या, ‘हो, या ना. पण आता सर्व तयारी झाली आहे. तरीही मी डारेक्टरना विचारून सांगते आणि हो, आपण आधीच्या कार्यशाळेत तमिलमधे सादर केलेला
शोधलेख आम्ही वापरू का? असे ही
विचारते.’ मी, ‘हो
वापरा ना. त्यात काय’ असे म्हणून गेलो. ‘बरं, कळवते तुम्हाला’ म्हटल्यावर फोन बंद झाला. नंतर दोन दिवस मी त्यांच्या
फोनची वाट पाहिली व नंतर घोळ नको म्हणून रेल्वे रिझर्वेशनची चाचपणी केली.
दिवस
जात होते. गुरूचरित्राचे पारायण संपून 3 आठवडे झाले होते. तरी मेहूण घालायला सवड मिळेना. एक छोटी जाहिरात
नजरेला पडली. ‘पुणे ते श्रीशैल्य, कुरवपुर,
पीठापूर अशी 9 दिवसांची यात्रा’ आखणी
त्यात दर्शवली होती. मनात आले की या स्थळांच्या दर्शनाला जायचे काही ना काही
कारणांनी राहून गेले आहे. यात्रा कंपनी बरोबर जावे. पत्नीचा सल्ला घेतला. पण तिला
यात सध्या रस नव्हता. दिवस सरकत होते. चेन्नईहून ही काही निरोप नव्हता. त्या बाईंना
इंग्रजीत बोलायला फार त्रास पडतो त्यामुळे संकोचाने त्या टाळत असाव्यात असे वाटून
मी मेसेज केला की केंव्हा बोलू ते कळवा. त्यांचा उलट मेसेज आला रात्री करा. माझ्या
सुनेशी बोला वगैरे...
‘येस, येस यू कम. बट नो. टीए-डीए.’ मी ओके म्हणून त्यांच्या सुनेला फोनवरून
‘28ला पोहोचतो व दि 31 जानेवरी पर्यंत 2-3
दिवस थांबून परतू. 30 जानेवारीला जेवणानंतरच्या सेशनमधे आमचे भाषण ठेवावे. मी
येताना एका नाडी वाचकाला यायची सोय करत आहे’ असा
निरोप दिला. मात्र आवर्जून मला आपल्या संस्थेचा पत्ता, फोन क्रमांक व कार्यक्रम
पत्रिका पाठवायला सुचवले. त्याप्रमाणे ते सर्व मला ईमेलने समजले.
पुन्हा
खात्री करायला त्यांच्याशी संपर्क करून सांगितले की
आम्ही येऊ इच्छितो. जाण्यायेण्याचा खर्च आमचा आम्ही करू तो प्रश्न नाही. आपण
आम्हास कार्यशाळेत सामिल करणार असाल तर यायचा विचार आहे.
होकार
मिळताच ‘मी येतोय’ असे म्हणून तयारी दर्शवली. हवाईतिकीट काढले. या दरम्यान मला वाटू लागले की मला आयतेच चेन्नईपर्यत जायचे आहे
तर ते काम आटोपल्यावर आपण परस्पर पीठापूर व शक्य ती तीर्थ स्थाने करायला जमतील का
असा नेट वरून अंदाज काढून पहावा. तसे शक्य आहे असे जाणवताच मी रेल्वेची
तिकिटे काढून ठेवली. समजा ते आयत्यावेळी रद्द झाले तर 31ला पुण्याला परतीचे आमच्या
दोघांचे तिकीट काढले. अशी सिद्धता तर झाली. परतीच्या रिझर्वेशनसाठी माझे मित्र
ग्रुप कॅप्टन राकेश नंदाना कळवून ठेवले होते की वेटींग लीस्टवरील नावे
आर्मी कोट्यातून मिळायसाठी व्यवस्था करावी.
ते सध्या हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानकावर एम सी ओ आहेत. त्यांच्याकडे
आर्मीचे कोटे रिलीज करायला सोय होते. ते काम झाले. असो.
27
जानेवारीला सायंकालीन ट्रेनमधे मी विराजमान झालो. 28 ला चेन्नईत पोहोचल्यावर टी. नगरच्या बस टर्मिनसपाशी सोयीच्या एका हॉटेलात राहायची सोय केली व जड बॅग तेथे
ठेवून जवळच्या नाडी केंद्रात प्रवेश केला. त्या केंद्रात खूप वर्षापुर्वी संत
ज्ञानेश्वरांची नाडी पट्टी मिळाली होती. त्यानंतर अनेकदा प्रयत्न करून ही पुढील
श्लोकांचे वाचन झाले नव्हते. त्यासाठी या भेटीत काही शक्यता आहे का ते विचारायला
मी गेलो होतो. ‘साब नहीं है’ अशी
नेहमीची सारंगी केंद्रातील वाचकांनी वाजली. मी त्यांच्याकडून डॉ करुणाकरनजींचा
संपर्क नंबर लावला. ते एस-नो करत म्हणाले, ‘मी सध्या येऊ शकत नाही.’ विरस वाटला. त्यांची मुलगी चेन्नईत राहाते. तिला व्यवस्थित
इंग्रजीत बोलायला येते. म्हणून मी तिला फोन लावला. तेंव्हा कळले की तिचे बाबा यात्रेला
व एकांच्या लग्नाला गेलेत. 30 जानेला परततील. मी 31 जानेवारीला केंद्रात भेटतील
काय असे विचारता विचारून कळवते असे मोघम म्हणाली. एस कुमारांचे शुक-मार्कंडेय जीव नाडी केंद्र याच भागात आहे
तेथे काय परिस्थिती आहे याचा कोनासा घेता कळले की 30 जानेवारीला एस कुमारांचा
जन्मदिवस मनवायला टी नगर भागातील एका कल्याण(लग्न)मंडपम मधे अनेक चाहते व भक्तगण
येणार आहेत त्या सोहळ्याला अध्यक्षस्थानी पुज्य रमणी गुरूजी असतील. आपण तिथे जरूर
यावे. असे निमंत्रण मिळाले.
दि.
29 ला मी अड्यार- तारामणी भागातील डॉ. महालक्ष्मींच्या कार्यशाळेत भेटून 30
तारखेला त्यांचा कसा काय कार्यक्रम ठरवला आहे याचा कानोसा घ्यायला संस्थेच्या
इमारतीत पोहोचलो. सरकारी इमारतीतील बकालपणा जाणवत होता. आवारात संत वल्लूवरांचा
पुतळा व त्यांच्या काव्याच्या ताडपट्टयांची पॅकेट्स व्यवस्थित रचून एक संग्रहालय
म्हणून ठेवलेली होती. ‘फोटो लेन
मना है’ ही तंबीवजा एकमात्र सुचना हिन्दीत उठून
दिसत होती.
आत
पोहोचलो तर नेमके त्यावेळी आधीचे भाषण संपवून डॉ महालक्ष्मी मला पाहताच, ‘वा, आलात का. या, या’ म्हणाल्या. आसपास रेंगाळणाऱ्या काही
मुलींपैकी महालक्ष्मी नावाच्या एकीला थांबवून म्हणाल्या, ‘जरा ते
काय बोलतायत ते सांगायला थांब.’ मग
आमच्यात संभाषण दुभाष्यामार्फत सुरू झाले. ‘आपण तर 28 ला येणार होतात. मी आपले भाषण त्या दिवशी ठेवले होते व वाट ही पाहिली. आपण आलाच नाहीत’. वगैरे बोलणे झाल्यावर मी म्हणालो, ‘झाले गेले, संपले. आता मी
आलोय. उद्यासाठी वेळ देता का?’
‘ओहो. नो. ते तर कार्यक्रम आधी फार फिट्ट झालेत. 31 ला तर शेवटच्या
दिवशी अन्य कार्यक्रम आहेत, तेंव्हा तो दिवस ही बाद आहे.’
‘आता मला
यावर काय उपाय ते सांगा’ म्हणणे मला
भाग पडले.
‘असे करा, आजच उरकून टाका आपले भाषण. मी म्हणालो की ठीक
आहे केंव्हा करू? मग ठरल की 4 ते 5 यावेळेत करा. मी म्हटले
की कोणत्या विषयावर बोलू? त्या म्हणाल्या, ‘ते तुम्हीच ठरवा. इथे सर्वांना इंग्रजीचे
ज्ञान बेताचेच आहे. तमिल मधूनचे आमचा कार्यभाग चालतो.’
तेवढ्यात मला रवीचा फोन आला. ‘सर काय ठरले? मी उद्या केंव्हा निघू? कुठे भेटायचे आहे?’ मी एका नाडीवाचकासह
वसंतमला पण घेऊन येऊ शकतो.’
मी पुण्यातून रवी नामक नाडी वाचक व भाषांतरकाराला सांगून
चेन्नईला बोलावले होते व माझ्या भाषणाला इंग्रजीत सांगायला मदत करायला बोलावले होते. शिवाय नाडी वाचकाला
काही पट्ट्यांचे पॅकेट नमुना वाचनासाठी आणायला सांगितले होते. त्याप्रमाणे माझ्या
फोनवरून तो इशाऱ्याची वाट पाहून होता. ‘मी कळवतो’ म्हणून त्याला सांगून परत काय करावे असे मनाशी ठरवू लागलो.
मी जाताना बरोबर पेन ड्राईव्ह मधून मला हवे ते लेख व अन्य साहित्य
नेले होते. त्यातून पॉवर पॉईंटने काही स्लाईड्स दाखवून मग पुढे लोकांचा कल पाहून
काय ते ठरवायचे होते. एका कॉम्पवर माझा पेन ड्राईव्ह उघडेच ना. दुसरा, तिसरा करत
त्या जुनाट यंत्रांवर काही ना काही कारणाने उघडणे शक्य वाटेना. काय करावे या
संभ्रमात असे पर्यंत मी मोबाईलवरून ईमेल उघडून त्यात नवव्या कांडाचे तमिल श्लोक व
त्याचा इंग्रजीतील महत्वाच्या ओळींचा अनुवाद आठवला. तो मी मोबाईलवरून डॉ
महालक्ष्मींना दाखवून यावर आपणच तमिळ मधे भाष्य करावे असे सुचवले. त्यांनी वाचून
ठरवू म्हणून संमती दर्शवली. नंतर सांबार-भाताचे ढीग असलेले ताट समोर घेऊन जो तो
उभा आडवा हात मारून ते ओरपायला लागला. मी मोबाईलवरून नेट कनेक्शन शोधू लागलो. ते
मिळेना. संत वल्लूवरांचा फोटो काढल्यावर तो बंद पडला होता. हे मी विसरून गेलो होतो.
काय करावे समजेना. आयत्या वेळी फोनने ही असा दगा दिला. पेनड्राईव्ह ओपन होईनात.
वाटले मोबाईलला चार्जींग लावावे, तसे करून पाहिले काही उपयोग नाही वाटून पूर्ण
निराशा आली.
महर्षींच्या प्रार्थनेशिवाय अन्य उपाय सुचेना. चाळा म्हणून तो
सहज पुन्हा पुन्हा बंद करून पुन्हा चालू करायला लागलो. नंतर काय झाले कोणास ठाऊक. जे
नेट कनेक्शन पुणे सोडल्यावर बंद पडले होते, ते असे उघडले गेले जणू काही झालेच
नव्हते. फोटो फंक्शन पुर्णपणे दिसायला लागले! मेल अकाऊंट उघडले व हैयोंनी
पाठवलेल्या मेलाला उघडून नवव्या कांडातील माझ्या संदर्भात घडलेल्या घटना व त्या
आधी वर्तवले गेलेले भविष्य कथन या मेळ कसा लागतो. याची ओळी ओळीतून कथा अर्थवाही
होऊ लागली. डॉ. महालक्ष्मींनी तमिल शब्दांच्या कूट अर्थाचे विश्लेषण करताना मीही
भारावून गेलो. काही ठिकाणी त्या अडल्या तेंव्हा हैयोंच्या इंग्रजीतील अर्थाचे
संदर्भ त्यांना भावले. आता त्यांनी नुसते तमिळ भाषातज्ज्ञ या भूमिकेशिवाय
व्यक्तीचे, गावांचे व घटनांचे अचूक काव्यमय वर्णन वाचून थक्क झाल्याचे नमूद केले.
दुसरी महालक्ष्मी एका मल्टी नॅशनल कंपनीतील अधिकारी होती. ती या कार्यशाळेला दहा
दिवसांची रजा टाकून मुद्दाम आली होती. मला खोदून खोदून विचारून ती घटनांच्या खरेपण
विषयी खात्री करून घेत राहिली. ती म्हणाली, ‘मला योगी राम सूरत
कुमार कोण हे माहित आहे. पण त्यांच्या नावाचे तुकड्याने केलेले वर्णन विचारात
टाकते.’ मी तिला जेव्हा हे सर्व मी माझ्या पुस्तकात सविस्तर वर्णन केले
आहे. असे म्हणताच तिला माझ्या पुस्तकाबद्दल उत्कंठा लागली. लँडमार्क, क्रॉसवर्ल्डमधे
पहा किंवा जिथे डायमंड पॉकेट बुक्स मिळतात तेथे चौकशी कर. मिळतील तिथे. नाही तर
मला सांग, मी तुला पाठवून देईन. काही क़ॉपीज मी पुण्याहून बरोबर आणल्या आहेत. पण
आत्ता त्या तुला द्यायला उपलब्ध नाहीत. काऱण मी आज फक्त भेट घ्यायच्या निमित्ताने
आलो होतो. असो.
माझ्या आधीच्या वक्त्यांना आपले भाषण आवरते घ्यायला आग्रह केला
गेला. त्यांचे भाषण तिकडे चालू असताना दुसऱ्या खोलीत मी व भाषांतरकार दुसरी महालक्ष्मी
नवव्या कांडातील श्लोकांची प्रिंट आउट्स काढून वाचन करू लागलो. त्या उत्साही
भाषांतर करणारणीने आपल्या परीने तमिळ श्लोकांचा अर्थ लावायला चालू केले. ते सर्व
मी ऐकून फक्त एवढेच म्हणालो,
‘अग, तू जरा
थांब. आता डॉ. महालक्ष्मी मॅडम कसा काय अर्थ सांगतात ते पाहू. कारण
तू केलेले स्पष्टीकरण फारच कुठल्या कुठे आहे.’ मग डॉ महालक्ष्मींनी हातात
कागद घेऊन वाचायला चालू केले. मी त्यांना थांबवत थोडी पार्श्वभूमी सांगून ‘आता त्याचा अर्थ शोधा’ म्हणालो. काही ठिकाणी
हायलाईट केलेल्या जागेतील इंग्रजीतील शब्दांमुळे त्यांना ते वाचन सोपे गेले. आता
पौर्णिमा, अमावास्या, ध्यानकूड, अन्ना मलाई, बिंबम वगैरे शब्दांची फोड व त्यातील
काही व्यक्तींच्या, गावाच्या नावांचे संदर्भ वाचून त्या सर्द झाल्या. भ्रूमध्यावर
नजर कशी केंद्रित करायवयाची व नंतर त्यावेळी
काय घटना होतील याचा तपशील व आलेला अनुभव कसा तंतोतंत जुळला याचा प्रत्यक्ष पुरावा
म्हणजे मी, असल्याचे ऐकून त्यांनी आमच्या कार्यशाळेत हे नवे दालन उघडले जात आहे
असे म्हटल्याचे दुसऱ्या महालक्ष्मीने सांगितले. असो. नंतर डॉ महालक्ष्मींनी पाऊण
तास या श्लोकांचा अर्थ कसा लावायचा वगैरे सांगून माझ्याकडे पहात म्हणाल्या, ‘मी इथे जमलेल्या शोधकर्त्यांना
अशी विनंती करते की त्यांनी नाडीभविष्याच्या ताडपट्ट्यांचा शोधन करायला पुढे यावे’. त्या आधी नाडी ग्रंथ म्हणजे काय याचा धावता आढावा
घेतला व त्यांना आलेल्या अनुभवाचा उल्लेख केला. असे मला नंतर बोलताना कळले.
टाळ्यांचा कडकडाट होऊन
त्यांचे भाषण संपले. त्यानंतर उपस्थितांनी मला खुर्चीत नुसते बसलेले पाहून आपण या प्रसंगी बोलावे अशी
विनंती केली. इंग्रजी भाषेची आडकाठी आहे परंतु आमच्यापैकी अनेकांना ती भाषा कळते.
तेंव्हा आपण आपले मनोगत व्यक्त करावे, असा आग्रह केला. मग मी 5 -7 मिनिटात तमिळांनी
या ताडपट्यातील ज्ञान साठ्याकडे फक्त भविष्यकथन म्हणून न पाहता भाषाविषयक शोधकार्याचा
एक दुर्लक्षित विभाग असे मानून शोधकार्यात पुढाकार घ्यावा. लगेच दोन पुरुषांचे व
2-3 महिलांचे हात वर गेले. त्यांनी नंतर माझा पत्ता व फोन टिपून संपर्कात राहून म्हणून आश्वासले. असो. ऐन वेळी
महालक्ष्मींनी दिलेल्या वेळेत, नाडीग्रंथात नमूद केलेल्या श्लोकांचे तमिल
विशेषज्ञाकडून उकलन, बंद मोबाईल अचानक कसा काय चालू झाल्याचे कुतूहल वाटून मी
विचार करत राहिलो. ही तर नांदी होती!