टक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात... खालील गरज पडाचे कारण असे की हैयोहैयैयो नामक एका व्यक्तीने नाडीग्रंथांच्या ताडपट्यातील तमिळ कूट लिपीचा अभ्यास करून एक लेख प्रसिद्ध केला. त्याला अंनिस वाले प्रतिवाद करू इच्छितात पण तमिळ भाषेतील तज्ञांची साथ त्यांना मिळाली नाही म्हणून ते नाडी ग्रंतांना थोतांड म्हणून सिद्ध कारयला कमी पडतात असे वाटून हा धागा इथे थोड्या अनपेक्षितपणे घालावा लागत आहे. वाचकांना हैयोंचा लेख इथे वाचता येईल. मदत तातडीची हवी आहे, म्हणून राग नसावा.
टक्कर देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात - अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.
हैयो हैयैयो,
आपल्या प्रमाणे तमिळ भाषेची जाण असणारा, पट्टीतील लिपिचा तज्ञ आणि जो आपण प्रतिपादन करता त्याला खोडून काढून नाडीच्या ताडपट्ट्यातील भाषा तमिळ नसते त्यात व्यक्तीची नावे व अन्य माहिती कोरून लिहिलेली असणे शक्य नाही असे ताडपट्टीतील मजकूर तपासून पाहून त्यावरून आपल्या लेखातील हवा काढून टाकणाऱा विवेकवादी व अंनि चा खंदा कार्यकर्ता हवा आहे.
इथे महाराष्ट्रात नाही मिळाला तर भारता बाहेर वा तमिळनाडूतील आमच्या समान विचारच्या संघटनांशी संपर्क साधून मिळवायचे प्रयत्न जारी आहेत. काळजी नको. य़श मिळणारच.
तोवर एक विचारणा - काहो हैयो हैयैयो, आमच्या संघटनेला अंतिमतः यश मिळणार का? की आम्ही धुळीला मिळणार? याचे भविष्य मिळेल का पहायला?
थोडी गोची अशी आहे की आमच्यापैकी कोणी नाडी भविष्य पाहू म्हटले तरी ते शक्य नाही कारण संघटनेचे पदाधिकारीच जर नाडीच्या केंद्रात गर्दी करून बसले तर मग आमची काय राहिली? नाही का?
म्हणून गळ घातली इतकेच.
बाकी आपण केलेले शोध कार्य फार भारी आहे यात शंका नाही. फक्त आमच्या बाजूने आपण नाहीत याची खंत वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा