Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

सोमवार, १६ जुलै, २०१२

नाडी ग्रंथ भविष्य चला नवग्रह मंदिर यात्रेला (आवृत्ती 5वी)
पुस्तक परिचय

 नाडी ग्रंथ भविष्य


चला नवग्रहमंदिर यात्रेला. {आवृत्ती ५वी}

नवी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर


लेखक – विंग कमांडर (नि) शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१४९.
 
विंग कमांडर (नि) शशिकांत ओक यांचे पाचव्या आवृत्तीच्या रूपाने नाडी ग्रंथावर पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. साप्ताहिकाच्या आकारातील या नव्या पुस्तकाचा शुभ्र कागद, तीन ऐवजी दोन कॉलममधील मांडणीमुळे संपूर्ण चेहरा मोहराच बदलला आहे.  
प्रथम वाचकांना, नाडी ग्रंथ पाहू इच्छिणाऱ्यांना हे पुस्तक वेगळ्या विश्वात घेऊन जाईल. शिवाय नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेल्यांना व ओकांची आधीची पुस्तके वाचलेल्यांना नवीन माहितीचे लेख पुन्हा आकर्षित करतील.
तमिळनाडू राज्यात ताडपट्यावर कूट तमिळ भाषेत कोरून लिहिलेल्या भविष्याला नाडी भविष्य म्हणतात. ह्या नाडीग्रंथाचा इंग्रजी-हिंदी व काही ठिकाणी मराठी भाषेत अनुवाद करून सांगण्याची सोय सध्या महाराष्ट्रात, व महाराष्ट्राबाहेर मराठी लोकांसाठी अनेक नाडी भविष्यकेंद्रात ठिकठिकाणी कोठे उपलब्ध आहे, त्यांचे ५० पत्ते-फोन नंबर, फी आदीची दि ३१ मे २००९ पर्यंतची सुधारित माहिती त्यात आहे.
उपशीर्षकात म्हटल्याप्रमाणे नाडी ग्रंथातील शांती-दीक्षा कांडातून अनेक मंदिरांच्या यात्रेला जाण्याचे आग्रहपूर्वक सांगितलेले असते. तेंव्हा मंदिरांना श्रद्धापुर्वक भेटी द्याव्या असे मनात असते. परंतु भाषेचा दुरावा, दूरचे अंतर, वेळ, पैसा व सर्व सोपस्कारकरून खरोखरच काही उपयोग होईल का अशी शंका, यामुळे यात्रा करणे लांबते वा टाळले जाते. पुजा-अर्चा, जपसाधना करावी का?, यांचे फळ मिळते काय? याची वैज्ञानिक कारणमिमांसा ‘शांतीदीक्षा केल्याने काय लाभ? ’ हे प्रकरण वाचल्यावर वाचकांच्या मनातील या बाबतच्या शंका दूर व्हाव्यात.
दक्षिणेतील नवग्रहांचे स्थानमहात्म्य, इतिहास, प्रत्येक ग्रहाचे व्यासकृत स्तोत्र, नैवेद्य याशिवाय नकाशा, जाण्या-राहण्याची सोय अशी उपयुक्त माहिती या पुस्तकात आहे. शिवाय नाडी ग्रंथप्रेमींतर्फे पुण्यात १४ ऑक्टोबर २००७ला झालेल्या अधिवेशनाचा अहवाल व त्यात चर्चेला आलेले विषय  या पुस्तकाचे आणखी एक आकर्षण आहे.
एखाद्याची नाडी भविष्याची पट्टी मिळण्याची घटना ही नदीच्या पुरातील पाण्यात टाकलेल्या दोन काड्यांची भेट पुन्हा काड्याच्या पेटीत होण्याइतकी अशक्यप्राय कशी आहे, या रंजक उदाहरणावरून पटवून देण्याची ओकांची हातोटी कौतुकास्पद आहे. आपणाकडून माहिती काढून तीच पुन्हा आपणाला सांगतात या आक्षेपाला उत्तर या आवृत्तीत मिळेल. नाडीपट्टच्या फोटोंचे काय महत्व आहे याचे वर्णन वाचून अनेक नाडीप्रेमींना विचारकरायला बाध्य करेल.
  'नाडी शास्त्री संमोहनाद्वारे नाडी भविष्य कथन करतात' असे विक्षिप्त तर्क केले जातात. प्रसिद्ध संमोहन तज्ञ डॉ.प्रा.खानापुरे यांनी त्यावर विदारक प्रकाश टाकला आहे.
नाडी ग्रंथाच्या आधारे पुर्वजन्मातील व्यक्तीरेखा शोधण्यात यशस्वी झालेल्या डॉ. दिलिप नाहरांची फोटोसह शोधयात्रा वाचून वाचकांना थक्क व्हायला होईल. नाडीवर वेबसाईट काढणारे- उदय मेहता, बडोद्यात केंद्र चालवणारे - निलेश त्रिवेदी, खेडचे उद्योजक श्री. हिराभाई बुटाला, श्री संतोष ओक, तरुण राजस खळदकर, उत्साही- विंग कमांडर राकेश नंदा, स्त्री नाडीवाचक सोलापूरच्या मल्लिका मीरा आदी नाडी प्रेमींचा प्रेरणादायक परिचय मोबाईल नंबर व फोटोसह या आवृत्तीत पहायला मिळेल.
या पुस्तकातील कथित नवग्रह यात्रेला जाण्याकरिता विविध यात्राकंपन्यांनी पुढाकार घेऊन नाडी केंद्रांशी संपर्क केला तर अशा यात्रा आखल्या जाऊन अनेक इच्छुकांची सोय होईल.


लेखक – विंग कमांडर (नि) शशिकांत ओक. मोः ०९८८१९०१४९. पाने – ५६. किंमत – रुपये ५०.
प्रकाशक – नितीन प्रकाशन, १४७ बुधवार पेठ, जोगेश्वरी मंदिर लेन, अप्पा बळवंत चौक, पुणे ४११००२.
फोन ०२०- -२४४८३५१७.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: