ठीक आहे, सूर्योदयाआधी (उदा., ६ जून १९७९ रोजी पहाटे ३-४ च्या आसपास चित्रा नक्षत्र होते तेव्हा) आधीच्या दिवशीचाच वार मानावा हे भारतीय पंचाग प्रकारचे स्पष्टीकरण मी स्वीकारतो.
काल पर्यंत स्वतःच्या बुद्धीवर फाजिल आत्मविश्वास असलेले रिकामटेकडा नावाने लेखन करणारे व्यक्ती दि १४ नोव्हेंबरच्या टिपणीत एकदम हैयोंचे म्हणणे मान्य करतात की त्या विशिष्ठ नाडी पट्टीतील व्यक्तीचा जन्म 6 जून 1979 ला बुधवारी नसून भारतीय काल गणने प्रमाणेमंगळवार ला झाला हे नाडी महर्षींचे ताडपट्टीतील लेखन अचुकच होते. 'हेआधीच सांगितले असतेत तर' असे हैयोंना विचारतात! पण वार गणनेत चूक झाली म्हणून इतर जो संदर्भ हैयोंनी लेखात दिलेत त्याला ठोकरून लावतात. ते कसे ते वाचा...
रिटे चे म्हणणे लाल तर हैयोंचे निळ्या रंगात
....१. "रिकामटेकड्याने लेख नीट वाचला नाही" असे तुमचे निरीक्षण असेल तर नेमका कोणता मुद्दा माझ्या वाचनातून निसटला आहे ते कृपया सांगा.
....ग्रेगरीचा बाप आला तरी माझी अक्कलच दामटेन.
काही चिकित्सकमंडळी पूर्वग्रहदोषाकारणे चिकित्सेतील मुख्य तत्त्वें सोडून इतरत्र भरकटत असतात असे मला नेहमी वाटत आलेले असल्याचे मी पूर्वीही सांगितलेले आहे. आपल्याही वाचनातून एक महत्त्वाचा मुद्दा निसटून आपण इतरत्र भरकटलेले दिसता. असो. निसटलेला मुद्दा असा: नाडिवाचकास आपला जन्मदिनांक प्रचलित पद्धतीप्रमाणे आंग्लभाषेमध्ये सांगण्यासाठी गणित घालणे आवश्यक असते आणि त्यासाठी भारतीय कालमापनपद्धतीचा सखोल अभ्यास असणे अत्यावश्यक असल्याचे मी लिहून दिलेले आहे. त्यामुळे शक्य होणार असल्यास आपली अक्कल भारतीय कालमापनपद्धतीप्रमाणे दामटा. ग्रेगरीच्या बाप काढण्याची आवश्यकता काही नव्हतीच मुळी! ;-) असो. शास्त्रशुद्ध भारतीय कालमापनपद्धतीप्रमाणे त्या विशिष्ट जातकाच्या जन्मसमयी मंगळवार असणे सयुक्तिकच आहे.
....जातक तेथे जाण्यापूर्वी नाड्या लिहिल्या गेल्या काय हा एक कळीचा मुद्दा आहे.
अहो, जातक नाडिकेंद्रात जाण्यापूर्वीच काय, जातकाच्या जन्माच्याहीपूर्वी इतके यथातत्त्व लेखन केले गेले असल्याचा नाडिग्रंथप्रेमींचा दावा असतो. हा दावा हाच अभ्यासाचा / संशोधनाचा / चिकित्सेचा विषय होय - ह्या माझ्या पूर्वीच्या एका विधानास आपण (अप्रत्यक्षरीत्या कां होई ना) लिखित मान्यता दिल्याबद्दल आपणांस अनेकानेक धन्यवाद. नाडिग्रंथ ही हस्तलिखिते असल्याने, भाषाशास्त्र आणि लिपीशास्त्र हे दोन विषय नाडिग्रंथांच्या अभ्यासास अपार सहाय्य करू शकतांत; ह्या अनुषंगाने लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे असे मी पूर्वीच सुचविलेले होते, त्याचे महत्त्व ह्यावरून इतरांस कळावे. असो.
....तुम्ही जी चार उदाहरणे दिली आहेत त्या नाडीपट्ट्या बनविणार्या नाडीतज्ञांच्या प्रामाणिकतेविषयी (आणि त्या अनुषंगाने जातकांच्या भोळसटपणा नसण्याविषयी) मला शंका आहे: "ठशांवरून नाडी का सापडावी?" याचे उत्तर माझ्याकडे नाही (कोणाकडेच नाही). लोक खोटे बोलतात असे अनेकदा दिसते. .....म्हणूनच, "ठशांवरून नाडी शोधून देणारे ढोंगी असतात" हा आमचा 'तात्पुरता' निष्कर्ष शास्त्रीयच आहे. तो चुकीचा ठरविला गेला तर नक्कीच मान्य करू पण तोवर नाडीशास्त्राला थोतांड म्हणण्याचा आमचा हक्क तुम्ही कृपया मान्य करा.
.....मी पट्टी शोधू शकत नाही. जरी तामिळ शिकलो तरी मुळात, ठशांवरून नाडीपर्यंत पोहोचण्याची पद्धत गुप्तच आहे. ती जादू नाडीतज्ञांनाच करावी लागणार.
....व्यक्ती नाडीकेंद्रात जाणार नाहीत ही अट मान्य करून, केवळ, अनेक व्यक्तींच्या बोटांचे ठसे पाहून कोणी नाड्या देणार असेल तर "अनुभवावर आधारित खात्री" करून घेण्यास मी तयार आहे.
आपली माहिती अर्धवट आहे. "ठशांवरून आपली पट्टी शोधली जाते" हे विधान माझ्या लेखनामधील नाही. (तो नाडिग्रंथप्रेमींचा दावा समजावा.) असो. आपण स्वत: प्रामाणिक असाल, भोळसट नसाल, तर आणि खोटे बोलणार नसाल, तर रिकाम्या वेळाचा उपयोग करून स्वत: चिकित्सा आरंभा. येथे चिकित्सेमध्ये, आपण स्वत:चीच पट्टी शोधली पाहिजे असा काही नियम नाही. नाडिकेंद्रात जा, कोठलीही एखादी पट्टी हाती घ्या, निरिक्षण करा, वाचा / वाचून घ्या, चिकित्साभ्यास करा आणि त्याआधारे स्वत:चे निष्कर्ष मांडा. परंतु कृपा करून बिनडोक, पूर्वग्रहदूषित आणि अभिवृत्तीग्रस्त निष्कर्षास मान्यता देण्याचा हट्ट माझ्यापुढे करू नका.
मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्षानुभव विरुद्ध प्रत्यक्षानुभव असा वितर्क होणे शास्त्रीय चिकित्सेस अपेक्षित असते. ज्यांना हे प्रतिपादन पटले आहे, त्यांनी जोवर प्रत्यक्षानुभव शक्य होत नाही तोवर वितर्क करावयाचा नाही असे ठरवून घेतलेले आहे, हे आपणांस ठावूक असेलच. ;-)
....२. एखाद्या सिद्धतेतील एक दुवा जरी निखळला की संपूर्ण डोलारा कोसळतो. त्यासाठी बाकीचा लेख वाचण्याची आवश्यकता नसते.
....मी आधीपासूनच स्वतःला शहाणा समजतो, त्यावर तुमचे प्रमाणपत्र घेण्यात मला रस नाही. विमल जालान, वेणुगोपाल रेड्डी, किंवा....
....स्वतःचा जन्मवारही अज्ञात असलेला जातक वापरणारा लेख विश्वासार्ह नाही. गेम ओवर.
वा, वा, रिकामराव! काय ती अभिवृत्ती! काय तो आवेश! काय तो अभिनिवेश! काय ती खोल, खोल रुतून बसलेली स्वतःच्या बुद्धीवरील अपार अंधश्रद्धा! अहो, एखाद्या तर्क-सिद्धतेतील एक दुवा जरी निखळला की संपूर्ण डोलारा कोसळतो! त्यासाठी बाकीचा बिनडोकपणा ऐकण्याची आवश्यकता नसते! खरेतर प्रत्यक्षानुभवाची भीति वाटत असेल तर तसे प्रांजलपणे मान्य करा, त्यात काही कमीपणा मानू नका - असे केल्याने आपला प्रामाणिकपणाच सिद्ध होईल! स्वत:च्या तर्कबुद्धीवर अपार अंधश्रद्धा, त्यासह पूर्वग्रहदोषही असल्याने; आपल्याच्याने केली जाणारी चिकित्सा ही अजिबात विश्वासार्ह नाही!
सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. आपल्या फ्लॉप् तर्क - सिद्धतेत आता निखळणेसाठी दुवाच शिल्लक नसावा! श्री. रिकामराव, आता गेम आवरा! ;-)
अवांतरः-
....सुब्बाराव* यांचे प्रमाणपत्र मिळणार आहे काय?
श्री. सुब्बारावांचे नांव घेतलेत म्हणून विचारतो. रु. १०० च्या चलनावर श्री. सुब्बारावांनी देवनागरीसह अन्य कोण्या लिपीमध्ये स्वाक्षरी केली आहे, हे आपणांस ठावूक आहे काय? ;-)
-
हैयो! हैयैयो!
हैयो! हैयैयो!
Posted by हैयो हैयैयो on 14 Nov 2010 at about 15:48.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Posted by रिकामटेकडा on 14 Nov 2010 at about 16:51.
ठीक
भारतीय कालमापनपद्धतीचा सखोल अभ्यास असणे अत्यावश्यक असल्याचे मी लिहून दिलेले आहे. त्यामुळे शक्य होणार असल्यास आपली अक्कल भारतीय कालमापनपद्धतीप्रमाणे दामटा.
ठीक आहे, सूर्योदयाआधी (उदा., ६ जून १९७९ रोजी पहाटे ३-४ च्या आसपास चित्रा नक्षत्र होते तेव्हा) आधीच्या दिवशीचाच वार मानावा हे भारतीय पंचाग प्रकारचे स्पष्टीकरण मी स्वीकारतो. हे स्पष्टीकरण आधीच्या प्रतिसादात देऊन तुम्हाला तुमचा वेळ वाचवता आला असता.
अहो, जातक नाडिकेंद्रात जाण्यापूर्वीच काय, जातकाच्या जन्माच्याहीपूर्वी इतके यथातत्त्व लेखन केले गेले असल्याचा नाडिग्रंथप्रेमींचा दावा असतो.
"विशिष्ट तारीख आणि वेळ असताना नेमकी काय ग्रहस्थिती असते? या प्रश्नाचे उत्तर आधीच लिहून ठेवणे शक्य असते" इतकाच मर्यादित दावा असेल तर तो शक्य आहे. व्यक्तीच्या ठशांवरून तिची जन्मतारीख/वेळ ओळखली जाते हा दावा त्यात जोडला नसेल तर माझा काहीही विरोध नाही.
"ठशांवरून आपली पट्टी शोधली जाते" हे विधान माझ्या लेखनामधील नाही.
"नाडिग्रंथांसंबंधी जे अनेक दावे केले जातांत त्यापैकी एक मुख्य दावा म्हणजे त्यांत व्यक्तीचे नांव, जन्मदिनाची नोंद कोरून येणे हा होय." आणि "व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद कोरून येते हे म्हणणे बरोबर आहे काय ह्या प्रश्नाचे सिद्ध उत्तर देण्यासाठी..." ही विधाने तुमचीच आहेत. म्हणजे, नाडीत व्यक्तीच्या जन्मदिनाची नोंद असते असा तुमचा दावा आहे. ("नाडीत एका दिवशीच्या एका वेळेच्या ग्रहस्थितीची नोंद असते" या दाव्याला कोणी विरोध केला आहे काय?) म्हणजे, विशिष्ट तारीख/वेळ असलेली नाडी विशिष्ट व्यक्तीशी जोडण्याची काहीतरी पद्धत असल्याचा तुमचा दावा आहे. 'ठसे' हा असा एक संबंध सांगितला जातो. तसा काहीच संबंध नसेल तर "व्यक्तीची जन्मवेळ घड्याळात सापडते" अशा प्रकारचा निरर्थक दावा शिल्लक राहील. (दावा निरर्थक का? घड्याळात विविध अशा ८६४०० वेळा दिसतात. त्या सार्यांचे फोटो काढून ठेवले तर व्यक्तीची जन्मवेळही त्यांपैकी एक असतेच. व्यक्तीला जन्मवेळ विचारून त्यानुसार फोटो शोधून दिला तर त्यात काय कौतुक? अर्थात, "अब्जावधि ग्रहस्थितींच्या नाड्या इवल्याश्या इमारतीत मावतात आणि प्रत्येक व्यक्तीची नाडी त्यात असते" हाही दावा सिद्ध झाला तर कौतुकास्पदच आहे!)
मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्षानुभव विरुद्ध प्रत्यक्षानुभव असा वितर्क होणे शास्त्रीय चिकित्सेस अपेक्षित असते. ज्यांना हे प्रतिपादन पटले आहे, त्यांनी जोवर प्रत्यक्षानुभव शक्य होत नाही तोवर वितर्क करावयाचा नाही असे ठरवून घेतलेले आहे, हे आपणांस ठावूक असेलच.
प्रत्यक्षानुभवाची भीति वाटत असेल तर तसे प्रांजलपणे मान्य करा, त्यात काही कमीपणा मानू नका
"त्या नाडीकेंद्राच्या इमारतीत जितक्या नाड्या मावतील त्या सार्यांमध्ये एका-एका तारखेच्या विशिष्ट वेळेच्या ग्रहस्थितीचे वर्णन केलेले असते" या दाव्यालाही कोणी विरोध करीत नाही. तो दावा प्रत्यक्ष अनुभवाशिवायच मान्य करण्यात मला भीती वाटत नाही.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा