मी भारवि अवधानी, दिनांक ९/१२/२०२२ ला श्री अगस्ती आश्रम मंदिर अकोले येथे दर्शनाकरिता गेलो होतो. तिथे गेल्यावर एक अजब घटना घडली. त्याचा अनुभव सांगतो. मी दर्शन घेतले व ध्यान करत होतो. माझे मन पूर्णपणे महर्षिंजवळ गेले होते. अचानक मंदिरात एक मांजर आवाज देत होते, माझ्या बायकोने व मुलीने सगळीकडे शोध घेतला पण मांजर कुठे आढळून आले नाही!
अचानक एक स्त्री माझ्या समोर आली. माझ्या पाया पडली व मला म्हणाली, 'मी महर्षी साठी चांदीचे डोळे केले आहेत ते तुमच्या हाताने द्या'.
मग मी विचारले, 'तुम्ही हे कशासाठी केले? तर ती म्हणाली, 'माझ्या सुनेची दृष्टी खूपच कमी झाली होती' मी महर्षिंना साकडे घातले होते की तिला जर फरक पडला तर डोळे मी दान करेन'.
मी जेव्हा ध्यानात गेलो होतो त्या वेळी हा संकेत मला मिळाला होता. मलाही सध्या डोळ्याचा त्रास होत आहे व माझीही ट्रीटमेंट चालू आहे. त्या बाईने माझ्या हातात चांदीचे डोळे दिले. ते मी पुजारी यांच्याकडे दिले. ते मला म्हणाले की आपणच लावा. काय संयोग आहे माहित नाही पण ते डोळे मूर्तीला लावत असताना खूप ऊर्जा मिळाली. पहिला डोळा लावता लावता पडला. महर्षींची कृपा झाली असा तो शुभ संकेत आहे, असे मी सांगितले. दुसरा डोळा लावला. तो बसला. मी दोन तास तिथे होतो तोवर एकही डोळा पडला नाही व तिच्या सुनेला हळू हळू दिसू लागले. त्यांची मुलाखत घेतली ती व फोटो पोस्ट करीत आहे.
नंतर तिथूनच चेंबूरच्या नाडी केंद्रातील नाडी वाचक श्री एम आर रवी यांनी मोबाइलवरून ते श्री अगस्ती महर्षींची आरती व कृपा आशीर्वाद देताना किती अजब आहे हे नाडी ग्रंथातील महर्षिंचे मार्गदर्शन याची जाणीव झाली... !
।। जय श्री अगस्ती महर्षी ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा