Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

सोमवार, १६ जुलै, २०१२

हैयो हैयैयो: रिकामटेकड्याला म्हणतात -अजूनही तुमची चित्तभ्रांति संपलीच नाही कां? ;-

http://mr.upakram.org/node/3209#comment-55333 येथून पुढे
सोम, 04/11/2011 - 08:34
हैयो हैयैयो:
विज्ञान परिपूर्णत्त्वाचा दावा करीत नाही हे खरे, परंतु 'जेवढे आपणास ठावूक आहे / कळते तेवढेच परिपूर्ण आहे' असा दावा विज्ञानप्रेमी करतात ना, मुळात तो दावाच अर्धवट आहे. विज्ञानप्रेमींच्या परिपूर्णत्त्वाच्या भावनिक दाव्यांमुळेच विज्ञानास मर्य्यादा आहे असे चित्र तुमच्या विरोधी पक्षाकडून निर्माण केले जावू शकते, हे खरेतर तुम्हां स्वघोषित विज्ञानप्रेमींच्या लक्षात यावे.

रिकामटेकडा: 

नाही, असा दावा आम्ही केलेला नाही.

--------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/11/2011 - 08:34
http://diwali.upakram.org/node/111#comment-2498 येथे "हा आमचा 'तात्पुरता' निष्कर्ष शास्त्रीयच आहे.>" असा तुमचा दावा आहे. हा दावा 'जेवढे आपणास ठावूक आहे / कळते तेवढेच परिपूर्ण आहे' ह्या प्रकारातच मोडतो. तुमच्या अशा अर्धवट दाव्यांमुळे 'त्यांचे' फावते आहे हेच मी तुमच्या लक्षात आणून देतो आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------

 रिकामटेकडा
सोम, 04/11/2011 - 08:39

परिपूर्ण वाटला असता तर त्याला तात्पुरता म्हटले नसते, चिरंतन म्हटले असते.

--------------------------------------------------------------------------------------------------

हैयो हैयैयो
सोम, 04/11/2011 - 09:15
तात्पुरता परिपूर्ण' आणि 'चिरंतन परिपूर्ण' ह्यांतील अंतर तिथेच स्पष्ट करता आले असते!
--------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/11/2011 - 10:13
त्याला मी 'तात्पुरता परिपूर्ण' असे म्हटले नाही. 'तात्पुरता आहे' असे म्हटले म्हणजेच 'परिपूर्ण नाही' असे म्हटले.

--------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/11/2011 - 10:17
तर, आपले तथाकथित शास्त्रीय निष्कर्ष 'अर्धवट' आहेत ह्या विधानास आपली सार्थ मान्यता आहे. ;-)

--------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/11/2011 - 10:26
कोणत्याही शास्त्रीय प्रयोगातील निष्कर्ष १००% खात्रीचे नसतात.

--------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/11/2011 - 10:33
महत्त्वांचे तत्त्व बोललात..! असो. कोणत्याही शास्त्रीय प्रयोगातील निष्कर्षांची खात्री काय प्रकारे वाढवावी?

--------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/11/2011 - 10:48
विश्वासार्ह प्रायोगिक माहितीने.

--------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/11/2011 - 11:03
ठीक! आता ही 'प्रायोगिक माहिती' कोण गोळा करणार? तीस 'विश्वासार्हते'चे प्रमाणपत्र कोण बहाल करणार?

--------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/11/2011 - 11:51
ही 'प्रायोगिक माहिती' कोण गोळा करणार?
उपलब्ध माहिती पुरेशी नाही असे ज्यांना वाटते त्यांच्यापैकी कोणीतरी.
तीस 'विश्वासार्हते'चे प्रमाणपत्र कोण बहाल करणार?
ज्यांनी अभ्युपगमाची सत्यता मान्य करावी अशी तुमची इच्छा असेल ते स्वतःच तुमच्या प्रयोगमांडणीचे निरीक्षण करून तसे प्रमाणपत्र बहाल करतील किंवा स्वतःच्या विश्वासातील तज्ञांना निरीक्षणासाठी नेमतील.

--------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/11/2011 - 13:48
ज्यांनी अभ्युपगमाची सत्यता मान्य करावी अशी तुमची इच्छा असेल ते स्वतःच तुमच्या प्रयोगमांडणीचे निरीक्षण करून तसे प्रमाणपत्र बहाल करतील किंवा स्वतःच्या विश्वासातील तज्ञांना निरीक्षणासाठी नेमतील.
तटस्थाभ्यासक ह्या नात्याने, अभ्युपगमाची सत्यता / असत्यता मान्य करणे हा मुद्दा मला विशेष महत्त्वाचा वाटतच नाही. त्याआधी अभ्युपगमाची सत्यासत्यता मान्य करण्यास लागणारी 'लॉकस् स्टाण्डि' दोहों पक्षांनी आपापसांत निश्चित करणे हे मला महत्त्वाचे वाटते. ह्या अनुषंगाने, माहिती त्यांनी (अभ्युपगमप्रेमींनी) मिळविली काय, किंवा तुम्ही (अभ्युपगमविरोधकांनी) मिळविली काय, मुळात कोणीही मिळविलेल्या ह्या माहितीस 'विश्वासार्हते'चे प्रमाणपत्र तुम्हा दोहों पक्षांपैकी कोण बहाल करणार? हा प्रश्न आधी सोडवावा.

--------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/11/2011 - 14:21
माहिती 'मॅटर ऑफ फॅक्ट' असली तर कोणीही मान्य करेल, उदा., आम्ही काही ठसे देऊ  अभ्युपमगम समर्थकांनी व्यक्तींच्या जन्मतारखा, वेळा ओळखाव्या; तसे ठसेधारी व्यक्तींना (ठसे त्याच व्यक्तींच्या बोटांचे आहेत की नाही ते मॅटर ऑफ फॅक्ट आहे) आम्ही हजर करू, त्या व्यक्तींच्या जन्मदाखल्यांवर (जन्मदाखले त्याच व्यक्तींचे आहेत की नाही ते मॅटर ऑफ फॅक्ट आहे) कोणत्या जन्मतारखा, वेळा आहेत ते जाहीर केले की प्रयोग संपला! कोणत्या माहितीच्या विश्वासार्हतेविषयी संशय घेतला जाण्याची तुम्हाला भीती आहे?
--------------------------------------------------------------------------------------------------

मंगळ, 04/12/2011 - 08:56
ठशांवरून पट्टी शोधणे शक्य आहे अथवा नाही ह्याबद्दल माझे मत पूर्वीच लिहून झालेले आहे, सबब पुनरुक्ती टाळतो! तरीही, उत्सुकतेपोटी काही प्रश्नः-
१.     हा प्रयोग शास्त्रीय आहे?
२.     ह्या प्रयोगातील निष्कर्ष किती % खात्रीचे असतील? २५%? ५०%? ७५%? (संदर्भः "कोणत्याही शास्त्रीय प्रयोगातील निष्कर्ष १००% खात्रीचे नसतात.")
३.  तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष वाचवयास आवडतील. यदाकदाचित, तुम्ही म्हणतां तशी ठशांवरून पट्टी सापडलीच कधी, तर अवश्य कळवावे. धन्यवाद!
--------------------------------------------------------------------------------------------------

मंगळ, 04/12/2011 - 09:26
ठशांवरून पट्टी शोधणे शक्य आहे अथवा नाही ह्याबद्दल माझे मत पूर्वीच लिहून झालेले आहे, सबब पुनरुक्ती टाळतो!
तुमची मर्जी! मी मात्र, मत पुन्हा देण्याची विनंती तुम्हाला करतो आहे.
हा प्रयोग शास्त्रीय आहे?
'शास्त्रीय प्रयोग' म्हणजे नेमकी तुमच्या मनात काय कल्पना आहे?
ह्या प्रयोगातील निष्कर्ष किती % खात्रीचे असतील? २५%? ५०%? ७५%?
जितक्या अधिक व्यक्ती असतील तितकी टक्केवारी वाढेल. (लाखो जन्मतारखा/वेळा शक्य असल्यामुळे) अगदी पाच/दहा व्यक्तींच्या प्रयोगातही ठशांवरून सर्वांच्या तारखा/वेळा ओळखल्या तरीही प्रयोग ९९.९९% पेक्षा अधिक खात्रीचा ठरेल असा माझा ऑफ-हँड अंदाज आहे.
तुमच्या प्रयोगाचे निष्कर्ष वाचवयास आवडतील.
मी प्रयोग करणार नाहीए, तसे मी कधीच सांगितले नव्हते.

--------------------------------------------------------------------------------------------------

मंगळ, 04/12/2011 - 12:46
ठशांवरून पट्टी शोधणे शक्य आहे अथवा नाही ह्याबद्दल माझे मत पूर्वीच लिहून झालेले आहे, सबब पुनरुक्ती टाळतो!
तुमची मर्जी! मी मात्र, मत पुन्हा देण्याची विनंती तुम्हाला करतो आहे.
  1. "ठशांवरून आपली पट्टी शोधली जाते" ह्या विधानात मला तथ्य आढळत नाही.
  2. व्यक्तीच्या ठशांवरून तिची जन्मतारीख / वेळ 'ओळखली जाते' असा अवास्तव दावा माझ्या ऐकिवात नाही.
'शास्त्रीय प्रयोग' म्हणजे नेमकी तुमच्या मनात काय कल्पना आहे?;
पूर्वी "कोणत्याही शास्त्रीय प्रयोगातील निष्कर्ष १००% खात्रीचे नसतात." ह्या विधानांत आपणांस 'शास्त्रीय प्रयोग' ह्या शब्दसमूह उपयोजिण्यामागे काय अर्थ अभिप्रेत आहे हे सुस्पष्ट करावे.
जितक्या अधिक व्यक्ती असतील तितकी टक्केवारी वाढेल. (लाखो जन्मतारखा/वेळा शक्य असल्यामुळे) अगदी पाच/दहा व्यक्तींच्या प्रयोगातही ठशांवरून सर्वांच्या तारखा/वेळा ओळखल्या तरीही प्रयोग ९९.९९% पेक्षा अधिक खात्रीचा ठरेल असा माझा ऑफ-हँड अंदाज आहे.
माझ्यासाठी हा प्रयोग निव्वळ Null and void आहे.
मी प्रयोग करणार नाहीए, तसे मी कधीच सांगितले नव्हते.
बरे, बरे!
हैयो हैयैयो!

--------------------------------------------------------------------------------------------------

मंगळ, 04/12/2011 - 15:00
"ठशांवरून आपली पट्टी शोधली जाते" ह्या विधानात मला तथ्य आढळत नाही.
तथ्य नाही असे जाहीर करण्यासाठी तुमच्याकडे काय 'स्वानुभव' आहे?
व्यक्तीच्या ठशांवरून तिची जन्मतारीख / वेळ 'ओळखली जाते' असा अवास्तव दावा माझ्या ऐकिवात नाही.
"नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी पुरुषांना उजव्या व स्रियांना डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा त्यावरील सर्व रेषा ठळक व व्यवस्थित दिसतील अशा बेताने उमटवून द्यावा लागतो. त्या रेषांच्या ठेवणीवरून महर्षींनी १०८ विभाग पाडलेले आहेत. नाडीकेंद्रात त्यापैकी उपलब्ध पट्यांशी त्या ठशांना पडताळून त्यांच्याशी जुळणाऱ्या पट्यांचे पॅकेट आणले जाते." असे ओकांनी लिहिले आहे.
पॅकेटमधील नाड्यांपैकी एकही जन्मतारीख+वेळ त्या ठसेधारी व्यक्तीशी जुळली तरीही चांगलीच खात्री मिळेल. प्रत्येक पॅकेटमध्ये सुमारे १०० नाड्या असल्या आणि आम्ही दिलेल्या १० व्यक्तींच्या ठशांसाठी मिळालेल्या १० पॅकेटांतून १००० जन्मतारखा+वेळा मिळाल्या आणि त्या १० व्यक्तींच्या जन्मतारखा+वेळा त्या १००० पैकीच असतील तरीही तो निष्कर्ष ९९% पेक्षा अधिक खात्रीचा ठरेल असे मला ऑफ हँड वाटते. (प्रत्येका पॅकेटमध्ये अधिक नाड्या असतील, उदा. १०००, तर व्यक्तींची संख्या वाढवून खात्रीची %वारी टिकवून धरता येईल.)
पूर्वी "कोणत्याही शास्त्रीय प्रयोगातील निष्कर्ष १००% खात्रीचे नसतात." ह्या विधानांत आपणांस 'शास्त्रीय प्रयोग' ह्या शब्दसमूह उपयोजिण्यामागे काय अर्थ अभिप्रेत आहे हे सुस्पष्ट करावे.
थोडी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Experiment#Overview येथे सापडू शकेल.
माझ्यासाठी हा प्रयोग निव्वळ Null and void आहे.
"ठशांवरून पॅकेट शोधले जाते" असा दावा करणार्‍यांसाठी तो प्रयोग उपयुक्त आहे. तुमच्या मनातील अभ्युपगम तसा नसेल तर तुम्ही तुमच्या मनातील नेमका अभ्युपगम मांडा, मग मी त्यासाठीचा शास्त्रीय प्रयोग सुचवेन.

--------------------------------------------------------------------------------------------------

बुध, 04/13/2011 - 08:59
तथ्य नाही असे जाहीर करण्यासाठी तुमच्याकडे काय 'स्वानुभव' आहे?
म्हणजे, "ठशांवरून आपली पट्टी शोधली जाते" हा दावा तुम्हांस खरा वाटतो असे मी समजावे काय? तुम्हांस तो खरा वाटत असल्यास, तसे प्रतिपादन करणेसाठी तुमच्याकडे काही 'स्वानुभव' आहे काय? असो. असा दावा मी कधी ऐकला नाही, कोणी केला असल्यास माझ्या स्वतंत्र अभ्यासांत मला त्यात तथ्य आढळत नाही.
"नाडी ग्रंथ भविष्य पहाण्यासाठी पुरुषांना उजव्या व स्रियांना डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा त्यावरील सर्व रेषा ठळक व व्यवस्थित दिसतील अशा बेताने उमटवून द्यावा लागतो. त्या रेषांच्या ठेवणीवरून महर्षींनी १०८ विभाग पाडलेले आहेत. नाडीकेंद्रात त्यापैकी उपलब्ध पट्यांशी त्या ठशांना पडताळून त्यांच्याशी जुळणाऱ्या पट्यांचे पॅकेट आणले जाते." असे ओकांनी लिहिले आहे.
अच्छा! मग? तुम्ही लगेच डोळे झाकून भरंवसा ठेवलांत वाटते? ;-)
पॅकेटमधील नाड्यांपैकी एकही जन्मतारीख+वेळ त्या ठसेधारी व्यक्तीशी जुळली तरीही चांगलीच खात्री मिळेल. प्रत्येक पॅकेटमध्ये सुमारे १०० नाड्या असल्या आणि आम्ही दिलेल्या १० व्यक्तींच्या ठशांसाठी मिळालेल्या १० पॅकेटांतून १००० जन्मतारखा+वेळा मिळाल्या आणि त्या १० व्यक्तींच्या जन्मतारखा+वेळा त्या १००० पैकीच असतील तरीही तो निष्कर्ष ९९% पेक्षा अधिक खात्रीचा ठरेल असे मला ऑफ हँड वाटते. (प्रत्येका पॅकेटमध्ये अधिक नाड्या असतील, उदा. १०००, तर व्यक्तींची संख्या वाढवून खात्रीची %वारी टिकवून धरता येईल.)
हा ऐकीव माहितीवर आधारित असा अनुभवशून्य आणि तर्कशून्य प्रयोग होय. पूर्वी लिहिलेप्रमाणे माझ्यासाठी निव्वळ Null and void आहे. असो.
थोडी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Experiment#Overview येथे सापडू शकेल.
माहिती कळली. तुम्हांस अभिप्रेत आहे ते हेच काय? येथेच स्पष्ट केल्यास उत्तम.
"ठशांवरून पॅकेट शोधले जाते" असा दावा करणार्‍यांसाठी तो प्रयोग उपयुक्त आहे. तुमच्या मनातील अभ्युपगम तसा नसेल तर तुम्ही तुमच्या मनातील नेमका अभ्युपगम मांडा, मग मी त्यासाठीचा शास्त्रीय प्रयोग सुचवेन.
म्हणजे, तुम्हांस केवळ सुचवासुचवीमध्येच वेळ दवडणे अभिप्रेत आहे तर....! त्यापेक्षाही छान एक खेळ सुचवू? माझ्या मनातील अभ्युपगम ओळखा बरे...! ;-)

--------------------------------------------------------------------------------------------------

बुध, 04/13/2011 - 09:38
"ठशांवरून आपली पट्टी शोधली जाते" हा दावा तुम्हांस खरा वाटतो असे मी समजावे काय?
मुळीच नाही. मात्र, "ओक यांनी "ठशांवरून आपली पट्टी शोधली जाते" अशासारखा दावा केला आहे" हा दावा मात्र खरा आहे.
असा दावा मी कधी ऐकला नाही
ओक यांच्या विधानाचा संदर्भ दिला आहे.
कोणी केला असल्यास माझ्या स्वतंत्र अभ्यासांत मला त्यात तथ्य आढळत नाही.
तुम्ही नेमका काय स्वतंत्र अभ्यास केला आहे?
अच्छा! मग? तुम्ही लगेच डोळे झाकून भरंवसा ठेवलांत वाटते? ;-)
तुम्ही निर्बुद्ध आहात अशी शंका मला आहे. - दावा करण्यात येतो की नाही इतकाच मुद्दा येथे चर्चेत आहे, दाव्याच्या सत्यतेचा/विश्वासार्हतेचा मुद्दा नाहीए. त्यामुळे, मी त्या दाव्यावर मुळीच भरवसा ठेवला नसला तरीही त्या दाव्याच्या अस्तित्वाचा उल्लेख केला आहे.
हा ऐकीव माहितीवर आधारित असा अनुभवशून्य आणि तर्कशून्य प्रयोग होय. पूर्वी लिहिलेप्रमाणे माझ्यासाठी निव्वळ Null and void आहे. असो.

प्रयोग ऐकीव माहिती/अंदाज इ. च्या तपासणीसाठीच असतात, खात्रीच्या माहितीनंतर प्रयोगच लागत नाहीत. प्रयोगानंतर अनुभव मिळतो. त्यामुळे, अनुभवशून्य परिस्थितीतच प्रयोगाची आवश्यकता असते. या प्रयोगाला तर्कशून्य म्हटलेत तर तुम्ही अक्कलशून्य आहात.
तुम्हांस अभिप्रेत आहे ते हेच काय? येथेच स्पष्ट केल्यास उत्तम.
त्याआधी, "विज्ञानप्रेमींच्या परिपूर्णत्त्वाच्या भावनिक दाव्यांमुळेच विज्ञानास मर्य्यादा आहे असे चित्र तुमच्या विरोधी पक्षाकडून निर्माण केले जावू शकते" या विधानातील विज्ञान या शब्दाचा तुम्हाला अभिप्रेत अर्थ सांगा.
तुम्हांस केवळ सुचवासुचवीमध्येच वेळ दवडणे अभिप्रेत आहे तर....!
मुळीच नाही, मला वेळ दवडणेच अभिप्रेत नाही. तुम्हाला अक्कल शिकविण्याचा प्रयत्न आहे.
माझ्या मनातील अभ्युपगम ओळखा बरे...! ;-)
तुमच्या मनातील अभ्युपगम असा असावा की नाडीच्या दुकानात अधिकाधिक गिर्‍हाईकांना बोलावून गंडविण्यासाठी उपक्रमचा वापर करणे शक्य आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------

हैयो हैयैयो
बुध, 04/13/2011 - 10:11
मुळीच नाही. मात्र, "ओक यांनी "ठशांवरून आपली पट्टी शोधली जाते" अशासारखा दावा केला आहे" हा दावा मात्र खरा आहे.
अशासारखा? दावा? केला आहे?!! हाय राम! अजूनही तुमची चित्तभ्रांति संपलीच नाही कां? ;-)
तुम्ही नेमका काय स्वतंत्र अभ्यास केला आहे?अजूनही तुमची चित्तभ्रांति संपलीच नाही कां? ;-
अभ्यास चालू आहे.
दावा करण्यात येतो की नाही इतकाच मुद्दा येथे चर्चेत आहे, दाव्याच्या सत्यतेचा/विश्वासार्हतेचा मुद्दा नाहीए.
हो कां? आणि मग त्याच दाव्यांवर आधारलेले ते शास्त्रीय प्रयोग वगैरे नुसते "दावा करण्यात येतो की नाही" इतकाच मुद्दा चर्चिण्यासाठी काय?
त्यामुळे, मी त्या दाव्यावर मुळीच भरवसा ठेवला नसला तरीही त्या दाव्याच्या अस्तित्वाचा उल्लेख केला आहे.
बरे. तसे करण्याने काय सिद्ध केलेंत? कोणाचे दावे काय हेच मुळांत माहिती नाही, आणि दाव्याच्या अस्तित्वाच्या उल्लेखावरच म्हणे ’शास्त्रीय प्रयोग’ आधारू पाहतांय..!
प्रयोग ऐकीव माहिती/अंदाज इ. च्या तपासणीसाठीच असतात, खात्रीच्या माहितीनंतर प्रयोगच लागत नाहीत. प्रयोगानंतर अनुभव मिळतो. त्यामुळे, अनुभवशून्य परिस्थितीतच प्रयोगाची आवश्यकता असते.
ह्या विधानांमधील निष्कर्ष १००% खात्रीचे नाहीत.
त्याआधी, "विज्ञानप्रेमींच्या परिपूर्णत्त्वाच्या भावनिक दाव्यांमुळेच विज्ञानास मर्य्यादा आहे असे चित्र तुमच्या विरोधी पक्षाकडून निर्माण केले जावू शकते" या विधानातील विज्ञान या शब्दाचा तुम्हाला अभिप्रेत अर्थ सांगा.
त्यासाठी भारतीय राज्यघटना, भाग ४[क]५१[ह(अ)] पहावे, नंतर ह्या विषयांवर मा. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या विविध टिप्पण्या अभ्यासाव्यात.
मुळीच नाही, मला वेळ दवडणेच अभिप्रेत नाही. तुम्हाला अक्कल शिकविण्याचा प्रयत्न आहे.
बरे, बरे.
तुमच्या मनातील अभ्युपगम असा असावा की नाडीच्या दुकानात अधिकाधिक गिर्‍हाईकांना बोलावून गंडविण्यासाठी उपक्रमचा वापर करणे शक्य आहे.
हॅहॅहॅहॅहॅ...!! स्वतः हे असे, अन् मी म्हणे निर्बुद्ध! कळले बरे, तुम्ही काय अक्कल शिकवाल ते. ;-)

--------------------------------------------------------------------------------------------------

बुध, 04/13/2011 - 10:42
अजूनही तुमची चित्तभ्रांति संपलीच नाही कां? ;-)
लोडेड प्रश्न! मला चित्तभ्रांती कधी होती हेच तुम्ही सिद्ध केलेले नाही.
अभ्यास चालू आहे.
तो करा आणि नंतर या.
त्याच दाव्यांवर आधारलेले ते शास्त्रीय प्रयोग वगैरे नुसते "दावा करण्यात येतो की नाही" इतकाच मुद्दा चर्चिण्यासाठी काय?
नाही, ते प्रयोग दाव्याच्या सत्यतेच्या तपासासाठीच आहेत. परंतु, तुम्ही "असा दावा मी कधी ऐकला नाही" असला कांगावा केलात म्हणून ओकांचे विधान दाखवून द्यावे लागले.
तसे करण्याने काय सिद्ध केलेंत?
"व्यक्तीच्या ठशांवरून तिची जन्मतारीख / वेळ 'ओळखली जाते' असा अवास्तव दावा माझ्या ऐकिवात नाही." या तुमच्या विधानाला नाकारले.
कोणाचे दावे काय हेच मुळांत माहिती नाही
तुम्हाला विचारले होते, तुम्ही सांगितले नाही. म्हणून मग मी तुमच्या डॉन किहोटीचे दावे उल्लेखिले.
आणि दाव्याच्या अस्तित्वाच्या उल्लेखावरच म्हणे ’शास्त्रीय प्रयोग’ आधारू पाहतांय..!
प्रयोग तसेच असतात.
ह्या विधानांमधील निष्कर्ष १००% खात्रीचे नाहीत.
निष्कर्ष नाहीतच, त्या व्याख्या आहेत.
त्यासाठी भारतीय राज्यघटना, भाग ४[क]५१[ह(अ)] पहावे, नंतर ह्या विषयांवर मा. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या विविध टिप्पण्या अभ्यासाव्यात.
इथे सांगा नाहीतर किमान, टिपण्णींच्या पानाचा थेट दुवा द्या.
कळले बरे, तुम्ही काय अक्कल शिकवाल ते. ;-)
माझ्या खरडवहीत तुमच्या स्वागताचा बोर्ड लावला नव्हता, अक्कल नको असेल तर खुशाल कटा.

--------------------------------------------------------------------------------------------------

शुक्र, 04/15/2011 - 06:14

अजूनही तुमची चित्तभ्रांति संपलीच नाही कां? ;-) 
लोडेड प्रश्न! मला चित्तभ्रांती कधी होती हेच तुम्ही सिद्ध केलेले नाही.
तुम्हांस चित्तभ्रांती आहे हे माझे साध्य नसून निरिक्षण आहे.
अभ्यास चालू आहे.
तो करा आणि नंतर या
.
येण्यासाठी तुमच्या आमंत्रणाची आवश्यकता अजून तरी भासली नाही. धन्यवाद. अभ्यास चालू असतांनाही येता येते.
नाही, ते प्रयोग दाव्याच्या सत्यतेच्या तपासासाठीच आहेत. परंतु, तुम्ही "असा दावा मी कधी ऐकला नाही" असला कांगावा केलात म्हणून ओकांचे विधान दाखवून द्यावे लागले.
बरे, पाहिला दावा. पुढे काय? प्रयोग कधी करणार? मला भंपक चर्चांमध्ये रस नाही. प्रयोग करणार असाल, तर बोला. नाहीतर कटा.
"व्यक्तीच्या ठशांवरून तिची जन्मतारीख / वेळ 'ओळखली जाते' असा अवास्तव दावा माझ्या ऐकिवात नाही." या तुमच्या विधानाला नाकारले.
साफ खोटे..! व्यक्तीच्या ठशांवरून तिची जन्मतारीख / वेळ "ओळखली" जाते असा दावाच मुळी अस्तित्त्वांत नाही. तुम्ही विनाकारण माझा वेळ घालवित आहात..!
प्रयोग तसेच असतात.
म्हणजे, तुमचे प्रयोगच नां?
निष्कर्ष नाहीतच, त्या व्याख्या आहेत.
जोपर्यंत त्या व्याख्या म्हणून सर्वमान्य नाहीत, तोपर्यंत त्यांस तुमचे निष्कर्षच म्हणेन. तुमचे निष्कर्ष म्हणजे सर्वमान्य व्याख्या आहेत सिद्ध करा, अन्यथा वेळ वाया घालविला हे मान्य करा.

--------------------------------------------------------------------------------------------------

शुक्र, 04/15/2011 - 08:53
तुम्हांस चित्तभ्रांती आहे हे माझे साध्य नसून निरिक्षण आहे.
ठीक आहे, मात्र, मी तुमचे निरीक्षण स्वीकारलेले नाही.
येण्यासाठी तुमच्या आमंत्रणाची आवश्यकता अजून तरी भासली नाही. धन्यवाद. अभ्यास चालू असतांनाही येता येते.
माझ्या खरडवहीतून तुम्हाला हाकलण्याचा निर्णय मी घेईन तेव्हा त्यास तुमची अभ्यासहीन बरळ हे कारण असेल.
बरे, पाहिला दावा. पुढे काय? प्रयोग कधी करणार? मला भंपक चर्चांमध्ये रस नाही. प्रयोग करणार असाल, तर बोला. नाहीतर कटा.
मी स्वतः होऊन तुमच्या खरडवहीत आलो नव्हतो, तुम्हीच लोचटपणे माझ्या खरडवहीत आलात म्हणून मी तुम्हाला प्रतिखरडी दिल्या.
साफ खोटे..! व्यक्तीच्या ठशांवरून तिची जन्मतारीख / वेळ "ओळखली" जाते असा दावाच मुळी अस्तित्त्वांत नाही. तुम्ही विनाकारण माझा वेळ घालवित आहात..!
मी वेळ घालवतच नाहीए, तुम्हीच लोचटपणे येता म्हणून मला प्रत्युत्तरे द्यावी लागतात. "नाडी ग्रंथ भविष्य हा एक अजब प्रकार म्हणावा लागेल. फोटोत दाखवल्याप्रमाणे ताडपत्राच्या पट्ट्या सदृष्य पानांवर काही कूट तमिळ भाषेतील लिखाण असून त्यात व्यक्तीविषयीची सर्व माहिती त्यात कोरुन लिहिलेली असते. उदा - व्यक्तीचे त्याच्या आई-वडिलांचे विवाहित असेल तर त्याच्या जोडीदाराचे, त्याची तमिळ पंचांगाप्रमाणे जन्मदिनांक, शिक्षण, सध्याचे नोकरी- धंद्याचे स्वरुप, जीवित भाऊबहिणी, मुले यांची संख्या, त्या शिवाय जन्मवेळची आकाशातील ग्रहगोलांची स्थिती, आदि. आणि हे सर्व सांगण्यासाठी व्यक्तीच्या हाताच्या अंगठ्य़ाच्या ठशांचा वापर अनुक्रमणिकेसारखा केला जातो." असे तुमच्या Don Quixote ने लिहिले आहे.
म्हणजे, तुमचे प्रयोगच नां?
माझे नव्हे.
जोपर्यंत त्या व्याख्या म्हणून सर्वमान्य नाहीत, तोपर्यंत त्यांस तुमचे निष्कर्षच म्हणेन. तुमचे निष्कर्ष म्हणजे सर्वमान्य व्याख्या आहेत सिद्ध करा,
आम्ही तुमच्या मताला सर्वमान्यतेसाठीच्या मतदानात मोजतच नाही. विज्ञानाला पुष्कळ लोकमान्यता आहे, ओकमान्यता नसली तरी चालेल. फुटकळ सोमेगोमे आमच्याविषयी काय मत बाळगतात त्याची आम्हाला पर्वाही नाही. आमचे मतपरिवर्तन करण्याची/आमच्याकडून मान्यता मिळविण्याची तुम्हाला खाज आहे. तुम्हाला अक्कल शिकविण्याचा आमचा प्रयत्नही केवळ तुम्ही आमच्याकडे येता म्हणून आम्हाला करावा लागतो, आम्ही स्वतःहून तुमच्याकडे येत नाही.
अन्यथा वेळ वाया घालविला हे मान्य करा.
(तुम्ही माझा) वेळ घालविला हे मान्य आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------

शुक्र, 04/15/2011 - 10:42
माझ्या खरडवहीतून तुम्हाला हाकलण्याचा निर्णय मी घेईन तेव्हा त्यास तुमची अभ्यासहीन बरळ हे कारण असेल.
'अभ्यासहीन' ह्या शब्दाचे उपयोजन करणेसाठी तुम्हाला अजिबात लॉकस् स्टाण्डि नाही. माझ्या अभ्यासास छेद देणारा कोणता अभ्यास तुम्ही केला आहे? मी बरळतो हे सिद्ध करा, नाहीतर तुम्ही हारलांत हे मी मान्य करेन.
मी स्वतः होऊन तुमच्या खरडवहीत आलो नव्हतो, तुम्हीच लोचटपणे माझ्या खरडवहीत आलात म्हणून मी तुम्हाला प्रतिखरडी दिल्या. मी वेळ घालवतच नाहीए, तुम्हीच लोचटपणे येता म्हणून मला प्रत्युत्तरे द्यावी लागतात.
तुमच्या वितर्कातील अर्धवटपणा दाखविण्यासाठी आलो होतो. वेळ गेला, पण माझे काम झालेले आहे. धन्यवाद.
...असे तुमच्या Don Quixote ने लिहिले आहे.
तुम्ही माझ्या आणि इतरांच्या लेखनामध्ये कां गल्लत करतांहात? इयत्ता दुसरीमध्ये ’फरक ओळखा’ टाईप प्रश्न सोडवितांना कॉपी करायचांत काय?
आम्ही तुमच्या मताला सर्वमान्यतेसाठीच्या मतदानात मोजतच नाही. विज्ञानाला पुष्कळ लोकमान्यता आहे, ओकमान्यता नसली तरी चालेल. फुटकळ सोमेगोमे आमच्याविषयी काय मत बाळगतात त्याची आम्हाला पर्वाही नाही. आमचे मतपरिवर्तन करण्याची/आमच्याकडून मान्यता मिळविण्याची तुम्हाला खाज आहे. तुम्हाला अक्कल शिकविण्याचा आमचा प्रयत्नही केवळ तुम्ही आमच्याकडे येता म्हणून आम्हाला करावा लागतो, आम्ही स्वतःहून तुमच्याकडे येत नाही.
Frustration युक्त जळजळ पोहोंचली..! असो. तुमच्या शाब्दिक आक्रमकतेवर तुमचे चाहते खुष होवोत. तुमची प्रयोगशून्य अक्कल मला नकोच, ठेवा तुमच्याचकडे.
राहता राहिले ते एक; व्यक्तीच्या ठशांवरून तिची जन्मतारीख / वेळ "ओळखली" जाते हे तुमचे गृहितक खोटे आहे, त्यामुळे त्यावर आधारित तुमचे प्रयोगही खोटेच आहेत. इथून पुढे तरी प्रयोग वगैरे बातां मारण्याआधी दावे तपासून घेत चला.

माझ्याकडून विषय संपला. धन्यवाद.

--------------------------------------------------------------------------------------------------

शुक्र, 04/15/2011 - 13:33
'अभ्यासहीन' ह्या शब्दाचे उपयोजन करणेसाठी तुम्हाला अजिबात लॉकस् स्टाण्डि नाही.
मी इंटरेस्टेड पार्टी आहे कारण तुम्ही माझ्या खरडवहीत लेखन करीत आहात आणि माझ्या विधानांना चूक ठरवीत आहात.
माझ्या अभ्यासास छेद देणारा कोणता अभ्यास तुम्ही केला आहे?
प्रश्न लोडेड आहे कारण तुम्ही अभ्यास केल्याचे मान्य करण्याचे बंधन या प्रश्नात आहे. तुमचा "अभ्यास चालू" असल्याची कबुली तुम्हीच याआधी दिलेली होती. त्यामुळे, तुम्ही अभ्यास केला असल्याचा या प्रश्नातील गर्भित दावा ऑपॉपच नाकारला जातो आणि तुमचा प्रश्नच गैरलागू ठरतो.
मी बरळतो हे सिद्ध करा, नाहीतर तुम्ही हारलांत हे मी मान्य करेन.
तुमच्या युक्तिवादांची तर्कशुद्धता मी मान्य करीत नाही तोवर तुमचे लेखन ऑपॉपच 'बरळ' या प्रकारचे ठरते.
तुमच्या वितर्कातील अर्धवटपणा दाखविण्यासाठी आलो होतो. वेळ गेला, पण माझे काम झालेले आहे.
माझ्या युक्तिवादात त्रुटी असल्याचा तुमचा दावा मी मान्य केलेला नाही. तुमचे काम झालेले असल्याचा भास तुम्हाला होत असेल तर त्याला माझा नाइलाज आहे.
तुम्ही माझ्या आणि इतरांच्या लेखनामध्ये कां गल्लत करतांहात? इयत्ता दुसरीमध्ये ’फरक ओळखा’ टाईप प्रश्न सोडवितांना कॉपी करायचांत काय?
कारण तुम्ही तुमच्या लेखनात कोणत्याही अभ्युपगमाचा उल्लेखच न करता त्याच्या सत्यतेच्या चर्चेची अपेक्षा केली आहे. तुमचा अभ्युपगम कोणता ते मी तुम्हाला अनेकदा विचारले आहे, उदा. "कोणत्या माहितीच्या विश्वासार्हतेविषयी संशय घेतला जाण्याची तुम्हाला भीती आहे?". तुम्ही उत्तर देत नसल्यामुळे तुमच्याच लेवलची अक्कल असलेल्या इतरांचे संदर्भ द्यावे लागतात.
Frustration युक्त जळजळ पोहोंचली..!
तुम्ही माझ्या खरडवहीत आलेलात, मी तुमच्या खरडवहीत आलो नाहीए. तुमची जिरवायची खाज मला नाही. फ्रस्ट्रेशन तुम्हालाच आहे, मला केवळ अनॉयन्स आहे.
तुमची प्रयोगशून्य अक्कल मला नकोच, ठेवा तुमच्याचकडे.
माझ्या खरडवहीत तुम्ही लेखन केल्यास तुमच्या मेंदूत अक्कल घुसविण्याचा प्रयत्न करेनच. मला खरडी लिहिणे थांबविलेत तरच तुम्हाला तुमच्या खरडवहीद्वारे अक्कल देणे थांबवेन.
व्यक्तीच्या ठशांवरून तिची जन्मतारीख / वेळ "ओळखली" जाते हे तुमचे गृहितक खोटे आहे, त्यामुळे त्यावर आधारित तुमचे प्रयोगही खोटेच आहेत. इथून पुढे तरी प्रयोग वगैरे बातां मारण्याआधी दावे तपासून घेत चला.
तुम्ही तुमचा अभ्युपगम सांगितला नाही त्यामुळे तुमच्याच लेवलची अक्कल असलेल्या इतरांचे संदर्भ द्यावे लागले. शास्त्रीयतेची चर्चा करण्याआधी अभ्युपगम सांगत चला.

--------------------------------------------------------------------------------------------------
शनि, 04/16/2011 - 11:56

...प्रश्न लोडेड आहे कारण तुम्ही अभ्यास केल्याचे मान्य करण्याचे बंधन या प्रश्नात आहे. तुमचा "अभ्यास चालू" असल्याची कबुली तुम्हीच याआधी दिलेली होती. त्यामुळे, तुम्ही अभ्यास केला असल्याचा या प्रश्नातील गर्भित दावा ऑपॉपच नाकारला जातो आणि तुमचा प्रश्नच गैरलागू ठरतो.
...तुमच्या युक्तिवादांची तर्कशुद्धता मी मान्य करीत नाही तोवर तुमचे लेखन ऑपॉपच 'बरळ' या प्रकारचे ठरते.
तुमच्या मान्यतेची आवश्यकता मला वाटत नसल्याने, तसेही; ’मी अभ्यास करतो / केला आहे’ ह्यापैकी काही ’मान्य करा’ असे मी तुम्हांस म्हटलेले नाहीच. तुमच्याकडून प्रयोग होणे शक्य नसल्याचे मी तुमच्याचकडून लिहून घेतलेले आहे. खरेतर त्यातूनच तुमचा काय अभ्यास आहे हे ऑपॉप स्पष्ट होते. स्वत:चा अभ्यास नसल्याने माझ्याशी सकारात्मकरीत्या चर्चा करणे शक्य नाही हे उमगून त्यातून येणारी हतबलता स्वच्छ दिसते. (माझ्या युक्तीवादापुढे?) बहुधा तुम्हांस असुरक्षितता वाटत असल्याने, पुढील चर्चेस घाबरून बंधने वगैरे तुम्ही स्वत:च स्वत:वर लादून घेतांहात. असो, राहिले!
...माझ्या युक्तिवादात त्रुटी असल्याचा तुमचा दावा मी मान्य केलेला नाही.
तुम्ही गृहितक म्हणून घेतलेल्या दाव्यामध्ये तथ्य नसल्याचे तुमच्या लक्षांत आणून देवून त्यावर आधारित तुमच्या प्रयोगाच्या युक्तीवादांत त्रुटी कशी आहे हे मी सिद्ध केले. तरीही स्वत:च्या युक्तीवादांत त्रुटी असल्याचे तुम्ही मान्य करित नसाल, तर श्री. ओक ह्यांच्या लेखनास तुमचे समर्थन आहे असेच मला म्हणावे लागेल.
बाकी, चांगल्या वळणावर जात असलेल्या चर्चेमध्ये स्वत:च्या हताशपणाचे, हतबलतेचे, नैराश्याचे योग्य तर्‍हेने प्रतिनिधीत्त्व करण्यासाठी तुम्ही उपयोजिलेले शब्दसमूह विशेष आवडले. उदा. ’अभ्यासहीन बरळ’, ’तुमच्या लेवलची अक्कल’, ’जिरवायची खाज’, ’मेंदूत अक्कल घुसविण्याचा प्रयत्न’, ’हाकलण्याचा निर्णय’, ’लोचटपणे’, ’Don Quixote’, ’तुम्ही निर्बुद्ध आहात’, ’अक्कलशून्य’. ह्या शब्दांशिवाय तुमच्या अनुत्पत्तीस वाट मिळाली नसती असे वाटते.
माझ्याकडून ह्या विषयास पूर्वीच पूर्णविराम दिला गेला असून पुन्हा ह्याच विषयावर बोलावयाचे असल्यास कृपया खरड लिहू नये. धन्यवाद.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

धम्मकलाडू  to रिकामटेकडा

शनि, 04/16/2011 - 15:59
खरडवहीत अशी फालतू हाणामारी करण्याऐवजी एखादा चांगला लेख लिहीणे कधीही उत्तम.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शनि, 04/16/2011 - 16:05
अहो मी करू तरी काय? तो कटतच नाही :(
अजून विकास यांना प्रतिसाद देणे बाकी आहे :( :(
तोवर (शक्यतितके) "गप्प रहायचे ठरवले आहे".

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रवि, 04/17/2011 - 09:24
तुमच्या मान्यतेची आवश्यकता मला वाटत नसल्याने,
मग मला खरड लिहिण्याचा उद्देशच काय?
तसेही; ’मी अभ्यास करतो / केला आहे’ ह्यापैकी काही ’मान्य करा’ असे मी तुम्हांस म्हटलेले नाहीच.
तुमच्या वाक्यांना मी विरोध न केल्याचा दावा नंतर करण्यात येऊ नये म्हणून आधीच विरोध करावा लागला.
तुमच्याकडून प्रयोग होणे शक्य नसल्याचे मी तुमच्याचकडून लिहून घेतलेले आहे.
ते आधीही सांगितलेले होते. तुम्हाला त्या विधानाची पाटी करून घरावर लावायची असेल तरीही मी हरकत घेतलेली नाहीए.
खरेतर त्यातूनच तुमचा काय अभ्यास आहे हे ऑपॉप स्पष्ट होते. स्वत:चा अभ्यास नसल्याने
अभ्यास करण्याजोगा नेमका कोणता विषय तुम्हाला अपेक्षित आहे तेच तुम्ही सांगितलेले नाही.
माझ्याशी सकारात्मकरीत्या चर्चा करणे शक्य नाही हे उमगून त्यातून येणारी हतबलता स्वच्छ दिसते.
विषय काय तेच तुम्ही सांगितलेले नसल्यामुळे चर्चा करण्यास हतबलता स्वाभाविकच आहे.
(माझ्या युक्तीवादापुढे?)
स्वतःहून प्रश्नचिन्ह टंकलेत त्याबद्दल धन्यवाद.
बहुधा तुम्हांस असुरक्षितता वाटत असल्याने,
'मी घाबरतो' आणि, 'तुम्हाला घाबरतो' - हाहा. गच्छ सूकर, भद्रं ते, वद 'सिंहो मया हत:'। पण्डिता एव जानन्ति सिंहसूकरयोर्बलम्||
पुढील चर्चेस घाबरून बंधने वगैरे तुम्ही स्वत:च स्वत:वर लादून घेतांहात. असो, राहिले!
"माझ्या अभ्यासास छेद देणारा कोणता अभ्यास तुम्ही केला आहे?" या विधानाचे कोणतेही उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यास मुळात तुम्ही अभ्यास केला असल्याचे मान्य केल्यासारखे होईल. "तुम्ही तुमच्या बायकोला अजूनही मारहाण करता काय?" अशासारखा तो लोडेड प्रश्न आहे.
तुम्ही गृहितक म्हणून घेतलेल्या दाव्यामध्ये तथ्य नसल्याचे तुमच्या लक्षांत आणून देवून त्यावर आधारित तुमच्या प्रयोगाच्या युक्तीवादांत त्रुटी कशी आहे हे मी सिद्ध केले.
जोवर तुम्ही तुमच्या मनातील चर्चाविषय असलेला अभ्युपगम सांगत नाही तोवर मी तुमच्यावर ओक यांच्याच अभ्युपगमाचा आरोप करेन.
तरीही स्वत:च्या युक्तीवादांत त्रुटी असल्याचे तुम्ही मान्य करित नसाल, तर श्री. ओक ह्यांच्या लेखनास तुमचे समर्थन आहे असेच मला म्हणावे लागेल.
तुम्ही काय म्हणाल त्यावर माझे नियंत्रण नाही.
बाकी, चांगल्या वळणावर जात असलेल्या चर्चेमध्ये
हे कधी घडत होते?
शब्दसंकलन आवडले. ती वाक्ये छापलेला टीशर्ट घालून तुम्हाला फिरायचे असेल आणि "बघा हो रिकामटेकडा काय लिहितो!" असे लोकांना सांगायचे असेल तरी मी हरकत घेतलेली नाहीए.
तुम्हाला अक्कल शिकविण्यात मी अपयशी असलो तरीही मला वैफल्य/हताशपणा, इ. वाटलेले नाही.
पुन्हा ह्याच विषयावर बोलावयाचे असल्यास कृपया खरड लिहू नये.
हं! तुम्ही मला खरड देण्यास सुरुवात केलीत, प्रत्येक खरडीला प्रतिखरड मिळेल.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/18/2011 - 10:46
...मग मला खरड लिहिण्याचा उद्देशच काय?
...हे कधी घडत होते?
'जेवढे आपणास ठावूक आहे / कळते तेवढेच परिपूर्ण आहे' ह्या प्रकारांत मोडणारा तुमचा अर्धवट दावा शास्त्रीय नसल्याचे तुमच्या लक्षांत आणून देणे एवढाच मर्य्यादित उद्देश होता. जोपर्यंत तुम्ही चुकीच्या गृहितकांवर आधारलेला प्रयोग मांडला नाही तोपर्यंत चांगली चर्चा चालली. आतां चूक लक्षांत येवूनही तुम्ही निव्वळ हटवादीपणा करतांहात.
...तुम्हाला त्या विधानाची पाटी करून घरावर लावायची असेल तरीही मी हरकत घेतलेली नाहीए.
मी कृतीशून्य विधानांस किंमत देत नाही.
..."माझ्या अभ्यासास छेद देणारा कोणता अभ्यास तुम्ही केला आहे?" या विधानाचे कोणतेही उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यास मुळात तुम्ही अभ्यास केला असल्याचे मान्य केल्यासारखे होईल. "तुम्ही तुमच्या बायकोला अजूनही मारहाण करता काय?" अशासारखा तो लोडेड प्रश्न आहे.
...अभ्यास करण्याजोगा नेमका कोणता विषय तुम्हाला अपेक्षित आहे तेच तुम्ही सांगितलेले नाही
...विषय काय तेच तुम्ही सांगितलेले नसल्यामुळे चर्चा करण्यास हतबलता स्वाभाविकच आहे.
...जोवर तुम्ही तुमच्या मनातील चर्चाविषय असलेला अभ्युपगम सांगत नाही तोवर मी तुमच्यावर ओक यांच्याच अभ्युपगमाचा आरोप करेन.

मुळांत, प्रश्नांतील लोड् हे तुमच्या मानण्यावर आहे. आणि लोड् असलेच तरीही लोडेड् प्रश्न सोडविताच येत नाही असे म्हणत असाल, तर ते हास्यास्पद वाटते. ’तुमचा अभ्युपगम कोणता’ असे जे तुम्ही माझ्याकडे वारंवार विचारता आहात, त्यात माझा अभ्यास असल्यास मान्यता मिळतेच आहे, नां? ;-) असो. तुमच्या बिनबुडाच्या आरोपांस काही अर्थ नाही. तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे ठशांवरून पट्टी मिळते की नाही, ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यापुरते मी मिळविले आहे. आतां ह्या प्रश्नांस तुम्ही कसे हाताळताहात हे मी पहात असून येथे माझ्याकडून कोठलाही नवा सिद्धांत मांडले जाणे सध्या अपेक्षित नाही.
...ती वाक्ये छापलेला टीशर्ट घालून तुम्हाला फिरायचे असेल आणि "बघा हो रिकामटेकडा काय लिहितो!" असे लोकांना सांगायचे असेल तरी मी हरकत घेतलेली नाहीए.
तुमचे अपयश मिरविण्यात मला आनंद नाही.
...तुम्हाला अक्कल शिकविण्यात मी अपयशी असलो...
तुम्हीच आहात तुमच्या अपयशाचे शिल्पकार.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सोम, 04/18/2011 - 17:13
'जेवढे आपणास ठावूक आहे / कळते तेवढेच परिपूर्ण आहे' ह्या प्रकारांत मोडणारा तुमचा अर्धवट दावा शास्त्रीय नसल्याचे तुमच्या लक्षांत आणून देणे एवढाच मर्य्यादित उद्देश होता.
मी तसला काही दावा केलाच नाहीए.

जोपर्यंत तुम्ही चुकीच्या गृहितकांवर आधारलेला प्रयोग मांडला नाही तोपर्यंत चांगली चर्चा चालली. आतां चूक लक्षांत येवूनही तुम्ही निव्वळ हटवादीपणा करतांहात.
तुमचा अभ्युपगम सांगा नाहीतर ओकांचाच अभ्युपगम तुम्हीही विकत असल्याचा आरोप मी करेन.
मी कृतीशून्य विधानांस किंमत देत नाही.
ते विधान माझ्याकडून 'लिहून घेण्यात' तुम्ही आनंद मानला त्याअर्थी त्या विधानाला तुमच्या लेखी किंमत आहे.
लोडेड् प्रश्न सोडविताच येत नाही असे म्हणत असाल, तर ते हास्यास्पद वाटते.
तुम्हाला कशाचे काय वाटेल त्यावर माझे नियंत्रण नाही, तुम्हीच हास्यास्पद आहात.
’तुमचा अभ्युपगम कोणता’ असे जे तुम्ही माझ्याकडे वारंवार विचारता आहात, त्यात माझा अभ्यास असल्यास मान्यता मिळतेच आहे, नां? ;-)
मुळीच नाही. अभ्युपगम बनविण्यासाठी अभ्यास लागत नाही.
तुमच्या बिनबुडाच्या आरोपांस काही अर्थ नाही.
मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही टाळत असल्यामुळे माझा नाइलाज आहे. एक व्यक्ती नाडीसाठी गेल्यावर त्या व्यक्तीची नाडी शोधेपर्यंत कायकाय माहिती विचारण्यात येते ते सांगा. 'ठसे' ही माहिती घेतली जाते की नाही?

तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे ठशांवरून पट्टी मिळते की नाही, ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यापुरते मी मिळविले आहे.
तुम्हाला नेमक्या कोणत्या अभ्युपगमाच्या तपासणीसाठी शास्त्रीय प्रयोग अपेक्षित आहे ते तुम्ही सांगितलेले नाही. (नाडीत कूटतामिळ श्लोक असतात की नाही आणि त्यांच्यातील ग्रहस्थितीशी संबंधित तारीख/वेळ अस्तित्वात असते की नाही, या प्रश्नांमध्ये मला रस नाही हे तुम्हाला मी अनेकदा सांगितलेले आहे.)
ह्या प्रश्नांस तुम्ही कसे हाताळताहात हे मी पहात असून येथे माझ्याकडून कोठलाही नवा सिद्धांत मांडले जाणे सध्या अपेक्षित नाही.
या प्रश्नाला मी हाताळणारच नाहीए! उदा., जोवर कोणी आमच्यासमोर निळी मेंढी हजर करीत नाही तोवर आम्ही "निळ्या मेंढ्या नसतात" असा 'तात्पुरता' निष्कर्ष (=परिपूर्ण नव्हे) काढून स्वस्थ बसतो. निळ्या मेंढ्या शोधण्यात कोणाला उत्साह असेल तर किमान पुरावा म्हणून कायकाय वस्तू (चांगल्या प्रतीचे छायाचित्र, थोडी निळी लोकर, इ.) स्वीकारू त्याची यादी आम्ही देऊ. आम्ही निळी मेंढी शोधायला जाणारच नाहीए.
तुमचे अपयश मिरविण्यात मला आनंद नाही.
मी तुम्हाला लोचट, निर्बुद्ध, अक्कलशून्य, इ. विशेषणे दिली ते तुम्हाला माझे अपयश वाटते! हाहाहा. मला अजून अपयश देणार आहात काय?
तुम्हीच आहात तुमच्या अपयशाचे शिल्पकार.
कुत्र्याचे शेपूट सरळ करणेही मला जमणार नाही असे मला वाटते. मी पार करू शकत नाही असे अनेक अडथळे जगात आहेत, त्या हतबलतेत माझा स्वतःचा काही दोष नाही. अडथळेच मोठे आहेत. उदा., तुमचा अप्रामाणिकपणा/निर्बुद्धपणा.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शनि, 04/23/2011 - 11:51
http://diwali.upakram.org/node/111#comment-2498 येथे "<हा आमचा 'तात्पुरता' निष्कर्ष शास्त्रीयच आहे.>" असा तुमचा दावा आहे. त्यामुळे "मी तसला काही दावा केलाच नाहीए" हे तुमचे ह्मणणे दुतोंडी आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"हा आमचा 'तात्पुरता' निष्कर्ष शास्त्रीयच आहे." हे विधान हा "जेवढे आपणास ठावूक आहे / कळते तेवढेच परिपूर्ण आहे" या प्रकारचा दावाच नाही.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दावा मागे घेतल्याबद्दल धन्यवाद ;-)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: