नाडी ग्रंथ
पट्टी
मिळणे ही किती अशक्यप्राय गोष्ट आहे ?
सहज कल्पना करा की आपण
एका प्रचंड
पूर आलेल्या नदीच्या पात्रावरील पुलावर
मजा
म्हणून उभे आहात. गंमत म्हणून खिशातून काड्याची
पेटी
काढून त्यातील एक काडी त्या घोंघावणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात
फेका. नंतर काड्याच्या पेटीतील
आणखी
एक काडी काढून ती फेका. आता त्या दोन काड्या प्रवाहात
कुठेतरी
पडून दिसेनाशा होतील. आता विचार करा की काही
सेकंदाच्या
फरकाने फेकलेल्या त्या काड्या कधी
पुन्हा
एकत्र येतील काय ? सामान्य उत्तर कधीच नाही असे
असेल. तथापि, गणितज्ञ या उत्तराशी सहमत
होणार
नाहीत. कारण ते
गणिती आकडे
मोड करून अतीशय क्लिष्ट संख्या मांडून
अति
दुर्मिळ पण अशक्य नाही असे त्यांचे
उत्तर
देतील. आता या पुढे
असा विचार
करा की त्याच काड्या काही कारणानी, काही काळानी त्याच काड्याच्या पेटीत
पुन्हा
एकत्र येतील काय? आता याचे उत्तर असे घडणे अशक्य
कोटीतील
आहे, असे येईल.
का? तर त्या
वेळची
परिस्थिती संपूर्ण बदललेली असेल. काड्या मोडून गेल्या असतील. माणूस जागेवर नसेल. नदीत पाणी नसेल. आणखी हजारो कारणे असतील
की ज्यामुळे
त्या दोन काड्या एकत्र येणे शक्य होणार
नाही. तरीही ‘असे
अघटित
घडेल’ असे
कोणी
म्हणाला तर त्याला मूर्खात काढले
जाईल. तर्क मान्यता देणार नाही. बुद्धीने विश्वास ठेवणे अशक्य
होईल.
ते
कसे शक्य आहे? आता असा
विचार करा
की ती घोंघावणारी नदी म्हणजे काळाचा
एक प्रचंड
ओघ आहे. त्याच्या एका
टोकावर नाडी
भविष्याच्या कर्त्या महर्षींनी ताडपत्रावर कोरून
एका व्यक्तीची
पट्टी त्या काळाच्या प्रवाहात सोडली. मधे किती काळ गेला कोणालाच
माहीत
नाही. पुढे एक
व्यक्ती
जन्माला आली. जणू काही
काड्याच्या
पेटीतील दुसरी काडीच. काही विशिष्ट काळ गेल्यावर
त्याला
आपले भविष्य पाहाण्याची बुद्धी
झाली. तोवर त्याच्यासाठी लिहिलेली
पट्टी
धक्के खात-खात हजारो
पट्ट्याच्या
गठ्ठ्यात पडून होती. जणु काही तिला माहितच होते
की तिला
कुठे व कधी त्या दुसऱ्या काडी समान
व्यक्तीला
भेटायचे आहे. वेळ आली की
ती व्यक्ती
खूप धावाधाव करून भेटणारच. भले तिला त्या पट्टीतील भाषेचा
गंधही
नसेल. विश्वास ही
नसेल त्याचा
की त्याच्या करता कोणी फार पूर्वी
पासून
एकजण पत्र लिहून गेला आहे. असे असले तरी करुणाभावाने काही मानवांनी, ज्यांना ज्ञानचक्षूंमुळे यापुढे जन्मणाऱ्या जिवांच्या जीवनपटांचे शब्दांकन करून ठेऊन असा ताडपट्ट्यांचे ग्रंथ साहित्य अशांच्या हाती दिले की योग्य वेळ आली की ती पट्टी ज्याची त्याने वाचावी
व आपले
हित कशात आहे हे जाणावे. त्या पट्टया लिहून ठेऊन
गेलेल्यांना
काही संपत्तीचा किंवा आणखी कशाचा
लोभ म्हणून
त्यांनी ते पत्र लेखन केलेले नाही. तर
निष्काम भावनेने केलेली ती मानवतेची सेवा
आहे. आता अशा महा मानवांना महर्षी असे नामकरण योग्य ठरणार नाही काय?
आपण जेंव्हा नाडी केंद्रात
जातो
व आपले भविष्य पाहायला बसतो. ती
वेळ काळाच्या प्रचंड वेगाच्या नदीतील दोन काड्यांचे जणू एकत्र येणे असे मानून ती घटना इतकी अतिदुर्मिळ असते याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. त्या महर्षींनी केलेल्या
कार्याची
जाण ठेवावी. आपल्याला त्यातील
समजेल
तितका, रुचेल तितका
आनंद
घ्यावा. त्यात सांगितलेल्या गोष्टी
आनंदाने
स्वीकाराव्या. नाही ऐकलेत, बकवास आहे, थोतांड आहे, म्हणालात तर तुमची मर्जी. आता अशांच्या सारख्या पढतमूर्खांना कोण
काय करणार? नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा