Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

बुधवार, ९ डिसेंबर, २००९

Preview | मिसळपाव

Preview | मिसळपाव: "शब्द गारवाच्या व मिपावाचकांना लेखक प्राचार्य अद्वयानंद गळतगे [1] आपल्या विज्ञान आणि चमत्कार या ग्रंथाच्या वाचकांना तो वाचनाच्या आधी महत्वाची सूचना देऊ इच्छितात.

कोणत्याही नैसर्गिक घटनांप्रकारांना(natural phenomena) – मग ते घटनाप्रकार कितीही अप्रिय असोत किंवा कितीही विलक्षण(बुद्धीली न पटणारे)असोत- विज्ञान निर्भयपणे सामोरे जाते व त्याविषयीचे सर्व पुरावे निःपक्षपातीपणाने तपासते, असे मानणाऱ्या शुद्ध विज्ञानवादी (विज्ञानावर शुद्ध प्रेम करणाऱ्या) लोकांसाठी हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे जो लोक स्वतःला विज्ञानवादी म्हणवून घेतात पण विज्ञानाला अशा (बुद्धीला न पटणाऱ्या) घटनांचा विचार करण्याची आवश्यकता नाही असे मानून त्या घटनांच्या खरेखोटेपणा विषयी पुराव्याची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष (किंवा डोळेझाक) करतात ते लोक वैज्ञानिक दृष्ट्या आंधळे (scientifically blind) ठरतात; आणि जे लोक ही (पुरावे तपासण्याची) आवश्यकता उघडपणे मान्य करतात पण प्रत्यक्षात ती तपासणी न करताच ते घटनाप्रकार खोटे म्हणतात किंवा त्याविषयी संशयवादी भूमिका जाहीरपणे स्वीकारकतात, ते लोक वैज्ञानिकदृष्ट्या अप्रामाणिक (scientifically Dishonest) ठरतात; आणि जे लोक अशा प्रकारांच्या (खरेखोटेपणाविषयीच्या) पुराव्यांची तपासणी करतात, पण ती विज्ञानलाजेस्तव केवळ उपचार म्हणून वरकरणी असते व आतून ते घटनाप्रकार खोटे ठरवण्यासाठी त्यांच्या तपासणीत(त्या घटनांची खोटी उपपत्ती देऊन) लबाडी करतात (मग त्याची कारणे काहीही असोत) ते लोक वैज्ञानिकदृष्ट्या दुटप्पी (scientifically double-dealers) ठरतात. अशा या तीनही प्रकारच्या लोकांना – म्हणजे ‘वैज्ञानिक आंधळे’, ‘वैज्ञानिक अप्रामाणिक’ आणि ‘वैज्ञानिक दुटप्पी’ यांना-प्रस्तूत ग्रंथावर कोणत्याही प्रकारचा अभिप्राय जाहीरपणे व्यक्त करण्याचा शास्त्रीय अधिकार नाही याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. जे लोक वरील तिन्ही प्रकारात बसत नाहीत त्यांनी संपूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय आपला अभिप्राय व्यक्त करू नये अशी विनंती आहे. [2]

[1] साधारण ७८ वर्षाचे श्री. अद्वयानंद गळतगे निवृत्त प्राचार्य असून कर्नाटकातील निपाणीपासून २५-३० किमी दूर भोज या खेड्यातील त्यांच्या मळ्यात वास्तव्य करतात. आज (दि ८ डिसेंबर २००९ रोजी) त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून (नवा फोन नंबर ०८३३८-२९३३९९) त्यांनी मला त्यांच्या या व अन्य ग्रंथातील उद्धृतांना यावेळी सढळपणे वापरण्याची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार मी (शशिकांत ओक) त्यांच्या समारोपातील वरील उरलेले विष्लेषण टाईप करून येथे डकवत आहे. लेखक आडगावी असल्याने त्यांच्याशी ईमेलने संपर्क त्यांच्या निपाणीतील चिरंजीव प्रो. वेदान्त यांच्यातर्फे करावा लागतो. म्हणून त्यांचे प्रतिसाद मिळायला ८-१० दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांना मराठीमधून ‘टाईपकरून उत्तरे पाठवायला शक्य होणार नाही म्हणून इंग्रजीतून उत्तरे पाठवू शकेन’ असे त्यांचे म्हणणे आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
[2] वरील तीनही प्रकारच्या लोकांची वर्तणूक विज्ञानविरोधी व म्हणून ते एक प्रकारचे ‘वैज्ञानिक पाप’ असले तरी पहिल्या दोन प्रकारचे ‘वैज्ञानिक पाप’ विज्ञानरुपी काशीत जाऊन (म्हणजे वैज्ञानिक पुरावे तपासून) धुतले जाऊ शकते. पण शेवटचे ‘वैज्ञानिक पाप’-म्हणजे ‘वैज्ञानिक दुटप्पीपणा’ – हे विज्ञान रुपी काशीत जाऊनच केलेले असल्यामुळे ते कशानेही धुतले जाऊ शकत नाही विज्ञान फसवणुकीवर कधीच चालू शकत नाही, हे त्याचे कारण आहे. वास्तविक ‘वैज्ञानिक दुटप्पीपणा’ हा शब्दप्रयोगच वदतोव्याघाती (self contradictory) आहे. कारण विज्ञान आणि फसवणूक या परस्पर विरोधी संकल्पना असून त्या एकत्र कधीच नांदू शकत नाहीत.

संपुर्ण ग्रंथ भाग १ पाने २२८ व भाग २ पाने ४६७ आपण येथे भाग १ व येथे भाग २ वाचावा
सादरीकरण शशिकांत"

२ टिप्पण्या:

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

ओकसाहेब लेखकाने सुचना केल्या पण आम्हावाचकांना त्या कडक आहेत त्यावर काही उपाय आहे का
काही महत्वाचे भाग आपण त्या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवावेत अशी आपणाला विनंती आहे.

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

ओकसाहेब, लेखकाने सुचना केल्या पण आम्हा उत्सुक वाचकांना कडक आहेत त्यावर काही उपाय आहे का?
काही महत्वाचे भाग आपण त्या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवावेत अशी आपणाला विनंती आहे.

फोनवरील विनंतीवजा आलेल्या या मागणीला मान देऊन मी लेखक प्रा. अद्वयानंगद गळतगे सरांशी संपर्क करून त्यांची परवानगी घेऊन काही भाग लवकरच सादर करीन.