महर्षी अत्री माता अनसूयांच्या समावेत आपल्या गुरूकुलाताल पारावर बसून आलेल्या प्रश्नार्थी जातकांचे समाधान करताना मागे, नाडीग्रंथांच्या लेखनाचे काम होताना, गोमाता, परणे ससे, पोपटांची जोडी व दत्तात्रयांचे दर्शन... |
अत्री जीव नाडी वाचन 7 सप्टेंबर 2011. सौ.अलका व राजेंद्र पाठक समावेत ईश्वरनजींच्या डहाणूकर केंद्रात विचारलेल्या प्रश्नांपैकी एक नाडी प्रेमींच्या सामान्य माहितीसाठी सादर आहे.
प्रश्न - आम्ही काही प्रकल्प करू इच्छितो. मार्गदर्शन करावे. फिल्म, कथाकथन, लेख, भेटी, भाषाशास्त्र, लिपी आदि अंगांनी अभ्यास, असे प्रकल्प व 14 नंबरच्या कांडात सांगितली जाणारी जप-साधना ज्या त्या केंद्रात सुरू करणे, वगैरे गोष्टींसाठी यासाठी नाडी केंद्र चालकांचा पुढाकार आदि त्यात समाविष्ट आहेत.
उत्तर - आज बुधवारचा दिवस, उत्तरा आषाढा नक्षत्र चालू आहे. माता अनसूया महर्षी अत्रिंना म्हणतेय, 'तो तुम्हाला विनंती करायला पत्नी सामावेत करायला आला आहे. अत्री म्हणतात, 'तू निराश होऊ नकोस. सध्याच्या नाडी केंद्रांची परिस्थिती, त्यांचा या सर्व गोष्टींकडे पहायचा दृष्टीकोन दूषित आहे. ना त्यांना आस्था ना काही नवे करायची इच्छा. पुर्वी गुरू शिष्यांना छळत असत. नंतर तेच शिष्य गुरू बनून त्यांच्या शिष्यांना छळत. तोच खाक्या इथे आहे. त्यांच्या विचारात अत्यंत धिम्या गतीने परिवर्तन घडेल. मात्र तुला या काम साठी अनेक लोक वेगवेगळ्या टप्प्यावर भेटत राहतील. त्यांच्या मुळे केंद्रांची वर्तणूक व आमच्या कार्याकडे पाहायची दृष्टी बदलेल. नव्या मार्गांनी भविष्यकथन घडेल. शिवाय तू हाती घेतलेले प्रकल्प थोड्या चिकाटीने व त्यात विघ्ने येत पार पडतील'.
{प्रत्यक्षात काय काय घडले? या वाचनानंतर कार्यशाळा 2011ची कल्पना पुढे आली. त्यात अनेकांच्या भेटीचे व मुलाखतीच्या चित्र फिती निर्माण झाल्या.व ब्लॉग वर आणि 'यू ट्यूब'वरून प्रसारित झाल्या. दिवाळी अंक ज्योतिष तंत्र मंत्र हा नाडी ज्योतिष विशेषांक, व ग्रहांकित चा मार्च 2013चा नाडी ग्रंथ पुरवणी अंक प्रकाशित होत आहे. राजेंद्र पाठक, मेधा गोखले, विश्वेश देशपांडे, या सारख्या प्रतिभावंत व्यक्तींचे सहकार्य लाभले. डिसेंबर 2012 मधे अचानक पंजाबात जाणे होऊन भृगू महर्षिंच्या दोन केंद्रात कोऱ्या कागदावरून व पवित्र विभूतीच्या अवतरणांमधून भृगुफल कथनाची अदभूत चित्र फित सादर केली गेली. }
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा