Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

अवधानींची अकोले मधे अगस्त्य महर्षिंची भेट

 





मी भारवि अवधानी, दिनांक ९/१२/२०२२ ला श्री अगस्ती आश्रम मंदिर अकोले येथे दर्शनाकरिता गेलो होतो. तिथे गेल्यावर एक अजब घटना घडली. त्याचा अनुभव सांगतो. मी दर्शन घेतले व ध्यान करत होतो. माझे मन पूर्णपणे महर्षिंजवळ गेले होते. अचानक मंदिरात एक मांजर आवाज देत होते, माझ्या बायकोने व मुलीने सगळीकडे शोध घेतला पण मांजर कुठे आढळून आले नाही! 


मी ध्यानातून बाहेर आलो. मला हे काहीही माहित नव्हते. हे सर्व माझी मुलगी अपूर्वाने सांगितले. 


 अचानक एक स्त्री माझ्या समोर आली.  माझ्या पाया पडली व मला म्हणाली, 'मी महर्षी साठी चांदीचे डोळे केले आहेत ते तुमच्या हाताने द्या'.



 मग मी विचारले, 'तुम्ही हे कशासाठी केले? तर ती म्हणाली, 'माझ्या सुनेची दृष्टी खूपच कमी झाली होती' मी महर्षिंना साकडे घातले होते की तिला जर फरक पडला तर डोळे मी दान करेन'. 

 मी जेव्हा ध्यानात गेलो होतो त्या वेळी हा संकेत मला मिळाला होता.  मलाही सध्या डोळ्याचा त्रास होत आहे व माझीही ट्रीटमेंट चालू आहे. त्या बाईने माझ्या हातात चांदीचे डोळे दिले. ते मी पुजारी यांच्याकडे दिले.  ते मला म्हणाले की आपणच लावा.  काय संयोग आहे माहित नाही पण ते डोळे मूर्तीला लावत असताना खूप ऊर्जा मिळाली.  पहिला डोळा लावता लावता पडला. महर्षींची कृपा झाली असा तो शुभ संकेत आहे, असे मी सांगितले. दुसरा डोळा लावला. तो बसला. मी दोन तास तिथे होतो तोवर एकही डोळा पडला नाही व तिच्या सुनेला हळू हळू दिसू लागले. त्यांची मुलाखत घेतली ती व फोटो पोस्ट करीत आहे.



 नंतर तिथूनच चेंबूरच्या नाडी केंद्रातील नाडी वाचक श्री एम आर रवी यांनी मोबाइलवरून ते श्री अगस्ती महर्षींची आरती व कृपा आशीर्वाद देताना किती अजब आहे हे नाडी ग्रंथातील महर्षिंचे मार्गदर्शन याची जाणीव झाली... !

।। जय श्री अगस्ती महर्षी ।।

समाप्त


मानो या ना मानो २नाडी ग्रंथांवरील एपिसोड

मानो या ना मानो २ ६ नोव्हेंबर२०१० च्या पाडवा दिवाळीच्या दिवशी रात्री १०३०नाडी ग्रंथांवरील एपिसोड - ५भागात डॉ.दिलीप नाहर यांच्या पुर्वजन्मच्या व्यक्तित्वाच्या शोधात -

नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास

वाचकमित्रहो, प्रथमत: आपणा सा-यांना दिवाळीनिमित्ते हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी आपणा सर्वांस सुखसमृद्धीची, आनंदाची आणि ज्ञानजिज्ञासेची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नाडिग्रंथ हा वाचकांसाठी काही नवा विषय राहिलेला नाही. गेल्या काही दशकांत ह्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ही फार वाढलेली दिसून येते. विविध विषयांच्या अभ्यासकांसाठी नाडिग्रंथांमधील रोचकता ही केवळ भविष्यकथनापुरतीच मर्यादित राहिलेली नसून त्याही पलिकडील अनेक विषयांच्यावर आज चर्चा होतांना दिसते. ह्यात मुख्यत: नाडिग्रंथांतील लिपी, भाषा, उपयोजिलेले काव्यप्रकार अशा; थोडक्यात, ज्योतिषशास्त्राहून भिन्न अशा विषयांवर मोठ्या प्रमाणात अभ्यास होतांना दिसून येतो.

ह्याच अनुषंगाने जानेवारी २०१० मध्ये पुणे येथे झालेल्या नाडिग्रंथ अधिवेशनामध्ये मी "कूटलिपी - एक विचार" हा नाडिग्रंथांत आढळणा-या लिपीबाबतचा विश्लेषणात्मक शोधनिबंध चर्चेसाठी पाठवून दिला होता. (पूर्वप्रसिद्धी: उपक्रम दिवाळी अंक २००९). ह्या शोधनिबंधावर चर्चा घडल्या, त्याहीनंतर अनेकांनी माझ्याशी संपर्क साधून वैयक्तिकरीत्या तसेच जाहिररीत्या प्रश्न केले, ते सारांशात असे: "हैयो, आपण ग्रंथलिपी आणि नाडिग्रंथांतील कूट्टेळुत्तु लिपी ह्यांचा संबंध दाखविणारी शोधनिबंधामध्ये प्रस्तुत केलेली माहिती मोठी रोचक आहे. लिपीशास्त्राभ्यासाच्या निमित्ताने आपण नाडिग्रंथांतील विविध हस्तलिखिते हाताळल्याचे आपल्या विश्लेषणातून कळते. ह्या विषयाबाबतचा आपला दृष्टीकोन हा तटस्थ आहे, प्रामाणिकही वाटतो. तेंव्हा त्या हस्तलिखितांतील मजकूर काही कां असेना, आपण आतांपर्यंत अभ्यास केला त्यात आपणांस काय दृष्टीपथास पडतें, त्याबद्दल सांगा बरें! विंग कमांडर (श्री. शशिकांत ओक) साहेब पट्ट्यांतून जातकाची नांवे, कुंडलीचे वर्णन इत्यादि येते असे ठासून सांगतांत, त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?"

अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तवचिकित्सा करणे अभिप्रेत आहे, हे ध्यानी ठेवून नाडिग्रंथांमध्ये हस्तलिखित ताडपत्रे असल्याने, भाषाशास्त्र आणि लिपीशास्त्र हे दोन विषय नाडिग्रंथांच्या अभ्यासास अपार सहाय्य करू शकतांत असा माझा ठाम विश्वास असून ह्या अनुषंगाने लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे असे मी पूर्वीच सुचविलेले होते.
नाडिग्रंथांसंबंधी जे अनेक दावे केले जातांत त्यापैकी एक मुख्य दावा म्हणजे त्यांत व्यक्तीचे नांव, जन्मदिनाची नोंद कोरून येणे हा होय. आपल्या विचारप्रक्रीयेस असा दावा निश्चितच चमत्कारिक वाटतो. ह्या प्रकारच्या चमत्कृतिपूर्ण दाव्यांमुळे अनेक वादापवाद आतांपर्यंत उद्भवून गेलेले आहेत. अशामुळे अभ्यासकांच्यामध्ये नाडिग्रंथांवर ’विश्वास ठेवणारे’ आणि ’विश्वास न ठेवणारे’ असे दोन मुख्य गट सिद्ध झाले आहेत. अशा दाव्यांमुळे होते काय, की विविध अभ्यासक विविध प्रकारचे दृष्टीकोन घेऊन नाडिग्रंथावलोकन करताना दिसतात. काहीजण, "चला बघुया कसे काय नांव लिहून येते ते" असा थक्क होण्याचा "विलक्षण थरार" अनुभविण्यासाठी म्हणून ग्रंथावलोकन करावयास जातात, तर इतर काहीजण "धादांत खोटा दावा आहे. अशाप्रकारे माहिती लिहून ठेवलेली असणे अशक्य आहे, चला दाखवतोच मी" अशा आविर्भावामध्ये नाडिवाचकास आणि पर्य्यायाने नाडिग्रंथांस खोटे सिद्ध करण्याकरिता ग्रंथचिकित्सा करावयास जातात.

नाडिकेंद्रात प्रवेश केल्या केल्या जाम गोंधळलेली - बौचळलेली दिसणारी अशी काही चिकित्सक मंडळी मी स्वत: पाहिली आहेत. तसेही, अ-तमिळ भाषकांस नाडिग्रंथकेंद्रातील वातावरण हे एकुणातच जरासे गूढ वाटणे सहज शक्य आहे. भिंतीएवढ्या आकाराची तमिळ देवदेवतांची आणि ऋषीमहर्षींची प्रकाशचित्रे, नाडिग्रंथ साठवून ठेवण्यासाठीची ती जुनाट लाकडाची कपाटे, त्यातल्या फूटपट्टीच्या आकाराच्या, वर्षानुवर्षे हातही न लागलेल्या वाटणा-या, अत्यंत नाजुक अशा ताडपत्र्या, कायम ’असहकार चळवळ’ पुकारल्याप्रमाणे वागणूक वाटणारे ते नाडिवाचक, त्यांचे तमिळ उच्चाराचा प्रभाव असलेले संभाषण, मुंगळ्यांची रांग चालेलशी दिसणारी त्यातील ती ठसठशीत उठावदार ग्रंथ-वट्टेळुत्तु लिपी, वाचकांचे ते अगम्यसे वाटणारे ग्रंथवाचन, आणि ह्या सा-याच्या उपर आपल्या अनुभवांविषयी विविध दावे करणारे नाडिग्रंथप्रेमी हे सारे एकत्रितरीत्या विचार करता अत्यंत गूढ आणि रहस्यमय वाटत जाते. अर्थात, आपणास ह्या सा-यामागील मुख्य तत्त्वें, त्यातील कारणभाव उमगेल, तर त्यात गूढ असे काहीही नाही हेही लक्षात येईल. तरीही चिकित्सकमंडळी मुख्य तत्त्वें सोडून इतरत्र भरकटत असतात असे मला नेहमी वाटत आलेले आहे. एका नाडिकेंद्रामध्ये वानराच्या अंगठ्याचा ठसा घेवून आलेला एक मनुष्य, त्याची गोष्ट नंतर कधीतरी सांगेन. असो. 

काही चिकित्सकांच्या अशा अशास्त्रीय दृष्टीकोनामुळे आतांपर्यंतच्या ह्या विषयाच्या प्रवासाकडे एक दृष्टीक्षेप टाकतां, वास्तवापासून दूर आणि तारतम्याचा अभाव असलेली चिकित्सा झाली असल्याचे ध्यानी येते. अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तवचिकित्सा करणे अभिप्रेत आहे, हे ध्यानी ठेवून नाडिग्रंथांमध्ये हस्तलिखित ताडपत्रे असल्याने, भाषाशास्त्र आणि लिपीशास्त्र हे दोन विषय नाडिग्रंथांच्या अभ्यासास अपार सहाय्य करू शकतांत असा माझा ठाम विश्वास असून ह्या अनुषंगाने लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे असे मी पूर्वीच सुचविलेले होते. ह्या ग्रंथांतील तमिळभाषा ही संगकाळात वापरली जाणा-या पुरातन भाषेशी जवळीक साधणारी असून, नाडिवाचकांव्यतिरिक्त तिची माहिती असणारे लोक (फार थोडे असले तरीही) अजून आहेत. एक भाषाभ्यासक म्हणून विचार करता, स्वत:लादेखील ह्या भाषेची फोड करणे कठिण नाही असे मला लक्षात येतें आणि त्याप्रमाणे एका स्वतंत्र दृष्टीकोनातून नाडिग्रंथांबद्दल स्वत:स जे काही दृष्टोत्पत्तीस येते, ते प्रामाणिकपणे इतरांसमोर प्रस्तुत करावयाचा हा एक प्रयत्न होय.

नाडिग्रंथांमध्ये लेखन केलेले असते काय, असल्यास ते कोण्या लिपीमध्ये ह्या स्वत:स पडलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी केलेल्या संशोधनामध्ये मला जे काही आढळले ते मी "कूटलिपी - एक विचार" ह्या शोधनिबंधात स्पष्ट केलेलेच आहे. ह्या शोधनिबंधानंतर आंतरजालावरील उपक्रम, विशेषत: मिसळपावावरील तसेच माहितीतील अनेकांनी स्वत: होवून आपणा स्वत:च्या तसेच आप्तस्वकीयांच्या नाडिग्रंथांवरून लिहून काढलेल्या वह्या मजजवळ (नांवे उघड न करण्याच्या अटींवर) अभ्यासासाठी पाठवून दिल्या. आंतरजालावरील सदस्यांच्या वह्यांची पडताळणी केल्या जावू शकली नाही, परंतु माहितीतील लोकांच्या वह्या ह्या पट्टींतील लेखनावरूनच केलेले आहे, ह्याची पडताळणी केलेली आहे. एकत्रितरीत्या ह्या सा-या व्यक्तींचे नाडिग्रंथावलोकन हे मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळूरु, चेन्नै, वैत्तिश्वरन् कोयिल् आणि दक्षिणभारतांतील इतर काही ठिकाणचे, थोडक्यात विविध ठिकाणचे आहे. व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद कोरून येते हे म्हणणे बरोबर आहे काय ह्या प्रश्नाचे सिद्ध उत्तर देण्यासाठी ह्या वह्यांतून मला ह्याबाबतीत काय दिसते ते मी आपणासमोर ठेवू इच्छितो. खरे पाहता तूर्तास नाडिग्रंथलेखनामध्ये आढळणा-या काही वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमानांच्याबद्दलच बोलावें, परंतु प्रश्नाच्या अनुषंगाने व्यक्तीच्या वह्यांमध्ये जन्मविषयक नोंद श्लोकाच्या रूपाने कशी मिळते, त्यांत काय सांगून येते, त्यांतून नाडिवाचक आपणांस आपला जन्मदिनांक कसा सांगतो, त्याबद्दल पाहूया:
पहिली वही सध्या वयाने साधारणत: तिशीमध्ये असणा-या व्यक्तीची आहे. त्यांत जन्मविषयक नोंद खालील श्लोकाच्या रूपाने येते:


तमिळ लिपीमध्येदेवनागरीमध्ये लिप्यंतरीत
மேலான சித்தார்த்தி ஆண்டுத்தோற்றம்
மாடதுவின் திங்களதில் இருபானீர்தெய்தி
சாலசெய் வாரமதில் சித்திரைவின்மீன்
சாற்றரவி மையின்மேல் கவிசேயுள்ளே
உள்ளதன்பின் ரவியேர் மாலும்யாழில்
உயர்மன்னன் வயலதுவில் கரிராவேங்கை
கள்ளமிலா மதிமங்கை சிகிகலசம்   
मेलाऩ सित्तार्त्ति आण्डुत्तोट्रम्
माडदुविऩ् तिङ्गळदिल् इरुबाऩीर्तॆय्ति
सालसॆय् वारमदिल् सित्तिरैविऩ्मीऩ्
साट्ररवि मैयिऩ्मेल् कविसेयुळ्ळे
उळ्ळदऩ्पिऩ् रवियेर् मालुम्याऴिल्
उयर्मऩ्ऩऩ् वयलदुविल् करिरावेङ्गै
कळ्ळमिला मदिमङ्गै सिगिहलसम्

ह्या श्लोकातील पहिल्या दोन ओळींचा अर्थ: ह्या व्यक्तीचा जन्म सिद्धार्थी (तमिळ उचार ’सित्तार्त्ति’) संवत्सरात रवी वृषभाच्या (माडदुविल्) महिन्यात असतांना तमिळ पंचांगाप्रमाणे २२ व्या तिथीवर मंगळवारी झाला. एवढ्याश्या माहितीवरून नाडिवाचकास आपला जन्मदिनांक प्रचलित पद्धतीप्रमाणे आंग्लभाषेमध्ये सांगण्यासाठी गणित घालणे आवश्यक असते. ह्यासाठी भारतीय कालमापनपद्धतीचा सखोल अभ्यास असणे अत्यावश्यक होय. नाडिग्रंथांतील श्लोकांमधून व्यक्तीच्या जन्माशी निगडीत दिनांकाची मांडणी ही नेहमी संवत्सर / मास / दिन अशा क्रमपद्धतीने समोर येते. ग्रंथांतील संवत्सराचे नांव हे तमिळभाषक लोकांच्या ६० वर्षांच्या तमिळ दिनदर्शिकेप्रमाणे नोंदविलेले आढळते. अभ्यासकांच्या मते अत्यंत अचूक अशी ही दिनदर्शिका असून तीत संवत्सरांची नांवे आणि त्यांचा क्रम हा ठरलेला असतो. अशा ह्या तमिळ दिनदर्शिकेप्रमाणे सित्तार्त्ति म्हणजे एप्रिल १९७९ ते मार्च १९८० होय. एवढ्या ह्या माहितीवरून व्यक्तीच्या जन्मवर्षाची साधारण कल्पना आपणास येते. येथून पुढे सूर्य कोण्या महिन्यात कोण्या राशीत प्रवेश करतो हीही माहिती ठेवणे आपणास आवश्यक ठरेल. साधारणत: १५ मे च्या सुमरास सूर्य वृषभराशीमध्ये प्रवेश करतो असे धरून, १५ मे पासून पुढे २२ दिवस मोजणे आतां आपणास आवश्यक आहे. हे मोजून येतो तो दिनांक म्हणजे ६ जून होय. थोडक्यात, ६ जून १९७९ हा दिनांक आपणास मिळाला.
खरेतर, तमिळ दिनदर्शिकेनुसार वरील श्लोकांत उल्लेखलेले सिद्धार्थी वर्ष हे १९७९-१९८० पूर्वी १९१९-१९२० मध्येही येवून गेलेले आहे, आणि ह्यानंतरही ते २०३९-२०४० मध्ये येणार आहे. अशावेळी, जातकाचा जन्म १९७९-१९८० मध्येच झाला हे नाडिवाचक कसेकाय सांगेल? अर्थात, समोर बसलेल्या जातकाकडे बघून तो वयाने तिशीतील आहे हे नाडिवाचकास नक्कीच कळू शकेल; तरीही, नाडिग्रंथांतून वाचून नाडिवाचक जे काही सांगतो आहे, त्याची खात्री जातकाने कशी पटवून घ्यावी? ही खात्री पटण्यासाठी नाडिग्रंथलेखकाने पडताळणीची सोय करून ठेवलेली असल्याचे आपणास क्रमश: येणा-या श्लोकांमधून कळते. पुढील श्लोकांमध्ये सिद्धार्थी नामक त्या विवक्षित संवत्सरामध्ये सूर्य वैशाख महिन्यात प्रवेशून २२ वी तिथी असतांना मंगळवारी अवकाशामध्ये जी काही ग्रहस्थिती होणार असेल, तिची नोंद नाडिग्रंथलेखकाने आपणासाठी आगावूमध्येच करून ठेवल्याचे सांगितले जाते. वरील श्लोकांत ही नोंद पुढीलप्रमाणे आलेली आहे: नक्षत्र चित्रेत, मेष लग्नामध्ये शुक्र आणि मंगळ (मैयिन्मेल् कवि सॆय्); त्याच्यापुढे रवि (अदऩ्पिऩ् रवि); मिथुनेत बुध (मालुम्याऴिल्); कर्केत गुरु (उयर्मऩ्ऩऩ् वयलदुविल्); सिंहेत राहू आणि शनि (करिरावेङ्गै) कन्येत चंद्र (मदिमङ्गै); कुंभेत केतु (सिगिहलसम्). ही ग्रहस्थिती ६ जून १९१९ मध्येही येणार नाही, अन् ६ जून २०३९ मध्येही येणार नाही. १९७९ मध्ये जून महिन्यातील ६ व्या दिवशी असलेली ही ग्रहस्थिती ही खरेतर त्या दिनी जन्मलेल्या जातकाच्या आयुष्याला ’साक्ष’ देणारी ग्रहस्थिती आहे असे वर्णन नाडिग्रंथांतून येते, तर हीच तुमची पत्रिका होय असे प्रचलित भाषेमध्ये त्या जातकास सांगितले जाते. साध्या भाषेत सांगावयाचे झाल्यास, "तुमचा जन्म ६ जून १९७९ चा आहे" एवढेच जातकास सांगितले जाते. असो. आतां येथून पुढे वाचकांच्या अभ्यासार्थ संक्षेपामध्ये दोन श्लोक देतो आहे. उपरोक्त श्लोकाच्या विवेचनामध्ये दिलेल्या माहितीवरून वाचक स्वत: प्रयत्न करून पुढील श्लोकांची पडताळणी करू शकतील, आणि तशी त्यांनी स्वत: श्लोकांची पडताळणी करून पहावी ही अपेक्षा आहे.

दोन जुळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी एकेकट्याने जावून नाडिग्रंथावलोकन केले होते. त्यांच्या पट्टींमध्ये त्यांच्या जुळेपणाबद्दल उल्लेख येतांना काय प्रकारची शब्दयोजना केली जाते, हे बघूया. त्यापैकी लहान असलेल्या भावंडाच्या वहीमध्ये खालीलप्रमाणे श्लोक येतो:


तमिळ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत


சித்தார்த்தியிலே கடைதிங்கள் தசமோடொன்று
அறியமதி நாள்தானே ஆதிரைமீனும்
வாதிரைமீனும் மதியாழில் சிகிமால்கலசம்
கலசம்மேல் ரவிமீனில் சுங்கன்வருடை
கூறாத மற்றகோட்கள் வேங்கையில்காணும்
सित्तार्त्तियिले कडैतिङ्गळ् तसमोडॊऩ्ऱु
अऱियमदि नाळ्दाऩे आदिरैमीऩुम्
वादिरैमीनुम् मदियाळिल् सिहिमालकलसम्
कलसम्मेल् रविमीनिल् सुङ्गऩ्वरुडै
कूर्राद मऱ्ऱहोट्कळ् वेङ्गैयिल्काणुम्


या व्यक्तीचा जन्म - सिद्धार्थी नामक संवत्सरात (१९७९-८० मध्ये) शेवटच्या (कडै) म्हणजे फाल्गुन महिन्यात, तमिळ पंचांगाप्रमाणे (तसमोडॊऩ्ऱु) ११ व्या तिथिवर सोमवारी (अऱियमदिनाळ्) झाला. पुढे ग्रहस्थिती देतांना आर्द्रा नक्षत्र (वादिरैमीनुम्), चंद्र मिथुनेत, (मदियाळिल्) केतु आणि बुध कुंभेत (सिहिमालकलसम्), कुंभेच्या पुढे मीनेत रवी (कलसम्मेल् रविमीनिल्), शुक्र मेषेत (सुङ्गऩ्वरुडै), न सांगितलेले इतर सारे ग्रह सिंहेत (कूर्राद मऱ्ऱहोट्कळ् वेङ्गैयिल्काणुम्) - म्हणजे राहु, शनि, गुरु, मंगळ अशाप्रकारची शब्दयोजना आहे. साध्या भाषेत, या व्यक्तीचा जन्म २४ मार्च १९८० चा आहे असा अर्थ निघतो. ह्या व्यक्तीने एकट्याने जावून मुंबईमध्ये जुलै २०१० मध्ये नाडिग्रंथावलोकन केले होते. त्याहीपूर्वी तिच्या जुळ्या भावंडाने एकट्याने दिल्लीमध्ये मार्च २०१० मध्ये नाडिग्रंथावलोकन केले, त्यातील जन्मविषयक माहिती देणारा श्लोक खालीलप्रमाणे:


तमिळ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत


யிவளுதிக்க சித்தார்த்தி பங்குனித்திங்கள்
வரும்திகதி யிலாபமதே சோமன்வாரம்
வாதிரைமீனில் மதிதண்டில் சிகிமால்கூனில்
கூனின்மேல் யிரவிமச்சம் சுங்கன்வருடை
கூடியிருக்க மற்றகோள் வேங்கைதன்னில்
यिवळुदिक्क सित्तार्त्ति पङ्गुऩित्तिङ्गळ्
वरुम्तिगदि यिलाबमदे सोमऩ्वारम्
वादिरैमीऩिल् मदिदण्डिल् सिहिमाल्गूऩिल्
कूऩिऩ्मेल् यिरविमच्चम् सुङ्गऩ्वरुडै
कूडियिरुक्क मऱ्ऱकोळ् वेङ्गैतऩ्ऩिल्

ह्याही व्यक्तीचा जन्म, २४ मार्च १९८० लाच झाला. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, ह्या दोन्हीही व्यक्ती भिन्न असल्या तरी (जुळ्या असल्यामुळे) त्यांच्या श्लोकांतून मांडलेली ग्रहस्थिती एकच होय. सर्वसाधारणत: महाराष्ट्रीय अथवा दाक्षिणात्य पद्धतीने ह्या व्यक्तींची कुंडली मांडली असतां ग्रहस्थिती एकच असल्याने दृक् रूप कुंडली एकसारखीच दिसावी. (चूकभूल देणेघेणे - मी ज्योतिषाभ्यासक नाही!) तर दोन वेगवेगळ्या ह्या पट्टीतील व्यक्तींच्या बाबतीत येणा-या एकाच ग्रहस्थितीबद्दल शब्दयोजना ही भिन्न भिन्न पद्धतीने समोर येते. जन्ममहिन्याच्या बाबतीत एके ठिकाणी ’फाल्गुन’ (पङ्गुनि) असा उल्लेख असून दुसरे ठिकाणी शेवटचा महिना (कडैत्तिङ्गळ्) अशा शब्दरचनेने तोच महिना दर्शवला आहे. त्याचप्रमाणे जन्मतिथीही दोन वेगळ्या शब्दांनी (यिलाबम् तथा तसमोडॊऩ्ऱु; दोन्हीचा अर्थ ११) दर्शविली आहे. पुढे जन्मवारही दोन वेगळ्या शब्दांनी (अऱियमदिनाळ् तथा सोमन्वारम्) दर्शविला गेला आहे.

श्लोकांमध्ये ग्रहस्थिती देतांना आर्द्रा नक्षत्रासाठी दोन्हीही ठिकाणी एकच शब्द उपयोजिला आहे (आदिरैमीऩ). चंद्र मिथुन राशीत असल्याची स्थिती दोन्हीकडे वेगवेगळ्या शब्दांनी दर्शविली आहे (मदिदण्डिल् आणि मदियाळिल्). केतु आणि बुध कुंभ राशीत असे सांगतांना एके ठिकाणी ’सिहिमाल्गूऩिल्’ अशी शब्दयोजना आहे, तर दुसरे ठिकाणी ’सिहिमालकलसम्’ असे म्हटल्या गेले आहे. रवी मीन राशीत म्हणण्यासाठी दोन्हीकडे ’यिरविमच्चम्’ आणि ’रविमीनिल्’ अशी वेगवेगळी शब्दयोजना आहे तर शुक्र मेष राशीत असे सांगण्यासाठी मात्र दोन्हीकडे ’सुङ्गऩ्वरुडै’ असे म्हटले आहे. दोन्ही श्लोकांतील साम्यवैशिष्ट्य ते असे की दोन्ही श्लोकांमध्ये राहु, शनि, गुरु, मंगळ ह्या ग्रहांचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. दोन्हीही व्यक्तींच्या वहीमध्ये हा जातक जुळ्या भावंडांपैकी एक आहे असा उल्लेख नंतरच्या वर्णनातून केला जातो. त्यातही मोठे कोण, लहान कोण इत्यादि उल्लेख बारकाईने नोंदलेला आढळतो. जिच्या वहीमध्ये ’ही धाकटी आहे’ असा उल्लेख आहे, त्या व्यक्तीने स्वत:च्या मातोश्रींस विचारून घेवून खात्री करून घेतल्यानंतर आधीच्या व्यक्तीच्या जन्मानंतर ११ मिनिटांनी आपला जन्म झाला असल्याचे लक्षात आल्याचे कळवले आहे. असो.

माझ्या माहितीतील, राजकीय वर्तुळातील भारदस्त अशा एका व्यक्तिमत्त्वाच्या वहीमध्ये खालील श्लोक येतो


तमिळ लिपीमध्ये देवनागरीमध्ये लिप्यंतरीत
இவளாண்டு ஹேவிளம்பி பங்குனியதில்
இருபானார் திகதியுடன் சேயின்வாரம்
ஆவிசாபம் கரிவருமே சேய்மகரம்
மகரமீரதில் சுங்கனும் ரவிசேவில்
மால்ஞானி மேடம் அரவேந்தன்துளை
ஆகபின் சந்திரனும் தேளதுவில்
इवळाण्डु हेविळम्बि पङ्गुऩियदिल्
इरुबाऩार् तिगदियुडऩ् चेयिऩ्वारम्
आविसाबम् करिवरुमे सेयमहरम्
मगरमीरदिल् सुङ्गऩुम् रविसेविल्
माल्ञाऩि मेडम् अरवेन्दऩ्दुळै
आहपिऩ् सन्दिरऩुम् तेळदुविल्

हेविळम्बि संवत्सर, फाल्गुनमास, २६वी तिथी, मंगळवार, धनुलग्नी शनि, मंगळ मकरेत, शुक्र कुंभेत, रवी मीनेत, बुध+केतु मेषेत, राहू+गुरु तुळेत, चंद्र वृश्चिकेत. साध्या भाषेत ०८ एप्रिल १९५८.

नाडिग्रंथसाहित्यातून खरोखरीच व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद येते काय असे विचारणा-या अभ्यासकांसाठी वरील विवेचनाची झलक प्रेरणादायी ठरावे असे वाटते. गेल्या वर्षभरात सुमार शेकड्याने वह्या आणि ग्रंथपट्ट्या माझ्या नजरेखालून गेल्या असाव्यात, जागाभयास्तव त्या सा-यांतील केवळ ४च श्लोक येथे प्रातिनिधीक म्हणून दिले आहेत. अर्थात, केवळ ४ श्लोकांमध्ये संपणारा हा विषय खचितच नव्हे. खरेतर ह्यामध्ये अजूनही केवढेतरी लिहावयाचे उर्वरित आहे. मूळ मुद्दा मांडावयाचा तो असा, की नाडिग्रंथांमधून जन्मरास आणि लग्नरास "लिहिलेली असते" अथवा "लिहिलेली नसते" असा कोणत्याही प्रकारचा दावा ठोकण्याआधी स्वत:च्या अनुभवावर आधारीत दाव्याची भाषाशास्त्रीयदृष्ट्या खात्री करून घ्यावी. बाजारांत मिळणारी तमिळभाषाशास्त्रविषयक शब्दकोश तथा पुस्तके ह्यासाठी नक्कीच उपयोगांत आणतां येतील.

जातां जातां, फलज्योतिषाभ्यासकांसाठी मजजवळ एक प्रश्न आहे. पारंपारिक पद्धतीने कुंडली मांडतांना जन्मवेळेसह जन्मठिकाणाची आवश्यकता असते असे फलज्योतिषाभ्यासक लिहून ठेवतांत. नाडिग्रंथांवरील माझ्या आतांपर्यंतच्या अभ्यासामध्ये कोणाच्याही नाडिग्रंथपट्टीमध्ये जन्मवेळ आणि जन्मठिकाण नोंदविलेले आढळलेले नाही. असे असूनदेखील ’जन्मविषयक इतर माहिती अत्यंत अचूकरीत्या नोंदविली जाते’ असा दावा नाडिग्रंथप्रेमी आणि नाडिवाचकांकडून केला जातो. हे कसेकाय शक्य होते ह्या विषयावर ज्योतिषशास्त्राभ्यासकांनी विचार करावा, चिकित्सकांनी चिकित्सा करावी. असो.

एकुणात काय, तर पूर्वी म्हटल्याप्रमाणे ह्या विषयातील चमत्कृती आणि दाव्यांस बाजूस ठेवून तीमागील मीमांसा सर्वांगाने अभ्यासिली जाण्यास हवी; जेणेकरून वास्तवाचा अभ्यास होवून सत्यता काय आहे हे आपोआप स्पष्ट होईल. ह्याने अनेक अनुत्तरीत गूढ अशा प्रश्नांची उकलही होईल आणि दाव्यांबाबतच्या सत्यासत्यतेविषयी ठाम निष्कर्षासही येतां येईल.

------

लेखक: हैयो हैयैयो, मुंबई उच्च न्यायालय येथे अभ्यसनक अधिवक्ता म्हणून कार्यरत. न्यायशास्त्राभ्यासक. समाजशास्त्राभ्यासाची आवड. विविध भाषांचे भाषाशास्त्र तथा लिपीशास्त्रावर २० वर्षांहून अधिक काळ अभ्यास. स्वतःच्या आवडीच्या विषयांवर मराठी, तमिळ, इंग्रजी इत्यादि भाषांमधून लेखन. भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांमधील एक 'समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार करणे' ह्याही तत्त्वाचा खंदा समर्थक.

संपर्क: haiyohaiyaiyo@gmail.com

-

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

पुम्बुहारचे भीषण समुद्रस्नान (पुनर्संपादित लेख)

  


पुम्बुहारचे भीषण समुद्रस्नान



"मी तटस्थ रहायचा प्रयत्न करत असतानाच पुढची लाट आली. गंभीर गर्जनेसह ... धडाऽऽल्ल करत शिळांवर आपटली. माझे हात मनोमन जुळले. मी महर्षींचे स्मरण करून म्हटले, “हे महर्षी, माहित नाही आपण माझी परीक्षा कां घेत आहात ते...पण मी माझ्याकडून आपल्या कथनाप्रमाणे पोचलो आहे. जगायचे का मरायचे ते आता माझ्या शारीरिक कुवतीच्या पुढे गेले आहे. आपली कृपा असावी....”



नाडीग्रंथ हिन्दी में कथनांतील एक महत्त्वाचा भाग असतो, विविध क्षेत्रातील स्थळांना भेटी देऊन तेथे अर्चना, अन्नदान, वस्त्रदान आदि कृत्ये श्रद्धापूर्वक करणे. मंदिरांच्या त्या स्थळांना शोधून वेळेवर पोहोचणे महत्त्वाचे. दक्षिणेत साधारण दुपारी १२ ते ४ मंदिरांचे दरवाजे बंद होतात. मग खोळंबा होऊन पुढील कार्यक्रमावर प्रभाव पडतो. म्हणून आखणी करताना वेळा लक्षात घेऊनच प्रवास ठरवावा लागतो. मात्र कितीही ठरवले तरी ऐनवेळी काहीतरी कारणांनी वेळा पुढे पुढे ढकलल्या जातातच. माझेही असेच काहीसे झाले.


स्वामीमलाई, सूर्यनार कोईल करत करत तिरुनल्लारला रात्री साडेआठला पोहोचलो. तोवर मंदिरात शुकशुकाट झाला होता. त्यात शनिदेवाचे उपमंदिर शोधण्यात वेळ गेला. तेथे दीप लावून व मुख्य मंदिरातील शिवाच्या स्थळी अर्चना करून परत फिरलो. मंदिराच्या बाहेर टॅक्सीवाल्याच्या शोधात अर्धा तास गेला. उशीर झाल्याने रागावलेला ड्रायव्हर आमच्यावर मोठ्या आवाजात डाफरत होता. आमच्या उशीराला कारण होते ते असे की आम्ही मंदिरात मधे पोचलो ते गोपुर - महाद्वार - एका दिशेचे होते. परतताना ज्या गोपुरातून आम्ही बाहेर पडलो ते वेगळ्याच दिशेला तोंड करून होते. त्यामुळे चुकामुक झाली. बरं त्याच्याकडचा मोबाईल काम करत नव्हता. असो.


त्या ठिकाणाहून आम्हाला पुम्बुहार या समुद्र किनार्‍यावरच्या गावात जायचे होते. ‘कावेरी नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या गावात समुद्रस्नान करावे’ असा एका नाडी महर्षींचा आदेश होता. ३५-४० किमीचा प्रवास असावा. सोबत हैयो हैयैयो चिडलेल्या ड्रायव्हरशी तमिळमधे बोलून त्याला झालेला घोटाळा सांगून शांत करत होते. मग अन्य विषयावर गप्पात कसा वेळ गेला कळले नाही. रात्रीचे नक्की किती झाले होते माहित नाही पण ११:३० तरी झाले असावेत. आमची टॅक्सी समुद्रकिनार्‍या पासून साधारण ३०० मीटर लांब उभी करून तो ड्रायव्हर सिगारेट शिलगावत म्हणाला, ‘इथेच थांबवतो. पुढे बॅरिकेड्स आहेत. इथून चालत चालत समुद्राजवळ जाता येईल.’


पौर्णिमेच्या गोलाकार चंद्राच्या प्रकाशात, मी पायातील चपला टॅक्सीतच काढून अनवाणी रेतीतून किनार्‍याकडे झराझरा निघालो. समुद्राच्या गाजेचा गंभीर आवाज येत होता पण अंधार्‍यावाटेत लाटा काही दिसत नव्हत्या. हैयो हैयैयो रेंगाळत रेंगाळत माझ्या मागून येत होते. अगदी जवळ आलो तेंव्हा कळाले की बहुधा सुनामीच्या कहरानंतर या किनार्‍यांना सुरक्षेसाठी मोठमोठ्या शिळा आणून बंधारा केला गेला आहे. त्यामुळे मला समुद्रात शिरायचे तर त्या शिळा पार करायच्या होत्या. काही शिळांवर पावले ठेवताच त्या किती अणकुचीदार आहेत याची त्वरित कल्पना आली. त्या डगडगत्या व काळ्याकभिन्न पत्थरांवर चढून, अनवाणी पावलांनी, साधारण २०-२५ फूट पाण्यात खाली उतरून जाणे रात्रीच्या वेळी फार धोक्याचे आहे, हे धडधडीत दिसत होते. मला पाण्यात शिरुन स्नान करण्याशिवाय पर्याय नव्हता. मी फक्त टॉवेलची तयारी करून आलो होतो. एकदा कपडे भिजले की अंगावरच वाळवायचे असा बेत होता.


तिकडे एक एक लाट त्या बांधाच्या पत्थरांवर जोरात धडकत होती प्रत्येक वेळी शुभ्र फेसाची चादर पसरून लुप्त होत होती. लाट धडकताना होणारा प्रचंड धडाकेबाज आवाज समुद्राच्या रौद्र स्वरूपाची भीषणता दाखवत होता. खूप दूर एक दोन लुकलुकणारे दिवे होते. काही वेळ मी नुसताच त्या वातावरणाशी जुळवून घेण्यात घालवला. काही वेळानी कोणीतरी लोक बोलतायत असे वाटले. तोवर हैयो हैयैयोंनी लांबून तंजावूरी मराठीत ओरडून सांगितले, ‘साहेब, तिकडे लांबवर काही कोळी लोक आपापसात बोलतायत. त्यांना मी विचारून आलो तर ते म्हणतात, आणखी काही अंतरावर एके ठिकाणी या बांधाला पार करता येईल अशी एक जागा आहे. तेथून समुद्रात उतरता येईल पण आत्ता भरतीची वेळ आहे. तेव्हा धोका आहे. जपून उतरावे.’ मी हिय्या करून काही शिळांवर पाय ठेवत वरून खाली पाण्यात उतरताना काय घडेल याचा अंदाज घेतला. उतरताना तोल जाणार व धडपडायला होणार. एकदा कोसळलो तर कपाळमोक्ष झाला नाही तरच नवल असे वाटून मी काय करावे असा विचारात वेळ घालवला.


मग वाटले त्या कोळ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती जागा शोधावी. त्या प्रमाणे मी बांधाच्या काठाने जाताजाता एक तारेचे कुंपण लागले ते ओलांडून मी एका पाणथळाशी आलो. तेथून पुढची वाट दिसली त्यातून सरकत सरकत मी बांधाशी समांतर एके ठिकाणी आलो. प्रत्येक पावला गणिक तळपायांना असह्य वेदना होत होत्या. छाती धडधडत होती. हातांना बारीक कंप सुटला होता. मी काय करतोय ते मलाच नक्की माहीत नव्हते. करता करता मला लाटा दिसायला लागल्या. अंदाज घेण्यासाठी काही शिळा उतरलो. डगडगत्या मनाने पावले पडत होती. एके ठिकाणी जरा पावले टाकता येतील इतपत आधार मिळाला. धीराने पुढे जाताजाता मी समुद्रातील लाटांच्यापाशी पोचलो. पँट गुडघ्यापर्यंत वर करून लाटांतील पाणी हातात घेतले. तोवर एक लाट आली गुडघ्यावर पाणी आले. फेसाळ पाण्याची परततानाची जोराची ओढ तोल घालवणारी होती. तरी मी पुढची लाट येताना पहात होतो. तिसरी लाट त्याच्यापेक्षा जोरात व आवाजात आपटली. शरीर आपल्या आपणच स्नान करु लागले. मी तटस्थ रहायचा प्रयत्न करत असतानाच पुढची लाट आली. गंभीर गर्जनेसह ... धडाऽऽल्ल करत शिळांवर आपटली. माझे हात मनोमन जुळले. मी महर्षींचे स्मरण करून म्हटले, “हे महर्षी, माहित नाही आपण माझी परीक्षा कां घेत आहात ते...पण मी माझ्याकडून आपल्या कथनाप्रमाणे पोचलो आहे. जगायचे का मरायचे ते आता माझ्या शारीरिक कुवतीच्या पुढे गेले आहे. आपली कृपा असावी....”


सुन्न करणारा एकांतवास... तुफानी लाटांच्या रौद्र गर्जना... सागराच्या भीषणतेतील ते सौंदर्य.... वर आकाशात पूर्णचंद्र... क्षणभर त्या लाटा विविध प्रकारच्या लोकांचे अनुभव घेऊन मला धडकणार्‍या व्यक्ती वाटल्या. कुठूनसा अंतर्मनातून आवाज आला.. "वृत्ती कणखर व सत्यशील असेल तरच तू आज तरशील". अन्यथा काय होईल ते दाखवायला बहुधा मला इथे आणले होते की काय असे क्षणभर वाटले....


 ... प्रिय व्यक्तीसाठी तुला समुद्रात तर्पण करायला यावे लागेल असा पुर्वसंदेश द्यायला जणू मला बोलावले गेले होते कि काय?...


पुढे काय घडले ते हैयो हैयैयोंच्या 'तंजावूरी मराठी' शब्दांत....

 

तिरुनळ्ळार्रु च्या शनिमंदिरातून बाहेर येताना निष्कारण विलंब झाल्याकारणे कृद्ध झालेल्या वाहनचालकासह वार्ता करित त्यास शांत करण्याचे यत्न एकीकडे करित होतो, तर दुसरीकडे वाहनचालक तमिळमध्ये सांगतो त्याप्रमाणे ‘ही समुद्रस्नानाची वेळ खरोखरीच नव्हे’ असे श्री. ओक साहेबांस मराठीमध्ये पटवून देण्याचा प्रयास करित होतो. पूम्बुगाराहून चेन्नैस परतण्यास बहुधा सकाळ होणार ह्या विचाराने वाहनचालक भयंकर अस्वस्थ होता, त्यातच दोन दिशांच्या दोन विचारांमध्ये ताळमेळ घडविता माझ्या मेंदूचे मात्र संधिखाद्य होत होते. त्यातच पूम्बुगारास पोहोचणेस रात्रीचे सुमारे ११:३० वाजले. त्या अवेळी सारे गांव निद्रिस्त होते, नांवास चिटपाखरूही दिसत नव्हते. एक प्रकारची भीषण शांती आसमंतात पसरलेली पाहून खरेतर इतर कोणीही भिवून माघारी फिरले असते. परंतु...

 

...दुरून दृष्टीपथास समुद्रकिनारा येईल अशा बेताने एका ठिकाणी वाहन उभे करून “येथून पुढे पायी-पायी जावे, बॅरिकेड्स आहेत, वाहन पुढे नेता येणार नाही” असे उद्दामपणे सांगता सांगता, चालकाने रजिनिकांत पद्धतीने सिगारेट शिलगावून हवेत नाराजीच्या धुराची वलये भिरकाविली. “कोण कुठून कुठून लोक येतात, कसल्या डोंबलाच्या पूजा घालतात, आणि त्यांच्यापायी आमचा मात्र वेळ जातो..” असा जो रोषाचा सूर त्याने लावला होता, त्यास शांतविण्यासाठी काय सांगावे असा विचार मी करित असतानाच, श्री. ओक साहेब समुद्राच्या दिशेने दण्णदण्ण चालत निघालेले मला दिसले आणि त्या दिशेने मीही चालत निघालो. श्री. ओक साहेबांचा उत्साह पाहून मीही वेगे वेगे चालण्यास प्रेरित होत होतो, परंतु दिवसभराचा थकवा वागविताना माझ्याकडून बेताच्याच वेगाने चालणे होत होते.


चालता चालता समुद्राच्या पायवाटेवर तमिळ भाषेमध्ये सावधानतेच्या सूचनांचे फलक जागोजागी लावलेले दिसले, ते पाहून त्यासंबंधी श्री. ओक साहेबांस कल्पना द्यावी म्हणून पुढे निघतो, तर एका बाजूस दोघेजण संवाद करितांना दिसले. त्यांच्या भाषेवरुन आणि समुद्राच्या स्वभावाची मजपेक्षा त्यांस असलेली ओळख पाहून ते दोघे मत्स्योपजीवी असावेत असे वाटले. त्यांस मी एकूण परिस्थिती निवेदिली आणि किनार्‍यावरील अवजड शिलाखंड पाहता त्यांस टाळून समुद्रस्नानाकरिता सुरक्षित जागा कोणती असावी असे विचारले. “काही अंतरावर एके ठिकाणी शिलाखंडबंधास पार करता येईल असे एक ठिकाण आहे. तेथून जानोपरि जलाशयात अवश्य उतरता येईल, परंतु सध्या भरतीची वेळ असल्याकारणे तसे करण्यात धोका असून जरा जपूनच कार्य उरकावे.” असे कथन त्या मत्स्योपजीवींपैकी एकाने केले.


श्री. ओक साहेब दूरवर एका शिलाखंडावरून पाहणी करित अंदाज घेताना दिसले. तेथवर जावून त्यांस सांगेपर्यंत बहुधा भरतीची वेळ जवळ येईल असे वाटून मी लांबुनच त्यांसाठी शब्द घोषणा करून, मत्स्योपजीवींनी पुरविलेली माहिती त्यांस सांगितली. त्याप्रमाणे दिशा बदलून ते पलिकडल्या बाजूस चालू लागले; चालता चालता वाळूच्या डोंगरापलिकडे दिसेनासेही झाले. मी आहे त्याच ठिकाणी उभा राहून विचार करू लागलो, आणि स्वत:च्या मनाशीच दिवसभराचा लेखाजोखा मांडता मांडता घरी पोहोचावयाची घाई झालेल्या कृद्ध वाहनचालकाची आठवण झाली. घड्याळाकडे पाहिले, आणि माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला! विचारमग्नावस्थेमध्ये रात्रीचे १२:३० वाजून गेल्याचेही कळू नये? मी स्वत:वर वैतागलो.

 

इकडे तिकडे पाहता कोणीही दिसेना. अधून मधून कानावर आदळणार्‍या समुद्रलहरींच्या गूढ घनगंभीर गाजांच्या आवाजामध्ये तेथील भीषण शांतता अधिकच भयावह वाटू लागली. पौर्णिमेचा चंद्र सोडला तर त्या अंधारात प्रकाशाचे दुसरे साधन असे काही नव्हते. त्यामुळे त्या वातावरणाची गूढता आणि भीषणता वाढून भीतिने कापरेंच भरू लागले. श्री. ओक साहेब कोठेही दिसेनासे झाल्यामुळे मी त्यांच्या नावाने मोठमोठ्याने साद घालू लागलो. थोड्या वेळापूर्वी ज्या वाळूच्या डोंगरापलिकडे ते निघाले होते, त्या दिशेने अंदाज घेत मीही हळूहळू निघालो. त्यांच्या नांवाने हाकारणें चालूच होते. बहुधा माझ्या हाकांचा आवाज दूरवर वाहनचालकापर्यंत गेला असावा. त्याने तातडीने बॅरिकेड्सची हालवाहालवी करून वाहन घेवून मी थोड्या वेळापूर्वी ज्या ठिकाणी उभा होतो तेथवर घेवून आला. तेथे वाहन लावून पळत माझ्याकडे येत मोठमोठ्याने आरडाओरडा करित मला विचारू लागला, "काय झाले वकीलसाहेब? कां ओरडतांय? तुमच्या सोबतचे साहेब कोठे आहेत?" आधीच तो भडकलेला, त्यातून ही बिकट परिस्थिती त्यास काही सहन होईना...


पुढे काय घडले ते टॅक्सी ड्रायव्हरच्या शब्दांत....


मुंबईचा वकील त्या आर्मीवाल्यांच्या नावानं जोरजोरानं ओरडत होता, त्याचा आवाज ऐकू आला. वकील एकटाच होता. आर्मीवालं कुठं दिसंनात. काय झालं कळंना. मीही घाबारलो. हातातली सिगारेट पायानं चेचली अन् बॅरीकेड्स हालवून तिकडं गाडी पळवत गेलो. वाळूत गाडी पुढं सरकंना.. मग एका ठिकाणी लावली अन् पुढे पळत गेलो. वकील रडकुंडीला आलेला दिसला. आर्मीवाले आंघोळीला समुद्रात उतरलेत म्हणं. कुठं दिसंनात म्हणं. ऐकून माझं टकुरं सटकलं.. मी वकीलावर ओराडलोच... “अरे बिनडोका... तुम्ही लोक एवढे शिकले सवरलेले.. कसल्या डोंबलाच्या आंघोळी करताय समुद्रात?.. मी तुला आधीच बोललो होतो नां.. समुद्रात उतरू नका म्हणून.. नुसतं समुद्राचं पाणी हातानं डोक्यावर घ्या म्हणून? अन् तू त्या आर्मीवाल्याला एकट्याने का जाऊ दिलेस? ते कुणीकडं गेलेत हेही तुला ठाऊक नाही? असे कसे मित्र तुम्ही? मगाशी मंदिरात हारवलात, आता इथं हारवताय... काय म्हणावं तुम्हाला? रात्रीचे बारा वाजून गेलेत, मूर्खा... काही उलटंसुलटं झालं... आर्मीवाला बुडाला, तर पोलिस केस होईल..!!" म्हणता म्हणता माझे अवसान गळाले आणि मला रडूच फुटले.


“गप्प बस् जरा! रडतोस काय असा बावळटासारखा?..” वकील मोठ्याने ओरडला. मीही ओरडलो... “तुझं काय जातंय... तू तर स्वत:च वकील. तू मलाच गुंतवणार. मीच तुमच्यासोबत इथं रात्री येण्याचा मूर्खपणा केला. अरेऽऽ देवाऽऽ...” मी रडवेला झालो होतो. अचानक दुरून अनेक लोकांच्या आवाजाचा एकच गिलका ऐकू आला अन् आम्ही दोघे एकदम गप्प झालो. त्या दिशेने पाहू लागलो. काही लोक समुद्रकिनार्‍याजवळ होड्या बांधून ठेवतात त्या जागेजवळ एकत्र जमून एका शिडीवर काहीतरी ओझे उचलताना दिसले आणि छातीमध्ये एकदम धाकधूक झाले. “काय हो, वकीलसाहेब... आर्मीवाल्यांनाच बाहेर काढताहेत की काय?” मी वकिलाला म्हणू लागलो, पण पाहिले तर वकील बाजूला नव्हताच. तो केंव्हाच त्या दिशेनं झपाझप चालू लागला होता. मीही त्याच्या मागं धावलो. तितक्या थंडीतही जोरदार घाम फुटला होता. अंग सगळे थरथरत होते. डोके गरगरू लागले होते. पाय कापत होते.. तरीही जोरात जोर आणून पळालो.


तिथं पोहोचून पाहतो तर तिथं आर्मीवाले नव्हतेच..! नावाडी लोक होते. ते आम्हाला पाहून बिचकले. तरीही वकीलानं त्यांना विचारलं.. कोणी माणूस कुठं दिसला का जवळपास म्हणून.. नावाड्यांच्या पैकी एकजण म्हणाला.. “हां.. एक माणूस तिकडं स्मशानाच्या बाजूला गुडघाभर पाण्यात उतरलेला आम्ही पाहिला मघाशीच..” पुढं “कुठाय स्मशान” असं विचारून वकील त्या दिशेनं आर्मीवाल्याला बघत त्यांच्या नावानं हाका टाकत झपाझप निघाला. वकीलाकडं पाहून आतापर्यंत माझ्या धीरात थोडा धीर आलेला होताच.. एका बांधाच्या काठानं तारेचं कुंपण ओलांडून आम्ही एका पाणथळापाशी आलो. वकील ओरडत होताच. त्याच्या हाकेला आर्मीवाल्याचा कुठूनतरी जवाब आला.. ते दोघं एकमेकात ओरडत ओरडत काहीतरी बोलले. मला त्यांची भाषा कळली नाही, तरी आर्मीवाल्याचा आवाज ओळखू आला अन् एकदम सुटल्यासारखं वाटलं...


समारोप:


नाडीग्रंथ वाचन जितके थरारक तितकेच त्या लिखाणातून निर्माण झालेल्या घटना घडताना पडलेले कष्ट व लेखनही थरारक... त्या दिवशी... जरा गफलत घडली तर..


रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

सोनेरी वस्त्रातील अगस्त्य म्हणतात, आम्ही 'हिरण्यगर्भ'...!!



नाडी ग्रंथ प्रेमी मित्रांनो
नमस्कार,
अहमदनगर येथील एक विख्यात वैद्य कोरटीकरांनी आपल्या आलेल्या अनुभवांना शब्दात गुंफले आहे.
असे अदभूत अनुभव लिहून सादर करायला आत्मिक बल लागते... वैद्य कोरटीकरांनी ते साध्य केले आहे. महर्षींच्या कृपा दृष्टीने उपकृत होऊन ते आपल्याला विश्वासाने सहभागी करतात हे आम्हा नाडी ग्रंथ प्रेमींचे भाग्य आहे.


ते लिहितात...
प्रणाम
विलक्षण अनुभव आला तो शब्दबद्ध करत आहे!
ध्यानामधे असे जाणवले की मी ज्ञानगंजचे पहाडीवर चालत आहे!
बर्फाच्छादित वाट , एका बाजूला खोल दरी
दुसरे बाजूस डोंगर!
मी सोनेरी वस्त्रे घातली होती पायात खडावा !
मला थंडी वाजत नव्हती,मला भूक, तहान लागत नव्हती, मला चढतांना दम लागत नव्हता, घामही येत नव्हता, मलमूत्र संवेदनांची जाणिव नव्हती!
अतिशय आनंदाचे गारुड असलेले वातावरण!
सर्वसाधारणपणे आपण चालतांना एक फूटापर्यंत पावूल टाकतो, माझे पावूल दहा बारा फूट लांब पडत होते!
वरती एक गुहा होती ,तिथे महर्षी अगस्त्य माझी वाट पाहात होते!
आलास!
मी त्यांना दण्डवत घातला!
चल आत !
आत गुहेत मिट्ट काळोख ! चालतोय चालतोय, खूप वेळ चालल्यावर हळूहळू नजर स्थिरावली एक निळसर प्रकाश पाझरु लागला !
अन् गुहेतील दृश्य मला दिसू लागली !
असंख्य योगी तपाचरण करीत होते! महर्षी अगस्त्यांनी सांगितले की युगानुयुगे हे तपाचरण करत आहेत!
मी आपला सगळ्यांना दण्डवत घालत सुटलो! किती तास गेले त्यात कोण जाणे!
महर्षी अगस्त्यांनी एका आसनाकडे बोट दाखवत मला म्हणाले, 'येथे आसन लावा नी ध्यान करा' !
हे सर्व मुनीजन ज्या क्षणाची वाट पाहात आहेत तो आता आला आहे'!
मी लगेचच बसून घेतले अन् ध्यानाला सुरवात होते होते तोच त्या सहस्त्रसूर्याचा कल्लोळ आला
एक सोन्याचा तापलेला गोळा गर्रगर फिरत मध्यावर हवेत तरंगत होता!
महर्षींनी त्याला नमस्कार केला, सगळ्या ऋषींनी डोळे उघडले नी त्याला नमस्कार केला ! मी ही नमस्कार केला तर तो गोळा 'माझ्याशी' बोलू लागला !
"आम्ही *हिरण्यगर्भ*
बाळा तुला अजून काही वर्ष आहेत "!
असे म्हणाला नी सगळ गायब झाल!
मी डोळे उघडून बसलो, पडला की हे खरे की ते खरे?
🙏🙏🙏
...
नाडी ग्रंथ प्रेमींच्या प्रतिक्रिया
...
खुपच अप्रतिम अनुभव ,
अगस्ती महर्षी सहित सर्व ऋषींचे दर्शन आपणास झाले 🙏🙏🙏🌹
...
नमस्कार, असे अदभूत अनुभव लिहून सादर करायला आत्मिक बल लागते... वैद्य कोरटीकरांनी ते साध्य केले आहे. महर्षींच्या कृपा दृष्टीने उपकृत होऊन ते आपल्याला विश्वासाने सहभागी करतात हे आम्हा नाडी ग्रंथ प्रेमींचे भाग्य आहे.
...
सर हे खरे आहे पण बरेच नाडी प्रेमी अनुभव लिहीत नाहीत ह्या ग्रुप मध्ये खूप लोक मोठी आहेत महर्षी चा त्यांना खूप उपदेश झाले आहेत त्यांना माझे शतशः नमन त्यांच्या एका अनुभवाने नाडी प्रेमींना खूप फायदा होतो मला तर अगस्ती महर्षी आणि अत्री महर्षी यांनी सर्वाना अनुभव सांगा तसेच नाडी प्रसार करा लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करा तुम्हाला कायम आशीर्वाद व आम्ही पाठीशी आहोत असे जीवनाडी त सांगितले आहे तरी कृपया चांगले अनुभव पोस्ट करा नाडी प्रेमिनो जय अगस्ती जय अत्री🙏🙏🙏🙏🌹
... 

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

अवधानींचे अजब अनुभव - सागर भावसार भाग १-२

श्री भारवी अवधानी - हे पुण्यातीस पिंपरी चिंचवड भागातील नाडी ग्रंथ प्रेमी आहेत. त्यांचे सर्व कुटुंब नाडी ग्रंथांच्या कामी वाहून घेतलेले आहे. ते डोळस नाडी प्रेमी आहेत. महर्षींच्या कार्याची जगाला ओळख करून देण्याचा काळकळीचा प्रयत्न ते सतत करत असतात. त्यांच्याकडून खालील अनुभव वाचायला सादर करत आहे. 
स्व. भिडे काका- हे पौरोहित्य करणारे वृद्ध ब्राह्मण होते. निस्पृह, फटकळ आणि उतारवयातही फेसपुक, व्हॉट्स अॅप वरून ते लीलया संपर्क करत असत.  त्यांचे निघन झाल्यावर घटनांवर आधारित कथन आहे. 
श्री सागर भावसार - एक आयटीक्षेत्रातील उच्च पदस्थ नागरीत असून विवाहाच्या साठी महर्षींचे मार्गदर्शन मिळवून आपले भाग्य आजमावत. 
श्री  ईश्वरन -  पुण्यात दोन नाडी केंद्रांची स्थापना करून ते आदर्शपणे चालवायची कला त्यांना ज्ञात आहे. मराठी , हिंदीतून ते संभाषण करतात म्हणून ग्राहकांना ते अधिक जवळचे वाटतात. शिवाय ते स्वतः अत्रीजीव नाडीचे रसाळपणे कथन करतात म्हणून त्यांच्याकडे देश - विदेशातील चाहत्यांची गर्दी असते.

अवधानींचे अजब अनुभव - सागर भावसार भाग १

बरेच दिवस हा अनुभव लिहावा पण होत नव्हते आज लिहण्यास महर्षिंनी प्रवृत्त केले 
दोन महिन्यांपूर्वी मी व सागर ईश्वरनजींच्या केंद्रामध्ये जीवनाडी बघितली होती. सागरच्या स्वप्नांत स्वर्गवासी भिडेकाका आले होते. ते एका शिवमंदिरात होते सागरचे आणि त्यांचे बोलणे चालू होते व ते बोलणे ऐकून सागर अवाक झाला! कारण सागर व त्यांचा जास्त संबंध आला नव्हता! मग हे स्वप्नात का? असे वाटले म्हणून आम्ही जीवनाडी बघत होतो.  नाडीत आले की ते शिव मंदिर म्हणजे अरुणाचलेश्वर ( तिरुवन्नमलई)  ज्या दिवशी भिडेकाका स्वप्नांत आले तो दिवस म्हणजे त्यांना त्या दिवशी जाऊन 1 वर्ष झाले होते! अत्री महर्षी असे सांगत होते की आता भिडे काका हे सप्तनदी व सप्तसमुद्र पार करून स्वर्गच्या दरबारात आहेत, पण त्यांना अरुणाचलेश्वरचे दर्शन घायचे आहे.  त्या शिवाय ते आत जाऊ शकत नाहीत. हे दर्शन त्यांना सागरच्या डोळयातून घ्यायचे आहे. तसेच ते दर्शन घेतल्यावर स्वतः भिडेकाका तुम्हाला दर्शन देतील. ते  तुमच्याकडून फक्त फळे घेतील. पुढे महर्षी असे सांगतात की सागरच्या शेजारी जे ( अवधानी ).बसले आहेत,  त्यांनापण बरोबर घेऊन जाणे. कारण अवधानी हे भिडे काकांच्या खूप जवळचे व मुलापेक्षाही माया असलेले व त्यांना भिडे काकांची जास्त माहिती आहेत. तसेच ते त्यांचे गुरू आहेत तसेच आता जे (ईश्वरनजी )नाडी वाचन करत आहे  त्यांचा आणि भिडे काकांचा खूप जवळचा संबंध आहे.  त्यांना कायम भिडे काकाची काळजी व प्रेम असे. त्यांनी पण एका माणसाचा खर्च करावा व जमल्यास सहा जणांनी जावे असे सांगितले. हा अनुभव ईश्वरनजींच्या केंद्रात आला. तेंव्हा डोळे भरून आले. एक आत्मा कसा सगळ्यांची काळजी करतो. आपले ऋणानुबंध कायम ठेवतो. हे मात्र अजबच. ह्या बद्दल श्री ईश्वरनजींचे मनापासून आभार व लाख लाख धन्यवाद मानून त्यादिवशीचे वाचन संपले. 🌹🌹🌹💐💐
...
अवधानींचे अजब अनुभव - सागर भावसार भाग २

🌹जय माता लोपमुद्रासहीत अगस्तीशाय नम:💐🌹 जय अत्री अनुसया माता नमः🌹🌹

आमचे आपापसात कधी, कसे, केंव्हा जायचे यावर मी आणि सागरमधे बोलणे होत असे.  तो म्हणत होता,         'राखी पौर्णिमेला जाऊ'. त्यातच अत्री महर्षींनी सांगितल्या प्रमाणे सागरचे लग्न १५ ऑगस्ट २०१९ला झाले होते.  'नंतर कधीतरी जाऊ'. सागर म्हणाला, 'कार्तिक दीपमला जाऊ'. पण मी म्हणालो, 'एवढ्या गर्दीत मी येणार नाही. बघू कधीतरी'. अशी थोडीशी चालढकल चालली होती. मग नंतर दोन आठवड्याचा कालावधी उलटला पण त्या नंतर अजबच घडले! 🌹🌹🌹

तो प्रसंग पुढील भागात वाचा...


... 
For Vivek AND OTHER NON-MARATHI KNOWING LOVERS OF THE GROUP... TRIED TO TRANSLATE  SOME PORTION...

Strange Experience of predictions - Sagar Bhavsar Parts 1-2

Shri Bharavi Avadhani - He is a lover of the Nadi books in Pimpri Chinchwad area. All of his family is involved in carrying out orders of Naadi books. They are lovers of Naadi maharishis. They are constantly trying to make the world known for the work of Maharishi. Introducing the following experience from them.
Late Sri Bhide uncle - he was an old Brahmin priest. He was fond of changing mobile handsets for the fun of it. Facebook, what's app like modern social media. There is an event based on his death.
Shri Sagar Bhavsar - An IT en holdings a senior post. He tries his luck by getting guidance from Maharshi for marriage.
Shri Ishwaran - He is well known for his art of running two Naadi centers in Pune, ideally. As he talks in Marathi, Hindi, they feel closer to the customers. Moreover, he himself has a rush of fans from across the country and abroad as he makes a cogent reading of Atri Jeeva Naadi.

Strange Experience of Avadhani - Sagar Bhavsar Part 1

For many days this experience I was thinking to write but could not happen till today. When Maharishi inspires to write it happens!

Sagar and I saw our Predictions in the center of Eashwaranji. In the dreams of the Sagar, heavenly people had come. They were in a Shiva temple and Sagar, and Bhide Kaka (Uncle) were talking. Because the Sagar had merely known BhideKaka, their relationship was not much! Then why did he come in his dream? Was the question lurking for Sagar. 

Download App for more details

https://naadigranthbhavishyamarathi.blogspot.com/2015/11/naadi-predictions-hoax-google-play.html

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६

Android App for Navagraha Temples as suggested by Naadi Maharishis

Picture
What exactly do the Navagraha do? Why are they worshiped?  Click here
In Indian philosophy, the theory of Rebirth and theory of Karma plays cardinal role. As explained elsewhere in the website, the person is responsible for his present plight due to the previous good or bad deeds. Through 13th Kandam (Chapter) of Naadi Predictions, the seeker is told to perform the services or Pujas /Archanas of the concerned Navagraha to overcome the bad or malefic effect thereof. Performance of Pujas and simultaneously providing food to the hungry and water to the thirsty, lighting of lamps are some of the means by which one gets rid of papas or bad deeds and boost the punyas or good and benevolent acts.
One of the main reasons why the Naadi Predictions are referred to is, to intuit the seeker to the performance of Shanti and Parihar rituals at the earliest and in the prescribed manner. One should visit as per the directions gained in the Naadi Palm leaf under the guidance of the Naadi readers. This app will give enough guidance for the needy.

Android App on comparison of Naadi Maharishi with Nostradamus! Decide Who is better?

Picture
 Comparative study of Naadi Maharishis and Nostradamus ....You Decide who is better  Click here
The caption of this article might shock many readers. For the reason that up till now every one presumed that Nostradamus was and is the number one astrologer, of the world! Now who is this new Naadi astrologer? Naturally, it must be someone boasting and trumpeting his tunes for nothing. Wing Commander Shashikant Oak has been drumming the Naadi Astrology Predictions for its exaggerated, bombastic and astonishing feats for last some years. But that does not permit Wing Commander Shashikant Oak to demean the towering personality of Nostradamus to lower esteem. Why should he indulge in this mud slinging acts?
Now, I leave to the readers of this article to judge for themselves, whether I am exaggerating the Naadi astrology or is it the reality by comparing both of them? While comparing the
m, I do not demean Nostradamus or other astrologers. Their method of predictions might be different.  

Android apps published Get Naadi center addresses of all over India

Please find the Details of the Android apps published by Naadi Lovers Group

Picture
Naadi Granth Predictions    Click Here

This app is aimed to create awareness about Ancient Maharishi’s work on palm leaves in old Tamil language, called “Naadi Ole Palm Leaf Predictions “. This app provider views Naadi Maharishi’s work as service to humanity. It is no way connected with any of the Naadi centers providing the Naadi reading Facilities. Options provided for expressing Naadi Reading Experience / opinions in ‘Feedback’ section are expected to be as a matter of fact and devoid of exaggeration.The opinions expressed by the visitors not to be taken as criticism but as guidance for further improvement by the concerned persons/centers. This app neither challenges nor accepts any challenge from any rationalist organisations or Individuals.  Fees collected from Addresses provided will be utilised for conducting Workshops, Conferences on  Naadi Related Indological academic topics from time to time and to make App sustainable and long lasting.
  •  Frequently asked Questions  About Naadi Granthas
  • Some prominent personalities’ experiences and views on Naadi Granthas.
  • Feed backs by Naadi Seekers –
  • Paid part of App provides: Naadi center addresses which are grouped in three parts.
  • 1.City or nearby cities wise  2. State Or Cluster of States wise. 3.  Full India.

Ramani Guruji Part1 Pune 2016

Ramani Guruji Giving Naadi Reading at Pune on 1 Feb 2016

Pujya Ramani Guruji had come to Pune to take some rest from his busy schedule at Tambaram Ashram. He generally resides At Shri Jayaraman ji's residence. His Wife Vimala and her sister Sarala are Guruji's very old devotees from their childhood.
Here is the part pertaining to Shashikant Oak.pf the reading on 1st Feb 2016. Jayaramanji hinted to Oak that Guruji was particularly asking me to confirm has he called "Commandera" which he used to Call him since his acquaintance at Air Force station in Tambaram.
The significance of that was revealed when the reading on that evening went for 15 minutes only for Oak. It is rare in general happening.
Know more about here.








शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६

अकोल्याचे ओम कालीचरण यांच्या नाडी ग्रंथभविष्यातील काही अनुभव सादर भाग 1

कार्यशाळा 2015 मधील ही मुलाखत शशिकांत ओक यांच्या निवासस्थानी दि 22 डिसेंबर 15 रोजी घेण्यात आली. ऍडव्होकेट गिरीश तिवारींनी याचे शूटींग केले . त्यांचे  धन्यवाद...




या छोट्याछोट्या भागातून अकोल्याच्या ओम कालीचरण या व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा ही अपेक्षा.
आपल्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत

अकोल्याचे ओम कालीचरण यांच्या नाडी ग्रंथभविष्यातील काही अनुभव सादर भाग 2

कार्यशाळा 2015 ओम कालीचरण आपले नाडी ग्रंथांचे  अनुभव मराठीतून सांगताना ...

कार्यशाळा 2015 ओम कालीचरण आपले नाडी ग्रंथांचे अनुभव मराठीतून सांगताना ...भाग 3

कार्यशाळा 2015 ओम कालीचरण आपले नाडी ग्रंथांचे  अनुभव मराठीतून सांगताना ...

कार्यशाळा 2015 ओम कालीचरण आपले नाडी ग्रंथांचे अनुभव मराठीतून सांगताना ...भाग 4

कार्यशाळा 2015 ओम कालीचरण आपले नाडी ग्रंथांचे  अनुभव मराठीतून सांगताना ...


ओम कालीचरणजी यांच्या नाडी ग्रंथांच्या अनुभवांवर आधारित मुलाखती भाग 5

ओम कालीचरणजी यांच्या नाडी ग्रंथांच्या अनुभवांवर आधारित मुलाखती  



या छोट्याछोट्या भागातून अकोल्याच्या ओम कालीचरण या व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा ही अपेक्षा.
आपल्या प्रतिसादांच्या प्रतीक्षेत

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

NAADI Predictions - A Hoax? - Google Play Store Top Apps | App Annie

Dear Friends and Lovers of Naadi Granthas,


There are many Android apps available on Google play store.One out of this is linked below -







NAADI Predictions - A Hoax? - Google Play Store Top Apps | App Annie





Dear Naadi Lovers ,

This app has been published recently. 

You can get the observations made by some of the oppressors of Naadi Grantha Predictions. Many of you some times feel what they say is it really true? If not then what is the argument one need to tell any one who come out in any conversation, discussions etc.

Naadi Lovers may get to know the effective replies given by the Naadi reader. He is  from Pune, Mr Eashwaran  he runs 2 Naadi centers. Please offer your comments.


गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

कपिलस्थानामध्ये महर्षी भृगूंच्या आशीर्वादासाठी परदेश भ्रमण !


मित्रांनो ,
अमेरिकेतील प्रवासातील अनेक घटनांमधे महत्वाची होती. संजय अग्रवाल यांच्या भृगु आश्रमांत मिळालेले फल....
            कपिलस्थानामध्ये महर्षी भृगूंच्या आशीर्वादासाठी परदेश भ्रमण !
                          
                               लेखक विंग कमांडर शशिकांत ओक (नि)

ग्रहांकितच्या मे 2015 अंकात मार्च 2015 मधील नेपाळमधे घडलेल्या अदभूत घटनाक्रमाचा आलेख आपण भृगुसंहितेच्या शोधात नेपाळ यात्रा या लेखात वाचलात.  नुकताच भृगू महर्षींच्या कृपाआशीर्वादाचा लाभ कपिलस्थानात (अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या भागाला कपिलस्तान असे भृगू संबोधतात) कसा घडला त्याचे संक्षिप्त कथन सादर.

    पांढऱ्या पोषाखातील संजयजी आणि त्यांचे तेथील शिष्यगण, गळ्यात काळ्यारंगाची बॅगवाल्या ओकांच्या समावेत

मी आणि पत्नी अलका नुकतेच अमेरिकेची सहल करून परतलो. त्या सहलीत मला कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजल्स शहराजवळील आरवाईन नामक गावात भृगु महर्षीच्या आशीर्वादाने भृगुवक्ता श्री संजय अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या आश्रमास भेट द्यायचा योग आला. या आश्रमात जायचे निमंत्रण त्यांनी खूप वर्षांपुर्वी पासून दिले होते. तो योग आमच्या अमेरिका यात्रे दरम्यान आला. आम्ही लॉस एंजल्सला जायचा बेत आखला. 17 सप्टेंबरला गणेशचतुर्थी होती. ती उरकून रात्री 12च्या सुमारास सॅन होजे भागातील बस स्थानकावरून मी एकटाच निघालो. सुमारे 400 मैलाचे (660 किमी) अंतर 130 -140 कि.मी. वेगाने झपाझट काटत ती वातानुकूलित ऐसपैस कोचबस वाटेत एके ठिकाणी थोडे थांबून 7 तासात लॉस एंजल्स शहराच्या मध्यातील स्टँडवर थांबली. पुन्हा एक अनाहाईम जाणाऱ्या बसमधून तासभर प्रवास करून मी तिथे उतरलो, तेंव्हा एक स्थूलसे, हसऱ्या चेहऱ्याचे ग्रहस्थ, हाय मी मॅक.”   म्हणत सामोरे आले. मला संजय गुरूजींनी आपल्याला पिक अप करायला पाठवले आहे. चला.” त्यांच्या गाडीतून पुन्हा 20 मिनिटांच्या प्रवासात ऑरेंज कौंटीभागातील विविध फळांच्या बागा पहात आम्ही संजयजींच्या फ्लॅट मधे प्रविष्ट झालो.
संजय अग्रवाल सध्या वयाच्या 45च्या पुढचे उत्तर भारतीय, उच्च शिक्षित, विवाहित व्यक्ती. मोठ्या पगाराच्या आणि पदाच्या नोकरीसाठी अमेरिकेत आले. ती त्यांनी मिळवली. या शिवाय भारतीय आध्यात्मिक विषयांचा गहन अभ्यास केला. भगवत गीतेवर ते अस्खलित इंग्रजीत प्रवचने देऊ लागले. ज्योतिषशास्त्रात प्राविण्य मिळवले. ज्योतिषावरील सभा आणि अधिवेशनातून वैदिक ज्योतिषशास्त्राचे अधिकारी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. ते क्लासेस घेऊन परदेशातील लोकात एक असाधारण ज्योतिषी म्हणून नावाजले गेले. हे एकीकडे होत असताना सन 2006च्या सुमारास त्यांची भेट काकाभुजंदर जीवनाडीचे वाचक चेन्नईतील रमणी गुरुजींशी अमेरिकेत झाली. त्यावेळच्या वाचनात काकभुजंदर महर्षींनी रमणी गुरुजींच्या पट्टीवाचनातून असे सांगितले, आता तुझी नोकरी करायची वेळ संपली आहे. यापुढे तुझे जीवित कार्य घडवायला एक व्यक्ती गंगेकिनारी वाट पाहाते आहे. तिच्या भेटीनंतर तुला तुझी ओळख होईल. याशिवाय तुला माझ्याकडून वेळोवेळी कथनातून मार्गदर्शन केले जाईल. आता तू नोकरी सोड...!’ एकांकडे पाहुणे म्हणून आलेल्या रमणी गुरुजी नामक अपरिचित व्यक्तिच्या अशा विचित्र कथनातून मोठ्या पगाराची नोकरी सोडून, हिमालयात गंगेच्या किनाऱ्यावर कुठेतरी असलेल्या अनामिक व्यक्तीच्या शोधात जायचा तो आदेश ऐकून ते व कुटुंबिय चक्रावून गेले! व ते कथन ऐकून सोडून दिले. पुढील घटनाचक्र असे फिरले की त्यांची नोकरी अचानक गेली! दरम्यानच्या काळात त्यांना एकांनी भारतातून फोनकरून भृगुआश्रमाची ओळख सांगून निमंत्रण दिले. संजयजीनी उत्तर काशीला अगदी गंगेकाठी असलेल्या आश्रमात बाबाजी नामक वृद्ध महिलेची भेट घेतली! त्यांच्या मार्गदर्शनातून काकभुजंदर महर्षींच्या कथनातील गूढार्थ त्यांना हळूहळू कळून येऊ लागला. दरवर्षी रमणी गुरुजी काकभुजंदर महर्षींच्या आदेशानुसार परदेशगमन करतात, त्याप्रमाणे पुढील गेली कित्येक वर्षे त्यांना विविध आदेशातून भृगु आश्रम निर्माणकरून भृगूंच्या भविष्यकथनास तयार केले गेले. दरम्यानच्या काळांत त्यांनी माझ्या विषयी ऐकले आणि आमचा फोनवरून परिचय झाला. त्यांचे सन 2010 मधे बाबाजींना भेटायला भारतात यायचे ठरल्यावर पुण्यात जीवनाडी असेल तर ती ऐकायला यायची इच्छा त्यांनी मला व्यक्त केली. त्यानुसार मी त्यांना जीवनाडी केंद्रात न्यायचे ठरले. काही वेळ मधे होता म्हणून वाटेत पडणाऱ्या एका केंद्रात आम्ही गेलो. तिथे अचानकपणे भृगू महर्षींची अति अति सूक्ष्म नाडीच्या लांबलचक ताडपट्टीत त्यांचे भविष्यकथन ऐकून ते थक्क झालेत्यात भविष्यात निर्माण होणाऱ्या संजयजींच्या आश्रमाचा आराखडा, त्यांच्या संबंधात आलेल्या व्यक्तींचे पुर्वजन्मातील ऋणानुबंध आदि ऐकून त्यांनी पुण्यात येण्याच्या उद्देशाची उकल केली गेली. त्यानंतर संजयजी आपल्या 30-40 शिष्यगणांसमावेत पुण्याला दरवर्षी येत राहिले. त्यांच्या शेजारी बसून महर्षींच्या अदभूत कथनाला साक्षी होण्याचे भाग्य मला लाभले. असो.
अशा संजयजींच्या आश्रमात 18 सप्टेंबरच्या सायंकाळी ऋषी पंचमीच्या दिवशी कथनाला सुरवात झाली. मधेच थांबून मला कवड्यांचे दान टाकायची आज्ञा झाली. 5 असे दान पडले. त्यानंतर मला आदेशात्मक आशीर्वाद मिळाला. संजयजी काही अंक लिहिलेल्या एका कागदावर पाहून त्यावर आपोआप उमटणाऱ्या संस्कृतभाषेतील मजकुराला वाचून सांगतात असे त्यांच्याशी चर्चा करताना समजले. याला अक्षयपत्रही म्हणतातत्यात सुरवातीला म्हटले गेले की बाळ, तुला सात समुद्र पार करून इथे येऊन आजच्या पंचमीला 5 असे दान टाकून तू पूर्वजन्मात अनेक वर्षापुर्वी माझ्या आशीर्वादाची अभिलाषा करुन होतास त्याची आज पूर्तता होत आहे. शशिकले प्रमाणे वाढत जाणारे तुझे शशिकांत नाव असेल. अनेक जन्मांच्या आधी एकदा मला माझ्या कार्याचे मार्गदर्शन करा म्हणून मला विचारणा केली होतीस. तेंव्हा तुला योग्य स्थळ व वेळ आली की ते आपसुक घडेल म्हटले होते ते आज फळाला येत आहे. असे आजच्या भेटीचे गमक आहे.
माझ्या आणि अन्य महर्षींच्या भविष्यकथन पद्धतीचा निदिध्यास घेऊन तू आमची सेवा निस्वार्थपणे करावीस अशी योजना आहे. यापुढे ज्यांना आमच्या या लोककल्याणाची कदर आहे अशांशी तुझ्या भेटी होतील. तू तुझ्या एकट्याच्या बळावर हाती घेतलेले कार्य तडीला जाण्यासाठी लोकांची साथ लाभेल. आमचे तुला पुर्ण आशीर्वाद आहेत.
या कथनानंतर संजयजीं उपस्थितांना हिन्दी व इंग्रजीत सुंदर भाषांतर करून सांगत होते. इतरांच्यासाठी कथनानंतर होऊन उपस्थित 25-30 जणांचा महाप्रसाद होऊन त्या रात्रीची सांगता झाली.
महर्षी भृगूंच्या कथनाचा पडताळा मला लगेच आला. सॅन फ्रान्सिस्को पासून 70 मैलावर असलेल्या पेटालूमा गावात नोएटिक सायन्सेस इन्स्टिट्यूटमधे जमलेल्या शास्त्रज्ञांसमोर पॉवरपॉईंट स्लाईड्स मधून नाडीग्रंथांच्या 1100 स्कॅन्स आणि सात मिनिटांची नाडी ताडपट्टीत व्यक्तींची नावे कशी येतात याची रंगीत चित्रफीत पाहून आश्चर्याने, बापरे इतका डेटा आणि ताडपत्रांवरील लेखी पुरावा आहेअहो या अशा पुराव्याची तर आम्हाला गरज आहे. सध्याच्या विज्ञानाची साधने वापरून मानवातील दैवी गुणाचा शोध घ्यायला आमची इन्स्टिट्यूट काम करते. पण असे पुरावे नाहीत म्हणून आमच्या अंतर्ज्ञानाशी संबंधीत कामाला हिणवले जाते. असा उद्गार त्यांनी काढला.
 इथे नमूद करायला हवे की ही संस्था डॉ. एडगर मिचेल, जे अपोलो 14 यानातून चंद्रावर पाऊल ठेवणारे 6वे अंतरिक्षयात्री होते, त्यांनी, या यात्रेहून परतताना निर्वात अंतरिक्ष पाहून काही काळ माझी समाधी अवस्था जागृत झाली होती.’ असे नमूद केले. यांनी निवृत्तीनंतर ही संस्था 1974मधे स्थापली आहे. त्यांच्याशी संपर्ककरून त्यांना भारतीय महर्षींच्या नाडीग्रंथांच्या कार्याची ओळख करून द्यावी अशी अपेक्षा ठेऊन ही भेट घडत होती. डॉ. एडगर मिचेल सध्या वृद्धत्वामुळे भेटू शकले नाहीत. पाहूया या संस्थेच्या कडून प्रतिसाद कसा मिळतो ते.   
....
लेखक -  शशिकांत ओक


नाडीग्रंथांवर आधारित Android अँड्रॉईड App - Google play store वर मोफत उपलब्ध आहेत.
1)Naadi Grantha Predictions या नावाच्या App मधून देशभरातील 320च्यावर नाडीग्रंथ केद्रांचे पत्ते स्मार्ट मोबाईलफोनवरून माफक फी भरून मिळतात. 2) Jeeva Naadi Granth -अत्रीजीव नाडी, 3) Naadi Predictions and Nostradamus - नॉस्ट्रॅडेमसशी नाडीग्रंथांची तूलना, 4) Rationalists and Naadi Grantha - अंनिससारख्या विचारकांची फटफजिती, 5) Naadi And Navgrahas नवग्रह मंदिरांची ओळख .

अधिक माहितीसाठी शशिकांत ओक मो. क्र. 9881901049 (कृपया रात्रीनंतर)