Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०

अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे ? नाही, मुळीच नाही

हैयोंच्या नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास हा लेख उपक्रमच्या २०१० दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाला. त्यावर रिकामटेकडा नामक एका विवेकवादीसदस्याने त्यावर जे वक्तव्य केले आहे त्यावरून नाडी ग्रंथांनी त्यांची त्यांच्या विचारांच्या समर्थकांची झोप उडवलेली आहे असे जाणवते

 अंधश्रद्धानिर्मूलन करणाऱ्यांच्यावर विवेकवादी वा विज्ञानवादी विचारांचा इतका भयंकर पगडा आहे की ते हमरी तुमरीवर येतात आणि आमचे तेच खरे असा वाद घालतात. हे लोक स्वतःच्या वैज्ञानिक अन्धश्रद्धा उराशी घट्ट बाळगून जपत असतात. मात्र त्यांच्या विचारांना न मानणाऱ्यांच्या श्रद्धा निर्मूलनाच्य़ा लायकीच्या आहेत असे ठरवून त्या घालवण्याचा मक्ता आपणाकडे ठेऊन घेतात. याचा प्रत्यय खालील वाचनातून लक्षात येईल. खालील संवाद हैयोरिटे यांच्यातील आहे

रिटेः "रिकामटेकड्याने लेख नीट वाचला नाही" असे तुमचे निरीक्षण असेल तर नेमका कोणता मुद्दा माझ्या वाचनातून निसटला आहे ते कृपया सांगा. एखाद्या सिद्धतेतील एक दुवा जरी निखळला की संपूर्ण डोलारा कोसळतो. त्यासाठी बाकीचा लेख वाचण्याची आवश्यकता नसते.
    दाव्यांबाबतच्या सत्यासत्यतेविषयी ठाम निष्कर्षासही येतां येईल.
    तुम्ही जी चार उदाहरणे दिली आहेत त्या नाडीपट्ट्या बनविणार्‍या नाडीतज्ञांच्या प्रामाणिकतेविषयी (आणि त्या अनुषंगाने जातकांच्या भोळसटपणा नसण्याविषयी) मला शंका आहे: "ठशांवरून नाडी का सापडावी?" याचे उत्तर माझ्याकडे नाही (कोणाकडेच नाही). लोक खोटे बोलतात असे अनेकदा दिसते. म्हणूनच, "ठशांवरून नाडी शोधून देणारे ढोंगी असतात" हा आमचा 'तात्पुरता' निष्कर्ष शास्त्रीयच आहे. तो चुकीचा ठरविला गेला तर नक्कीच मान्य करू पण तोवर नाडीशास्त्राला थोतांड म्हणण्याचा आमचा हक्क तुम्ही कृपया मान्य करा.
    मूळ मुद्दा मांडावयाचा तो असा, की नाडिग्रंथांमधून जन्मरास आणि लग्नरास "लिहिलेली असते" अथवा "लिहिलेली नसते" असा कोणत्याही प्रकारचा दावा ठोकण्याआधी स्वत:च्या अनुभवावर आधारीत दाव्याची भाषाशास्त्रीयदृष्ट्या खात्री करून घ्यावी.
    व्यक्ती नाडीकेंद्रात जाणार नाहीत ही अट मान्य करून, केवळ, अनेक व्यक्तींच्या बोटांचे ठसे पाहून कोणी नाड्या देणार असेल तर "अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे.
    

    अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे

    रिटे ओक यांतील संवाद

    व्यक्ती नाडीकेंद्रात जाणार नाहीत ही अट मान्य करून, केवळ, अनेक व्यक्तींच्या बोटांचे ठसे पाहून कोणी नाड्या देणार असेल तर "अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे.
    त्या नाडीपट्ट्या बनविणार्‍या नाडीतज्ञांच्या प्रामाणिकतेविषयी (आणि त्या अनुषंगाने जातकांच्या भोळसटपणा नसण्याविषयी) मला शंका आहे:

    जर शंका आपणांस आहे तर त्याशंकेचे निरसन आपणालाच प्रत्य़क्ष अनुभवाने व नाडीग्रंथांची विविध अंगांनी परीक्षा फावल्या वेळात करायला नको काय? हे काम आपण टाळण्याने आपणांस शाब्दिक लेखनात फक्त रिता वेळ घालवायचा आहे, असा समज होतो.

    हैयोंचा लेख नाडी पट्टीत जे कूट तमिळ लिपीतून लिहून येते त्याच्या ओळींची फोडकरून सामान्य तमिळ भाषेत ते मांडून गैर तमिळ लोकांना त्यातील अर्थाची ओळख करून देणे असा आहे. त्याअर्थांच्या विश्लेषणाच्या बाबत आपणांस काही विचारणा करावीशी वाटत असेल तर त्याबद्दल तेथे चर्चा होऊ शकते. ३जून१९७९ला बुधवार येतो हे विधान वगळता ज्याअर्थी तशी आपण ती करत नाही त्या अर्थी हैयोंच्या अर्थाची फोड आपणांस मान्य आहे असे मानावे लागेल. पर्यायाने नाडी ग्रंथांच्या पट्यात जन्मदिनांक व त्यावेळची ग्रहस्थिती श्लोकबद्ध असते हे मान्य आहे. बुधवार का मंगळवार याचे विश्लेषण नाडी केंद्रातील तज्ञांकडून केले जाऊ शकते. आपणास वेळ मिळाला तर कोणत्याही केंद्रातून ते मिळवावे.

    आता ते श्लोक खरोखरीच तेथे असतात की नाही या शोधासाठी आपण नाडी केंद्रात जायचे का नाही याची गरज निर्माण करून निर्माण होणाऱ्या समस्येला आपण वा आपल्या सारख्या विचारांच्या लोकांनी तो प्रश्न नाडीकेंद्र वाल्यांशी विचार विनिमय करून सोडवावा लागेल. त्यांनी मान्य केले तर आमच्यासारख्या इतरांनी हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पण त्यासाठी आपणाला पुढाकार घेऊन तुम्हीच तो सोडवला पाहिजेत.

    नाडी केंद्रात न जाताच नाडी ग्रंथांचा अनुभव केवळ ठसे पाठवून व ताडपट्या पाहून परीक्षा घेण्याचा आपला आग्रह असेल ही. पण हैयो आपल्याला लेखातून आपण म्हणता त्या तऱ्हेनी नाडी पट्ट्या शोधतात असा दावा जर करत नाहीत आणि नाडीतज्ञ वाचक नाडी पट्या केंद्रात बसून(नव्या) बनवतात अशी नाडीवाचकांच्याच्या प्रामाणिकतेची शंका आपणास असेल तर त्यांना भेटून त्यांच्या कडून ती सप्रमाण निरसन करून घ्यायला जे काही करावे लागेल ते आपणासारख्यांनी करायचे आहेत.

    अपेक्षा करतो की हैयोंनी जशा काही नाडी पट्ट्यांचा अर्थ सादर करून व त्याची फोड करून दाखवली तशी आपण आपल्या स्वतःची ताडपट्टी शोधावी व त्यातील जन्मकालीन ग्रहस्थिती वर्णन करून सादर करावी. त्यासाठी आपणांस हैयोंची मदत हवी असेल तर त्यांना आपण विनंती करावी ते शोधकवृत्तीचे समतोल विचारक आहेत असा त्यांचा दावा आहे. म्हणून त्यांच्या सचोटीबाबत आपणल शंका नसावी.

    ही विनंती ज्यांनी नाडीग्रंथांना थोतांड म्हणून लेखन केले आहे यांनाही लागू होते.
    

    मुळीच नाही

    जर शंका आपणांस आहे तर त्याशंकेचे निरसन आपणालाच प्रत्य़क्ष अनुभवाने व नाडीग्रंथांची विविध अंगांनी परीक्षा फावल्या वेळात करायला नको काय?
    नको.
    हे काम आपण टाळण्याने आपणांस शाब्दिक लेखनात फक्त रिता वेळ घालवायचा आहे, असा समज होतो.
    ऍज इफ मी काही हीन कृत्य करतो आहे!
    ३जून१९७९ला बुधवार येतो हे विधान वगळता ज्याअर्थी तशी आपण ती करत नाही त्या अर्थी हैयोंच्या अर्थाची फोड आपणांस मान्य आहे असे मानावे लागेल. पर्यायाने नाडी ग्रंथांच्या पट्यात जन्मदिनांक व त्यावेळची ग्रहस्थिती श्लोकबद्ध असते हे मान्य आहे.
    जातक तेथे जाण्यापूर्वी नाड्या लिहिल्या गेल्या काय हा एक कळीचा मुद्दा आहे.
    बुधवार का मंगळवार याचे विश्लेषण नाडी केंद्रातील तज्ञांकडून केले जाऊ शकते.
    ग्रेगरीचा बाप आला तरी माझी अक्कलच दामटेन.
    दर २८ वर्षांनी तारीख आणि वार यांची जोडी जमते (१८००, १९००, २१००, अशी १०० ने भाग जाणारी पण ४०० ने भाग न जाणारी वर्षे मध्ये पडली नाहीत तर!). २००० ला ४०० ने भाग जातो त्यामुळे २८ चा नियम वापरून मी असे ठासून सांगतो की ६ जून १९८२ रोजी रविवार होता. म्हणूनच ६ जून १९८१ रोजी शनिवार होता, ६ जून १९८० रोजी शुक्रवार होता, ६ जून १९७९ रोजी बुधवार होता (कारण मध्ये २९ फेब्रु १९८० आली), ६ जून १९७८ आणि १९८४ रोजी मंगळवार होते. स्वतःचा जन्मवारही अज्ञात असलेला जातक वापरणारा लेख विश्वासार्ह नाही. गेम ओवर.
    पण त्यासाठी आपणाला पुढाकार घेऊन तुम्हीच तो सोडवला पाहिजेत.
    नाही! नाडीकेंद्राच्या चाहत्यांनी पुढाकार घ्यावा. त्यात त्यांचा फायदा आहे. सरकारने नाडीशास्त्राला मान्यता दिल्यास आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल.
    नाडीवाचकांच्याच्या प्रामाणिकतेची शंका आपणास असेल तर त्यांना भेटून त्यांच्या कडून ती सप्रमाण निरसन करून घ्यायला जे काही करावे लागेल ते आपणासारख्यांनी करायचे आहेत.
    "जे काही" म्हणजे काय? मला सुचलेला मार्ग असा की जातकाने तेथे जाऊ नये, केवळ ठसे पाठवावे.
    अपेक्षा करतो की हैयोंनी जशा काही नाडी पट्ट्यांचा अर्थ सादर करून व त्याची फोड करून दाखवली तशी आपण आपल्या स्वतःची ताडपट्टी शोधावी व त्यातील जन्मकालीन ग्रहस्थिती वर्णन करून सादर करावी.
    मी पट्टी शोधू शकत नाही. जरी तामिळ शिकलो तरी मुळात, ठशांवरून नाडीपर्यंत पोहोचण्याची पद्धत गुप्तच आहे. ती जादू नाडीतज्ञांनाच करावी लागणार. म्हणूनच, तामिळचे भाषांतरही नाडीवाल्यांनीच करावे, भाषांतर हा बॉटलनेक नाहीच मुळी.
    शिवाय, जर पट्टी सापडली नाही तर? मी आधीपासूनच स्वतःला शहाणा समजतो, त्यावर तुमचे प्रमाणपत्र घेण्यात मला रस नाही. विमल जालान, वेणुगोपाल रेड्डी, किंवा सुब्बाराव यांचे प्रमाणपत्र मिळणार आहे काय?

    -

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: