Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

Tuesday, 29 September 2009

हा डाव दाभोलकर धुर्तपणे खेळत आहेत

ज्योतिषांची परीक्षा घेण्यसाठी अंनिसने केलेल्या खेळीला उद्देशून दि १८ मे २००८ ला विद्यार्थी गृहात झालेल्या सभेत हे पत्र सादर केले गेले.

विंग कमांडर ओक - नाडी ज्योतिष समर्थक

मी ज्योतिषी वा ज्योतिषाचा अभ्यासक नसलो तरी पण ज्योतिषप्रेमी आहे. आयुका, नारळीकर संख्याशास्त्र विभाग पुणे विद्यापीठ यांना भरीस घालून हा डाव दाभोलकर धुर्तपणे खेळत आहेत. या बाबतीत खालील बाबींचा विचार ज्योतिष परिषदेने करावा.

) ही परिक्षा का? - सध्या दोन्ही (महाराष्ट्र अखिल भारतीय) अंनिसंकडे प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणताही हातखंडा प्रयोग नाही. डॉ. जयंत नारळीकरांना हाताशी धरून लाखो रुपयांची बक्षिसाची बोली करता फुकटात ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याची संधी मिळवण्याकरिता, पुणे विद्यापीठाला आयुकासारख्या संस्थांना त्यात गोवून लेखी बदनाम करण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

) परराष्ट्रातील ज्योतिषांना तेथील विज्ञानवाद्यांनी जर चीतपट करून त्यांचे ज्योतिषशास्त्र शास्त्र नाही असे म्हणावयाला भाग पाडले असेल तर भारतीय ज्योतिषांना त्यांच्या (वैदिक) ज्योतिष शास्त्राला मुद्दाम वेगळे चीत करण्याची गरज काय? मात्र अंनिसचे प्रथमपासून तसे धोरण असल्यांने त्यांची चाल आपण समजू शकतो. पण या तऱ्हेचाछळडॉ. नारळीकरांना करण्याचे काही विशेष कारण असावे. अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ जादूटोणा अघोरी विद्या प्रथा निर्मूलन कायदा सध्या मेलेलाही नाही पण जीवंतही नाही असा कोमात गेलेल्या अवस्थेत असल्याने त्याला प्राणवायू देण्यासाठी ही मोहीम हाती घेणे अंनिसच्या जीवन-मरणा इतके हातघाईवर आलेले प्रकरण आहे.

) ही परिक्षा घेण्याचा यांना अधिकारच काय?
ही परीक्षा ज्या संस्थेतर्फे, ज्या प्रख्यात व्यक्तींच्या देखरेखीखाली केले जाणार आहे, त्यांनीज्योतिषहे शास्त्र तर नव्हेच मात्रथोतांडआहे असे सिद्ध केल्याचे दावा मांडणारी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. अशांनी ही ज्योतिषांची परिक्षा पुर्वग्रह ठेवता करणार असल्याचे सांगणे म्हणजे मनी मावशीने उंदराला मी सध्याउपवासकरत आहे म्हणून तुला मुळीच खाणार नाही असे आश्वासन देण्यासारखे आहे.

) ज्या पुणे विद्यापीठाने ज्योतिषशास्त्राला शैक्षणिक दर्जा देण्यास ठाम नकार दिला आहे, त्या विद्यापीठातील संख्याशास्त्र विभाग या परिक्षेचा निकाल ठरवणार (की लावणार?) असल्याने ही परिक्षा खरोखरच निःपक्षपाती असणार कि नाही याची सर्वसामान्यांना कल्पना आहे. मात्र ही चाल उलट पडून ज्या सामान्य लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे, ते सामान्य लोक ज्योतिष शास्त्राच्या आणखी जवळ करण्याची शक्यता आहे. भले ज्योतिष शास्त्र असो वा नसो ज्या ज्योतिषांच्यामुळे आम्हाला मानसिक भावनिक आधार मिळतो त्यांना नष्ट करणाऱ्या संस्था प्रसिद्ध व्यक्तीं बाबतचा आदर कमी होऊन त्यांच्या अन्य क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल आमच्या मनात एक प्रकारची अढी बसवण्याची कामगिरी या परीक्षेमुळे नक्की होणार आहे.

) पुर्वी गावागावातून वादविवाद करून विजयपत्रे मिळवून हत्तीवरून फिरून दरारा प्रसिद्धी मिळवली जायची त्याचीच ही आधुनिक आवृत्ती आहे.

ज्योतिषांना विनंती –

) ही परिक्षा हा एक सापळा आहे. जे ज्योतिषी वैयक्तिकरित्या खोट्या तात्कालिक लोकप्रियतेच्या आमिषाला बळी पडतील त्यांच्यामुळे ज्योतिष शास्त्राचे हसे होईलच पण भविष्यकाळात अन्य भारतीय (हिंदू) विद्या उदा. आयुर्वेद, योगासने, अध्यात्म अन्य शास्त्रे, यांच्यावर हल्ला करण्यासाठी विरोधकाना धारदार शस्त्र मिळाल्यासारखे होईल.

) हे आव्हान ज्योतिषशास्त्राला आहे. त्यामुळे त्याला संस्थांतर्गत उपाय योजना करून तोड काढली पाहिजे. त्यासाठी सर्व ज्योतिषशास्त्र संचलन करणाऱ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील संस्थांनी एकत्र येण्याची ऐतिहासिक गरज निर्माण झाली आहे. वैयक्तित मतभेद वा मतांतरांना आत्ता स्थान नाही. या निमित्ताने एक संयुक्त समिती स्थापन करून ह्या आव्हानाला एकत्रित कायमचे बंद करायला हवे आहे.

) महाराष्ट्राबाहेरील चौबे-पांडे, त्रिवेदी, श्रीमाली टाईप उत्तर भारतीय ज्योतिषी अशा आव्हानांना तात्काळ बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्यांना समोरील पक्ष किती बनेल धूर्त आहे याची नीट कल्पना नाही. मात्र मराठी लोकांना विरोधकांचे छक्केपंजे चांगलेच ज्ञात आहेत.

) हुशारी हा निकष लावण्यातील त्यांचीहुशारीलक्षात घेण्यासारखी आहे. ८० टक्केवाला , ९० टक्केवाला बरा फक्त गणितात १०० गुण मिळवणारा खरा हुशार असे म्हणूनमार्कशीटवरून हुशारीची प्रतवारी करून / पाडून ज्योतिषीय अंदाज खोटे पाडण्यासाठी खेळी म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.

) या ऐवजी असे निकष असावेत की जे तात्काळ प्रत्यक्ष पडताळता येतील शिवाय ज्योतिषशास्त्रातही त्याची पडताळणी करण्यासाठी विशिष्ट असे आडाखे उपलब्ध असतील. (सहज सुचले म्हणून - आंधळा, पाय वा अन्य अवयव तुटका, पोलिओ, पांढरे कोडवाला व्यक्ती)

) जो जिंकेल त्याला काय मिळणार?

अंनिस आणि पार्टी ही परिक्षा जिंकणार हे ठरवून ठेवलेले उत्तर असल्यानेज्योतिषाचा धंदा कायदेशीररित्या बंद करावाही अट स्वाभाविकपणे मान्य करायला लावणे ही त्यातली मेख आहे. ९० टक्यांखाली उत्तरे बरोबर आली तर ती लढाईअनिर्णितझाली असून जोवर अंनिसकडून तिचानिकाललागत नाही तोवर ती खेळली पाहिजे, असा धर्मराजाला शेवटपर्यंत द्यूत खेळायला भाग पाडणारा त्याला पुरते नागवले जाण्याला प्रवृत्त करणारा हा आधुनिक शकुनीमामांचा घाट आहे.

) पण याही परिस्थितीत ज्योतिषांनी ही परिक्षा जिंकली तर?

अशी अट घालता येईल - अंनिस त्यांच्या विचारांच्या जगातील सर्व संस्थांतर्फेपराजयपत्रदिले जावे. शिवाय यापुढे अन्य कुठल्याही प्रांतात, नव्हे जगात कुठेही जर कोणी अशी परिक्षा करण्याची शक्कल काढेल तर त्याला डॉ. नारळीकर डॉ. दाभोलकर त्यांच्या अखत्यारीतील सर्व ज्योतिषशास्त्र विरोधी संस्था जातीने ज्योतिषशास्त्राच्या बाजूने लढतील ज्योतिषशास्त्रकसे आहे याचे प्रात्यक्षिक करून त्यावेळच्या विरोधकांची तोंडे बंद करतील. असा लेखीकबूलनामात्यांनी द्यायला हवा. तसे काही करता जर ही परिक्षा केली जाणार असेल तर ती क्रिकेटच्या कसोटी सामन्याप्रमाणे एक संपणारी कसोटी ची मालिकाच ठरेल.

) भविष्य काळात जर सर्व अटी मंजूर झाल्या तर अशा परिक्षेसाठी प्राचार्य अद्वयानंद गळतगे. मु. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. पिन५९१२६३. (फोन ०८३३८-२९३३९९ मो. ०९८८६६७८१८३) यांना अन्य पंचांसमावेत नियुक्त केले जावे. ते पंच बनण्यासाठी अत्यंत लायक असण्याची दोन कारणे आहेत.

. पूर्वी सांगलीत गिरिश शहांच्यातर्फे अशा तऱ्हेच्या ज्योतिष शास्त्राच्या कसोटीसाठी प्रा. अद्वयानंद गळतग्यांनी पंच म्हणून काम करण्याचे उत्स्फूर्तपणे मान्य केले होते. ‘त्यावेळी डॉ दाभोलकरांनी शहांना आव्हान देऊन पलायन केलेअसे वर्णन त्यांनी त्यांच्याविज्ञान अंधश्रद्धा निर्मूलनया अंनिसच्या फसलेल्या मोहिमांवर आधारित पुस्तकात केले आहे.

. प्राचार्य अद्वयानंद गळतग्यांनी १२-१३ वर्षापूर्वी डॉ. नारळीकरांना शास्त्रीय कसोटी करण्याला आवाहन करण्यासाठी लागोपाठ पाच सविस्तर पत्रे पाठवून मनधरणी केली होती. (ती पाचही पत्रेबोध अंधश्रद्धेचापुस्तकात समाविष्ट आहेत) त्यावेळी त्यांनी दाद दिली नव्हती. कदाचित त्यामुळे त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली असेल. कारण आता ते म्हणतात की बऱ्याच काळापासून त्यांच्या मनात असे करण्याचे घाटत होते!

-
Post a Comment