Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

गुरुवार, २२ एप्रिल, २०१०

कावळ्यांच्या बाजूने विचार करू - पक्षी तज्ञांचा खुलासा अपेक्षित

http://misalpav.com/node/12007

पिंडविधी आणि कावळा ~ दोन अनुभव !!
Submitted by इन्द्र्राज पवार on Tue, 04/20/2010 - 23:33.

* धर्म
* विचार

२१ व्या शतकाच्याबाबतीत असे म्हटले जात आहे कि विज्ञान कल्पनेपेक्षाही जास्त प्रगती करणार आहे आणि संपूर्ण जगच आता एक छोटेसे खेडे वाटावे अशा रीतीने जुळले जाणार आहे किंबहुना ती प्रक्रिया काही प्रमाणात सुरु झाली आहे असे म्हणण्यासही प्रत्यवाव नसावा. आंतरजालीय जादूने ही किमया तर केली आहेच, पण येथून पुढेही अविश्वसनीय अशा प्रगतीची दारे मानवासमोर उघडली जाणार आहे यात कोणत्याही सुशिक्षित मनाला संदेह न वाटण्यासारखी सध्या स्थिती आहे.


कावळ्यांच्या बाजूने विचार करू - पक्षी तज्ञांचा खुलासा अपेक्षित
new
Submitted by शशिकांत ओक on Thu, 04/22/2010 - 10:29.

मी नमस्कार केला म्हणून आस्तिक ठरत नाही, किंवा केला नाही म्हणून नास्तिक मानला जात नाही. हे एक प्रमाण आहे. त्याच अनुषंगाने "कावळा शिवणे" या प्रकाराकडे पाहिले पाहिजे. जी दोन उदाहरणे दिली त्याचे सार असे आहे कि, ज्याचा पिंडाला कावळा चटकन शिवला तो "पुण्यवान, कोणतीही इच्छा न उरलेला आत्मा " आणि ज्याचाकडे ढुंकूनही पहिले नाही तो "पापी, अजून त्याच्या इच्छा आहेत असा आत्मा"; ही समजूत त्या दोन व्यक्ती जे जीवन जगल्या त्यांच्याशी तपासून पाहिले तर सत्यतेत उतरतात का?

वरील चर्चा ही मानवाच्या दृष्टीकोनातून चाललेली आहे. ते स्वाभाविकही आहे. मी कावळ्यांच्या बाजूने विचार करू इच्छितो. कारण एका पिंडाला तो किंवा त्याचे जमलेले भाईबंद तात्काळ चोची मारुन व दुसऱ्याला अगदी काही फुटाच्या अंतरावरील शेजारच्या पिंडाला एकाही कावळा ढुंकून न पहायला असे काय कारण असावे?
सामान्यपणे 'शाका किंवा मांसा' असे भेद आपण केले त़री कागांच्या दृष्टीने ते दोन्ही खाद्य आहे. मग एका पिंडाला खाणे आणि दुसऱ्याला नाकारणे याचा भेद त्यांनी का करावा? असा भेदभावपूर्ण पसंतीचा त्यांचा स्वभाव धर्म असतो का ?
अन्य वेळा सामान्य भोजनातही त्यांना असे भेदभावाने खाणे पसंत असते का?
पिंडदानाच्या वेळेला ते तसा ते करतात. आपण जातीने लक्ष ठेवून असतो म्हणून हे अनेकदा अनुभवाला येते.
... त्यानंतर सामाजिक विचारवंतांनी कावळे का येत नाहीत - नसावेत यावर काही आडाखे मांडले असावेत. त्यानुसार आपण कावळ्यांचे शिवणे किंवा ना शिवणे मानवी वासनापुर्तीशी, पाप-पुण्याच्या जोडगोळीशी लावणे सोईचे ठरल्याने जोडले असावे.
पण तेच एक कारण असेल असे नाही.
मात्र भक्ष्य म्हणून जे पिंडदानाचे अन्न दिले जाते ते सोडता कावळ्यांची भक्ष्याबाबत मानसिकता काय असते. हा विषय घेऊन पक्षी तज्ञांनी याचा खुलासा अपेक्षित.
या शिवाय काही प्रश्न
१) फक्त कावळेच पिंडाचा स्वीकार करतात का? अन्य पशु-पक्ष्यांना ते खायला चालते. अनेक पशु-पक्षी जवळ आले तर त्यांना नो एंट्री करून फक्त कावळ्यांना ते खाऊ घातले जाते का ते आपणहून खायला जात नाहीत?
२) पक्षितीर्थ या ठिकाणी एक पक्षाचे जोडपे दुपारी बाराच्या सुमाराला विवक्षित भागात येते व ठेवलेले अन्न चाखून परतते. याचे प्रत्यक्ष पुरावे साईटवरून मिळतात.गेल्या काही वर्षांपासून ते तसे येणे बंद झाल्याचे ही वाचायला मिळते.
३)ते पक्षी कोणते? फक्त एकच जोडी का येते?
४) दरवेळा तीच जोडी येते की आलटून पालटून जोड्या येतात?
५) रोज विवक्षित वेळी अन्न मिळतेय असे दिसते तर त्याच प्रकारच्या वा अन्य पक्षांना तेथे जावेसे का वाटू नये किंवा जाता येऊ नये?
४) अनेक पक्षी तज्ञशोधकर्ते विविध जनावरांच्या जगतातील जीवनरहस्ये शोधून त्यातील माहिती रंजकपणे सादर करतात त्यांनी यावर आपले कार्य केले असेल तर यावर अधिक प्रकाश पडेल...

शशिकांत

शुक्रवार, ९ एप्रिल, २०१०

नाडी ग्रंथ कार्यशाळा

Dates: – 24th, 25th & 26th January 2010. 
Venue: – MAP Group, Hyde Park, Vastushree Complex, A - Wing, Office No 7 & 8, Market Yard, Pune - 411037
Contact: – Sinhagad, MahaSainik Lawns Complex, Near National War Memorial, Ghorpadi, Pune 411001

Wing Commander (Retd) Shashikant Oak,
A – 4/ 404, Ganga Hamlet Society,
Viman Nagar, Pune - 411014.
Cell: 098819 01049 (Oak)Email: – shashioak@gmail.com, shashikantoak@yahoo.co.in


पत्रकार निवेदन पत्रक

मा. संपादक महाशय,

महाराष्ट्रातील अनेक नाड़ी ग्रंथ भविष्य प्रेमींच्यावतीने रविवार, दि.२4 ते २६ जानेवारी 20१० रोज पुणे येथे तीन दिवसीय नाडी ग्रंथ कार्यशाळा संपन्न झाली. त्याचा इंग्रजीतील मसूदा -

Work shop on Naadi Granths was successfully conducted on 24 to 26th Jan 2010, Pune.
The following were the participants:-

  1. Princ. Adwayanand Galtage from Bhoj, Karnatak.
  2. Princ. Chiplunkar Vilas B from Jayasigpur, Maharashtra.
  3. Adv Amit Chandra from Mumbai
  4. Shri. NileshBhai Trivdi from Vadodra, Gujrat.
  5. Vikram Phadke, from Saphale-Vasai.
  6. Shri. Sanjeeb Patra - Mumbai
Detailed biodata and photos are appended as Appendix ‘A’

The papers submitted by them are grouped in Section I (study papers) and Sec II (various articles) presented in the workshop. Attached as Appendix ‘B’ and Appendix ‘C‘

Concluding part of the function was conducted in Club House of Ganga Hamlet Hsg Society Viman Nagar on 26th January 2010 at 17:30 hrs. The high feature of the evening was of Atri Jeeva Naadi reading in presence of all. Shri Eashwaran, Atri Jeeva Naadi reader read out loudly the messages from limited leaves in Tamil and for the benefit of all Adv. Amit Chandra translated it in English. In that, Maharshi Atri in conversation with his consort, Mata Anusuya stated that the time has been over for the reading, as the birds have reached back to their resting nests, after sunset. However, the gathering is of my lovers, I take pleasure of addressing them through these records on Palm leaves. T

he phrase he used was unique. "As the birds have returned to their resting nests for night." Naadi reader Shri. Eashwaranji said, “Maharshi says, we generally don’t accept request for replying any queries after 6 o clock in evening. But now we may entertain some of your questions. 

Parag Pradhan son in law of Shashikant Oak came forward to start the questioning. He asked regarding his impending visit abroad. Maharishi Atri replied affirmatively. But cautioned that there may be hitches may create some complications. But before that, everyone was astonished when Eashwaran started the readings from the specific palm leaf by mentioning the names of the persons present. Like Shashikant (Oak), Jay Pakash (Khaladkar), Ashok ( Lachke) and the person with conch shells meaning Prasad (Bodas). A scientist (Dr RN Shukla), person from educational fields – refereeing to Princ Galatage and Prof. Chiplunkar. Some foreigners - there were two German persons attending. And many for the first time. Person suffered heart attacks meaning Subhash (Havre), person sitting immediate right to Eashwaran was Land developer Mansingrao Patil. Thus the atmosphere was surcharged with admiration and reverence.

Sanjeeb Patra from Mumbai was next person to throw cowries for his answer to be sought. He had come especially to meet Wing Commander Shashikant Oak and the other participants of the workshop. He was advised to visit Guru temple on every Thursday with yellow flowers and cloth . ‘After 96 days there would be considerable change as per his wish’ Maharishi Atri assured him. Earlier he suggested, while talking with participents, he was keen to get some of his queries solved in this trip of his avoiding another trip. So he got the answer to seek Maahrshi’s blessings then and there.

The proceeding started with Rudra Paath (रुद्रपाठ) rendered by Prof. Chiplunkar. He further conducted the meeting with his resonding and thunderous voice, chanting Mantras and Ved Mantras. Wing Commander Shashikant Oak gave the outline of what had been the achievements in this 3 days workshop. He narrated the aims and objective and the intended steps towards the next goal of getting the invitation from Indologial Institutes involved in Research work on Palm ole or leaf Tamil language. Getting invitations from some western countries to promote Indian heritage of rich ancient past.

The details s of the same are in Appendix D,E., F,

The meeting concluded with a high note from Dr RN Shukla that the persons of repute in the field of science and Technology may be asked to come forward to openly accept the reality of Naadi Granth Phenomena in public.

Biodata

Shashikant Oak
Educational qualification M.Com.
Posts held Retired from Indian Air Force after serving for 32 years.

Contribution for Naadi Granth in past: For last 15 years extensively studying on the topic of Naadi Granthas from various angles. Visited many Naadi Centers all over India. Prepared Sample Tamil Dictionary for the use of Naadi Predictiosns. Written books on Naadi Predictions in Marathi Hindi, Gujrati, and English. Contributed for Making of Present Paper / Article : Nostradamus and Naadi Granths comparative study.

Synopsis of the paper/Article.:

Wing Commander Shashikant Oak & Adv. Amit Chandra

Swagatadhyaksha Karyadhyaksha
Naadi Palm leaf Astrology lovers group

-

Naadi Predictions - Google Books

Naadi Predictions - Google Books

गुरुवार, ८ एप्रिल, २०१०

मित्र हो,
आज जरा मूड ही आहे व वेळ ही.

एकदा मंजुळ आवाजाच्या एक बाई म्हणाल्या, "काहो तुमच्या सोईची रात्री ९ नंतरची वेळ तुम्ही ठेवलित भेटायची पण आम्ही नंतर परत जायचे कसे?"

पुर्वी एकदा एकांनी प्रश्न कांडममधील माझ्या लेखांवर छद्मीपणे लिहून पृच्छा केली होती की जेव्हा तुम्ही अगदी specific प्रश्न विचारलात जसे की, 'माझी पुढची बदली कोठे होइल'?
त्यावेळी मात्र नाडी वाचकांने किंवा महर्षींच्या नावाखाली सोईस्कररित्या हे उत्तर देण्याचे टाळले. 'याचे उत्तर तुला कळायची वेळ आली की कळेल' असे तुम्ही लिहिता!
काहो,ते महाशय पुढे म्हणाले, आज पर्यंत तुम्ही नाडीवाल्यांना असा एखादा प्रश्न विचारला आहे का? ज्याचे उत्तर केवळ तुम्हाला आणि केवळ तुम्हालाच माहीती आहे?
मला खात्री आहे की त्याचे उत्तर नाडीत येईल की "अजून ती वेळ आलेली नाही. ती वेळ येताच तुम्हाला उत्तर मिळेल". कारण ते उत्तर जर नाडी वाचकालाच माहित नसेल तर तो सांगणार तरी कुठुन?
याबाबत मला नेहमी हिणवले जाई.
नंतर काही काळानी एका नाडी केंद्रात (दिल्लीला) ज्यांना माझ्या नोकरीची कामाची कल्पना नाही अशा ठिकाणी विचारणा केली. त्यावेळी महर्षी देखील वेगळे होते.(आधीचे वसिष्ठ तर नंतरचे अगस्त्य महर्षी) प्रश्न कांडम मधून मी विचारले होते की माझी या पुढची पोस्टींग कुठे असेल त्यावर तेंव्हा त्या प्रश्नाचे उत्तर आले, 'तुझा जन्म जेथे झाला त्या गावाच्या सीमेवर होईल'.(नाडी पट्टीत व्यक्तिचा जन्म कुठे झाला ते कधीच विचारले जात नाही.)
आता त्यावेळची परिस्थिती अशी होती की मला श्रीनगरहून "ड्यू टू एक्सिजन्सीज ऑफ सर्व्हीस" - हव्या त्याठिकाणी पोस्टींग मिळणार नाही", असे माझ्या वरिष्ठ खात्याकडून लेखी लिहून आले होते. माझ्या एयर ऑफिसर कमांडिंगनी - ते कोण ते नंतर पुन्हा केंव्हा तरी लेखातून धक्कादायकरित्या प्रगट होईल - स्वतः त्या खात्याला नवीदिल्लीत भेट देऊन माझ्यासाठी केलेले प्रयत्न व्यर्थ झालेले होते. अशा परिस्थितीत मी तो प्रश्न विचारला होता. महर्षींनी दिलेल्या उत्तराप्रमाणे घडायचे असेल तर हा निव्वळ चमत्कार ठरणार होता. काही महिने गेले. मी काहीही न करता, एक दिवस मला बातमी मिळाली. तुझी पोस्टिंग पुण्याला झाली आहे. तेच माझे जन्म गाव होते. मी जेंव्हा पुण्याच्या सीमेवरील नगररस्त्यावरील नाईन बी आर डी ला जॉईन झालो तेंव्हा तो चमत्कार सत्यात उतरला होता. त्यानंतर एका लेखातून या घटनेचा उल्लेख आवर्जून केला. मात्र त्याची दखल नाडी विरोधक घेत नाहीत किंवा सोईस्करपणे टाळतात.
अनेकदा मला प्रत्यक्ष घरी भेटायला येण्यासाठीचे फोन येतात. मी प्रथमपासून म्हणत आलो आहे की मला जे म्हणायचे आहे ते मी पुस्तकातून म्हटले आहे. "आपण नाडी ग्रंथ पहावेत व काही शंका असेल तर फोनवरून संपर्क करावा, तो ही रात्री नऊ नंतर." एकदा मंजुळ आवाजाच्या एक बाई म्हणाल्या, 'काहो तुमच्या सोईची रात्री ९ नंतरची वेळ तुम्ही ठेवलित पण आम्ही नंतर परत जायचे कसे'?
'माताजी, आपण मला फोनवरुन संपर्क करावा असे सुचवले होते, प्रत्यक्षात नाही'. माझ्या खुलाशाने त्यांना रंगतदार भेटीची मजा गेली असावी. असो.
सध्याच्या परिस्थितीचे उदाहरण द्यायचे तर मुंबईच्या २६ -११च्या हल्लाप्रकरणात, भारताने पाकिस्तानच्या चरणी पुराव्यांचा ढीग अर्पण करायचा अन् आशाळभूताप्रमाणे पाकच्या तोंडाकडे पहात रहायचे! आता पाकिस्तान नक्की मानेल अशी आस करून शेपटी हालवत रहायचे! पाकने त्याकडे तोंड फिरवून म्हणायचे की 'आणखी पुरावा हवा. कितीही दिला तरी म्हणायचे की हे तर रद्दीचे कागद आहेत. आणखी खूप खूप आणा. मग नक्की कारवाई करतो. आणखी आणा'!
आपल्या सरकारने पुन्हा धावाधाव करून ढीगाने पुरावे वाजत गाजत दिले की म्हणायचे, 'छे छे यात काहीच दम नाही. आणखी हवेत'!
कार्टून जगतातील बावळट प्लूटो कुत्रा जसा मालका करता धावाधाव करतो तसा, भारताला पाक दमवतोय. मात्र निरोधकांनो, विरोधक म्हणणे ही प्रशस्त नाही कारण ते फक्त निरोध करू शकतात. नाडी महर्षींशी गाठ आहे. घडते उलटे. रडीला येतील विरोधक. हे नाडी निरोधकांच्या लक्षात येत नाही वा ते मुद्दाम तसे भासवतात.

असेच एकादा हवाईदलातील एक मित्र म्हणाले, "ऐसी की तैसी इन नाड़ीवालोंकी । विंको ओकने पागल बना के रखा है हम सब को। सब की ऐसी खबर लुंगा के पुछो मत"।
काही काळानंतर या महाशयांना नाडीत सांगितल्या प्रमाणे अपघात झाला. फ्रॅक्चर झालेला हात गळ्यात आडकवलेल्या अवस्थेत सर्वांना दाखवत भेटेल त्याला तो सांगत सुटायचा की 'नाड़ी भविष्य देखा के नही? पोस्टींग होने से पहले जरूर देख लो। बाद में यहा आना हो या ना हो।"
उलट एक मित्र विंग कमांडर राकेश नंदा ३ मोबाईल बाळगून आहे की कोणी त्याला नाडीग्रंथांविषयी विचारणा केली की तो त्यांना तात्काळ सर्व माहिती पुरवतोच शिवाय (सध्या बंगलोरला) लोकांना नाडी केंद्रात ही नेऊन आणण्याची व्यवस्था करतो. त्याला तर लोकांनी मुर्खात काढले, "तू तर म्हणत होतास की तो अमक्या तमक्या एयर मार्शलच्या प्रमोशनवर जाणार म्हणून? पण तो तर आता रिटायर होऊन घरी बसलाय! बोल आता काय म्हणणे आहे तुझे?"
अशांच्या मजा मजा सांगताना गंमत वाटते की लोक वेळ आली की कशी टोपी फिरवतात त्याची!
राकेश नंदाच्या संदर्भातील त्या उच्च पदस्थ हवाईदलातील अधिकाऱ्याने रिटायर झाल्यावर सुप्रिम कोर्टात हवाईदलाच्या विरुद्ध केस केली. नंतर कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला एयर मार्शल ही पुढची रँक मिळाली. जे नंदाला व अनुषंगाने नाडीग्रंथांना अपशब्द करत होते तेच आता नंदाला नाडीवाल्यांच्याकडे नेण्यासाठी वारंवार गळ घालू लागले.
आपला जीवनाचा प्रवाह कसा बदलला, तटलेल्या मुलींची लग्ने कशी लीलया पार पडली, पारपत्र न मिळालेल्यांनी परदेशवारीची आशा सोडली होती त्यांना कसा अचानक नवा ब्रेक मिळाला.
नाडी ग्रंथांची पोल खोलायला आलेल्या एका वार्ताहर बाईंना त्यांचे दोन विवाह, नंतर झालेल्या शारीरिक व मानसिक अत्याचाराचे वर्णन, नंतर अशक्यप्राय वाटणारे तिसऱ्या विवाहाचे व बाळाचे कथन ऐकून ती डोळे पुसत रवाना झाली. कालांतराने तिला परदेशात तिसरा पती मिळाला. मूल झाले.

"असंभव म्हणावे लागेल अशा घटना कधी तुमच्या बाबत घडल्या आहेत का? तर बोला."
"सांगेन पुन्हा कधीतरी वेळ आली की..."
»

* 786 reads
* Click to bookmark
* Email this page
* Printer-friendly version

तु ऐक सत्य
Submitted by टारझन on Tue, 03/16/2010 - 15:37.

तु ऐक सत्य ना$$$रायणा$$ची कथा ..
तु ऐक सत्य ना$$$रायणा$$ची कथा ...

- (मुडी) टारझन
»

* reply

ती बरी
Submitted by महेश हतोळकर on Tue, 03/16/2010 - 17:33.

आहो प्रसाद तरी भेटतो.
»

* reply

बोंबला,
Submitted by Nile on Tue, 03/16/2010 - 15:51.

बोंबला, कोण वाचणार पुन्हा तेच?पुन्हा पुन्हा तेच तेच टंकायचा कंटाळा कसा येत नाही? का नाडीच टंकुन देते?
»

* reply

६००० कोटी
Submitted by नितिन थत्ते on Tue, 03/16/2010 - 16:10.

६००० कोटी लोकाम्च्या नाड्या लिहिल्यात त्याम्नी. कंटाळा कसा येईल त्यांना?

नितिन थत्ते
»

* reply

आयला..
Submitted by खादाडमाऊ on Tue, 03/16/2010 - 16:21.

काही काळानंतर या महाशयांना नाडीत सांगितल्या प्रमाणे अपघात झाला. फ्रॅक्चर झालेला हात गळ्यात आडकवलेल्या अवस्थेत सर्वांना दाखवत भेटेल त्याला तो सांगत सुटायचा की 'नाड़ी भविष्य देखा के नही? पोस्टींग होने से पहले जरूर देख लो। बाद में यहा आना हो या ना हो।"

म्हणजे युद्धाला जाण्याअगोदर प्रत्येकाने आपपली नाडी बघून जावे का? परवा हैदराबाद्च्या विमान अपघातात दगावलेल्या पायलटने नाडीपरीक्षा करून घ्यायला हवी होती असे उगीच वाटले.

आपल्या सरकारने पुन्हा धावाधाव करून ढीगाने पुरावे वाजत गाजत दिले की म्हणायचे, 'छे छे यात काहीच दम नाही. आणखी हवेत'!
पुराव्याच्या ढिगाला नाडी बांधा..लगेच सगळे प्रश्न सुटतील.

(ओकसाहेब..इथे मला नाडीवाल्यांची चेष्टा करायचा उद्देश नाही (कारण अनुभव नाही)..पण जे जे आत्तापर्यंत वाचले ते काही पचनी पडले नाही).

खादाडमाऊ
»

* reply

नाडिग्रन्थ
Submitted by धिन्गाना on Tue, 03/16/2010 - 16:26.

मी प्रथमच नाडिग्रन्थ ह शब्द एइकला.अधिक माहितिसाठि क्रुपया दुवे द्याल का?
»

* reply

लहानपणी
Submitted by श्रावण मोडक on Tue, 03/16/2010 - 18:48.

लहानपणी आम्ही कापूसकोंड्याची गोष्ट खेळायचो, त्याची आठवण करून दिल्याबद्दल आभार.
»

* reply

ही फुकटची
Submitted by सनविवि on Tue, 03/16/2010 - 19:34.

ही फुकटची करमणूक थांबवा आता साहेब!!
»

* reply

:)
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 03/16/2010 - 19:36.

'नाडी' विषय आला रे आला की हहपुवा होते.[काहीच विश्वास नाही म्हणून] पण आपल्या आवडत्या विषयाशी एकरुप होऊन त्याचे महत्त्व वाचकावर बिंबवत राहण्याबाबत [ न आवडले तरी] आपल्याला तोड नाही.

पुढील अनुभवांच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे
»

* reply

+++१
Submitted by हर्षद आनंदी on Wed, 03/17/2010 - 06:53.

असेच म्हणतो.

आपल्याला समजले नाही, अथवा विश्वास नाही म्हणुन चेष्टा करणारे खुप भेटतील, तो मानवी स्वभावच आहे. पण म्हणुन तुम्ही लिहिणे थांबवु नका. तुमचे अनुभव, इतरांचे अनुभव लिहित रहा!!

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
»

* reply

माझ्या खुलाशाने त्यांना रंगतदार भेटीची मजा गेली असावी. असो.
Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/17/2010 - 01:06.

नाडीकथनं अशा रंगतदार भेटींसाठी फोन येतात, हा फायदा तुम्ही आधीच सांगितला असता तर इतक्या लोकांनी विरोध केला नसता असं वाटतं.

राजेश
»

* reply

पूजाची(पूज
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 03/17/2010 - 15:12.

Rolling On The Floor Rolling On The Floor Rolling On The Floor

पूजाची(पूजेची) नाडी असेल का? Wink

(पळा आता, ओक आणि/किंवा घासकडवींचा बडगा यायच्या आत!)

अदिती
»

* reply

नाडी
Submitted by पाषाणभेद on Wed, 03/17/2010 - 08:56.

नाडी रिमोटली पाहता येते का? (हे एकदम सिरीअसली आहे हं.)
आम्ही व्हॉलेंटीअर्स तयार आहोत.

तसे असेल तर तुम्ही ते पहाणे सुरू करा अन लोकांच्या तोंडाला नाडीने बांधा.

नाहितर पोपटकडे भविष्य पहाणे अन नाडी पहाणे सारखेच समजावे लागेल.

बाकी नाडी अनूभव येवू द्या. चार घटका करमणूक तरी होईल. (त्याच त्या बातम्या, (लेख), जाहीराती बघून मेंदू शिणलाय.)
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
»

* reply

नाडी रिमोटली पाहता येते का?
Submitted by महेश हतोळकर on Wed, 03/17/2010 - 11:06.

विसरा. आता पर्यंत मी २-३ वेळा हाच प्रश्न विचारला आहे. हो - नाही लांबची गोष्ट, उत्तरच येत नाही. परत विचारतो.

"मी ठसे फॅक्स किंवा कुरीयरने पाठवून देईन. नाडी मिळेल का?"
»

* reply

भारतीय
Submitted by आनंद on Wed, 03/17/2010 - 09:19.

भारतीय हवाइ दलातली नाडी बघुन , देवावरचा विश्वास वाढला.
»

* reply

जाऊं देत
Submitted by राघव on Wed, 03/17/2010 - 15:01.

ओकसाहेब,
तुम्हाला काही समजावून घ्यायचेच नाही तर आम्हीच सांगणारे मूर्ख ठरतो.
राह्यलं. यापुढे काही सांगणार नाही ब्वॉ. चालू देत तुमचे.

राघव
»

आजचा सुधारक मासिकाचा अंधश्रद्ध

आजचा सुधारक मासिकाचा अंधश्रद्धआजचा सुधारक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (मंगळ, 03/30/2010 - 17:20)

* तत्त्वज्ञान
* धर्म
* सामाजिक
* बातमी

आजचा सुधारक’ या विवेकवादी वैचारिक मासिकाचा अंधश्रद्धा विशेषांक’ येत्या एप्रिल मध्ये प्रसिद्ध होत आहे. या अंकाचे अतिथी संपादकत्व मला मिळाले होते.

या अंकात अंधश्रद्धांधा वैचारिक आणि ऐतिहासिक वेध घेतला आहे. याशिवाय फलज्योतिष्य, मंत्र मांत्रिक, चमत्कार, भूतयोनी आदिंचा समावेश यात आहे. होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, चिनी, चुंबकचिकित्सा अशा भिन्न वैद्यक परंपरा, मिथ्याविज्ञाने, आधुनिक अंधश्रद्धा, धार्मिक अंधश्रद्धा आदिंवर येथे लिखाण आहे.
सर्वसामान्य लोकांचा श्रद्धा व अंधश्रद्धांना नेमका काय प्रतिसाद असतो हे जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले गेले. असे सर्वेक्षण महाराष्ट्रात वा भारतात पहिल्यांदाच घेतले असावे. या सर्वेक्षणात लोकांचा देवाबद्दलच्या कल्पना, मंत्र, चमत्कार, आयुर्वेद यावर प्रश्न विचारले होते. समाजातील विविध थरातील जवळपास अडीचशे लोकांनी सर्वेक्षणात आपले मत नोंदवले.
हे जग देवाने निर्माण केले, आपली प्रार्थना देव ऐकतो व त्याचे फळ देतो, देव प्रत्येक घटनेवर नियंत्रण ठेऊन असतो. या तीन विधानांवर विश्वास दर्श्ववणार्यांथची संख्या जवळ पास 70 टक्के होती. माहित नाही वा मत नाही सांगणारे साधारण 12 टक्के होते. तर अविश्वास दर्शवणारे जवळपास 15 टक्के होते. हे आकडे काही प्रगत देशापेशांसारखेच असावे. मंत्र, चमत्कार आणि फलज्योतिष्य यावर विश्वास दर्शवणारे केवळ 30 टक्के लोक होते. या संबंधी माहित नाही, मत नाही म्हणणारे 20 टक्के होते. तर अविश्वास दाखवणारे लोक निम्याहून अधिक होते.
लोकांची सामाजिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले होते, त्यानुसार वय, शिक्षण व उत्पन्न गट यावरील माहिती लोकांनी दिली. वय व उत्पन्न गटातील भिन्नतेने फारसे मत बदलत नाही असे कळले. मात्र शिक्षण वाढल्यावर लोकांचा कल श्रद्धा ठेवण्याकडे कमी झुकतो असे लक्षात आले.
अधिक खालील तक्त्यावरून हे स्पष्ट होईल.

(पूर्व परिक्षण पाहिल्यानंतर हे ल्क्षात येते की तक्ता नीटसा येत नाही.)

प्र 1 प्र 2 प्र 3 प्र 4 प्र 5 प्र 6 प्र 7 प्र 8
अ 37 28 26 16 12 8 8 27
ब 16 25 18 12 14 21 22 41
क 15 13 16 26 16 14 14 19
ड 13 13 16 22 23 24 28 7
इ 16 17 21 19 34 32 26 6
फ 3 4 3 4 1 2 1

विचारलेले प्रश्न व उत्तरे
खालील विधानावर पुढील पर्याय सांगा. अ- पूर्ण विश्वास, ब – विश्वास, क- मत नाही, ड- अविश्वास, इ – पूर्ण अविश्वास, फ- चुकीचा प्रश्न
प्र 1. हे जग देवाने निर्माण केले
प्र 2 आपली प्रार्थना देव ऐकतो व त्याचे फळ देतो
प्र 3 देव प्रत्येक घटनेवर नियंत्रण ठेऊन असतो.
प्र 4 पुराणकाळी मानव आजच्यापेक्षा जास्त प्रगत होता
प्र 5 मंत्रामध्ये भलेबुरे करायची शक्ति असते
प्र 6. काहीजणांकडे चमत्कार करण्याची शक्ति असते.
प्र 7 जन्मवेळेनुसार केलेल्या कुंडलीकडे वा हाताच्या रेषांकडे बघून जाणकार मंडळी तंतोतंत भविष्य सांगतात.
प्र. 8 आयुर्वेद हे संपूर्ण विज्ञान आहे.
»

* प्रमोद सहस्रबुद्धे यांना व्यनि पाठवा
* 551 वाचने

पूर्ण विश्वास आणि विश्वास
प्रेषक प्रियाली (मंगळ, 03/30/2010 - 18:34)

अ. पूर्ण विश्वास आणि ब. विश्वास यांत फरक काय? (असाच प्रश्न अविश्वास आणि पूर्ण अविश्वासासाठी) उत्तरे देताना हा फरक कळावा म्हणून प्रश्न विचारत आहे. अन्यथा, विश्वास पानिपतावर मेला अशीच धारणा आहे. - ह. घ्या.
»

* प्रतिसाद
* प्रियाली यांना व्यनि पाठवा

फरक विश्वासाच्या दर्जाचा
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (बुध, 03/31/2010 - 17:07)

अडीचशे पैकी एकानेही असा प्रश्न विचारला नव्हता. बरेचसे लोक अ ऐवजी ब उत्तर देताना कमी डचमळले. हे डचमळणे या उत्तरात नोंद झाले आहे.
एक आठवण म्हणजे. सुरुवातीला फ हा पर्याय नव्हता. पहिल्या एकदोन प्रतिसादात तो घालावा लागला. आणि ते योग्य ही होते असे मला नंतर जाणवले.

प्रमोद
»

* प्रतिसाद
* प्रमोद सहस्रबुद्धे यांना व्यनि पाठवा

फरक
प्रेषक नितिन थत्ते (शुक्र, 04/02/2010 - 04:18)

बहुधा पूर्ण विश्वास = मला महिती आहे
विश्वास = मला वाटते

तसेच उलट असावे.

हे पर्याय बहुतेक स्ट्राँगली ऍग्री , ऍग्री, डोन्ट नो, डिसऍग्री आणि स्ट्राँगली डिसऍग्री यांचे रूपांतर आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
»

* प्रतिसाद
* नितिन थत्ते यांना व्यनि पाठवा

छान सर्वेक्षण
प्रेषक राजेशघासकडवी (मंगळ, 03/30/2010 - 19:23)

एक सूचना अशी करेन की हा (की ही?) विदा आलेखस्वरूपात मांडावा. मी प्रयत्न केला पण एक्सेलमध्ये एकच एक ओळ चिकटते. विशेष करून दोन गोष्टी पहायला आवडतील.

१. प्रत्येक प्रश्नासाठी उत्तरांचं विभाजन (क्ष अक्ष अ, ब, क इ) यातून कशावर अधिक व कशावर कमी विश्वास आहे हे दिसेल.
२. प्रत्येक पर्यायासाठी सर्व प्रश्नांना मिळून एकंदरीत उत्तरं किती आली आहेत यांचा आलेख (क्ष अक्ष अ, ब, क इ). यातून एकंदरीतच विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती दिसेल.

हेच प्रश्न दर वर्षी विचारले तर २ मध्ये जे बदल होतील त्यावरून एकंदरीत जनमताविषयी काही निष्कर्ष काढता येतील.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
»

* प्रतिसाद
* राजेशघासकडवी यांना व्यनि पाठवा

तक्ता
प्रेषक धनंजय (बुध, 03/31/2010 - 20:14)

येथे तक्ता एचटीएमएल मध्ये
* प्र १ प्र २ प्र ३ प्र ४ प्र ५ प्र ६ प्र ७ प्र ८
अ 37 28 26 16 12 8 8 27
ब 16 25 18 12 14 21 22 41
क 15 13 16 26 16 14 14 19
ड 3 13 16 22 23 24 28 7
इ 16 17 21 19 34 32 26 6
फ 3 4 3 0 1 1 2 1
»

* प्रतिसाद
* धनंजय यांना व्यनि पाठवा

आलेख
प्रेषक राजेशघासकडवी (मंगळ, 03/30/2010 - 23:47)

धनंजयनी तक्ता दिल्यावर आलेख करणं खूपच सोपं झालं. (खरं तर ते ४८ आकडे लिहून काढण्याचा मी आळस करत होतो..) आलेखातून खूप रोचक चित्र दृष्टीला पडतं. अ, ब, क, ड, ई, फ हे चढत्या क्रमाने नास्तिक, चार्वाकीय, अंधश्रद्धाहीनता, श्रद्धाहीनतेकडे जाणारे पर्याय आहेत. त्यातला फ हा पर्याय कदाचित ईच्या पलिकडचा असेल, कदाचित प्रश्नाविषयीच्या असंदिग्धतेमुळे आलेला असू शकेल. तूर्तास आलेखात तो ठेवलेला आहे.
पहिले तीन प्रश्न देवाविषयी आहेत. त्यांची उत्तरं सर्वसाधारणपणे सारखी दिसतात. म्हणून ती एकत्रितपणे मांडलेली आहे. त्यावरून दिसतं की बहुमताचा देवावर, देवाच्या करणीवर विश्वास आहे. यातही प्रश्न क्रमांकाबरोबर विश्वास (थोडासा) कमी कमी होत जाताना दिसतो.

प्रश्न ४ हा पुराणकालीन प्रगतीविषयी होता. फ पर्यायाकडे तूर्तास दुर्लक्ष केलं तरी बहुमताने लोक ते अमान्य करतात असं दिसतं.

प्रश्न ५,६,७ हे सर्वसाधारणपणे मंत्रशक्ती, मनुष्याच्या चमत्कारशक्तीविषयी, किंवा भविष्य जाणण्याच्या क्षमतेची चिकित्सा करणारे होते. त्यात तीनही बाबतीत अधिकाधिक अविश्वासाकडे कल दिसतो.

प्रश्न ८ हा आयुर्वेद विज्ञान असण्याविषयी होता. त्याला बहुमताचा पाठिंबा दिसतो.

थोडक्यात सांगायचं झालं, तर
देव या कल्पनेवर, त्याच्या विश्वनिर्मिती व नियंत्रणशक्तीवर विश्वास आहे, पण ज्योतिषाने विधिलिखित जाणणं, मंत्र तंत्र वा चमत्काराने ते बदलणं असली माणसाची शक्ती झूठ. पूर्वजांनी जे संशोधन व प्रमाद-प्रयासावर आधारित वैद्यकशास्त्र निर्माण केलं त्यावर विश्वास आहे, पण त्यांची एकंदरीत वैज्ञानिक प्रगती आजच्यापेक्षा जास्त होती हे मान्य नाही.

वा, बरीच चांगली परिस्थिती वाटते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
»

* प्रतिसाद
* राजेशघासकडवी यांना व्यनि पाठवा

केवळ या सर्वेक्षणावरून?
प्रेषक प्रियाली (बुध, 03/31/2010 - 00:22)

मात्र शिक्षण वाढल्यावर लोकांचा कल श्रद्धा ठेवण्याकडे कमी झुकतो असे लक्षात आले.

केवळ या सर्वेक्षणावरून निष्कर्षापर्यंत पोहोचणे खरे मानायचे का? शिक्षण वाढल्यावर लोकांच्या अंगी एक हुशारी, लबाडी (स्मार्टनेस म्हणा हवं तर) येत असावी. एक उदाहरण सांगायचे तर -

एक जुने उपक्रमी दुसर्‍या एका संकेतस्थळावर पूर्वी असे काही बोलून गेले होते (शब्द जसेच्या तसे नाहीत परंतु मथितार्थ जसाच्या तसा आहे) -

इथे संकेतस्थळावर येऊन मी देव-देवता या संकल्पना झूठ आहोत म्हणून सांगतो आणि श्रद्धांवर प्रहार करतो परंतु माझ्या घरी माझा व्यवहार असा असेलच असे नाही. मी गेले कित्येक शनिवार शनिमहात्म्य वाचतो, घरी सत्यनारायणाच्या पूजा घालतो, गणपती आणतो.

उपक्रमासारख्या संकेतस्थळावर राहून आतापर्यंत अनेकांच्या लक्षात आले असेल की श्रद्धांचा विषय सुरु झाला की गप्प बसावे अन्यथा बहुसंख्यांच्या री मध्ये री ओढावी. इतर काही नाही तरी शिक्षण इतकी अक्कल देते असे वाटते.
»

* प्रतिसाद
* प्रियाली यांना व्यनि पाठवा

प्रामाणिकपणा
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (बुध, 03/31/2010 - 17:22)

बहुतेककरून सर्वेक्षण निनावी पद्धतीने केले होते. म्हणून प्रामाणिक झाले असावे असे वाटते. पण केवळ शिक्षणानेच माणूस लबाड होतो असे का म्हणावेसे बाटते?
प्रमोद
»

* प्रतिसाद
* प्रमोद सहस्रबुद्धे यांना व्यनि पाठवा

अंदाज
प्रेषक प्रियाली (बुध, 03/31/2010 - 17:30)

बहुतेककरून सर्वेक्षण निनावी पद्धतीने केले होते. म्हणून प्रामाणिक झाले असावे असे वाटते.

हा अंदाज झाला. :-) आपल्याला प्रश्न का विचारले आहेत याचा अंदाज समोरच्याला आला तर तो सावध उत्तरे देण्याची शक्यता आहे.

केवळ शिक्षणानेच माणूस लबाड होतो असे का म्हणावेसे बाटते?

केवळ शिक्षणाने असे म्हटलेले नाही परंतु शिक्षणाने माणसाच्या अंगी स्मार्टनेस (त्याला लबाडी हा शब्द साजेसा नसावा) येतो. तोच स्मार्टनेस अनुभवा(च्या शिक्षणा)नेही येतोच.
»

* प्रतिसाद
* प्रियाली यांना व्यनि पाठवा

रोचक सर्वेक्षण
प्रेषक अक्षय (बुध, 03/31/2010 - 00:43)

श्री सहस्रबुद्धे, सर्वेक्षण व त्यातून मिळालेली आकडेवारी रोचक आहे. परंतु प्रियालीतै यांच्याप्रमाणेच मला विश्वास-पूर्ण विश्वास, अविश्वास-पूर्ण अविश्वास हे थोडेसे त्रासदायक वाटते. असे पर्याय देण्यामागे काही खास कारण होते का?

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
»

* प्रतिसाद
* अक्षय यांना व्यनि पाठवा

चांगला प्रकल्प पण
प्रेषक विकास (बुध, 03/31/2010 - 01:22)

हा प्रकल्प नक्कीच चांगला आहे. फक्त सर्वेक्षणात अंधश्रद्धांच्या पंगतीत आयुर्वेदाला बसवलेले रुचले नाही. याचा अर्थ आयुर्वेदात भोंदूगिरी करणारे नाहीत असे म्हणायचे नाही आहे, पण म्हणून त्याचे जे काही वैद्यकीय मूळ आहे ते जर कोणी मानले तर त्यात अंधश्रद्धाळूपणा कसा काय ठरेल? बर मग तसे सर्वेक्षण चुंबकचिकित्सा वगैरेचे का केले गेले नाही? जर आयुर्वेद ही अंधश्रद्धा वाटत असेल तर बीएएमएस ही शैक्षणिक पदवी देण्याविरुद्ध कोणी कधी बोलले आहे का? दुसरा भाग म्हणजे पाश्चिमात्य वैद्यकीय पद्धतीत काहीच चुका नाहीत का / होत नाही का?

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
»

* प्रतिसाद
* विकास यांना व्यनि पाठवा

समांतर
प्रेषक प्रकाश घाटपांडे (बुध, 03/31/2010 - 07:41)

आयुर्वेदला थेट अंधश्रद्धा असे म्हणवण्यास तज्ञ धजावणार नाहीत. पण यात पर्यायी वैद्यकिय उपचार पद्धतीत भारतात आयुर्वेद हे अग्रक्रमावर आहे.
आमचे मत विचाराल तर उपचार होणे महत्वाचे.(विशेषतः ग्रामीण भागात) ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मांत्रिकाकडे जाउ नका कोणत्या तोंडाने म्हणणार.
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

सहमत
प्रेषक गुंडोपंत (गुरू, 04/01/2010 - 12:38)

विकास यांच्याशी सहमत आहे.

काही वेळा काही लोक स्वतःला पुरोगामी म्हणवण्याच्या नादात देशी ते सर्व गौण असे मानूनच चालू लागतात की काय असे मला वाटले.
ख्रिश्चन धर्मात संत बन(व)ण्यासाठी चमत्कार व्हावा लागतोच!
आणि चर्च हे संतपण आणि चमत्कार खरा आहे असे मानूनच देते.

येथे अंधश्रद्धा नसते असे काही लोकांना वाटत असावे असो, आपला आपला विषय...

सुधारक सारखी मासिके असा विषय सोडून देतात, कधीच चर्चेत घेत नाहीत हे पाहून मला गंमत वाटते.
हे विषय चर्चेत येवूच नयेत यासाठी काही विशिष्ट मासिकांना / संपादकांना काही विशिष्ट धर्माच्या खास व्यक्तींकडून यात काही आर्थिक लाभ असावा का? अशी भाबडी शंकाही मला येऊन जाते. असे कदाचित काही नसेलही.
त्यापेक्षा जीवाचीच भीती मोठी असावी, म्हणून जेथे मऊ लागते तेथेच खणायचे असे धोरण असावे असे वाटते.
असो,

हे विषय चर्चेत नाहीत हे मात्र खरे!

आपला
गुंडोपंत
»

* प्रतिसाद
* गुंडोपंत यांना व्यनि पाठवा

नेमके काय?
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (गुरू, 04/01/2010 - 13:55)

सुधारक सारखी मासिके असा विषय सोडून देतात, कधीच चर्चेत घेत नाहीत हे पाहून मला गंमत वाटते.
हे विषय चर्चेत येवूच नयेत यासाठी काही विशिष्ट मासिकांना / संपादकांना काही विशिष्ट धर्माच्या खास व्यक्तींकडून यात काही आर्थिक लाभ असावा का? अशी भाबडी शंकाही मला येऊन जाते. असे कदाचित काही नसेलही.
त्यापेक्षा जीवाचीच भीती मोठी असावी, म्हणून जेथे मऊ लागते तेथेच खणायचे असे धोरण असावे असे वाटते.

मला हे कळले नाही.
नेमका कुठला विषय चर्चेस घेतला नाही? म्हणजे कुठला लेख/चर्चेचा प्रस्ताव 'आजचा सुधारक' ला पाठवला आणि तो त्यांनी नामंजूर केला?
साधारण पणे ज्याला ज्याचे ज्ञान त्यावर तो लिहितो. या असलेल्या ज्ञानात सर्वसमावेशकता नसणे हा काही धोरणीपणा नसतो.
मला असे वाटते की या अंकात (एप्रिलच्या) बहुतेक सर्व धर्म/संस्कृतींचा उल्लेख येत गेला आहे. उणीव भासल्यास जरुर कळवा

प्रमोद
»

* प्रतिसाद
* प्रमोद सहस्रबुद्धे यांना व्यनि पाठवा

आयुर्वेद
प्रेषक नितिन थत्ते (गुरू, 04/01/2010 - 18:13)

सर्वेक्षणाच्या प्रश्नांबरोबर आयुर्वेद का घातला हे मलाही पडलेले कोडे आहे. कदाचित 'संपूर्ण विज्ञान' हा त्यातला भाग सर्वेक्षण करणार्‍यांना अंधश्रद्धा म्हणून अपेक्षित असेल.

आयुर्वेद हे 'संपूर्ण विज्ञान' असल्याची समजूत अनेकदा वृत्तपत्रीय लिखाणात आयुर्वेदासंबंधी जे छापून येते त्यांतून बनवली जाते. उदा. ऍलोपथी वरवर उपचार करते, लक्षणांना सप्रेस करते उलट आयुर्वेद मूळ कारणावर उपचार करतो वगैरे. अनेकदा लेख लिहिणारे आयुर्वेदाबरोबरच अध्यात्मादि गोष्टी लिहितात. तसेच गेल्या काही काळात उगवलेल्या 'उपचार केंद्रांच्या' जाहिरातींमध्ये 'अनुभव' या नावाखाली काही सुरस आणि चमत्कारिक कथा छापलेल्या असतात. अशा स्वरूपाचे अनुभवकथन सहसा बुवा-बाबांच्या भक्तांनी चालवलेल्या मासिकांतून आपल्याला वाचायला मिळतात. (असे अनुभव काही चॅनेलवरून इव्हॅन्जलिस्ट लोकांकडूनसुद्धा पहायला मिळतात). या अनुभवांत जनरली आधुनिक विज्ञानाला अजून दुर्धर असणार्‍या रोग्यांची बरे वाटल्याची कथने असतात. त्यामुळे आयुर्वेद हे आधुनिक विज्ञानाच्या पुढे गेलेले असल्याचा भास निर्माण केलेला/झालेला असतो. या कारणांमुळेही सर्वेक्षकांनी आयुर्वेदाचा समावेश केला असू शकेल.

सर्वेक्षणातील इतर विषयांसारखा आयुर्वेद हा विषय उघड श्रद्धेचा नाही. कारण त्याचे फॉर्मल ज्ञान उपलब्ध आहे. आणि बर्‍याच प्रमाणात कृती आणि परिणाम वस्तुनिष्ठ आहेत. म्हणजे व्यक्तिनिष्ठ नाहीत.

तरीही आयुर्वेद हा विषय सामान्यांत (आणि प्रॅक्टिशनर कम्युनिटीतही) काहीसा श्रद्धेकडे झुकलेला आहे असे वाटते. त्याची मला वाटणारी काही कारणे

काही बाबतीत आयुर्वेदातल्या संकल्पना आधुनिक विज्ञानापेक्षा वेगळ्या आहेत. तसेच गेल्या काही शतकात मिळालेल्या ज्ञानाच्या अभावी उपचारांमध्ये ज्या त्रुटी असतील त्या घालवायला हव्या. परंतु याची गरजच नाही असा दृष्टीकोन दिसतो.

तसेच अमुक एक औषधाचा अमूक रोगावर उपयोग होतो हे व्हॅलिडेट केलेले नसते. (म्हणजे जुन्या काळी ते व्हॅलिडेट केले असेल तरी त्याचा विदा आज उपलब्ध नाही). त्यामुळे ते विदा गोळा करून पुन्हा वॅलिडेट करायला हवे. परंतु आयुर्वेद वापरणार्‍यांना हे मान्य नसते. आधुनिक विज्ञानाची तत्त्वे आयुर्वेदाला लागू करता येणार नाहीत असा दावा ते करतात.
(एका आयुर्वेदिक औषधे बनवणार्‍या उद्योजकाने सांगितलेली माहिती. जर एखादे नवीन औषध बाजारात आणायचे असेल तर त्याची सरकारी परवानगी मिळवण्यासाठी त्या औषधाचा उल्लेख ग्रंथात आहे एवढे दाखवावे लागते. त्याची टॉक्सिसिटी टेस्ट वगैरे करून ते वापरास सुरक्षित असल्याचे सिद्ध करावे लागत नाही. हा ग्रंथप्रामाण्याचाच प्रकार दिसतो).

आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट नसतात हा एक असाच समज श्रद्धा या स्वरूपात सामान्यांमध्ये पसरलेला आहे.

डिस्क्लेमर १ : मी आयुर्वेदिक डॉक्टर नाही त्यामुळे या माहितीत काही चुका असू शकतात.
डिस्क्लेमर २ : हा प्रतिसाद विकास यांना नाही. आयुर्वेदाचा समावेश अंधश्रद्धांच्या यादीत करू नये असे माझेही त्यांच्यासारखेच मत आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
»

* प्रतिसाद
* नितिन थत्ते यांना व्यनि पाठवा

आयुर्वेद
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (शुक्र, 04/02/2010 - 03:10)

कदाचित 'संपूर्ण विज्ञान' हा त्यातला भाग सर्वेक्षण करणार्‍यांना अंधश्रद्धा म्हणून अपेक्षित असेल.
बरोबर.

या सोबत. आयुर्वेदाविषयी एकंदर माहिती फार कमी असते असा माझा अनुभव आहे. त्यामुळे यावरील उत्तर इतर उत्तरांपेक्षा वेगळे असले पाहिजे अशी अपेक्षा होती. मनापासून आणि मनमोकळेपणाने प्रतिसाद मिळतो आहे का? हे तपासण्यासाठीही या प्रश्नाचा उपयोग होता.

या उत्तरांचा Cross analysis करायचा मी प्रयत्न अजून केला नाही. म्हणजे १-२-३ प्रश्नांची ड-ई उत्तर देणार्‍यांचा इतर प्रश्नांना काय प्रतिसाद असतो हे शोधले नाही. वरवर पाहिले तेव्हा असे दिसले की आयुर्वेदाबद्दल त्यांची उत्तरे अ ब अशीपण आहेत. (Vice versa सुद्धा).

निदान व उपचार असे कुठल्याही वैद्यकशाखेचे दोन भाग केले जाऊ शकतात. यातील निदानाचा भाग आयुर्वेदात नाडी,कफ वात पित्त प्रकृती/रस अशा संकल्पनांचा आहे. आयुर्वेदातील औषधे काही योग्य असतील काही अयोग्य (त्यांची यादी बरीच मोठी आहे). जी योग्य ठरली त्यांचा वापर आधुनिक वैद्यकशास्त्रात (ऍलोपथी हा होमिओपथी वाल्यांनी वापरलेला शब्द आहे) होतोच आहे. (असे मला वाटते नक्की संदर्भ नाही.)

आयुर्वेदात काय संशोधन होऊ शकते? आपली निदान पद्धती बदलल्यावर त्यास आयुर्वेद म्हणता येईल का? नवीन औषधे तयार करण्याची/तपासण्याची एक पद्धत आध्नुनिक वैद्यकशास्त्रात आहे. या पद्धतीचा अवलंब केला तर आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्रात काही फरक राहील का?

याचा अर्थ आयुर्वेदातले ज्ञान कवडीमोलाचे आहे असा नाही.

प्रमोद

प्रमोद
»

* प्रतिसाद
* प्रमोद सहस्रबुद्धे यांना व्यनि पाठवा

लायकर्ट स्केल
प्रेषक धनंजय (बुध, 03/31/2010 - 02:08)

वरील अ-ब-क-ड-इ हे "लायकर्ट स्केल" प्रमाणे असावेसे वाटते.

समजा "पूर्ण विश्वास"-"विश्वास"-"मत नाही"-"अविश्वास"-"पूर्ण अविश्वास" अशी पाच स्थाने असली :

- यात जर टोकांचे ढोबळ अर्थ विरोधी म्हणून लोकप्रसिद्ध असले, ([पूर्ण] विश्वास आणि [पूर्ण] अविश्वास, या विरोधी भावना आहेत)
- तर त्यातील टोके ही सर्वेक्षण-प्रतिसादकासाठी व्यक्तिसापेक्ष सर्वात टोकाच्या शक्यता असतात (पूर्ण विश्वास = म्हणजे प्रतिसादक व्यक्तिशः जास्तीत जास्त ठेवतो तितपत विश्वास, पूर्ण अविश्वास = म्हणजे प्रतिसादकाला व्यक्तिशः वाटू शकतो तितका जास्तीत जास्त अविश्वास)
- त्यातील मध्य हा "कुठचेही मत नाही" अशी बरोबर मधली स्थिती असते.
- स्थान क्र. दोन आणि चार टोकापेक्षा कमी, आणि मध्यभागापेक्षा एकीकडे झुकलेले असे मत असते. अर्थात टोकाची भावना व्यक्तिसापेक्ष टोकाची भावना असते.

कलांबद्दल (ऍटिट्यूड बद्दल) मतचाचणी ही जात्याच व्यक्तिसापेक्ष असते. व्यक्तिसापेक्ष असतात म्हणून माहितीशून्य मात्र नसतात. जोवर लोकप्रसिद्ध अर्थांनी समाजात संदेशन होते, संवाद खुंटण्याइतकी व्यक्तिसापेक्षता नसते, तोवर तितपत अर्थ अशा सर्वेक्षणांना असतो.

कित्येकदा टोकाची भावना प्रत्येक व्यक्तीची वेगळी असू शकते. म्हणजे व्यक्तिगत टोकाचा विश्वास असला तर एखादा व्यक्ती कड्यावरून उडी मारेल, पण अगदी टोकाचा विश्वास असल्यास दुसरा व्यक्ती फारफारतर एक लाखाची जोखीमच पत्करेल, त्याहून अधिक नाही.

टोकाची वागणूक जरी वेगळी असली तरी मध्यबिंदू ("मत नाही") हा तितका व्यक्तिसापेक्ष नसतो. अशा परिस्थितीत अ+ब = मत नसण्यापेक्षा अधिक विश्वास; ड+इ = मत नसण्यापेक्षा अधिक अविश्वास, असे वर्गीकरण बर्‍यापैकी व्यक्ति-निरपेक्ष असते.
»

* प्रतिसाद
* धनंजय यांना व्यनि पाठवा

विश्वास/ सहमती
प्रेषक अक्षय (बुध, 03/31/2010 - 03:02)

पर्याय लायकर्ट स्केलप्रमाणे असल्यास त्यात थोडा बदल करून अधिकाधिक व्यक्ति-निरपेक्षता येण्यासाठी 'त्यात विधानाशी पूर्ण सहमत, काहीसा/शी सहमत, उदासिन, काहीसा/ शी सहमत, पूर्ण असहमत' असे पर्याय योग्य ठरले असते काय? 'विश्वास' या शब्दामुळे उत्तर देतांना गोंधळ होण्याची शक्यता आहे. उदा. 'हे जग देवाने निर्माण केले आहे' यावर 'क्ष'चा पूर्ण अविश्वास आहे पण 'क्ष' विधानाशी काहीसा सहमत आहे म्हणजे हे विश्व निर्माण करण्यात आले आहे पण जग देवानेच निर्माण केले आहे याशी असहमत आहे.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
»

* प्रतिसाद
* अक्षय यांना व्यनि पाठवा

हा हा हा हा
प्रेषक आजानुकर्ण (बुध, 03/31/2010 - 03:50)

'हे जग देवाने निर्माण केले आहे' यावर 'क्ष'चा पूर्ण अविश्वास आहे पण 'क्ष' विधानाशी काहीसा सहमत आहे म्हणजे हे विश्व निर्माण करण्यात आले आहे पण जग देवानेच निर्माण केले आहे याशी असहमत आहे.

प्रश्नकर्ताः भारताचे राष्ट्रपिता कोण?
उमेदवारः सोनिया गांधी
प्रश्नकर्ताः उत्तरातील सोनिया चूक परंतु गांधी बरोबर. त्यामुळे तुम्हाला अर्धे गुण देण्यात येत आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
»

* प्रतिसाद

चांगला प्रयत्न
प्रेषक प्रकाश घाटपांडे (बुध, 03/31/2010 - 07:32)

असे सर्वेक्षण महाराष्ट्रात वा भारतात पहिल्यांदाच घेतले असावे.

फलज्योतिषाच्या वैज्ञानिक चाचणीची आठवण झाली. या अगोदर खरोखरच तसे काही प्रयत्न झाले नाहीत का? याविषयी कोणी माहिती दिल्यास आवडेल. यानिमित्ताने गूढचिकित्सामंडळ ची आठवण येते

समाजातील विविध थरातील जवळपास अडीचशे लोकांनी सर्वेक्षणात आपले मत नोंदवले.

जेव्हा सर्वेक्षण मान्य करायचे नसते त्यावेळी विदा कमी होता, विश्वासार्ह पद्धत नव्हती असे आक्षेप येणार. ११० कोटींच्या भारतात २५० साईज सॅम्पल पुरेसे आहे का? हा प्रश्न विचारला जाणार.
राजेश व धनंजय यांच्या प्रतिक्रिया जाणुन घ्यायला आवडेल
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

खोडूनच काढायचे झाले तर
प्रेषक प्रियाली (बुध, 03/31/2010 - 11:46)

जेव्हा सर्वेक्षण मान्य करायचे नसते त्यावेळी विदा कमी होता, विश्वासार्ह पद्धत नव्हती असे आक्षेप येणार. ११० कोटींच्या भारतात २५० साईज सॅम्पल पुरेसे आहे का? हा प्रश्न विचारला जाणार.

बरोबर. याचसह, हा विदा महाराष्ट्रातील सर्व थरांतून गोळा केला असे सांगितल्यावर नंतर वय, शिक्षण आणि उत्त्पन्न हे वर्गीकरण दाखवलेले आहे परंतु शहरी-ग्रामीण, शहरी झाल्यास शहरातील नेमक्या कोणत्या विभागातून, जाती-जमाती, इतर धर्म वगैरे जमेस धरले आहेत की नाही हे कळत नाही. एकंदरीत प्रश्नांचा कल पाहता इतर धर्मीय २५० मध्ये समाविष्ट नसावेत अशी शंका येते.

असो. चिकित्सेत कोणत्या अडचणी येतात आणि एखादी गोष्ट मानायची नसेल तर अनेक खुसपटे कशी काढता येतात हे सहज दाखवता येते असे दिसले. :-)
»

* प्रतिसाद
* प्रियाली यांना व्यनि पाठवा

प्रश्न योग्य आहेत
प्रेषक धनंजय (बुध, 03/31/2010 - 16:22)

११० कोटींच्या भारतात २५० साईज सॅम्पल पुरेसे आहे का? हा प्रश्न विचारला जाणार.

मात्र प्रश्न नेमका हा नाही.

(११० कोटींच्या भारतात १०९.९९९९९९९ कोटींचे सर्वेक्षण केले, तरी टक्केवारीबाबत पूर्ण निश्चितता येणार नाही. कारण शेवटच्या राहिलेल्या व्यक्तीच्या मताबद्दल आपल्याला माहीत नसते.)

१००% नसलेल्या कुठल्याही सर्वेक्षणात दोन प्रकारचे दोष येऊ शकतात.

संभाव्य दोष प्रकार १) कुठल्याही एका बाजूला कल नसूनही निश्चितता नसणे (अनबायस्ड इम्प्रेसिशन)

जर जनतेमधील निवडलेले लोक कोण आणि सोडलेले लोक कोण, याचा विचारलेल्या प्रश्नाशी पूर्वसंबंध नसला, तर प्रत्येक निवडलेला व्यक्ती "त्याच्यासारख्या व्यक्तींचे" प्रतिनिधित्व करतो. मात्र हे प्रतिनिधित्व माहितीच्या दृष्टीने अपूर्ण असते, त्यामुळे खरी टक्केवारी सँपलमधील टक्केवारीपेक्षा अधिकही असू शकते, किंवा कमीही असू शकते. इथे सँपल साइझचा मुद्दा उत्पन्न होतो. जितके सँपल लहान तितके कमी-अधिकच्या अनिश्चिततेचे क्षेत्र मोठे. (अनिश्चिततेचे क्षेत्र जितके कमी तितके बरे.) सँपलची निवड खरोखर रँडम असेल, तर २५०च्या सँपलने मिळालेली टक्केवारी कितपत अनिश्चित असेल? ९५% निश्चिती इतकी हवी असेल, तर त्याचे क्षेत्र साधारणपणे +-४ ते ७% इतके असेल. उदाहरणार्थ सँपलमध्ये कसलीतरी टक्केवारी ५०% असली, तर ज्या जनसमूहातून ते सँपल घेतले त्याची टक्केवारी ४३-५७ टक्के अशा क्षेत्रात असू शकेल. दुसरी कसली टक्केवारी सँपलमध्ये १०% असेल, तर जनसमूहात त्याची टक्केवारी ८-१२ टक्के अशा क्षेत्रात असू शकेल.

या गणितात जनसमूहाची लोकसंख्या ११० लाख की ११० कोटी या संख्येचा नगण्य फरक पडतो.

संभाव्य दोष प्रकार २) सँपल खरोखर रँडम नसणे. निवडपद्धतीचा जर प्रश्नाच्या उत्तराशी पूर्वसंबंध असेल तर सँपलमधील टक्केवारी खर्‍या टक्केवारीपेक्षा त्या पूर्वसंबंधांच्या दिशेने कललेली असेल. (बायस)

स्पष्ट उदाहरणार्थ मराठी संकेतस्थळावर कौल घेतला की "तुम्ही मराठी संकेतस्थळ वापरता का?" तर प्रश्नाच्या "होय" उत्तराशी निवडपद्धतीचा पूर्वसंबंध आहे. त्यामुळे सँपलमध्ये "हो" म्हणणार्‍यांची टक्केवारी जनसामान्यातील टक्केवारीपेक्षा अधिक असेल. याचा "सँपल साइझ"शी थेट संबंध लागत नाही. सँपल साइझ खूप प्रचंड असले तरी कल दुष्परिणाम करायचा तो करतोच.

निवडपद्धतीमधील चूक नेहमीच इतकी सुस्पष्ट नसते. समजा सेल फोन वापरून सर्वेक्षण केले, "तुमच्या आंगणात रांगोळी काढतात काय?" तर आपल्याला खरोखर माहीत नसते - "सँपलमध्ये निवड होण्यासाठी सेलफोन उपलब्ध पाहिजे, खरे - पण त्याचा रांगोळी असण्याशी पूर्वसंबंध आहे काय?" असा पूर्वसंबंध नसला, तर बायस नाही. असा पूर्वसंबंध असल्यास बायस आहे. अशा परिस्थितीमध्ये मर्यादित विधान करणे बरे : "सेल फोन वर उत्तर देणार्‍यांपैकी क्ष% लोकांच्या आंगणात रांगोळी असते - अनिश्चिततेचे क्षेत्र य%-ज्ञ%"

येथे मात्र जनसमूहाच्या लोकसंख्येचा आडसंबंध येतो. जनसमूह मोठा आणि विखुरलेला असेल, तर त्याच्या प्रत्येक व्यक्तीला सँपलमध्ये येण्याची शक्यता नसते. उदाहरणार्थ : अरुणाचल प्रदेशातल्या एखाद्या दुर्गम भागातल्या शेतकरीसुद्धा सँपलमध्ये येणे शक्य होते का? जे निवडीच्या बाहेर होते त्याचा प्रश्नाच्या उत्तराशी पूर्वसंबंध लागतो का?

अशा परिस्थितीत सँपल कसे निवडले त्याबद्दल माहिती तळटीपांमध्ये किंवा अहवालाच्या परिशिष्टात देणे आवश्यक असते.

उदाहरणार्थ माझ्या वैद्यकीय निबंधात अशी काहीशी टीप असते :
अमुक शहरात, सन १९क्षक्ष ते २०क्षक्ष काळात, अमुक १० इस्पितळांत हृदयविकाराच्या झटक्याने दाखल झालेल्या पेशंटपैकीच सँपल आहे. (अशा हजारो रुग्णांपैकी निवडले फक्त १००, पण त्या हजारोंपैकी कोणीही निवडले जायची शक्यता होती, हे अध्याहृत.) त्यातही ज्यांना सर्वेक्षण समजावून सांगता आले, आणि ज्यांनी उत्तरे देण्याची अनुमती दिली, त्यांनाच निवडलेले आहे.
.
- अमुक शहर हे अन्य शहरांपेक्षा वेगळे आहे, विशेषतः वाचकाला रस आहे त्या शहरापेक्षा वेगळे आहे, आणि त्याचा दिलेल्या उत्तराशी पूर्वसंबंध आहे
- १९क्षक्ष ते २०क्षक्ष हा काळ आजच्या काळापेक्षा खूप वेगळा आहे, आणि त्याचा दिलेल्या उत्तराशी पूर्वसंबंध आहे
- ती दहा इस्पितळे अन्य इस्पितळांपेक्षा खूप वेगळी आहेत आणि त्याचा दिलेल्या उत्तराशी पूर्वसंबंध आहे
- इस्पितळात दाखल झालेले लोक हे इस्पितळात दाखल होण्यापूर्वीच झटक्यात मरून जाणार्‍या लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत, आणि त्याचा दिलेल्या उत्तराशी पूर्वसंबंध आहे...
- अनुमती देणारे खूप वेगळे...
.
हे सर्व निर्णय वाचकाने करायचे असतात.
.
अर्थातच लेखक म्हणून मी मत सांगेन की माझ्या सर्वेक्षणाचे निकाल अमुकतमुक मर्यादेपर्यंत अन्य रुग्णांना लागू आहेत. आणि या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचा त्या मर्यादेतील रुग्णांच्या उपचारासाठी भविष्यात उपयोग व्हावा. (कारण असा उपयोग होत नसला तर सर्वेक्षण प्रसिद्ध करण्याचे माझे प्रयोजन फार कमी होते.)
.
»

* प्रतिसाद
* धनंजय यांना व्यनि पाठवा

काही माहिती
प्रेषक प्रकाश घाटपांडे (बुध, 03/31/2010 - 07:48)

प्र१ उत्तर ई
प्र २ उत्तर अ किंवा ब
प्र ३ उत्तर ड किंवा ई
संदर्भ मी व माझा देव
नुसार असु शकते
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

सर्वेक्षणाच्या मर्यादा
प्रेषक प्रमोद सहस्रबुद्धे (बुध, 03/31/2010 - 17:55)

धनंजय आणि राजेश यांनी चांगलाच हातभार लावला. आलेखाची कल्पना मला सुचली नव्हती.

एकंदर ११ प्रस्न विचारले होते. शेवटचे तीन प्रश्न उत्पन्न, शिक्षण आणि वयावर आधारित होते. त्यावरून थोडी अधिक आकडेवारी मांडता येते.
विश्वास शब्दाऐवजी सहमत शब्द जास्त योग्य आहे हे मान्य करतो.

हे सर्वेक्षण अचानक झाले. म्हणजे विचार बरेच दिवस होता पण हिम्मत होत नव्हती. म्हणजे कुणाच्या भावनेला धक्का पोचेल का असे वाटत होते. पहिला प्रयोग कार्यालयात केला. तेव्हा मला न जुमानता सहकार्‍यांनी आपली मते मांडल्यावर तो दुणावला. आपसूक सहभागी होणारे मिळत गेले. मी फक्त लक्ष एव्हडेच ठेवले की कुठल्याही कल असलेल्या संघटनेतील (आस्तिक/नास्तिक) एकगठ्ठा मते येऊ नयेत.
नेमकी निवड वगैरे प्रकार करता आला नाही. (असे सर्वेक्षण बरेच महागडे होऊ शकते.) प्रयत्न केला की वय-शिक्षण-उत्पन्नावर विविधता मिळावी. लिंग व धर्मावर जोर दिला नाही. प्रश्न मराठीत असल्याने मुस्लिम ख्रिश्चन कमी होते. (नव्हतेच असे नाही.) पुरुषांचे प्रमाण त्यामानाने थोडे फार जास्तच असावे. सर्वेक्षण महाराष्ट्रभ्रर केले नाही. ते मुख्यतः मुंबईत आणि आसपास झाले. एका नेट सर्वेक्षणाची योजना केली गेली. त्यात साधारण सत्तर प्रतिसाद आले.

उत्तरांचे प्र्माण सारखे येत आहे असे वाटल्यावर अधिक नोंदणी केली नाही. अर्थात हे काही सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेचे लक्षण आहे असे म्हणता येणार नाही.

प्रमोद
»

* प्रतिसाद
* प्रमोद सहस्रबुद्धे यांना व्यनि पाठवा

अभिनंदन
प्रेषक ऋषिकेश (बुध, 03/31/2010 - 18:32)

सर्वेक्षण करून विदा जाहिर केल्याबद्द्ल अभिनंदन
शिवाय सर्वेक्षणाच्या मर्यादा मान्य करूनही जो आलेख मिळत आहे तो माझ्या आजपर्यंतच्या (आप्त, मित्र, परिचित यांच्याशी बोलण्यातून आलेल्या) अनुभवांशी मिळताजुळता आहे. पुनश्च अभिनंदन

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
»

* प्रतिसाद
* ऋषिकेश यांना व्यनि पाठवा

असेच म्हणतो.
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (गुरू, 04/01/2010 - 14:03)

सर्वेक्षण करून विदा जाहिर केल्याबद्द्ल अभिनंदन

-दिलीप बिरुटे
[जग देवाने निर्माण केले यावर विश्वास असलेला]
»

* प्रतिसाद
* प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांना व्यनि पाठवा

डिव्हाईन अंडरस्टॅडींग
नवीन
प्रेषक अजय भागवत (मंगळ, 04/06/2010 - 13:35)

Divine understanding
हा दीपक रानडे ह्यांनी लिहिलेला लेख ह्या विषयावर चर्चा करण्यास उपयोगी पडू शकेल.
»

भ्रमाचा भोपळा | mr.upakram.org

भ्रमाचा भोपळा | mr.upakram.orgभ्रमाचा भोपळा
प्रेषक यनावाला (मंगळ, 03/30/2010 - 17:15)

* शिक्षण
* विचार

भ्रमसेन:
गणित,विज्ञान,व्याकरण, वैद्यक,धर्म,अध्यात्म, अशा प्रत्येक क्षेत्रात काही तर्‍हेवाईक व्यक्ती असतात.त्यांचा समज असतो की आपली बुद्धी काही वेगळीच आहे.कुणालाच कधी सुचल्या नाहीत अशा विलक्षण अलौकिक कल्पना आपल्याला सुचतात.त्या लोकांनी स्वीकारल्या तर जग बदलू शकेल.आपला जन्म त्यासाठीच आहे. असा त्यांचा दृढ विश्वास असतो.ही त्यांची मानसिकता असते.
अशा व्यक्तींना भ्रमसेन(क्रॅंक) म्हणतात.ते वास्तवापासून दूर असतात. तारतम्याचा अभाव असतो.आपल्याला उपजतच सर्व ज्ञान आहे अशा भ्रमामुळे अभ्यासही फ़ारसा नसतो.मात्र ते स्वत:शी प्रामाणिक असतात.ते जे सांगतात ते त्यांना मनापासून खरे वाटत असते.कुणाला फसवायचा उद्देश नसतो.ते लबाड नसतात.
एखाद्या वैज्ञानिक भ्रमसेनाला वाटते की आपण लावलेला शोध अभूतपूर्व आहे.आता जगाची इंधनाची समस्या कायमची मिटणार.पर्यावरण प्रदूषणमुक्त होणार.
"तुम्ही रामनामाचा एक कोटी जप करा.तुमचे सर्व रोग दूर होतील.डॉक्टर नको, दवाखाना नको, औषध नको." असे एक धार्मिक भ्रमसेन पूर्वी मोठ मोठ्या सभांत सांगत असत.भाविक श्रोते मान डोलावत असत.
सूक्ष्म देहाने परग्रहावर जाऊन तेथील खडान् खडा माहितीचे वर्णन(!) करणारे आध्यात्मिक भ्रमसेन बहुपरिचित आहेत.
"कोनाच्या त्रिभाजनाची भौमितिक रचना मी शोधली आहे";
"फ़र्माच्या अंतिम प्रमेयाची सोपी सिद्धता मला सापडली आहे." असे छातीठोकपणे सांगणारे शेकडो गणिती भ्रमसेन होऊन गेले.
बाह्य ऊर्जेविना अविरत चालणारे(पर्पीच्यूअल) यंत्र शोधून काढल्याचा दावा करणारे भ्रमसेन अधून मधून डोके वर काढीत असतात.
गणित, विज्ञान,वैद्यक, व्याकरण या क्षेत्रात भ्रमसेन असले तरी त्यांची संख्या तशी अल्पच.धर्म आणि अध्यात्म ही भ्रमसेनांसाठी सुपीक क्षेत्रे. कारण या विषयांत मोक्ष,स्वर्ग, नरक,परलोक, परब्रह्म, परमात्मा,जीवात्मा,पुनर्जन्म, तसेच अतीन्द्रिय अनुभव,भावातीत ध्यान, समाधी,साक्षात्कार,दृष्टान्त, अशा अनेक भ्रामक संकल्पना आहेत.त्यामुळे इथे भ्रमसेन असणे स्वाभाविक आहे. पण या क्षेत्रांत ठकसेनांची संख्या सर्वाधिक आहे.बाबा,बुवा, बापू, महाराज हे सर्व या ठकसेन वर्गातील आहेत.त्यांचा आध्यात्मिक गोष्टींवर मुळीच विश्वास नसतो.ते लबाड असून श्रद्धाळूंना फसवणे हाच त्यांचा धंदा असतो
या क्षेत्रांतील भ्रमसेनांचा असा समज असतो की आपल्याला विशेष ईश्वरीकृपाप्रसाद लाभला आहे.साक्षात्कार झाला आहे. आत्मज्ञान झाले आहे.ते इतरांना देणे हे आपले जीवितकार्य आहे. म्हणून ते प्रवचने देतात, पुस्तके लिहितात.काही श्रद्धाळू अनुयायी मिळतात. पण अपेक्षित परिणाम साधत नाही.विद्वन्मान्यता मिळत नाही. मग "कंपूशाही, प्रस्थापितांची गटबाजी "असा त्रागा करतात. पण भ्रमाचा भोपळा काही फुटत नाही.
अशा या सर्व भ्रमसेनांकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर.
»

* यनावाला यांना व्यनि पाठवा
* 577 वाचने

भ्रमसेन शब्द आवडला
प्रेषक राजेशघासकडवी (मंगळ, 03/30/2010 - 18:40)

भ्रमसेन व ठकसेन यांची जी सांगड घातली आहे ती सुंदर आहे. खरोखर स्वत:लाच भ्रम झाला आहे असे काही असतात. पण माझा अनुभव असा आहे की स्वार्थ साधणं हा मुख्य हेतू असतो.

तुम्ही दुसरं भ्रम-ठकसेनांनी भरलेलं क्षेत्र विसरलात : राजकारण.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
»

* प्रतिसाद
* राजेशघासकडवी यांना व्यनि पाठवा

बरं मग्?
प्रेषक भटका (मंगळ, 03/30/2010 - 18:43)

नाही म्हणजे.. म्हणायचं काय आहे?

भ्रमसेन प्रत्येक क्षेत्रात आहेत् हे माहीतच आहे. नवीन् काय्?

"..गणित, विज्ञान,वैद्यक, व्याकरण या क्षेत्रात भ्रमसेन असले तरी त्यांची संख्या तशी अल्पच.धर्म आणि अध्यात्म ही भ्रमसेनांसाठी सुपीक क्षेत्रे. कारण या विषयांत मोक्ष,स्वर्ग, नरक,परलोक, परब्रह्म, परमात्मा,जीवात्मा,पुनर्जन्म, तसेच अतीन्द्रिय अनुभव,भावातीत ध्यान, समाधी,साक्षात्कार,दृष्टान्त, अशा अनेक भ्रामक संकल्पना आहेत.त्यामुळे इथे भ्रमसेन असणे स्वाभाविक आहे. पण या क्षेत्रांत ठकसेनांची संख्या सर्वाधिक आहे.बाबा,बुवा, बापू, महाराज हे सर्व या ठकसेन वर्गातील आहेत.त्यांचा आध्यात्मिक गोष्टींवर मुळीच विश्वास नसतो.ते लबाड असून श्रद्धाळूंना फसवणे हाच त्यांचा धंदा असतो
या क्षेत्रांतील भ्रमसेनांचा असा समज असतो की आपल्याला विशेष ईश्वरीकृपाप्रसाद लाभला आहे.साक्षात्कार झाला आहे. आत्मज्ञान झाले आहे.ते इतरांना देणे हे आपले जीवितकार्य आहे. म्हणून ते प्रवचने देतात, पुस्तके लिहितात.काही श्रद्धाळू अनुयायी मिळतात. पण अपेक्षित परिणाम साधत नाही.विद्वन्मान्यता मिळत नाही. मग "कंपूशाही, प्रस्थापितांची गटबाजी "असा त्रागा करतात. पण भ्रमाचा भोपळा काही फुटत नाही...."

केवळ ही वाक्य लिहिण्यासाठी आख्खा धागा उघडायचे कष्ट घेतलेत का?

"शहाणे करून् सोडावे सकळ जनं" अश्या भुमिकेतून् लेख लिहिला असेल तरिही वरील वाक्यांमध्ये नवीन काहिच् नाही आहे. जुनेच मुद्दे आहेत्.
थोडक्यात हा लेख संदर्भहीन, अर्धवट वाटतो..
»

* प्रतिसाद
* भटका यांना व्यनि पाठवा

अधिक माहिती द्यावी
प्रेषक प्रियाली (मंगळ, 03/30/2010 - 18:50)

या लेखाच्या पुष्टीसाठी अधिक माहिती द्यावी. खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्ती आपल्याला भ्रमसेन किंवा ठकसेन वाटतात.

१. जीजस क्राईस्ट
२. साईबाबा
३. सत्यसाईबाबा
४. एम. एफ. हुसैन
५. पांडुरंगशास्त्री आठवले
६. गाडगेबाबा
७. मुहम्मद पैगंबर
८. बाबासाहेब पुरंदरे
९. महात्मा गांधी
१०. बाबा रामदेव

यापैकी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या विचारसरणीवर गाढ विश्वास ठेवून आहे/ होती. काही धर्म संस्थापक आहेत. काहींनी वेगळी तत्त्वे जगासमोर मांडली आहेत. काहींनी वेगळी चित्रे जगासमोर मांडली आहेत. यांतील काही बाबा,बुवा, बापू, महाराज आहेत तर काही इतिहासाचार्य आहेत. परग्रहावर जाऊन आलेल्या व्यक्तिचे नाव घेतलेले नाही कारण त्याचे चर्वितचर्वण खूप झाले आहे. असो.
»

* प्रतिसाद
* प्रियाली यांना व्यनि पाठवा

तुम्हीच ठरवा
प्रेषक बाबासाहेब जगताप (बुध, 03/31/2010 - 07:27)

या क्षेत्रांतील भ्रमसेनांचा असा समज असतो की आपल्याला विशेष ईश्वरीकृपाप्रसाद लाभला आहे.साक्षात्कार झाला आहे. आत्मज्ञान झाले आहे.ते इतरांना देणे हे आपले जीवितकार्य आहे. म्हणून ते प्रवचने देतात, पुस्तके लिहितात.काही श्रद्धाळू अनुयायी मिळतात. पण अपेक्षित परिणाम साधत नाही.विद्वन्मान्यता मिळत नाही. मग "कंपूशाही, प्रस्थापितांची गटबाजी "असा त्रागा करतात. पण भ्रमाचा भोपळा काही फुटत नाही.

मूळ लेखातले वरील विवेचन वाटून या यादीपैकी भ्रमसेन कोण हे तुम्हालाही ठरवता येईल. या यादीतील एखाददुसरेच नाव त्रागा करणाऱ्यापैंकी आहे. बाकी सर्वांनाच मान्यता व श्रध्दाळू अनुयायी मिळाले. माझ्यामते काहींची सुरुवात खरेच जगाच्या कल्याणासाठी असते. पण नंतर श्रध्दाळूंचा घोळका जमायला लागला की हे लोक त्या श्रध्दाळूंची संख्या वाढवण्यात व त्यांची श्रध्दा जोपासण्यात व अधिक गाढ करण्यात इतके गुंतून पडतात की मूळ कार्यापासून ढळू लागतात. काही जणांची सुरूवात मी ईश्वराचा सेवक अशी आहे व शेवट मीच ईश्वर आहे अशी असा होतो. जो शेवटपर्यंत जनतेचा आत्मसन्मान व विवेकी कल्याण यांना बांधील राहीला तो असो एखादा विरळाच असतो.
»

* प्रतिसाद
* बाबासाहेब जगताप यांना व्यनि पाठवा

याचे उत्तर यनांनी द्यायचे आहे
प्रेषक प्रियाली (बुध, 03/31/2010 - 11:48)

मूळ लेखातील विवेचन हे अतिशय विस्कळीत आणि त्रोटक आहे. अशाप्रकारचे त्रोटक आणि विस्कळीत लेख लिहिण्यात नेमके काय हशील असते तेच जाणून घ्यायचे आहे आणि म्हणूनच काही प्रसिद्ध व्यक्तिंची नावे दिली आहेत. जर माझे मलाच उत्तर काढायचे झाले तर वरील लेखाची गरजच ती काय?

वरील व्यक्ती भ्रमसेन आहेत का ठकसेन किंवा त्या तशा नाहीत याचे उत्तर देताना सोबत स्पष्टीकरण दिल्यास अधिक उत्तम.
»

* प्रतिसाद
* प्रियाली यांना व्यनि पाठवा

नामसूची
प्रेषक यनावाला (गुरू, 04/01/2010 - 16:16)

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली यांनी जी नामसूची दिली आहे त्यात दोन धर्मसंस्थापक आहेत.अशा महामानवांची अंतःस्फुरणशक्ती असामान्य असते.त्यामुळे त्यांच्या मानसिकतेविषयी कोणतेही ठोस विधान करणे शक्य वाटत नाही.(मात्र धर्म स्थापन झाले नसते तर हे जग अधिक सुंदर आणि सुखी असते.माणसाची कितीतरी अधिक प्रगती झाली असती.धर्मांमुळे मानवतेची अतोनात हानी झाली आणि होत आहे, असे माझे दृढमत आहे.)
अन्य आठ व्यक्तींत भ्रमसेनतेची ल़शणे दिसत नाहीत.दृढ श्रद्धा असणे,पूर्वी कोणी मांडल्या नाहीत अशा गोष्टी जगापुढे मांडणे म्हणजे भ्रमसेनता नव्हे.भ्रमसेन तर्‍हेवाईक ,विक्षिप्त असतात.त्यांना वास्तवाचे भान नसते.
लेखात भ्रमसेनाची व्याख्या नेमक्या शब्दांत केली नसली तरी अनेक लक्षणे दिली आहेत.उदाहरणे आहेत.अर्थासाठी 'क्रँक'असा इंग्लिश प्रतिशब्द दिला आहे.त्यावरून अर्थ स्पष्ट होऊ शकतो असे मला वाटते.
»

* प्रतिसाद
* यनावाला यांना व्यनि पाठवा

थोडासा विस्कळित पण रोचक लेख
प्रेषक धनंजय (मंगळ, 03/30/2010 - 23:05)

थोडासा विस्कळित पण रोचक लेख. भ्रमसेन/ठकसेन हे वर्गीकरण विचार करण्यालायक आहे.

माझ्या मते वर्गीकरण याहून थोडेसे सूक्ष्म असावे.

चौपदरी वर्गीकरण :
* स्वतःशी प्रामाणिक स्वतःशी अप्रामाणिक
लोकांना पटवून सांगणारे स्वतःशी प्रामाणिक, नवकल्पना पटवून देणारे : नवकल्पना मोठ्या आवाक्याची असल्यास लोकनायक, नवकल्पना रोजव्यवहारातली असल्यास आपण बहुतेक सामान्य लोक स्वतःशी अप्रामाणिक, नवकल्पना पटवून देणारे : यशस्वी ठकसेन
न-पटवता खरेच म्हणणारे स्वतःशी प्रामाणिक, नवकल्पना न-पटवता खरेच म्हणणारे : भ्रमसेन स्वतःशी अप्रामाणिक, नवकल्पना न-पटवता खरेच म्हणणारे : अयशस्वी ठकसेन

इ : सध्या लहानमोठी कुठलीही नवकल्पना नसलेले : झोपलेले किंवा कमालीचे थकलेले किंवा आळसावलेले किंवा मतिमंद लोक
(येथे "चला खरेदीला जाऊया" असे घरच्यांना पटवणे, हीसुद्धा "नवकल्पना" मानलेली आहे. अशी साधीसुद्धा नवकल्पना नसणारे लोक क्वचितच कोणी असावे.)

- - -

भ्रमसेनाबाबत स्वतःला लागू करण्यासाठी माझे तत्त्व असे आहे :

विज्ञानात एखादी कल्पना "सत्य" आहे असे मला वाटले, तरी जोपर्यंत आपल्या क्षेत्रातल्या दुसर्‍या कोणाला ती मी पटवून देऊ शकत नाही, तोपर्यंत ती कल्पना चुकली असल्याची दाट शंका माझ्या मनात असते. दुसर्‍याला कल्पना पटवता येणे हे माझ्या लेखी कल्पना जाणण्याइतकेच पायाभूत आहे.

दुसर्‍याला पटवून देता येत नाही तोवर त्या कल्पनेबाबत मी भ्रमसेन असू शकतो. किंवा सिद्धता करण्याची खटपट अजून पूर्ण झाली नाही अशा स्थितीमध्ये असेन.

परंतु दुसर्‍यांना पटवण्यापूर्वी नवकल्पनेने भारावून जाणेसुद्धा महत्त्वाचे, सिद्धता शोधायला त्यामुळे आंतरिक बळ मिळते. (सिद्धता मिळण्यापूर्वीच्या "भ्रमसेन" अवस्थेचे हे आंशिक समर्थन आहे.)

- - -

कधीकधी मी अयशस्वी ठकसेनासारखा सुद्धा वागतो. बाजारात भाव करताना सुरुवातीला वाजवीपेक्षा कमी किंमत सांगतो. अर्थात वाजवी किमतीबद्दलच्या माझ्याच विचाराशी माझे बोलणे अप्रामाणिक असते. या हुज्जतीमध्ये मी बहुतेक वेळा अयशस्वी होतो - दु:खदपणे हे नमूद करतो.
»

* प्रतिसाद
* धनंजय यांना व्यनि पाठवा

नाडीग्रंथाची भलावण करणारे
प्रेषक प्रियाली (बुध, 03/31/2010 - 00:26)

कोणत्या क्याटेगरीत येतील?

स्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?

---

माझे प्रश्न टवाळखोर वाटण्याची शक्यता आहे परंतु ते तसे नाहीत असे स्पष्टीकरण द्यावेसे वाटते कारण भ्रमसेन आणि ठकसेन हे सापेक्ष तर नाही अशी शंका मला वाटत आहे. टवाळखोर प्रतिसाद वाटत असल्यास आगाऊ क्षमस्व!
»

* प्रतिसाद
* प्रियाली यांना व्यनि पाठवा

पटवून देणारे
प्रेषक धनंजय (बुध, 03/31/2010 - 01:25)

"पटवून देणारे" हे थोडेसे व्यक्तिसापेक्ष असले तरी खूपसे व्यक्तिसापेक्ष नाही. "पटवून देणे" म्हणजे श्रोता-वक्ता या दोघांचे कुठले निकष असतात, त्या निकषाइतपत पटवून देणे.

आता प्रत्येक श्रोता-वक्ता जोडीत निकष वेगळे असू शकतील, इतपत "पटवून देणे" व्यक्तिसापेक्ष आहे. मात्र "प्रत्येक श्रोता-वक्ता जोडीत पटवण्यासाठी-पटण्यासाठी निकष असतात" हे विधान व्यक्तिसापेक्ष नाही.

अंततोगत्वा व्यक्तिसापेक्षता ही अपेक्षितच आहे, कारण काही पटल्यानंतर त्यावर कार्य करण्याचा निर्णय व्यक्तीच घेऊ शकते. आणि व्यक्तीला निर्णयस्वातंत्र्य आहे. मात्र जोवर समाजात संवाद होत आहेत तोवर हि व्यक्तिसापेक्षता पूर्णपणे यादृच्छिक आणि तर्‍हेवाईक (रँडम अँड कॅप्रिशियस) नसणार, असा माझा अनुभव आणि कयास आहे. समाजातल्या बहुतेक संवादक-जोड्यांचे पटण्या-पटवण्याचे निकष एकमेकांशी आदमासे सुसंगत असावेत.

त्या अनुभवांवरून पटण्याबाबत माझे निकष मी अन्यत्र विस्ताराने सांगितलेले आहेत. आणि केवळ तत्त्वे न सांगता माझ्या वागणुकीतून ते निकष व्यवहार्य आणि समावेशक असल्याचे दाखवले आहे. इतकेच काय माझे वागणे अन्य लोकांच्या वागण्यासारखे असल्यामुळे, अन्य कित्येक लोकांचेही बोलण्यात-नसले-तरी-वागण्यात तसेच कुठलेसे निकष असल्याचे माझे मत आहे.

- - -

व्यापारविषयक पटवा-पटवीबाबत मात्र एक वैशिष्ट्य : विक्रेत्याला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी थोडा अधिक प्रयत्न करावा लागतो. माल विकण्यामुळे फायदा होतो - त्या फायद्याच्या इच्छेमुळे प्रामाणिकपणा वाकवला जाऊ शकतो, ही गोष्ट बर्‍याच पुरातन काळापासून ज्ञात आहे. (नैयायिक म्हणतात : विश्वासू माणूस तो ज्याने स्वतः बाकी (प्रत्यक्ष वगैरे) प्रमाणांनी सत्याची परीक्षा केली आहे, आणि जो राग-लोभ वगैरे भावनांनीही सत्यापेक्षा वेगळे बोलणार नाही.)

आणि आजही बर्‍याच लोकांना ही गोष्ट पटते, की आर्थिक फायदा होत असेल तर आपल्याला थोडासा अप्रामाणिकपणा करायचा मोह होतो. बाजारात भाव करताना ही गोष्ट कित्येकदा लक्षात येते. (वर बाजारभाव करताना खुद्द माझ्या थोड्याशा अप्रामाणिकपणाचे उदहरण दिलेलेच आहे. हे वागणे अपवादात्मक नसावे. विक्रेतासुद्धा किंमत वाजवीपेक्षा वाढवून सांगितल्याचा आपला अनुभव असतो.)

- - -

विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते.
या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व.

या उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे? याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो :

धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.

ज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे. लक्षात घेतले पाहिजे : वरील दुव्यांमधील संवादक-जोडीत पटणे-पटवणे अयशस्वी झाले, ही बाब व्यक्तिनिरपेक्ष आहे.

मात्र हा संवाद कोणी ऐकत-वाचत असले (उदाहरणार्थ तुम्ही), तर संवादकांपैकी कोणाचे पटवणे सुसंगत आहे, तो निर्णय त्या-त्या श्रोत्या-वाचकासाठी व्यक्तिसापेक्ष आहे. तुम्ही वरील दुवे वाचून पटवले गेले आहे/नाही याबद्दल स्वतःचा निर्णय करू शकता. माझी आशा आणि कयास आहे, की प्रत्येक वाचकाचा निर्णय व्यक्तिसापेक्ष असला तरी पूर्णपणे यादृच्छिक आणि तर्‍हेवाईक नसेल.
»

* प्रतिसाद
* धनंजय यांना व्यनि पाठवा

दोन्ही
प्रेषक प्रकाश घाटपांडे (बुध, 03/31/2010 - 08:26)

नाडीग्रंथाची भलावण करण्यात काही लोक भ्रमसेन असतात तर काही ठकसेन. भ्रमसेनातुन ठकसेनाकडे प्रवास हा रोचक असावा. मारुतीच्या बेंबीत बोट घालण्यासारखा.
भ्रमसेन व ठकसेन यातील द्वैत जेव्हा संपते तेव्हा त्याला काय म्हणावे बरे?
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

त्याला
प्रेषक चतुरंग (गुरू, 04/01/2010 - 12:14)

'इनसेन' म्हणावे! ;)

चतुरंग
»

* प्रतिसाद
* चतुरंग यांना व्यनि पाठवा

टवाळखोर
प्रेषक यनावाला (गुरू, 04/01/2010 - 16:28)

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली यांच्या प्रश्नांना टवाळखोर म्हणता येणार नाही.त्या प्रामाणिक शंका आहेत असेच मला वाटते.
नाडीग्रंथाची भलावण करणारे भ्रमसेन असतील अथवा ठकसेनही असू शकतील. मात्र नाडीग्रंथाधारे भविष्यकथनाचा धंदा करणारे लोक नि:संदेह ठकसेनच आहेत.त्यांची लबाडी अनेकदा उघड झाली आहे श्री.प्रकाश घाटपांडे यांनी त्याविषयी लिहिले असल्याचे स्मरते.
»

* प्रतिसाद
* यनावाला यांना व्यनि पाठवा

स्थल-काल सापेक्ष तसेच डायनॅमिक
प्रेषक अक्षय (बुध, 03/31/2010 - 00:39)

धनंजय यांनी मांडलेले वर्गीकरण योग्य आहे. असे वर्गीकरण एका व्यक्तीचे स्थायीपणे करणे मात्र अशक्य वाटते. उदा. सहकार्‍याने माझ्याबरोबर कॉफी पिण्यास यावे हे त्याला मी पटवून देऊ शकलो पण कॉफी पिल्यानंतर त्याने धुम्रपान करू नये हे मात्र पटवू शकलो नाही.

प्रामाणिक-अप्रामाणिक, यशस्वी-अयशस्वी भ्रमसेन-ठकसेन यांच्याप्रमाणेच ते ज्या लोकांन पटवून देत आहेत त्यांचेही प्रामाणिक-अप्रामाणिक, यशस्वी-अयशस्वी भ्रमित-ठकित असे वर्गीकरण करता येईल. वेगवेगळ्या घटनांमध्ये एकच व्यक्ति भ्रमसेन-ठकसेन ही भुमिका बदलून भ्रमित-ठकित होऊ शकेल.

या भुमिकांचा खेळ डायनॅमिक असल्याने व्यक्तिचे काही एक शिक्षण होऊ शकेल व त्याचाही कुठली भुमिका स्विकारावी तसेच यश-अपयश यावर परिणाम होऊ शकेल.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
»

* प्रतिसाद
* अक्षय यांना व्यनि पाठवा

माझे मत
प्रेषक विनायक (बुध, 03/31/2010 - 17:47)

न-पटवता खरेच म्हणणारे स्वतःशी प्रामाणिक, नवकल्पना न-पटवता खरेच म्हणणारे : भ्रमसेन

यामध्ये लोकांना एखादी गोष्ट पटली नाही तर दोष सर्वस्वी पटवू न शकणार्‍या व्यक्तीचा आहे असे गृहीत धरले आहे. कधी कधी शास्त्रज्ञ काळाच्या बराच पुढे असल्याने त्याचे मत लोकांना त्यावेळी पटत नाही पण ५० - १०० (कोपर्निकस) क्वचित १८०० - २००० (ऍरिस्टार्कस) वर्षांनी पटते. अशा वेळी नेमके भ्रमसेन कोण? हे शास्त्रज्ञ की त्यांचे विचार न पटणारे लोक?

हाच तर्क पुढे चालवायचा तर आज ज्यांना भ्रमसेन म्हणून हसतो, टवाळी करतो त्यांचे म्हणणे पुढे खरे ठरले तर भविष्यात आपण भ्रमसेन ठरू आणि लोक आपल्याला हसतील. अर्थात इतका पुढचा विचार करून आज प्रतिगामी ठरण्यापेक्षा (आणि पुढे खरेच द्रष्टा ठरेन याची खात्री नसताना) सरळ आज या न पटणार्‍या गोष्टी सांगणार्‍यांना "भ्रमसेन" म्हणून रोकडा पुरोगामीपणा पदरात पाडून घ्यावा यातच शहाणपण आणि पोलिटिकल करेक्टनेस आहे.

याउलट टॉलेमीसारखा शास्त्रज्ञ समकालीन लोकांना चुकीच्या (पुढे चूक ठरलेल्या) गोष्टीही पटवण्यात यशस्वी ठरतो. अशा वेळी त्याला भ्रमसेन म्हणायचे का?

विनायक
»

* प्रतिसाद
* विनायक यांना व्यनि पाठवा

वरील प्रतिसादातली ही वाक्ये
प्रेषक धनंजय (बुध, 03/31/2010 - 21:09)

उदाहरणे चुकलेली आहेत (स्पष्टीकरण पुढे), तरी तुमच्या सुयोग्य भावनेस आधीच हिशोबात घेतलेले आहे :

दुसर्‍याला पटवून देता येत नाही तोवर त्या कल्पनेबाबत मी भ्रमसेन असू शकतो. किंवा सिद्धता करण्याची खटपट अजून पूर्ण झाली नाही अशा स्थितीमध्ये असेन.
.
परंतु दुसर्‍यांना पटवण्यापूर्वी नवकल्पनेने भारावून जाणेसुद्धा महत्त्वाचे, सिद्धता शोधायला त्यामुळे आंतरिक बळ मिळते. (सिद्धता मिळण्यापूर्वीच्या "भ्रमसेन" अवस्थेचे हे आंशिक समर्थन आहे.)

- - -
उदाहरणे चुकली, असे का म्हटले?

ऍरिस्टार्कस आणि कोपेर्निकस यांच्याबद्दलला तुमचा इतिहास चुकलेला आहे. त्या दोघांनी आपले म्हणणे पटवण्यासाठी दोघांनी युक्तिवाद दिले होते. युक्तिवादांशिवाय आपले म्हणणे खरे, असे म्हटले नव्हते.

ऍरिस्टार्कसचे मूळ लेखन आपल्यापाशी नाही. मात्र आर्किमेडीसने केलेल्या उल्लेखावरून त्याने काहीतरी युक्तिवाद केला होता हे कळते. (ऍरिस्टार्कसच्या सूर्यमध्यसिद्धांताच्या युक्तिवादाचा पूर्वार्ध असावा तो युक्तिवाद येथे बघावा. या पूर्वार्धात सूर्य आणि चंद्रांची पृथ्वीपासून अंतरे, आणि त्यांच्या आकारमानाचे पृथ्वीच्या आकारमानाशी प्रमाण [प्रोपोर्शन] काय, त्याचे ढोबळ गणित केलेले आहे. असा पूर्वार्ध असेल, तर उत्तरार्ध काय असावा, याची बरीच कल्पना येते. मात्र सूर्यमध्यसिद्धांताचा पूर्ण युक्तिवाद सध्या उपलब्ध नाही.)

आणि शिवाय :
पृथ्वी सूर्याभोवती फिरते की दुसर्‍या कुठल्या बिंदूभोवती, १८००-२००० वर्षांच्या नंतर याचा निर्णय तुम्ही काय केलेला आहे? जर सूर्य आकाशगंगेच्या मध्याभोवती फिरत असेल तर पृथ्वी "सूर्याभोवती" फिरून परत गोल-त्याच ठिकाणी येणार नाही. आणि आकाशगंगासुद्धा चल आहे असे बघता पृथ्वी आकाशगंगेच्या मध्याभोवती सुद्धा फिरत नाही.

कोपेर्निकुसचा युक्तिवाद सोडला तर त्याचे निष्कर्ष चुकलेले आहेत, यात तुम्हाला काही शंका आहे काय? (कोपेर्निकुसचे युक्तिवाद आणि त्याचे निष्कर्ष त्याच्या मूळ शब्दात आपल्याकडे उपलब्ध आहेत.) कोपेर्निकुसचे युक्तिवाद आपल्यापाशी उपलब्ध असल्यामुळे आपण म्हणू शकतो, की तो "भ्रमसेन" नाही.

कोपेर्निकुसचे युक्तिवाद समजणारे लोक त्याच्या काळात नव्हते, असे तुम्हाला म्हणायचे असले, तर ते इतिहासाच्या दृष्टीने चुकलेले आहे. चर्चने "त्याचे युक्तिवाद समजत नाहीत" असे म्हटले नाही. त्याचे निष्कर्ष धर्मशास्त्रविरोधी आहेत, असे म्हणून चर्चने त्याच्या सिद्धांतांना पाखंड ठरवले.
»

* प्रतिसाद
* धनंजय यांना व्यनि पाठवा

उत्तर
प्रेषक विनायक (गुरू, 04/01/2010 - 03:07)

ऍरिस्टार्कस आणि कोपेर्निकस यांच्याबद्दलला तुमचा इतिहास चुकलेला आहे. त्या दोघांनी आपले म्हणणे पटवण्यासाठी दोघांनी युक्तिवाद दिले होते. युक्तिवादांशिवाय आपले म्हणणे खरे, असे म्हटले नव्हते.

त्यांनी युक्तिवाद दिलेला नाही असे मी कुठे म्हटले आहे? माझे म्हणणे असे आहे की त्यांनी दिलेला युक्तिवाद लोकांना त्याकाळी पटला नाही. आता याचा दोष कुणाचा? या दोघांचा की लोकांचा? केवळ युक्तीवाद दिला म्हणजे भ्रमसेन नाही असे आहे का? कारण तसेही आज न पटणार्‍या गोष्टी सांगणारे लोक काहीएक युक्तिवाद देतातच पण तो आज आपल्याला पटत नाही. त्यावर माझे उत्तर इतकेच असेल "बाबारे तुझे म्हणणे मी ऐकले/वाचले. माझ्या वकुबानुसार मी त्याचे परीक्षण केले. माझ्या अल्पबुद्धीला आज तरी ते पटत नाही. दोष तुझ्या युक्तिवादाचा नसून माझ्या मर्यादित वकुबाचाही असणे शक्य आहे. कदाचित् आणखी १०० कदाचित् १००० वर्षांनी नवीन संशोधन होऊन तुझे म्हणणे खरे ठरेल. त्यामुळे तू भ्रमसेन आहेस असे मी म्हणणार नाही."

याची दुसरा बाजू अशी की ज्यांनी केलेले संशोधन एकेकाळी लोकांनी स्वीकारले होते पण पुढे चुकीचे ठरले अशा लोकांची वर्गवारी कुठे करायची? हे नुसत्या टॉलेमीपुरते नाही तर फ्लॉजिस्टोनची कल्पना, ईथरची कल्पना मांडणारे, कोलेस्टेरॉलची संरचना पहिल्यांदा मांडल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले विंडॉस (पुढे ती संरचना चुकीची सिद्ध झाली आणि थोर रसायनशास्त्रज्ञ वुडवर्ड यांनी आज प्रचलित असलेली योग्य संरचना मांडली) या सर्वांना काय म्हणावे ? प्रत्येकाने युक्तीवाद दिला होता आणि ते स्वतःशी प्रामाणिक होते. त्यामुळे त्यांना भ्रमसेन म्हणता येत नाही आणि त्यांनी स्वार्थाकरता लोकांची फसवणूक केली नाही म्हणून ठकसेनही म्हणता येत नाही. लोकांना पटवले तरी ते पटवणे अल्पजीवी ठरून मूळ कल्पनाच चुकीच्या ठरल्याने थोर शास्त्रज्ञांमध्येही गणना करता येत नाही. मग काय करावे?

कोपेर्निकुसचे युक्तिवाद समजणारे लोक त्याच्या काळात नव्हते, असे तुम्हाला म्हणायचे असले, तर ते इतिहासाच्या दृष्टीने चुकलेले आहे. चर्चने "त्याचे युक्तिवाद समजत नाहीत" असे म्हटले नाही. त्याचे निष्कर्ष धर्मशास्त्रविरोधी आहेत, असे म्हणून चर्चने त्याच्या सिद्धांतांना पाखंड ठरवले.

कोपर्निकसचा युक्तिवाद समजणारे लोक त्याच्या काळात नव्हते असे मी म्हटले नाही. त्याचा युक्तिवाद समजणारे अगदी थोडे
लोक त्याच्या (किंवा नंतरच्या १०० एक वर्षांत) काळात होते. ज्याला कोपर्निकसच्या विचाराचा प्रसार केल्याबद्दल जाळले तो ब्रूनो, ज्याने स्वतःचे असे "तडजोड मॉडेल" (इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि सूर्य ग्रहांसकट आणि चंद्र सुटा पृथ्वीभोवती फिरतात) प्रसिद्ध केले तो टायको ब्राही, ग्रहांच्या गतीचे अचूक गणित करणारा योहानस केपलर आणि दुर्बिणीतून आकाश बघणारा गॅलिलिओ या सर्वांना कोपर्निकसचा युक्तिवाद समजला होता असे वाटते. ही यादी अर्थातच सर्वसमावेशक नाही. यापेक्षा मोठी नक्कीच असणार. परंतु विरोध करणार्‍या चर्चला किंवा धर्मगुरूंना तो किती समजला होता याबद्दल मी साशंक आहे.

चर्चने किंवा धर्मगुरूने "बाबा कोपर्निकसा, तुझे ' डेस रिव्होल्युनिशनिबस" मी समग्र वाचले, त्यावर चिंतन केले. तुझा युक्तिवाद तर्कशुद्ध आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तुझे म्हणणे मला १००% पटले. पण काय करावे? बायबलात याच्या विरोधी उल्लेख असल्याने तुझे हे धर्मविरोधी विचार मला मान्य करता येत नाहीत याबद्दल मला क्षमा कर." असे म्हटल्याचा उल्लेख आहे का? एखाद्या धर्मगुरूने नाही तर बहुसंख्य धर्मगुरूंनी असे म्हटल्याचा काही एक पुरावा आपल्याजवळ असेल तर जरूर द्यावा. मी आपले म्हणणे योग्य मानेन.

माझ्याजवळ कुठलाच पुरावा नसल्याने माझे मत तर्कानेच देत आहे. बहुसंख्य धर्मगुरू हे कोपर्निकसचे किचकट गणित समजण्याइतके शिकलेले नव्हते. मुळात हे मत बायबलविरोधी असल्याने आणि जरी वाचले तरी आपल्याला काही समजणार नाही अशी खात्री असल्याने बहुसंख्याकांनी "डेस रिव्होल्युनिशनिबस" मुळातून वाचण्याचे कष्ट न घेता त्याच्याविरुद्ध हाकाटी केली.

बाकी ऍरिस्टार्कस किंवा कोपर्निकसची मॉडेल्स ही दोषमुक्त नव्हती. फक्त टॉलेमीच्या अधिक सदोष मॉडेलच्या मानाने ते तोग्य दिशेने टाकलेले पाऊल होते.

विनायक
»

* प्रतिसाद
* विनायक यांना व्यनि पाठवा

सिद्धता, असिद्धता
प्रेषक राजेशघासकडवी (गुरू, 04/01/2010 - 07:47)

दोष तुझ्या युक्तिवादाचा नसून माझ्या मर्यादित वकुबाचाही असणे शक्य आहे.

काही युक्तिवाद अॅब्सोल्यूट पातळीवर चुकीचे असू शकतात, व ते तसे सिद्ध केले जाऊ शकतात हे तुम्हाला मान्य आहे का? नाहीतर काहीही आत्ता चूक वाटतं, पण नंतर बरोबर सिद्ध होऊ शकतं असं म्हटलं तर बरोबर आणि चूक, किंवा सिद्धता यालाच काही अर्थ राहात नाही. मग सत्य हे केवळ प्रस्थापित रचनेने मान्य केलेली विधानं ठरतील.

आईन्स्टाईनने जे नियम मांडले त्यांनी न्यूटनचे नियम चुकीचे ठरले नाहीत. त्यांचा एका अर्थाने विस्तार झाला. जिथे न्यूटनचे नियम लागू पडत नाहीत असं आईन्स्टाईनने म्हटलं तिथे ते पडताळून बघितले गेले. पण उद्या जर कोणी म्हणायला लागलं की ते दोघेही चुकीचे आहेत हे माझ्या अंतर्मनाला पटलं आहे, व या तुम्हीदेखील अमुक इतके पैसे देऊन अशी ध्यानधारणा केलीत तर तुम्हाला देखील ते पटेल, तर अशा 'युक्तिवादा'ला काय म्हणावं?

भ्रमसेनांचं आणखीन एक व्यवच्छेदक लक्षण असं असतं (जे धनंजय यांच्या वर्गीकरणात आलेलं नाही) ते म्हणजे 'अमुक तमुक निरीक्षण झालं तर माझा युक्तिवाद, त्यातून येणारे निष्कर्ष, व तद्वतच माझा सिद्धांत चुकीचा आहे असे ठरेल' असं ठाम विधान करायला ते कचरतात. ठकसेनांचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते जातकाचा/ग्राहकाचा विश्वास असला पाहिजे ही अट घालतात.

आणखीन एक निरीक्षण - काही महत्त्वाचा विदा - (मूळ गृहितकं काय आहेत, भविष्य जाणण्याची प्रक्रिया काय, अमुकतमुक मंत्र कार्य कसा करतो, नाडीपट्ट्या नेमक्या किती आहेत) ही लपवून ठेवलेली असतात, व त्यांच्याविषयी प्रश्नांची उत्तरं टाळली जातात. असं होतं तेव्हा त्यांच्या सत्यकथनक्षमतेवर संशय निर्माण होतो.

थोडक्यात - सिद्धतेची पारदर्शक प्रक्रिया, व असिद्धतेचे निकष किंवा शक्यतादेखील नसलेल्या युक्तिवादांना मी 'दोष तुझ्या युक्तिवादाचा नसून माझ्या मर्यादित वकुबाचाही असणे शक्य आहे' असं म्हणणार नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
»

* प्रतिसाद
* राजेशघासकडवी यांना व्यनि पाठवा

त्यांच्या सत्यकथनक्षमतेवर संशय निर्माण होतो.
प्रेषक शशिओक (शुक्र, 04/02/2010 - 07:19)

आणखीन एक निरीक्षण - काही महत्त्वाचा विदा - (मूळ गृहितकं काय आहेत, भविष्य जाणण्याची प्रक्रिया काय, अमुकतमुक मंत्र कार्य कसा करतो, नाडीपट्ट्या नेमक्या किती आहेत) ही लपवून ठेवलेली असतात, व त्यांच्याविषयी प्रश्नांची उत्तरं टाळली जातात. असं होतं तेव्हा त्यांच्या सत्यकथनक्षमतेवर संशय निर्माण होतो.

राजेशजी,
आपल्याला नाडी ग्रंथांसंबंधी काही उत्तरे न दिल्यामुळे संशय निर्माण होत असेल तर -

१) मूळ गृहितकं काय आहेत - नाडीग्रंथातील ताडपट्टयात व्यक्तीचे नाव व अन्य माहिती कशी कोरून येते.
२) भविष्य जाणण्याची प्रक्रिया काय - नाडी महर्षींना ती प्रक्रिया कशी प्राप्त आहे.
३) अमुकतमुक मंत्र कार्य कसा करतो - व
४) नाडीपट्ट्या नेमक्या किती आहेत - या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मलाच काय नाडीवाचकांसकट कोणालाच सांगता आलेली नाहीत. म्हणूनच संशय वाढतो आहे. तीच जाणून घ्यायला हवी असतील तर काय करावे यासाठी सर्वांनी एकत्र विचार करावा. असे सुचवावेसे वाटते.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
»

* संपादन
* प्रतिसाद

नवसिद्धांताचा प्रवर्तक?
प्रेषक शशिओक (बुध, 03/31/2010 - 14:09)


ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही

{प्रियालींच्या धनंजयांना विचारलेल्या प्रश्नाला - की}... नाडीग्रंथांची भलावण करणारे कोणत्या क्याटेगरीत {भ्रमसेन की ठकसेन}येतील?
स्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?

{धनंजय म्हणतात} ...विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते. {कदाचित हैयोहैयैयोंच्या अनुषंगाने} या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व.
या उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे? याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो :
धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.
ज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे....

{कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते.
नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीशास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत.
आपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.

नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या बाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल.
नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून भौतिकविज्ञान विरुद्ध ओक असे न पाहता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
»

* संपादन
* प्रतिसाद

संपूर्ण ग्रंथ परिचय - विज्ञान अण

संपूर्ण ग्रंथ परिचय - विज्ञान अणसंपूर्ण ग्रंथ परिचय - विज्ञान अणि चमत्कार
प्रेषक शशिओक (सोम, 03/29/2010 - 14:13)

* भाषा
* अनुभव

प्रा. अद्वयानंद गळतगे

- ग्रंथ परिचय –


विज्ञान अणि चमत्कार

बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान?
या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे?
विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा बसवावा? परामानसशास्त्राने केलेल्या संशोधनाची ओळख व महत्व काय?

अशा अनेक कूट प्रश्नांच्या उत्तरांचे समग्र भांडार म्हणजे ‘विज्ञान अणि चमत्कार’ हा ग्रंथ आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या आधीच्या ‘विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन’, ‘विज्ञान आणि बुद्धिवाद’ या ग्रंथाच्या विश्लेषणातून निर्माण होणाऱा हा ‘ग्रंथराज’ आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

६६४ पानांच्या या भारी ग्रंथाच्या प्रस्तावनेत या ग्रंथाच्या उद्देशाबाबात त्यांनी म्हटले आहे की भौतिकवादी विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार असत्य (किंवा अशक्य) ठरतात... कारण ते त्या शास्त्राच्या मर्यादेत कदाचित घडत नसतील पण त्या शास्त्राच्या मर्यादेबाहेर घडतात की नाही हे त्या मर्यादेत राहून कसे कळणार? किंवा ठरवणार? त्यासाठी ती मर्यादा ओलांडून बाहेर आले पाहिजे. कारण त्या शास्त्राच्या बाहेर काम करणारी अनेक शास्त्रे आहेत. भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिकशास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत. त्यांनी तसे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे. हा ग्रंथ वाचकांना या संकुचित दृष्टीच्या बेडकांच्या विहिरीतून बाहेर काढून विशाल अतींद्रीय सागराचे दर्शन घडवतो. ते जग वाचकांनी कुतुहल व करमणूक म्हणून नव्हे तर गंभीरपणे शास्त्रीय, अभ्यासू वृत्तीने पाहावे अनुभवावे, यातून वाचकाला नवी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाली तर लेखकाला या ग्रंथ लेखनाचे सार्थक झाल्याचे समाधान होईल.

ग्रंथाची शुद्ध विज्ञानवादी भूमिका -

शुद्ध विज्ञानात 'दैवी शक्तीला' किंवा 'परमेश्वर' या व्यक्तीरुपी संकल्पनेला अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्याची नैसर्गिक उपपत्ती शोधते. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे जड़वादी तत्वज्ञानावरही प्रहार करते. असे ते दुधारी शस्त्र आहे. अतिंद्रिय घटनांनी भौत विज्ञानाचे नियम पाळलेच पाहिजेत असा दुराग्रह का धरावा? विश्वातली सर्व रहस्ये माहित नसताना जडवादी विचारवंतांनी आपली दुराग्रही मते पुन्हा तपासावीत, असा लेखकाचा उद्देश ग्रंथाचे संपूर्ण वाचन केले की लक्षात येतो.

भानामतीच्या विविध केसेसची प्रत्यक्ष भेट देऊन केलेली छाननी, घटनांची अर्थपू्र्ण फोड, आक्षेप व प्रतिआक्षेप - त्यांची तर्कपुर्ण तपासणी, विरोधी विचारांच्या व्यक्तींचे तोकडेपण आदि गोष्टी ग्रंथ वाचनाच्या वेळी प्रकर्षाने जाणवातत.

अभ्यासपुर्ण ओघवती भाषा व विज्ञाननिष्ठ विवेचन त्यामुळे लेखक आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत असा अनुभव येतो. ३५० पेक्षा जास्त संदर्भ व टिपणे यातून प्राचार्य गळतगे यांनी पाश्चात्य संशोधकांपासून ते भारतीय ऋषिमुनी, संत-महंतांचे दाखले ग्रंथाच्या पानोपानी दिले आहेत. इंग्रजी उताऱ्यांचे त्यांनी केलेले सोपे व अचुक भाषांतर वाचून थक्क व्हायला होते.

या ग्रंथराजाची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अंधश्रद्धेच्या उच्चाटनाची ढाल पुढे करून सश्रद्ध मनावर तलवार चालवून वैचारिक पंगू बनवण्याच्या नीतीची चाल या ग्रंथातून उघड केली आहे. वैज्ञानिक सिद्धांतांचा बुरखा घेऊन श्रद्धास्थानांना थोतांड म्हणवणाऱ्या स्वयंनिर्मित समाजसुधारकी संस्था व विचारकांची प्रा.गळतग्यांनी वैचारिक चिरफाडकरून त्यांचे खोटारडे व प्रसंगी विकृत रुप समाजापुढे आणले आहे. खोटे लिहायचे व बोलायचे, सरळ सरळ फसवणे शक्य नसेल तर खोटे सुचवायचे हे तंत्र या विचारकांचे महत्वाचे शस्त्र आहे. हे तंत्र फक्त मराठी भाषिकातील संस्था व व्यक्ती वापरत नाहीत तर जगभरातील सर्वच रॅशनॅलिस्ट संस्था व व्यक्ती कशा व किती टोकाच्या थराला जाऊन वापरतात याची उदाहरणे या ग्रंथात अनेकवेळा वाचायला मिळतात.

वैचारिक वाद घालताना प्रा. अद्वयानंदांचे नाव विकृतकरून लिहिणे, संतांचे चमत्कार खरे की खोटे यावर लिहिताना, रामऋष्ण परमहंसांची 'मिरगी झालेली व्यक्ती' अशी संभावना करणे, गळतग्यांची पुस्तके विकत घेणार नाही, वाचणार नाही पण त्यांनी आमची (प्रतिपक्षाची) पुस्तके विकत घेऊन वाचावीत आदि हुकूमशाही मनोवृत्तीची लक्षणे त्यांनी दाखवून दिलेली आहेत. अशा 'विवेकवादा'विरुद्ध गळतग्यांनी सादर केलेल्या पुराव्यांना तपासण्याचे नाकारणारे नागपूरच्या डॉ.नी.र. वऱ्हाडपांड्यांना विवेकवादी समजायचे कि हटवादी?

प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ग्रंथात 'नाडी ग्रंथ भविष्य' यास 'आकाश लखनाचा नुर्णायक पुरावा' असे म्हटले गेले आहे. त्यांनी स्वतः दक्षिण भारतात जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन नाडी ग्रंथ अदभूत चमत्कार ठरतात यात संशय नाही असे म्हटले आहे. आपल्या अपत्यांची नावे ठेवण्यास आपण स्वतंत्र आहेत असे आपण समजतो. परंतु ती नेमकी नावे नाडी ग्रंथांच्या ताडपट्ट्यात तंतोतंत येतात याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचे काय नाव असेल हे अगोदरच ठरून गेलेले आहे.असे लक्षात येते. अगस्त्य आणि अन्य नाडी ग्रंथकर्त्यां महर्षींनी ती नावे व व्यक्तीचे भविष्य 'आकाशरुपी कॅनव्हास' वर अगोदरच ठरवून लिहिलेले जीवननाट्यपट वाचून ती सांगितली. म्हणजेच अगोदर ठरवून लिहिलेल्या नाटकाच्या कथानकाचा तो एक भाग आहे असे म्हणावे लागते.

'नाडी ग्रंथ' - 'विश्व एक नाटक' असल्याचा तो सार्वजनिक पुरावा आहेत. त्यामुळे आकाश लेखनाच्या सत्यतेचा तो निर्णायक वैज्ञानिक पुरावा आहे, असे गळतगे यांचे प्रतिपादन आहे.

विश्व हे एक नाटक वा चित्रपट असेल तर मानवाच्या इच्छा स्वात्रंत्र्याचा अर्थ कसा लावायचा? आकाश लेखन हे निर्णायक सत्य असेल तर 'मानवाला इच्छा स्वातंत्र्य नाही' हे खरे नसून मानवाचे इच्छा स्वातंत्र्य हे मानवाचे नसून त्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचे -विश्व नाटककाराचे - आहे असे ठरते, असे लेखकानी ठासून म्हटले आहे. 'बंधन व स्वातंत्र्य' या किंवा 'प्रयत्नवाद व नियतीवाद' या तथाकथित समस्येचा उलगडा करताना प्रा. गळतगे म्हणतात, 'ज्या लोकांचा पुण्य कृत्य करण्याकडे ओढा आहे, ते लोक ज्याला सामान्य लोक 'बंधन' समजतात ते ईश्र्वराचे इच्छा स्वातंत्र्य सिद्ध करतात. ज्या लोकांचा पाप कृत्यांकडे ओढा आहे, ते लोग ईश्वरेच्छा स्वातंत्र्य नाकारून त्या इच्छा स्वातंत्र्याचा संकोच करतात.

म्हणजेच ज्याला सामान्य लोक 'स्वातंत्र्य' समजतात त्या ईश्वरी मायेच्या 'बंधनात' पडतात म्हणजेच आपले ईश्वरीय स्वातंत्र्य गमाऊन बसतात. अशा रीतीने पुण्य करण्याचे तथाकथित बंधन हे खरे अध्यात्मक 'स्वातंत्र्य' आहे. पाप करण्याचे तथाकथित सैतानाचे 'स्वातंत्र्य' हे खरे मायेचे 'बंधन' आहे.

संत रामदास स्वामींचे प्रयत्नवादाचे वचन -

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ।

यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे।।

आणि संत तुकारामांचे नियतीवादाचे वचन

जे जे संचिती। ते न चुके कल्पांती।

होणार ते ते होऊन जाय । व्यर्थ बोलोनिया काय ।।

लाभ अथवा हानी । घरा येता चासोनी।

तुका म्हणे स्वस्थ मन । करा विठ्ठल चिंतन।।

येथे दोन्ही सत दोन परस्पर विरोध दृष्टीकोनाचे आहेत असे वरवर दिसत असले तरी दोघांनीही त्यासाठी ईश्वराची साक्ष काढली असल्याने तो विरोध वरवरता आहे हे स्पष्ट होते. कारण ईश्वराच्या ठिकाणी सर्व विरोध मावळतो.

मागल्या जन्मी केलेल्या 'कर्माला' (प्रयत्नांना) या जन्मात 'दैव' म्हणतात म्हणून प्रयत्न केल्याशिवाय 'दैव' कधीच सिद्ध होत नाही कर्म एकच, एका बाजूने त्याला 'प्रयत्न' म्हणतात, तर दुसऱ्याबाजूने 'दैव'! हे या ग्रंथात मार्मिकपणे सांगितले आहे. पुनर्जन्मसिंद्धांतामुळे प्रयत्न व दैववाद हा खोटा ठरतो.

संत ज्ञानेश्वरांच्या १२ व्या अध्यायातील ओवीचा दाखला देताना प्रा. गळतगे म्हणतात, 'जे मनाने, वाचेने, देहाने, कर्म होईल ते मी करत आहे असे मानू नकोस कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालत आहे तोच कोणती गोष्ट करणे अथवा न करणे निर्धारित करतो. या सत्याचा ब्रह्मविज्ञानामुळे उलगडा होतो.

विश्व हे गारुडाचा खेळ नसून ते खरे आहे हे समजले की 'चमत्कार' हे खरे आहेत हे कळते. (चमत्कार हे एकाच वेळी खरे व खोटे कसे? पोट मथळा पृष्ठ- ३९९) विश्व हे नाटक आहे हे कळले की मानवाला ईश्वराहून वेगळे इच्छा स्वातंत्र्य आहे हे खोटे हे कळते. विश्व हे नाट्य आहे हे ज्याला माहित नाही किंवा मान्य नाही अशा बुद्धिवादी लोकांच्या दृष्टीला स्वतःला वेगळे इच्छा स्वातंत्र्य आहे हे खरे वाटते. मग त्यांना चमत्काराच्या नियमभंगाच्या उपपत्तीची समस्या सोडवता येत नाही व त्यामुळे चमत्कार नाकारायचा म्हणजेच ते खोटे म्हणण्याचा अर्थहीन आडमुठेपणा करावा लागतो.

टोलनाक्यावर कर चुकवण्यासाठी रात्रभर अन्य मार्ग हुडकून फिरत पहाटे परत टोलनाक्यावरच येणाऱ्या गाडीवानासारखी अवस्था ब्रह्म विज्ञानाच्या कर्मर्सिद्धांतांची ओळख नसल्याने पाश्चात्य शास्त्रज्ञांची झाली आहे. अशा आडरानातील अंधाऱ्या रस्त्याने फिरणाऱ्या शास्त्रज्ञांचा प्रतिनिधी म्हणून लेडरमन यांचा उल्लेख करता येईल असे गळतगे प्रतिपादन करून पुढे म्हणतात, त्याच्या God Particle(1993) ग्रंथात त्यांनी अंतिम भौतिक कण हाच ईश्वर मानला जावा अशी त्यांची धारणा होते! या शिवाय जॉन पोकलिंग हॉर्न यांचे Beyond Science(1996), आर पन रोज यांचे Emperor's New Mind(1987) ब्रायन एपलयार्ड यांचे Understanding the Present (1992) असे अनेक दाखले प्रा. गळतगे यांनी वानगी दाखल दिले आहेत.

क्वांटम सिद्धांत पाश्चात्य विज्ञानाचा रुढ दृष्टीकोन मुळातच अपुरा असल्याचे दाखवून देतो. रूढ विज्ञानातून कार्यकारण भावाची कायमची हकालपट्टी करण्याची गरज सिद्ध करतो. डेव्हीड बोहम म्हणतात, अणुचे जेंव्हा कोणीही निरीक्षण करत नाही तेंव्हा त्याला कोणतेही गुणधर्म नसतात. म्हणजेच कोणाचेतरी पहाणे, पाहणारा किंवा त्याचे मन (Consciousness) प्रत्यक्षात अणू भौतिक रुपाने अस्तित्वात आणते. तात्पर्य अणुला 'वस्तुनिष्ठ' अस्तित्व नसून 'व्यक्तीनिष्ठ' अस्त्वित्व असते.

अणु जड भौतिक नाही किंवा खरा नाही असा याचा अर्थ नसून अणूचा जडपणा (गुणधर्म )किंवा खरेपणा (अस्तित्व) हे मानवाच्या त्याला पहाण्याच्या मनामुळे प्राप्त होते असे क्वांटम सिद्धांता वरून सिद्ध होते. त्यामुळए भानामती, UFO, आदींना मानवी मनामुळे खरेपणा, अस्तित्व प्राप्त होते. ही उपपत्ती क्वांटम सिद्धांत ही उचलून धरतो.

समारोप -

जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा अंधळा आपल्याला दिसत नाही म्हणून प्रकाशच अस्तित्वात नाही असे म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे अतींद्रीय दृष्टी नसलेला मनुष्य – भले तो मोठा शास्त्रज्ञ असेल – लिंगदेह, मनोदेह, बुद्धिदेह, आत्मा हे डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून अस्तित्वातच नाहीत असे म्हणू शकणार नाहीत. तसे म्हणणाऱ्यांना अदृष्य पातळीवरील त्या देहाचे भौतिक जगात सुद्धा कसे दृश्य़ परिणाम घडून येतात, अनुभवायला मिळतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आंधळ्या भौतिकवादी शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य करावे लागते.

पदार्थविज्ञान (फिजिक्स), भूत-भानामती, परामनोविज्ञान (दैवतशास्त्र), ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान (स्पिरिचुअल सायन्स) या तिन्हींचा वरवर पाहता परस्परांशी संबंध नाही. नव्हे ती एकमेकांना धिक्कारताना दिसतात परंतु या तीनही शास्त्रांना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी या शास्त्राची नाळ परस्परांशी निसर्गतःच जोडली गेली आहे गेलेली आहे हे सिद्ध केले आहे.

ग्रंथपरिचय – विंग कमांडर शशिकांत ओक

लेखक – प्राचार्य अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३. फोन ०८३३८-२९३३९९. मो - ०९९०२००२५८६ .वेदांत विवेक प्रकाशन. पृष्ठे - ६६४. किंमत – रु.४००.
»

* 343 वाचने

ह्म्म्म्
प्रेषक ऋषिकेश (सोम, 03/29/2010 - 17:39)

ग्रंथ मोठा दिसतो. सहज ग्रंथालयात मिळाला तर नक्की वाचेन.
बाकी नाडीसारख्या करमणूक-व्यवसायापेक्षा, "देव" व "कर्मकांडा"सारख्या मोठ्या संकल्पनांवर / प्रश्नांवर हे पुस्तक काय भुमिका घेते व कसा उहापोह करते हे वाचण्यास उत्सुक आहे.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
»

* प्रतिसाद
* ऋषिकेश यांना व्यनि पाठवा

ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान
प्रेषक वसंत सुधाकर लिमये (मंगळ, 03/30/2010 - 16:20)

संपूर्ण लेख वाचलेला नाही , वर वर चाळला.
पुस्तकाचे स्कॅन केलेले पान वाचले.
प्रा. गळतगेंनी सादर केलेले पुरावे कुठल्या जर्नलमधे वाचायला मिळतील ते कळावे.

विज्ञानाला सगळ्या गोष्टी माहित आहेत असा दावा विज्ञानाचाही नाही.
तसे असते तर विज्ञान हा प्रकार कायमचा थांबला नसता का?

पदार्थविज्ञान (फिजिक्स), भूत-भानामती, परामनोविज्ञान (दैवतशास्त्र), ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान (स्पिरिचुअल सायन्स) या तीनही शास्त्रांना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे.

काय प्रकार आहे ते लक्षात आले.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
»

* प्रतिसाद
* वसंत सुधाकर लिमये यांना व्यनि पाठवा

माफक अपेक्षा
प्रेषक शशिओक (मंगळ, 03/30/2010 - 18:17)

संपूर्ण लेख वाचलेला नाही, वर वर चाळला.

काय प्रकार आहे ते लक्षात आले.

निदान ग्रंथपरिचय पुर्ण वाचावा. ही माफक अपेक्षा आहे. नंतर आपली उत्सुकता वाढली तर संपुर्ण ग्रंथ वाचावा.
ही नम्र विनंती

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
»

* संपादन
* प्रतिसाद

निव्वळ भामटेपणा
प्रेषक बाबासाहेब जगताप (बुध, 03/31/2010 - 07:08)

*या ग्रंथराजाची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अंधश्रद्धेच्या उच्चाटनाची ढाल पुढे करून सश्रद्ध मनावर तलवार चालवून वैचारिक पंगू बनवण्याच्या नीतीची चाल या ग्रंथातून उघड केली आहे.
अंधश्रद्धेचे उच्चाटन ही गेल्या शंभर ते दिडशे वर्षापूर्वीपासून जोर धरत असलेली संकल्पना आहे. त्या आगोदरच्या शेकडो वर्षात सामान्यजनांना वैचारिक पंगू बनवण्याचे काम या असल्या चमत्काराच्या शिलेदारांनीच केले आहे. यांचे पितळ उघडे पाडून वैचारिकदृष्ट्या सामर्थ्य देण्याचेच काम सुधारकांनी केले आहे.

*समाजसुधारकी संस्था व विचारकांची प्रा.गळतग्यांनी वैचारिक चिरफाडकरून त्यांचे खोटारडे व प्रसंगी विकृत रुप समाजापुढे आणले आहे.
आजपर्यंत कुणाचा खोटारडेपणा पुढे आला हे सर्वांना माहित आहे. विकृती ही उपचाराच्या नावाखाली (भानामती काढणे वगैरे ) स्रियांवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये आहे. की अध्यात्मानुभव देण्याच्या नावाखाली स्वतःच्या शारिरीक लालसांची पूर्ती करणाऱ्यांमध्ये आहे हे वेगळे सांगायची गरज नसावी.
(असल्या काही कृत्यांची उदाहरणे दिली की आम्ही त्या गावचे नाहीच हे ही चमत्कारांचे समर्थक बिनधोकपणे ठोकून देण्यास कमी करत नाहीत.)

*इच्छा स्वातंत्र्य हे मानवाचे नसून त्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचे -विश्व नाटककाराचे - आहे असे ठरते, असे लेखकानी ठासून म्हटले आहे. 'बंधन व स्वातंत्र्य' या किंवा 'प्रयत्नवाद व नियतीवाद' या तथाकथित समस्येचा उ लगडा करताना प्रा. गळतगे म्हणतात, 'ज्या लोकांचा पुण्य कृत्य करण्याकडे ओढा आहे, ते लोक ज्याला सामान्य लोक 'बंधन' समजतात ते ईश्र्वराचे इच्छा स्वातंत्र्य सिद्ध करतात. ज्या लोकांचा पाप कृत्यांकडे ओढा आहे, ते लोग ईश्वरेच्छा स्वातंत्र्य नाकारून त्या इच्छा स्वातंत्र्याचा संकोच करतात.

इच्छा स्वातंत्र्य हे विश्व नाटककाराचे आहे पण चांगल्या इच्छा (म्हणजे चमत्कारसमर्थकांना अनुकुल असलेल्याच) ह्याच इश्वराच्या कारणाने आहेत असे असेल तर जगातल्या वाईट इच्छांचे काय. की इश्वर यांच्यापूढे हतबल झाला आहे.

*प्रा. गळतगे म्हणतात, 'जे मनाने, वाचेने, देहाने, कर्म होईल ते मी करत आहे असे मानू नकोस कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालत आहे तोच कोणती गोष्ट करणे अथवा न करणे निर्धारित करतो. या सत्याचा ब्रह्मविज्ञानामुळे उलगडा होतो.

जे करतो आहे ते इश्वरच करवून घेतो आहे. असे म्हणून काही बाबाबूवा भक्तांना मारझोड करतात. एक इच्छाधारी बाबा तर कड़कडून चावा घेतो आणि म्हणतो ये तो सब शंकरजी करवाते है. उद्या हे भामटे स्रियांचे विनयभंग आणि बलात्कारही इश्वराच्या नावावर खपवतील. कारण यांना पक्के माहीत आहे की इश्वर नावाची शक्ती नाहीच मग ती आपले काय बिघडवणार.

*जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगताच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे.

हे विधान म्हणजे उघडउघड थापेबाजी झाली. हे जर खरे असते तर विद्युतप्रवाह, प्रकाशाचा वेग, वेगवेगळ्या वायूंचे अस्तित्व त्यांचे गुणधर्म, रासायनिक, भौतिक व जैविक क्रियाप्रतिक्रियांचा उलगडा यांचे शोध शास्राला लागलेच नसते.
जे डोळ्यांना दिसते तेच सत्य असे जर भौतिक शास्राने मानले असते तर त्यानेही या भामट्यांच्या पूर्वजांप्रमाणे पृथ्वीला केंद्रस्थानी सुर्यताऱ्यांना तिच्याभोवती फिरणारे असे मानले असते.

एकूणच असली साहित्यसंपदा म्हणजे मरणप्रायअवस्थेतली भूते पून्हा जागीकरण्याचा व त्यातून स्वतःच्या मनोउड्डाणांना जगावर लादण्याचा प्रयत्न आहे.
एका शब्दात निव्वळ भामटेपणा.
»

* प्रतिसाद
* बाबासाहेब जगताप यांना व्यनि पाठवा

बाबासाहेब
प्रेषक प्रकाश घाटपांडे (बुध, 03/31/2010 - 08:39)

बाबासाहेब भ्रमसेन व ठकसेन वाचताय ना?
प्रकाश घाटपांडे
»

* प्रतिसाद
* प्रकाश घाटपांडे यांना व्यनि पाठवा

व्हॅटीकन
प्रेषक गुंडोपंत (गुरू, 04/01/2010 - 12:47)

बाबासाहेब यांचे बरेचसे विवेचन चर्चच्या लोकांनाही लागू होते असे दिसते. सध्या तरी चर्च म्हंटले की लोक आपापली मुलेबाळे सांभाळायला लागले आहेत असे दिसते.

आपला
गुंडोपंत
»

* प्रतिसाद
* गुंडोपंत यांना व्यनि पाठवा

चर्च असो की आश्रम
प्रेषक बाबासाहेब जगताप (शुक्र, 04/02/2010 - 07:54)

गुंडोपंतांनी दिलेल्या दूव्यांवर चर्च मध्ये बोकाळलेल्या श्रध्दां(!)चा गैरफायदा घेणाऱ्या वर स्वतःला अलौकीक समजणाऱ्यां धर्मशासकांच्या कृत्यांचा पाढा वाचला. चर्च असो की आश्रम मुलाबाळांना संभाळायला हवेच. त्या आधी स्वतःच्या अविवेकी श्रध्दांनाही मुरड घालायला हवी. अशी मुरड घालून पून्हा पातकाच्या दहशती खाली वावरणे हे ही परवडणारे नाही. त्यासाठी अंतरंगात भिनलेल्या काही समजांना मूळापासून उखडून निर्भीड आयुष्य जगायला हवे.
»

* प्रतिसाद
* बाबासाहेब जगताप यांना व्यनि पाठवा

हे भ्रमसेनच
प्रेषक बाबासाहेब जगताप (बुध, 03/31/2010 - 09:53)

धर्म आणि अध्यात्म ही भ्रमसेनांसाठी सुपीक क्षेत्रे. कारण या विषयांत मोक्ष,स्वर्ग, नरक,परलोक, परब्रह्म, परमात्मा,जीवात्मा,पुनर्जन्म, तसेच अतीन्द्रिय अनुभव,भावातीत ध्यान, समाधी,साक्षात्कार,दृष्टान्त, अशा अनेक भ्रामक संकल्पना आहेत.त्यामुळे इथे भ्रमसेन असणे स्वाभाविक आहे. पण या क्षेत्रांत ठकसेनांची संख्या सर्वाधिक आहे.बाबा,बुवा, बापू, महाराज हे सर्व या ठकसेन वर्गातील आहेत.त्यांचा आध्यात्मिक गोष्टींवर मुळीच विश्वास नसतो.ते लबाड असून श्रद्धाळूंना फसवणे हाच त्यांचा धंदा असतो

भ्रमसेन व ठकसेन वाचतांना वरील लेख न आठवलेला (वाचला असल्यास) उपक्रमी सापडणे कठीणच.
एकूण हा भ्रमसेनाचाच अवतार दिसतो. कदाचित विश्वनाटककाराच्या पूढे काही एक न चालल्याने सुदैवाने त्यांचा ठकसेन झाला नाही. आजच्या अध्यात्म (!) युगात घडामोडी इतक्या वेगाने घडत आहेत की आजचा भ्रमसेन उद्याचा यशस्वी ठकसेन कधी होईल याचा नेम नसतो. आणि या बाबांच्या भक्तमंडळीत आपले बाबा आणि दूसरे बूवा यांच्यात भेद करण्याचीही विलक्षण हातोटी असते. जोपर्यंत कारनामे उघडकीस येत नाहीत तोपर्यंत सगळे अध्यात्मगुरुच असतात. आणि या ठकसेनांच्या भक्ताच्या गर्दीत अनेक भ्रमसेन असतात ज्यांना की बाबांनी घातलेली लाथही कृपाप्रसादाप्रमाणे वाटते.
»

* प्रतिसाद
* बाबासाहेब जगताप यांना व्यनि पाठवा

ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?
प्रेषक शशिओक (बुध, 03/31/2010 - 16:55)

प्रा. गळतगे यांच्या ग्रंथपरीक्षणाच्या धाग्यात खालील प्रतिसाद थोडा अप्रस्तूत वाटेल पण वरील विचारांत त्याचा भाग आल्याने येथे डकवत आहे.
ओक नवसिद्धांताचा प्रवर्तक? छे नक्की नाही

{प्रियालींच्या धनंजयांना अन्यत्र ठिकाणी विचारलेल्या प्रश्नाला - की}... नाडीग्रंथांची भलावण करणारे कोणत्या क्याटेगरीत {भ्रमसेन की ठकसेन}येतील?
स्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?

{धनंजय म्हणतात} ...विचारलेल्या उदाहरणाबद्दल थेट उत्तर मात्र देण्याचे मी टाळत आहे. परंतु वरील दिलेल्या सामान्यनियमानुसार उदाहरणाचे वर्गीकरण करणे सुस्पष्ट आहे, असे मला वाटते. {कदाचित हैयोहैयैयोंच्या अनुषंगाने} या विवक्षित उदाहरणाच्या बाबतीत माझे इतके लिहून झालेले आहे, की आणखी काही लिहिण्यासाठी उरलेले नाही. पूर्वीचे दुवे देण्यावेगळे मी काही करू शकणार नाही, क्षमस्व.
या उदाहरणाच्या संदर्भात पटवण्यासाठी काय आवश्यक आहे? याबाबत मला जमेल तितके थेट आणि विस्ताराने स्पष्ट करूनही (प्रात्यक्षिकासाठी भूमी तयार करणे) त्यातून असा निष्कर्ष काढला जातो :
...धनंजयांना म्हणणे आहे की 'प्रत्यक्ष माझ्यासाठी नाही' असे आपण जाहिर करता आणि त्यातून आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.....
ज्या अर्थी विस्ताराने काही सांगून मला अभिप्रेत नसलेला अर्थ निघतो त्या अर्थी याबाबतीत या संवादक-जोडीत काहीही पटवण्यात मी अयशस्वी आहे..

..

{कंस माझे} माझे (ओकांचे) धनंजयांच्या संदर्भातील म्हणणे असे की - ते मला व मी त्यांना पटवण्यात अयशस्वी आहे. हे मला मान्य नाही आणि हे मत इतर सभासदांना ही लागू पडत आहे. असे एकंदरीत इथले अन्य ठिकाणचे आपले व इतरांचे प्रतिसाद वाचून वाटते.
नाडीग्रंथांबाबत मी "नवसिद्धांताचा प्रवर्तक" नाही. मी कुठलाही वैज्ञानिक सिद्धांत -हायपोथिसिस - मांडल्याचा दावा केलेला नाही.ती माझी पात्रता नाही. 'प्रवर्तक' मानायचे असेल तर नाडी ग्रंथकर्ते महर्षींनाच मानावे लागेल. कारण नाडीवाचक शास्त्री देखील नाडीग्रंथांच्या वाचनापलिकडे नाडीग्रंथांचे कर्तेपण घेऊ शकत नाहीत. मी किंवा नाडी वाचक त्या ग्रंथांचे मुळ लेखक नाहीत.
आपल्या बाबतीतील मत की आपण अनुभव घेणार नाही ही भूमिका स्पष्ट करता. ह्याचे एकमेव कारण त्यातील 'भविष्य' हा शब्द असावा. तो शब्द त्यात नसतां, तर एक अभ्यासक ह्या नात्याने आपण अशी ताठर भूमिका घेतली नसती.
नाडी ग्रंथांवरील माझे विचार वा लेख वाचणाऱ्या इतर शेकडो सभासदांना अशी नम्र विनंती आहे की नाडीग्रंथांकरिता मला मध्यवर्ती न मानता त्यांच्या मुळलेखकांना केंद्रस्थानी मानलेत आणि (त्यातील भविष्य हा शब्द तूर्तास टाळला) तर कदाचित माझ्या व नाडीग्रंथांबाबतचा आपल्या सर्वांचा दृष्टीकोन निवळेल.
नाडी विरोधक वा नाडी ग्रंथांना सहानुभूती दर्शवणारे असे विभाग पाडून 'भौतिकविज्ञान विरुद्ध ओक" असे न मानता पुर्वग्रह न ठेवता साहचर्याने अनुभव घेऊ या. पाहू या. असा माझ्या सर्व कथनाचा गाभा आहे.
भागाच्या वाचकांसाठी प्रतिक्रिया परत टाकली आहे. पुन्हा वाचणाऱ्यासाठी क्षमस्व.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
»

* प्रतिसाद

खुलासा: नव खोडायचे होते
प्रेषक प्रियाली (बुध, 03/31/2010 - 17:23)

स्वतःशी प्रामाणिक, (नव)कल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?

मला माझ्या प्रश्नात नव खोडायचे होते. विचारण्याचा उद्देश असा होता की जर कल्पना नवी नसेल पण कर्ता तिच्याशी प्रामाणिक असेल तर तो भ्रमसेन ठरेल का? ते तसे न दिसून आल्याने कोणाचे गैरसमज झाले असतील तर क्षमस्व!

नव खोडण्यामुळे वरील प्रश्न असा दिसला असता -

स्वतःशी प्रामाणिक, नवकल्पना पटवून देणारे - यांत आले तरीही त्यांना भ्रमसेन म्हणता येईल का?

असो.

हा खुलासावजा उपप्रतिसाद केवळ वरील प्रतिसादासाठी दिलेला आहे. वरील प्रतिसाद इतरत्र दिसल्यास प्रत्येक ठिकाणी खुलासा देत जाणार नाही.
»