नाडीग्रंथ भविष्य काय प्रकार आहे?, ते खरेच असते का?, मला पहायला मिळेल का?, कुठे?, फी किती?, अंनिस सारख्या संस्था नावे ठेवतात त्याची सत्यता कायआहे?, मला माझे नाव ताडपट्टीत पाहता येईल का?, अशा अनेक विचारणांची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल, नाडी ग्रंथ विषयावर कार्यशाळेत डॉ विजय भटकर आपला अनुभव सांगतात तो काय होता? सध्या ताडपत्रावरील मजकूर गोळाकरून डेटा बँकचे काम चालू आहे?, त्यात मला सहभागी होता येईल का? For more, please visit http://www.naadiguruonweb.org/
Welcome to New APPS and Websites
Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.
For more, please visit
For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)
रविवार, १५ जून, २०१४
मंगळवार, १० जून, २०१४
तंजावरच्या अरुल कुटीर केंद्रात गणेशन नामक नाडी वाचक अगस्त्य जीव नाडीचे वाचन
मला मध्यंतरी महर्षींच्या मार्गदर्शनाची इच्छा झाली.
आता कोणाला विचारावे असा पेच पडला. तेंव्हा या जीव नाडीची आठवण झाली व जे
कुमारांशी फोनवरूनसंपर्क करून महर्षींच्याकृपाशिर्वादाची व मार्गदर्शनासाठी
विचारणा केली. जे कुमार एरव्ही सेलम या शहरात राहतात. कधीमधी ते तंजावरला 3-4 शे
किमीचा प्रवास करून येतात. नेमके ते त्यावेळी तंजावरला होते.अन मग 5 सप्टेंबरलामाझ्या
अपरोक्ष जे त्यावेळी ताडपट्टीवर उमटले त्याचा इंग्रजीत गोषवारा त्यांनी पाठवला.
ते कथन मी पुढे अलदान सरांना विचारार्थ पाठवले.
त्यांचे त्या कथनावरील विचार अनेकांसाठी ते उपयोगी होतील असेल वाटून वाचकांना
त्यांच्या संमतीने तेही प्रकाशित करत आहे.
(टीप - अशी कथने ताडपत्रावर उत्पन्न होऊ शकत
नाहीत आदी थिल्लरपणे चेष्टा वा टीका-टिपणी करण्याआधी तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव
घेतल्याशिवाय करू नये. कोणी टीका केली तर त्याची दखल घेतली जाणार नाही.)
आम्ही (सिद्धर) परमशिवांच्या आज्ञेने, हे पवित्र
शब्द (in Tamil = Arul Vaakku) जीव अरुल नाडीच्या
द्वारे जे लोक आमच्याशी संपर्क करतात त्यांना कथन करत असतो.
ऐका, ज्यांच्यात अहंकारविरहीत आत्मविश्वास, शिव
तत्वावर अढळ श्रद्धा, सत्यधर्माचरण असे गुण आहेत. जे काया-वाचा-मनाने गुण आहेत. जे
इतरांचे भले करू इच्छितात, आणि आपल्या पूर्वकर्माने सात्विक व परोपकारी जीवन
रहाटतात असे लोक आमच्या जीवन पद्धतीचे व भगवंताचे रहस्य जाणू शकतात.
सध्याच्या ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या जगात, मी सत्वशील आचरण केले
तर लोक त्याच गैरफायदा उठवतीलअसा विचार करून लोक कसलेल्या नटाप्रमाणे धूर्त वर्तन
करण्यात तरबेज झाले आहेत.आता आम्हाला विचाराल तर जे अशा धूर्तांकडून बनवले जातात
त्यांना आम्ही दोष देऊ इच्छित नाही. कारण जो फसवतो तो आपले वाईट कर्म निर्माण करत
असतो. आणि जो फसला जातो तो एका अर्थी त्याच्या वाईट पूर्वकर्माचा निचरा करतो. यावर
अशी विचारणा लगेच होईल की मग काय आम्ही आमची बुद्धी वापरून बरे काय - वाईट काय
याचा सारासारविचार करायचा नाही की काय? नाही, आम्ही फक्त इतकेच म्हणतो आहे की
जरी दक्षतेने वागूनही कधी पैसा वा मालमता, व्यक्ती गमवायची वेळ आली तर, दुःखीहोऊन
स्वतःलादूषणे देऊ नका. आपल्या मनाला समजावा, की जे आत्ताच्या जीवनात विपरीत घडले
ते एका अर्थाने पुनर्जन्मात मी इतरांशी केल्या दुष्कृत्याचे आरशातील प्रतिबिंब
(प्रतिफल) आहे.
आता हे सर्वसामान्यांना पचनी पडायला अवघड जाईल
याची कल्पना आम्हाला आहे. अनेक जण असा तर्क देतील की मी तर रोज पहाटे उठून
जप-जाप्य, वेद पठण, योगासने करून सात्विक जीवन रहाटतो. भारतात तीर्थयात्राकरून व
अनेक संत-महात्म्यांचे आशीर्वाद मिळवले आहेत.मला पाप शिवणारही नाही. मात्र ते तसे
नाही. यात मेख अशी की या सर्व कर्मांचे सर्वोच्च अधिष्ठान धर्म, धर्म आणि धर्म हेच
असले पाहिजे. (धर्म या शब्दाचा अर्थ रिलिजन असा अभिप्रेत नाही.)
धर्म कार्य पैसे वा वस्तू दान करून
साधता येते.
ते शक्य
नसेल तर आपल्या अंगमेहनतीने सेवा करून करता येते. ते ही शक्य नसेल तर लोकांशी
सौजन्यपुर्वक आत्मियतेने गोड बोलून ही ते
साधता येईल. काहींना तेही शक्य नसेल तर मौनात जाऊन मानवजातीच्या कल्याणाची
प्रार्थना देवाला करावी. लक्षांत ठेवा की जर तुमच्या एकट्याच्या
नुकसानीने हजारोंचा
फायदा होणार असेल तर
तो सहन करावा. पण त्याच्या उलट वर्तन करू नये. आम्ही नाडी महर्षीं नेहमी असाच
विचार करून जास्तीत जास्त लोकांचे कल्याण करायला कधी कधी काही जणांचे त्रुटिपूर्ण
कथन करून रोष सहन करतो.
आज या जातकाला, जो ताडपत्रावरील आमच्या लेखनाचा व
कथनांचा सखोल अभ्यास करत आला आहे, त्याला
व अशा समविचारी लोकांना आमचे हेच सांगणे असेल
की आम्ही सिद्धमुनीजन व प्रत्यक्ष शिव परमात्मा तुमच्या मानवी दृष्टीला
कधी येणार नाही. सामान्य मानवी चक्षु, अध्यात्मिक प्रज्ञाचक्षूंशीबरोबरी करू शकतील
काय? हां, प्रेम,
भक्ती व परिपूर्ण शरणागतीद्वारे आमच्याशी मानसिक संपर्क करू शकाल. मात्र ते अनुभवजन्य
ज्ञानानेच कळू शकेल. असो.
हा जातक फार तळमळीचा आहे. त्याला
आलेल्या नाडीग्रंथांच्या अनुभवावरून सगळ्या जगाला आमच्या कथनाचे महत्त्व व मर्म
सांगण्याच्यासर्वतोपरी प्रयत्नांचीघाईझाली आहे. चांगली गोष्ट आहे.पण लक्षांत असू
दे की हे काम इतके सहजासहजी होणारे नाही. आम्ही त्याला या घटकेला सांगू इच्छितो की
त्याने आमच्यासाठी कार्य करताना पंचाक्षर मंत्र सदैव मुखात ठेवावा. शिवांच्या
आज्ञेने जर तो आमच्या कुटीरात योग्य वेळी पुन्हा भेट द्यायला प्रत्यक्ष आला तर
योग्य मार्गदर्शन केले जाईल. आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की सध्याच्या
काळात त्याची मनस्थिती गोंधळलेली आहे. तेंव्हा हे आशीर्वचन ऐकून तो आणखी बुचकळ्यात
पडेल. तो त्याच्या प्राक्तनाचा भाग आहे. ते
त्याला भोगून संपवावे लागेल. म्हणून आम्ही त्याला सांगतो की तुझ्या कुवतीप्रमाणे लोकसेवा व
ईशसेवा पूर्ण श्रद्धाभावाने चालू ठेवावी. उर्वरित अरुल वाक्य योग्य वेळी मिळेल.
तोवर आमचे शुभाशीर्वाद....
सोमवार, ९ जून, २०१४
नाडी ग्रंथ पट्टी मिळणे ही किती अशक्यप्राय गोष्ट आहे ?
नाडी ग्रंथ
पट्टी
मिळणे ही किती अशक्यप्राय गोष्ट आहे ?
सहज कल्पना करा की आपण
एका प्रचंड
पूर आलेल्या नदीच्या पात्रावरील पुलावर
मजा
म्हणून उभे आहात. गंमत म्हणून खिशातून काड्याची
पेटी
काढून त्यातील एक काडी त्या घोंघावणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात
फेका. नंतर काड्याच्या पेटीतील
आणखी
एक काडी काढून ती फेका. आता त्या दोन काड्या प्रवाहात
कुठेतरी
पडून दिसेनाशा होतील. आता विचार करा की काही
सेकंदाच्या
फरकाने फेकलेल्या त्या काड्या कधी
पुन्हा
एकत्र येतील काय ? सामान्य उत्तर कधीच नाही असे
असेल. तथापि, गणितज्ञ या उत्तराशी सहमत
होणार
नाहीत. कारण ते
गणिती आकडे
मोड करून अतीशय क्लिष्ट संख्या मांडून
अति
दुर्मिळ पण अशक्य नाही असे त्यांचे
उत्तर
देतील. आता या पुढे
असा विचार
करा की त्याच काड्या काही कारणानी, काही काळानी त्याच काड्याच्या पेटीत
पुन्हा
एकत्र येतील काय? आता याचे उत्तर असे घडणे अशक्य
कोटीतील
आहे, असे येईल.
का? तर त्या
वेळची
परिस्थिती संपूर्ण बदललेली असेल. काड्या मोडून गेल्या असतील. माणूस जागेवर नसेल. नदीत पाणी नसेल. आणखी हजारो कारणे असतील
की ज्यामुळे
त्या दोन काड्या एकत्र येणे शक्य होणार
नाही. तरीही ‘असे
अघटित
घडेल’ असे
कोणी
म्हणाला तर त्याला मूर्खात काढले
जाईल. तर्क मान्यता देणार नाही. बुद्धीने विश्वास ठेवणे अशक्य
होईल.
ते
कसे शक्य आहे? आता असा
विचार करा
की ती घोंघावणारी नदी म्हणजे काळाचा
एक प्रचंड
ओघ आहे. त्याच्या एका
टोकावर नाडी
भविष्याच्या कर्त्या महर्षींनी ताडपत्रावर कोरून
एका व्यक्तीची
पट्टी त्या काळाच्या प्रवाहात सोडली. मधे किती काळ गेला कोणालाच
माहीत
नाही. पुढे एक
व्यक्ती
जन्माला आली. जणू काही
काड्याच्या
पेटीतील दुसरी काडीच. काही विशिष्ट काळ गेल्यावर
त्याला
आपले भविष्य पाहाण्याची बुद्धी
झाली. तोवर त्याच्यासाठी लिहिलेली
पट्टी
धक्के खात-खात हजारो
पट्ट्याच्या
गठ्ठ्यात पडून होती. जणु काही तिला माहितच होते
की तिला
कुठे व कधी त्या दुसऱ्या काडी समान
व्यक्तीला
भेटायचे आहे. वेळ आली की
ती व्यक्ती
खूप धावाधाव करून भेटणारच. भले तिला त्या पट्टीतील भाषेचा
गंधही
नसेल. विश्वास ही
नसेल त्याचा
की त्याच्या करता कोणी फार पूर्वी
पासून
एकजण पत्र लिहून गेला आहे. असे असले तरी करुणाभावाने काही मानवांनी, ज्यांना ज्ञानचक्षूंमुळे यापुढे जन्मणाऱ्या जिवांच्या जीवनपटांचे शब्दांकन करून ठेऊन असा ताडपट्ट्यांचे ग्रंथ साहित्य अशांच्या हाती दिले की योग्य वेळ आली की ती पट्टी ज्याची त्याने वाचावी
व आपले
हित कशात आहे हे जाणावे. त्या पट्टया लिहून ठेऊन
गेलेल्यांना
काही संपत्तीचा किंवा आणखी कशाचा
लोभ म्हणून
त्यांनी ते पत्र लेखन केलेले नाही. तर
निष्काम भावनेने केलेली ती मानवतेची सेवा
आहे. आता अशा महा मानवांना महर्षी असे नामकरण योग्य ठरणार नाही काय?
आपण जेंव्हा नाडी केंद्रात
जातो
व आपले भविष्य पाहायला बसतो. ती
वेळ काळाच्या प्रचंड वेगाच्या नदीतील दोन काड्यांचे जणू एकत्र येणे असे मानून ती घटना इतकी अतिदुर्मिळ असते याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. त्या महर्षींनी केलेल्या
कार्याची
जाण ठेवावी. आपल्याला त्यातील
समजेल
तितका, रुचेल तितका
आनंद
घ्यावा. त्यात सांगितलेल्या गोष्टी
आनंदाने
स्वीकाराव्या. नाही ऐकलेत, बकवास आहे, थोतांड आहे, म्हणालात तर तुमची मर्जी. आता अशांच्या सारख्या पढतमूर्खांना कोण
काय करणार? नाही का?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)