Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

सोमवार, १२ डिसेंबर, २०११

रेकॉर्डींगला स्टूडिओत हजर राहावे


कोल्हापूर संस्थानाने दान दिलेल्या जमिनीच्या संदर्भात एका खटल्याची मोडी लिपीतली ११० वर्षे जुनी कागदपत्रे अभ्यासत असताना फोन वाजतो. खटल्यातल्या महत्त्वाच्या बाबींची टिप्पणे काढून त्या दिवशी न्यायालयात सादर करावयाची विधाने तयार करत असतानाच, "तू कण्णुक्कुल् गाण्याची थीम इंग्रजीत लिहिशील का, प्लीज?"  असा एक लघुसंदेश आलेला असतो. आता एवढ्या गडबडीत हे कसे काय शक्य आहे? करु या नंतर.. असा विचार करून, ती व्यक्ती त्या लघुसंदेशाकडे सध्यापुरते दुर्लक्ष करते.

पण हे ही काम गडबडीचेच असते. सध्या चित्रीकरण सुरु असलेल्या, एका येऊ घातलेल्या हिंदी सिनेमातील गीताचे ध्वनिमुद्रण आजच संध्याकाळी होणार असते. स्टुडिओ आणि गायक कलाकाराचे बुकिंग झालेले असते. मात्र गीत अजून लिहायचे बाकी राहिलेले असते. बरे, हा सिनेमा तमिळ सिनेमाचा रीमेक असल्याने, मूळ तमिळ गाण्यावर बेतलेले हिंदी गाणे लिहायचे ठरलेले असते. अर्थात, चाल ऐकून हिंदी गाणे लिहायला एक दिग्गज गीतकार बसलेले असतातच, पण तमिळ भाषा समजत नसल्याने, त्यांची जाम पंचाईत झालेली असते. दिग्दर्शक त्यांना जी संकल्पना ऐकवतो, ती त्यांना कळल्यासारखी वाटत नाही. मूळ तमिळ गाण्याचा व्हीडीओ दाखवला, तर अधिकच गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. गीताचे बोल लिहून रातोरात त्यावर संगीताचा साज चढवायचा असल्याने. घाई असते. तरीही जर कामाचा दर्जा नसेल, तर सारे पुन्हा पहिल्यापासून करायची तयारी असते. फक्त, दिग्दर्शकाला आणि संगीतकाराला हव्या असणार्‍या इतर कलाकारांच्या एकत्रित तारखा जवळ-जवळ ३-४ महिन्यानंतरच उपलब्ध असतात.

इकडे, कोल्हापूर संस्थानाचे १ आण्याचे जुने धुसर झालेले मोडी लिपीतले स्टॅंप पेपर वाचता वाचता त्या व्यक्तीला आलेल्या लघुसंदेशाचा विसर पडतो. थोड्या वेळाने पुन्हा एक लगुसंदेश येतो. त्यानंतर लगेच फोन कॉलही येतो. नेमकी निर्माण झालेली परिस्थिती थोडक्यात सांगितली जाते, आणि "प्लीज, जरा अर्जंट आहे, लवकर झाले तर खूप श्रम वाचतील.." अशी विनंती केली जाते. आता आली का पंचाईत? इथे आपले हातचे काम सोडूनही जमणार नाही, आणि संगीतक्षेत्रातल्या लोकांना दुरावूनही जमणार नाही. काय बरे करावे? ती व्यक्ती हळूच स्वत:च्या एका मित्राला फोन करून ह्याची माहिती देते - आपल्या वतीने हे काम करण्याची विनंती करते. कामही तसे विशेष नसतेच... एका तमिळ गीताचा सारांश इंग्रजीतून लिहून काढणे, एवढेच...

लगोलग, परस्पर सारांश लिहून काढला जातो. फोनवरूनच ईमेल्सची देवाणघेवाण होते. एकदोनदा फोनवर संभाषणही होते. मध्यंतरीच्या काळात, जमिनीच्या खटल्याच्या संदर्भात मोडी लिपीतली जुनी कागदपत्रे अभ्यासून काढलेले निष्कर्षही न्यायालयात मांडून होतात. त्यानंतरच्या मोकळ्या वेळात, मूळ तमिळ गीतातील भावपूर्ण अर्थ सारांशात अचूक उतरला आहे की नाही, हे ही व्यक्ती स्वत: जातीने बघते, आवश्यक ते बदल करून सारांश लगेच ईमेलने स्टुडिओला पाठवला जातो. त्यातच एकदा हिंदी गीतकाराशीही जुजबी संभाषण होते. तोही तिकडे कामाला लागलेला असतो.

संध्याकाळी सार्‍या दिवसाची कामे आटपल्यानंतर, एका ठिकाणी एका सुहृदांकडे काही मंडळी जमणार असतात. तिथे, तमिळभाषेतील हात न उचलता लिहिता येणार्‍या एका लिपीबाबत पूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ़् एशियन स्टडीज, चेन्नई येथे सादर केलेल्या शोधप्रबंधातील काही भागांवर प्रात्यक्षिकासह स्पष्टीकरण द्यायचे असते. होता होता उशीर होतो. एका बाजूला दुपारच्या त्या हिंदी गीताच्या ध्वनिमुद्रणासाठी रात्री स्टुडिओत हजर राहावे अशी मैत्रीखातर प्रेमळ विनंती वारंवार मोबाईलवरून येत असते. दुसर्‍या बाजूला शोधप्रबंधाच्या अनुषंगाने काही नवीन मुद्दे चर्चेत आल्याने ती चर्चा मधेच थांबवण्यासाठी मन वळत नाही. शेवटी, स्टुडिओतून येणार्‍या फोनवर, "मी जरा बाहेरगावी असल्याने येता नाही येणार, क्षमस्व" असे ह्या व्यक्तीला सांगावे लागते... कोण ही व्यक्ती?

...ही व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नाडीग्रंथातील भाषा-लिपींच्यावर अभ्यासकार्य करणारे.... हैयो हैयैयो होत....

--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: