Welcome to New APPS and Websites

Introducing this new websites for the benefit of those who cannot visit the Naadi Centers, but wish know more about the Naadi astrology.

For more, please visit
(From Jan 2016 on wards)
At a Glance - Shashikant Oak
(Matters Up to 31 Dec 2015)

http://shashioak1.weebly.com/

Please get connected with Android Apps

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०

उपक्रमाने नाडी ह्या प्रकाराला कायमस्वरुपी बंदी घालावी का?

हैयो हैयैयोंनी दिवाळी अंकात लिहिलेल्या नाडीग्रंथांवरील लेखाने चिडून जाऊन उपक्रमींनी हा धागा सुरू केला आहे. 

 

ओकांनी त्यांना सडेतोड उत्तरे दिलेली आहेत. 'ओक हैयो नाडी ग्रंथांची उपक्रमवर जाहिरात करत आहेत' असा मनघडंत आरोप करून ही मोहीम चालवली जात आहे. ओक किंवा हैयो वा अन्य कोणीही ज्याने नाडी ग्रंथांचा अनुभव घेतला आहे त्याने आपला अनुभव सादर केला तर तो जाहिरात म्हणून कसा होतो ते उपक्रमींच्या टोळीलाच माहित. मात्र विज्ञानाचा बुरखा घेऊन हे श्रद्धेवर झडप घालायला कसे आसुसलेले आहेत य़ाची झलक सामान्यवाचकांच्या माहितीसाठी सादर...

विज्ञानवादी विवेकवादी म्हणवून घेणाऱ्यांना नाडी ग्रंथांच्या विषयाने असे भंडावले आहे की त्यांची झोप उडाली आहे... त्यातील एक झलक पेश...

'नाडीग्रंथातील जन्मदिनाकाची नोंद - एक अभ्यास' यालेखाने तेथील अनेकांची झोप उडवली आहे असे जाणवते. हैयोंनी आपल्या नेहमीच्या शांत पण खंबीर पद्धतीने लेखन करून नाडी ग्रंथ तमिळ मधील काव्याचा एक एक विलक्षण नमुना सादर करून त्यातून असे दाखवून दिले आहे की अत्यत कमी शब्दात व्यक्तीच्या जन्मदिनाकाची त्यावेळच्या ग्रहपरिस्थितीचे वर्णन इतक्या चपखलपणे केलेले असते ते पाहून अचंभा वाटावा.तेही काव्याच्या सर्व मर्यादा पाळून...

त्यातील एका उदाहरणात दोन जुळ्याबहिणींच्या नाडी ग्रंथातील नोंदी कशा विविध प्रकारे सादर केल्या आहेत ते फारच रंजक आहे. आणखी एका उदाहरणात एका व्यक्तीचा जन्म ६जून १९७९ ला मंगळवार झाला होता असे नाडी महर्षींचे कथन त्या साईटवरील एकांनी आपल्यापद्धतीने ताडून ते चुकीचे आहे असे आव्हानात्मक प्रतिसाद घालून प्रतिपादन केले होते. मात्र हैयोंनी त्यांना प्रचलित कॅलेंडर प्रमाणे बुधवार असला तरी तो भारतीय कालगणने नुसार तो मंगळवार येतो असे ठासून सांगितल्यावर त्यांना मान्यकरावे लागले की होय तो मंगळवारच येतो म्हणून. (जन्म जर पहाटे सूर्योदयापुर्वीझाला असेल तर तो आधीच्या दिवसाची तारीख वार मानावा )यानंतर अनेकांनी नाडी ग्रंथावरील या लेखातील महत्वाच्या मुद्यांना डावलून ओरड चालू केली की नाडीज्योतिष शास्त्रासारखे विषय उपक्रमवरून काढून टाकावेत. त्यातील एक धागा ...

नाडीग्रंथ


नाडी ह्या प्रकारावर आंतरजालावरील दोनेक माणसांनी जी जाहिरात मोहिम उघडली आहे ती थांबवणे गरजेचे आहे. समाजाला मागे नेणार्‍या ह्या भोंदू गोष्टींच्या जाहिरातीमधे संकेतस्थळांचा समावेश असू नये ह्या नैतिक जवाबदारीतुन उपक्रमाने नाडी ह्या प्रकाराला कायमस्वरुपी बंदी घालावी का? उपक्रमावर ह्यापूर्वी सनातन प्रभातवाले रतीब घालायचे तो आता बंद केलेला दिसतो तसेच नाडीच्या बाबतीतही होणे गरजेचे आहे का?

बहुतेक


http://mr.upakram.org/node/2948#comment-49256 या पाळलेला राक्षस यांच्या प्रतिसादाला धरून उपक्रम नाडीप्रेमी आहे का (कारण दिवाळी अंकात नाडीवरून लेख आहे) असा प्रश्न विचारता येऊ शकतो याची काळजी वाटलेली दिसते आहे.

अर्थात याला माझे उत्तर त्या विचारांना सातत्याने विरोध करावा, हा सदस्यांकडून तसेच प्रशासनाकडून केला जावा, कारण ती ऍ़क्टिव्ह आर्थिक फसवणूक चाललेली असू शकते असे मत आहे. प्रशासनाकडून ह्या लेखांमुळे सदस्यांची आर्थिक/सामाजिक फसवणूक/वित्तहानी झाल्यास संपादक/प्रशासक जबाबदार राहणार नाहीत असा वैधानिक इशारा प्रत्येक लेखाखाली देणे सोयीचे ठरेल.

+१


जाहिरातींबाबत पूर्णपणे नकारात्मक धोरण न घेता उपक्रम संकेतस्थळाने जागरूकही असावे.

लेखकाला किंवा एखाद्या विक्रेत्याला आर्थिक फायदा होईल अशा प्रकारची माहिती देण्यास पूर्ण निर्बंध नकोत. पण काही बंधने हवीत, असे राहूनराहून वाटते.

सहमत.

प्रशासनाकडून ह्या लेखांमुळे सदस्यांची आर्थिक/सामाजिक फसवणूक/वित्तहानी झाल्यास संपादक/प्रशासक जबाबदार राहणार नाहीत असा वैधानिक इशारा प्रत्येक लेखाखाली देणे सोयीचे ठरेल.

सहमत. पण नाडी मनोरंजक आहे. द्वेष पसरविणारी नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नाडीग्रंथ


चित्राचे वरील म्हणणे योग्य वाटते. नाडीचिकित्सा हा व्यवसाय आहे. तेथे मूल्य आकारले जाते. त्याची जाहीरात आणि त्यावरून फसवणूक उपक्रम दिवाळी अंकात झाली असे लोक म्हणू शकतात असे वाटते.

पुरोगामी की प्रतीगामी


नाडीपट्टीचा धंदा करणार्‍याला 'एनी पब्लीसीटी इज अ गूड पब्लीसीटी ' वाटू शकते त्यामुळे निषेधार्ह देखील जास्त शब्दही बोलावेसे वाटत नाहीत. उपक्रमाच्या दिवाळी अंकातही नाडीपट्टीबद्दल लेख् आल्याचे पाहून उपक्रम हे संस्थळ जे पुरोगामी आहे असे वाटते त्याबद्दल फेरविचार करावासा वाटत आहे. उपक्रमाला तो लेख छापू दिल्याबद्दल काही आर्थीक फायदा झाला आहे का असा प्रश्न ह्या निमित्ताने विचारावासा वाटतो. बहूदा नसावा पण उपक्रम व्यवस्थापन याबददल खुलासा करेल काय? निदान ह्या निमित्ताने तो लेख छापू देण्यामागची भूमीका जरी कळले तर बरे होइल.

सहमत


त्यावर हिरिरीने आलेले प्रतिसाद पाहून हा सगळ्यात लोकप्रिय लेख वाटत आहे. उपक्रमाने प्रायश्चित्त म्हणून हा लेख दिवाळी अंकातून मागे घ्यावा आणि इथल्या विज्ञानप्रेमींच्या भावनांचा आदर करावा.

-डॉन कोर्लिओनी

अजिबात नाही


उपक्रमाने प्रायश्चित्त म्हणून हा लेख दिवाळी अंकातून मागे घ्यावा आणि इथल्या विज्ञानप्रेमींच्या भावनांचा आदर करावा.

उपक्रमाने कोणतेही प्रायश्चित्त घेण्याची गरज मला दिसत नाही. ही स्वघोषित विज्ञानप्रेमी संस्था साली फारच माजली आहे हल्ली! :)

आपला
गुंडोपंत

मला वाटते


लेख छापू देण्यामागची भूमीका जरी कळले तर बरे होइल.

मला वाटते एखादी गोष्ट दाबून टाकल्याने जास्त तोटा होतो. त्या ऐवजी त्याचे विवेचन, परिक्षण व चिंतन केल्याने काही मते बदलतात, बदलू शकतात. म्हणून यासाठी तरी तो लेख तेथे रहावा असे माझे मत आहे.

आपला
गुंडोपंत

मला वाटते

मला वाटते एखादी गोष्ट दाबून टाकल्याने जास्त तोटा होतो. त्या ऐवजी त्याचे विवेचन, परिक्षण व चिंतन केल्याने काही मते बदलतात, बदलू शकतात. म्हणून यासाठी तरी तो लेख तेथे रहावा असे माझे मत आहे.

सहमत,
नाडीच्या थोतांडपणा शक्य त्या ठिकाणी झोडले पाहीजे पण बंदी नको.
हवे तर खाली वाक्य टाका, उपक्रम कोणत्याही नाडीच्या दाव्याशी सहमत नाही.

कोणाचा?

मला वाटते एखादी गोष्ट दाबून टाकल्याने जास्त तोटा होतो.
त्या 'गोष्टी'च्या दुकानदारांचा तोटा होतो! आमच्या विचारसरणीचा काय तोटा?

प्रतिसाद काढून टाकावा.


प्रतिसाद काढून टाकावा.

उपक्रमाच्या लेखनविषयक ध्येयधोरणांमध्ये खालील स्वरूपाचे लेखन अपेक्षित नसल्याचे स्पष्ट आहे.
  1. सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन करणारे किंवा आक्षेपार्ह लेखन.
  2. व्यक्तिगत रोख असणारे किंवा व्यक्तिगत पातळीवर जाणारे कोणतेही लेखन.
  3. परस्परांविषयी किंवा इतर सदस्यांना उद्देशून व्यक्तिगत स्वरूपाचे लेखन.
ह्यास अनुसरून रिकामटेकड्यांचा वरील प्रतिसाद काढून टाकण्यात यावा ही विनंती. मुळांत दिवाळी अंकातील लेख मी (हैयोने) लिहिलेला असताना श्री. ओक ह्यांच्यावर घसरण्याचे काही कारण नव्हते, त्याहीपुढे असांसदीय भाषा उपयोजून संदिग्ध आरोप करण्याचेही कारण नव्हते.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

मूळ असांसदीय प्रतिसाद काढून टाकला आहे याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.

नाही

मुळांत दिवाळी अंकातील लेख मी (हैयोने) लिहिलेला असताना श्री. ओक ह्यांच्यावर घसरण्याचे काही कारण नव्हते,
हा धागाच "दोनेक माणसांनी जी जाहिरात मोहिम उघडली आहे" या विषयावरील आहे. हा धागाच शशिकांत ओक आणि तुम्ही या दोन व्यक्तींविरुद्ध सुरू करण्यात आला आहे.

आक्षेपार्ह


आक्षेपार्ह

असे असले तरीही तुमचा व्यक्तिगत रोख असणारा - व्यक्तिगत पातळीवर जाणारा प्रतिसाद सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन करणारा आणि आक्षेपार्ह आहे.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

किती आरोप?


तुम्हा दोघांच्या लेखनामुळे लोकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते अशी भीती येथे अनेकांनी व्यक्त केली आहे. "शशिकांत ओक लबाड आहेत काय ते मला माहिती नाही" या वाक्यात त्या भीतीविषयीच मत व्यक्त केलेले आहे. म्हणजे, 'लबाड' हा शब्द तुमच्या आरोपातून बाद!

दुसर्‍या आरोपाला येथे प्रिसीडंट आहे.
विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार अर्थात् 'शिळ्या कढीला ऊत` - भाग २
प्रेषक: प्रकाश घाटपांडे गुरू, 03/09/2009 - 12:06
--------
शुद्ध बिनडोकपणा
या नाडी-पट्ट्या व्यक्तिश: एकेका जातकासाठी नावानिशी बनवलेल्या असतात असे सांगणे म्हणजे शुद्ध लुच्चेगिरी आहे.
त्या आरोपाला एक वर्ष उलटून गेल्यामुळे तुमची मागणी टाईमबार आहे. त्या धाग्याचे ज्ञान असूनही ओक गप्प बसले, तुमचे का पोट दुखते?
'भ्रमसेन' असल्याचाही आरोप नाडीवाल्यांवर यापूर्वीच झालेला आहे.

धन्यवाद.

धन्यवाद.

मूळ असांसदीय प्रतिसाद काढून टाकल्याबद्दल संपादनमंडळास धन्यवाद.

ज्या विरोधी निबंधात तत्वज्ञान किंवा बुद्धी यावर जोर दिसत नाहीत त्यात मला रस नाही. असो.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

संभवामि धागे धागे

ज्या विरोधी निबंधात तत्वज्ञान किंवा बुद्धी यावर जोर दिसत नाहीत त्यात मला रस नाही.
तुम्हाला ते दिसत नाहीत हे दु:खद आहे.

सहमती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
लेखात मांडलेला विचार तसेच वरील पाच प्रतिसादांतून(चि,ध,प्रि,स,रि) व्यक्त झालेली मते या सर्वांशी सहमत आहे. दिवाळी अंकातील हैय्यो. यांचा लेख जरी नाडीग्रंथावर असला तरी त्या ग्रंथाची अथवा भविष्याची भलावण केल्याचे दिसत नाही. तरीपण असल्या विषयांवरील लेखांना "उपक्रम" वर स्थान नसावे असेच मत आहे.

उपक्रमवर धोरण ठरलेले नाही


उपक्रमवरील दिवाळी अंकात मला वाटतं नाडीग्रंथावलोकनाच्या पद्धतीबाबत विचार मांडलेला दिसतो. नाडीपट्टीबाबत सदरील लेखकांचा सदरील विषयावर अनेकांशी त्यांचा संवाद-वादविवाद झालेला आहे. पट्टीवर असलेले कुटलिपीतील लेखन कसे असते, ते कोणाला वाचता येते, नाडीपट्टीतील प्रतिमा वगैरे हे सर्व विषय माझ्यासारख्या उपक्रमी वाचकाला नवीन आहेत. लिहिणार्‍या लिहू द्यावे. मत मांडणार्‍यांनी त्यावर मत मांडावे. उपक्रमच्या दिवाळी अंकात त्यांनी म्हटलेच आहे की, ''अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तवचिकित्सा करणे अभिप्रेत आहे'' तेव्हा काय वास्तवचिकित्सा वाचकांनी करायची ती करावी. नाडीपट्टीबाबत कोणा सदस्याला ते आर्थिक फायदा व्हावा म्हणून नाडीपट्टीचिकित्सेचा आग्रह धरत असतील किंवा नाडीपट्टीची जाहिरात ते करत असतील तर सदस्यांनी व्यवस्थापनाकडे त्याबाबत भावना पोहचवल्या पाहिजेत असे वाटते. मात्र लेखन प्रतिगामी आहे, पुरोगामी नाही म्हणून लेखन ठेऊ नये हे पटणारे नाही. उपक्रमचे अशा लेखनाबाबत कोणतेही धोरण ठरलेले नाही. [ठरले असेल तर तसे वाचनात नाही] त्यामुळे लेखन बंदी वगैरेचा प्रश्नच उरत नाही.

-दिलीप बिरुटे

हेच


सर अगदी बरोबर म्हणतात तुम्ही.

कोणत्याही प्रकारची मुस्काटदाबी करणे योग्य नाही असे माझे मत आहे. त्या ऐवजी लेखात म्हंटल्या प्रमाणे अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तव चिकित्सा करणे अभिप्रेत आहे, ती ज्याची त्याने करावी.

आपला
गुंडोपंत

:)

त्या ऐवजी लेखात म्हंटल्या प्रमाणे अभ्यासकाने खरेखोट्याचे निराकरण करण्याकरतां तारतम्याने वास्तव चिकित्सा करणे अभिप्रेत आहे, ती ज्याची त्याने करावी.
"ज्याची त्याने करावी" म्हणता तर 'समुदाय' कशाला हवा?

ज्योतिष

नाडीमध्ये रस नसल्याने मी सदर लेख वाचलेला नाही परंतु यनांच्या म्हणण्याप्रमाणे त्यात भविष्याची भलावण केलेली नाही हे मी मानते.

उपक्रमावर ज्योतिष असा समुदाय आहे. तो बंद करण्याविषयी किंवा त्याचे वर्णन/धोरण बदलण्याविषयी यापूर्वीही चर्चा झाल्या आहेत. उपक्रमाच्या अपग्रेडसोबत काही निरुपयोगी समुदायांकडे नजर टाकणे योग्य राहिल.

ज्योतिष हा समुदाय तसाच ठेवला जावा


उपक्रमावर ज्योतिष असा समुदाय आहे. तो बंद करण्याविषयी किंवा त्याचे वर्णन/धोरण बदलण्याविषयी यापूर्वीही चर्चा झाल्या आहेत. उपक्रमाच्या अपग्रेडसोबत काही निरुपयोगी समुदायांकडे नजर टाकणे योग्य राहिल.


ज्योतिष हा समुदाय तसाच ठेवला जावा असे माझे मत आहे. त्यावर चर्चाही घडल्या पाहिजेत. फक्त तर्कट लोकांच्या त्यांच्यामते असलेल्या वैज्ञानिक चर्चा करण्यासाठीच हे स्थळ बनू नये ही असे वाटते.
आपला
गुंडोपंत

अस्सं का?


तेथे गेल्या ३६० दिवसांत 'ज्योतिषशास्त्र' या विषयासाठी समर्थक काहीही लेख आलेला नाही. तुम्ही त्या समुदायात एखादा अभ्यासपूर्ण लेख टाका बरे! अन्यथा, "उपक्रमवरील 'ज्योतिषशास्त्र' समुदाय मृत आहे काय?" अशी चर्चा सुरू व्हायची ;)

जरासा खुलासा


कुठलाही विषय वर्ज नको हे तत्वतः पटते. त्याच बरोबर संस्थळ व्यवस्थापनाचा त्याबाबत अंतीम अधिकार हेही पटते. नाडीपट्टीबद्दल उपक्रमावर लेख असणे तितकेसे पसंत नसले तरी ते माझे वैयक्तिक मत आहे, मला आवडत नाही म्हणून उपक्रमावर कोणी माहीतीपूर्ण लेखन करु नये असे माझे म्हणणे नाही. (पक्षी: असू द्या ज्योतीष समुदाय, येउ द्या नाडीलेख)

मराठी संस्थळाबाबत 'दिवाळी अंक' हा एक त्यातल्या त्यात "पवित्र" मानला गेलेला प्रकार आहे अशी माझी (भाबडी??) समजूत. त्यामुळे पुरोगामी माहीतीपूर्ण संस्थळ अशी एक प्रतिमा असलेल्या उपक्रमाच्या दिवाळी अंकात नाडीपट्टी सारख्या विषयाबाबत रुची/ अभ्यासपूर्ण असे काही कुतूहल निर्माण करणारे लेख यावेत हे काही पटले नाही.

आता उपक्रमाने नाडीपट्टीवर विशेषांक काढला तरी आपण कोणीही (फार तर उपक्रमसंन्यास घेण्याव्यतिरिक्त फारसे विशेष असे) काही करु शकत नाही. (असेही म्हणा लोक कोणत्याही संस्थळाचा, विषयाचा कितीही दुस्वास केला तरी तिथे तिथे जातात व तो विषय व आपला निषेध उगाळत बसतच असतात.)

उपक्रम संस्थळ चालवणारे लोक नेहमीच्या संभाषणातले लोक आहेत त्यांना सहज हा प्रश्न विचारला तर उत्तर मिळावे अशी अपेक्षा. किमान उपक्रमाच्या नियमीत वाचकाला तसा लेख निदान दिवाळी अंकात येण्याबद्दल आक्षेप का वाटतो हे उपक्रम व्यवस्थापनाला कळवण्यासाठी हा प्रतिसाद.

हंगामा है क्यों बरपा

हंगामा है क्यों बरपा
विज्ञानाला कशाचेच वावडे नसते. शोधकार्याला कुठलाच विषय त्याज्य नसतो.
पुरोगामी विचाराचा तो मूळ गाभा आहे.

नाडीग्रंथांचा भाषेच्या दृष्टीकोनातून केला गेलेला अभ्यास याचा दुस्वास करून वा त्याला या संस्थळावरून कमी करून तो कसा साधला जाईल?
उलट विचार करायला लावणाऱ्या दुरस्थ भाषेतील काव्याचे बारकावे समजून घेणे, त्याचा मराठी वा अन्य भाषातून कसा उपयोग केला गेला आहे याचा तौलनिक अभ्यास करायची ती अनुकूल संधी म्हणून वापरावयाला पाहिजे. तमिळ भाषा व तिचा अभ्यास हा फक्त हैयोहैयैयोंनी घेतलेला मक्ता नाही. अन्य भाषाशास्त्र तज्ञांनी यात आपले लक्ष केंद्रित करायला त्या लेखातून प्रेरणा घेण्यासाठी केलेला प्रयास असे हैयोंना अपेक्षित असावे.

त्या लेखातील भाषा, लिपी व काव्यालंकाराच्या विषयाला विविध बाजूंनी पहायला काय हरकत आहे? या स्थळावर काव्यशास्त्रविनोदावर चर्चा रंगतात. त्यातील देशी आणि विदेशी भाषेवर काम करणाऱ्या आपल्या तज्ज्ञांनी हा विषय त्याच्या माहितीतल्या भारतीय भाषांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांसमोर मांडावा. या संस्थळावरील इंडॉलॉजीवर काम करणाऱ्यांनी या विषयावर काम करायला पुढे यावे. नाडी ग्रंथातून काय सांगितले जाते ते तूर्तास बाजूला ठेवून त्यातील काव्याचा आस्वाद - अत्यंत कमी शब्दांचा वापर, तोही काव्यातील प्रास-अनुप्रास आदीचे सर्व संकेत पाळून अर्थपुर्ण रचना करणे, ताडपट्टीवर कष्टपुर्वक लिहिण्य़ाची कला, त्याला लागणारी एकतानता - घ्यायला काय हरकत आहे.
या संस्थळाचा व त्यातील तज्ज्ञांचा सकारात्मक सहभाग असेल तर फार छान. नाही का?
संपादकांनी यावर निश्चित विचार केलेला असेल.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

हा हा हा

नाडी ग्रंथातून काय सांगितले जाते ते तूर्तास बाजूला ठेवून त्यातील काव्याचा आस्वाद - अत्यंत कमी शब्दांचा वापर, तोही काव्यातील प्रास-अनुप्रास आदीचे सर्व संकेत पाळून अर्थपुर्ण रचना करणे, ताडपट्टीवर कष्टपुर्वक लिहिण्य़ाची कला, त्याला लागणारी एकतानता - घ्यायला काय हरकत आहे.


ललित मोदी ऐकले होते आता ललित नाडी पण ऐकले. वा भाई वा!!!! मग इतके दिवस नाडीकेंद्रावर जा, स्वता अनुभव घ्या हे त्यातील काव्यअविष्काराबद्दल सांगत होतात होय?

या संस्थळाचा व त्यातील तज्ज्ञांचा सकारात्मक सहभाग असेल तर फार छान. नाही का?

बरोबर उद्या कोणी एखादे वाक्य कलात्मक आहे असे म्हणले तर उपक्रमावर म्हणजे एका विज्ञानवादी संस्थळावर विज्ञानवाद्यांनी आता नाडीपट्टीला मान्यता दिली आहे अशी जाहीरातबाजी सुरु व्हायला वेळ लागणार नाही.
दुसर्‍या एका चर्चेत विशाल तेलंग्ने यांनी उधृत केलेले शेवटचे वाक्य इथेही लागू पडते असे वाटते.

माझं नाव

[...]विशाल तेलंग्ने[...]
माझं नाव विशाल तेलंग्रे असे आहे. तेलंग्रे शब्दाची विभक्ती करुन दाखवली तर तो त्+ए+ल्+ं+ग्+र्+ए असा होतो. :P इंग्रजीत मी Telangre असे लिहितो. ;)

नाडी ग्रंथ थोतांड आहेत

नाडी ग्रंथ थोतांड आहेत, थोतांड आहेत असे त्याचा अनुभव न घेताच सारखे म्हणत राहणे व ज्यांना पहायला जावेसे वाटेल त्यांच्या मनांत उगाचच संभ्रम निर्माण करणे हीच खरी जाहिरातबाजी नव्हे काय?
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

आक्षेप

नाडी ग्रंथ थोतांड आहेत, थोतांड आहेत असे त्याचा अनुभव न घेताच सारखे म्हणत राहणे व ज्यांना पहायला जावेसे वाटेल त्यांच्या मनांत उगाचच संभ्रम निर्माण करणे हीच खरी जाहिरातबाजी नव्हे काय?
हा लोडेड प्रश्न आहे. "जाहिरातबाजी नाही" असे उत्तर दिले तरी "मनांत उगाचच संभ्रम निर्माण करणे" हा आरोप स्वीकारावा लागेल.
--------
संशय 'उगीचच' नाही, तार्किक किंवा प्रात्यक्षिक यांपैकी कोणतेच आधार तुम्ही देत नसल्यामुळे संशय आहे.
--------
उत्पादनाचा खप वाढेल अशी वक्तव्ये करणे हे कधी जाहिरातबाजी असते तर कधी प्रामाणिक, वैयक्तिक अनुभवांचे प्रकटीकरण असते (तुम्ही काय करता आहात त्याची खात्री नाही). पण उत्पादनाचा खप कमी होईल असे वक्तव्य करणे ही कधीच जाहिरातबाजी नसते. "नाडीवाल्यांना पैसे देण्याऐवजी ते अंनिसला द्या", इ. विधाने केली तर त्याला जाहिरातबाजी म्हणता येईल.

विशेष आश्चर्य वाटले नाही.

विशेष आश्चर्य वाटले नाही. 

उपक्रमावर २९५२ वा नोड थोडासा उशिरानेच वाचला. सदस्यांच्या प्रतिक्रिया वाचून विशेष आश्चर्य वाटले नाही.

श्री. यनावाला सर, आपले काही शब्द उसने घेतो:

प्रत्येक क्षेत्रात आपली बुद्धी काही वेगळीच असल्याचा समज बाळगणा-या काही तर्‍हेवाईक व्यक्ती असतात. आपला जन्म जग बदलण्यासाठीच असल्याचा त्यांचा दृढ विश्वास असतो. साधारणत: वास्तवापासून दूर राहणे आणि तारतम्याचा अभाव हीच त्यांची मानसिकता असते. आपल्याला उपजतच सारे काही ज्ञान आहे अशा भ्रमामुळे अभ्यासही फारसा नसतो, मात्र ते स्वत:शी प्रामाणिक असतात. ते जे सांगतात ते त्यांना मनापासून खरे वाटत असते. कुणाला फसवायचा उद्देश नसतो. ते लबाड नसतात. नाडिकेंद्रातही न जाता, केवळ दिव्यदृष्टी(!)नेच बसल्या ठिकाणी चिकित्सा करणारे भ्रमसेन बहुपरिचित आहेत. स्वत:चे आत्मज्ञान इतरांना देणे हेच आपले जीवितकार्य आहे असे समजून ते प्रतिसाद इ. लिहितात. काही श्रद्धाळू अनुयायी मिळूनही अपेक्षित परिणाम मात्र साधत नाही. ह्यांच्या चिकित्सेला सर्वमान्यता मिळत नाही. मग "कंपूशाही, प्रस्थापितांची गटबाजी, जाहिरातबाजी" असा त्रागा करतात, परंतु भ्रमाचा भोपळा काही फुटत नाही - मनातील असुरक्षिततेची भावना काही संपत नाही.

आधुनिक विज्ञानास सार्‍या गोष्टी माहित असल्याचा ह्या भ्रमसेनांचा दावा असेल, परंतु तो दावा स्वत: विज्ञानास मान्य नाही. राहता राहिला प्रश्न नाडिग्रंथ ह्या विषयावर बंदी घालण्याचा - ह्या मागणीने पाकिस्तानवरील धाग्याची आठवण झाली. "उपक्रम दिवाळी अंकावर एका मनुष्याच्या हातून लिहिलेला लेख ठेवू देण्यास बरोबरच्या काही सदस्यांनी नकार दिला. (कारण दिवाळी अंकाला त्यांच्या नावडत्या विषयाचा स्पर्श झाला होता). ह्यावर त्या मनुष्याने "तुमच्या (तथाकथित नाममात्र) अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांच्या मनांमध्येदेखील खोल कूपमण्डूकवृत्ती आणि अपार अंधश्रद्धा आहेच ना?" असा प्रश्न करून (तथाकथित नाममात्र) अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील भ्रमसेनांचा 'अपमान' केला." अन् चवताळले की हो सारे भ्रमसेन..!
असो. अशा या सर्व भ्रमसेनांकडे दुर्लक्ष करणेच श्रेयस्कर. स्वत:स विज्ञानवादी म्हणविणारांचा बालिशपणा पाहून मिशीतल्या मिशीमध्ये सखेद हसू मात्र उमटते. शेवटी, अपेक्षित त्या वळणावर चर्चा आणली असे म्हणायचे. असो. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे! ;-)

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

डोळे अंमळ पाणावले

तुमच्याकडून अशाच प्रतिसादाची अपेक्षा होती.

जशास तसे!

जशास तसे!
जशास तसे ह्या न्यायानेच ना? ;-)
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

माहिती नाही

न्यायशास्त्रवाल्या चर्चेतील डॉक्टर वेगळे आहेत, मी नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: