विंग कमांडर ओक - नाडी ज्योतिष समर्थक
मी ज्योतिषी वा ज्योतिषाचा अभ्यासक नसलो तरी पण ज्योतिषप्रेमी आहे. आयुका, नारळीकर व संख्याशास्त्र विभाग पुणे विद्यापीठ यांना भरीस घालून हा डाव दाभोलकर धुर्तपणे खेळत आहेत. या बाबतीत खालील बाबींचा विचार ज्योतिष परिषदेने करावा.
१) ही परिक्षा का? - सध्या दोन्ही (महाराष्ट्र व अखिल भारतीय) अंनिसंकडे प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणताही हातखंडा प्रयोग नाही. डॉ. जयंत नारळीकरांना हाताशी धरून लाखो रुपयांची बक्षिसाची बोली न करता फुकटात ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याची संधी मिळवण्याकरिता, पुणे विद्यापीठाला व आयुकासारख्या संस्थांना त्यात गोवून लेखी बदनाम करण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
२) परराष्ट्रातील ज्योतिषांना तेथील विज्ञानवाद्यांनी जर चीतपट करून त्यांचे ज्योतिषशास्त्र शास्त्र नाही असे म्हणावयाला भाग पाडले असेल तर भारतीय ज्योतिषांना त्यांच्या (वैदिक) ज्योतिष शास्त्राला मुद्दाम वेगळे चीत करण्याची गरज काय? मात्र अंनिसचे प्रथमपासून तसे धोरण असल्यांने त्यांची चाल आपण समजू शकतो. पण या तऱ्हेचा ‘छळ’ डॉ. नारळीकरांना करण्याचे काही विशेष कारण असावे. अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ जादूटोणा अघोरी विद्या प्रथा निर्मूलन कायदा सध्या मेलेलाही नाही पण जीवंतही नाही असा कोमात गेलेल्या अवस्थेत असल्याने त्याला प्राणवायू देण्यासाठी ही मोहीम हाती घेणे अंनिसच्या जीवन-मरणा इतके हातघाईवर आलेले प्रकरण आहे.
३) ही परिक्षा घेण्याचा यांना अधिकारच काय?
ही परीक्षा ज्या संस्थेतर्फे, ज्या प्रख्यात व्यक्तींच्या देखरेखीखाली केले जाणार आहे, त्यांनी ‘ज्योतिष’ हे शास्त्र तर नव्हेच मात्र ‘थोतांड’ आहे असे सिद्ध केल्याचे दावा मांडणारी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. अशांनी ही ज्योतिषांची परिक्षा पुर्वग्रह न ठेवता करणार असल्याचे सांगणे म्हणजे मनी मावशीने उंदराला मी सध्या ‘उपवास’ करत आहे म्हणून तुला मुळीच खाणार नाही असे आश्वासन देण्यासारखे आहे.
४) ज्या पुणे विद्यापीठाने ज्योतिषशास्त्राला शैक्षणिक दर्जा देण्यास ठाम नकार दिला आहे, त्या विद्यापीठातील संख्याशास्त्र विभाग या परिक्षेचा निकाल ठरवणार (की लावणार?) असल्याने ही परिक्षा खरोखरच निःपक्षपाती असणार कि नाही याची सर्वसामान्यांना कल्पना आहे. मात्र ही चाल उलट पडून ज्या सामान्य लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे, ते सामान्य लोक ज्योतिष शास्त्राच्या आणखी जवळ करण्याची शक्यता आहे. भले ज्योतिष शास्त्र असो वा नसो ज्या ज्योतिषांच्यामुळे आम्हाला मानसिक व भावनिक आधार मिळतो त्यांना नष्ट करणाऱ्या संस्था व प्रसिद्ध व्यक्तीं बाबतचा आदर कमी होऊन त्यांच्या अन्य क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल आमच्या मनात एक प्रकारची अढी बसवण्याची कामगिरी या परीक्षेमुळे नक्की होणार आहे.
५) पुर्वी गावागावातून वादविवाद करून विजयपत्रे मिळवून हत्तीवरून फिरून दरारा व प्रसिद्धी मिळवली जायची त्याचीच ही आधुनिक आवृत्ती आहे.
ज्योतिषांना विनंती –
१) ही परिक्षा हा एक सापळा आहे. जे ज्योतिषी वैयक्तिकरित्या खोट्या व तात्कालिक लोकप्रियतेच्या आमिषाला बळी पडतील त्यांच्यामुळे ज्योतिष शास्त्राचे हसे होईलच पण भविष्यकाळात अन्य भारतीय (हिंदू) विद्या उदा. आयुर्वेद, योगासने, अध्यात्म व अन्य शास्त्रे, यांच्यावर हल्ला करण्यासाठी विरोधकाना धारदार शस्त्र मिळाल्यासारखे होईल.
२) हे आव्हान ज्योतिषशास्त्राला आहे. त्यामुळे त्याला संस्थांतर्गत उपाय योजना करून तोड काढली पाहिजे. त्यासाठी सर्व ज्योतिषशास्त्र संचलन करणाऱ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील संस्थांनी एकत्र येण्याची ऐतिहासिक गरज निर्माण झाली आहे. वैयक्तित मतभेद वा मतांतरांना आत्ता स्थान नाही. या निमित्ताने एक संयुक्त समिती स्थापन करून ह्या आव्हानाला एकत्रित व कायमचे बंद करायला हवे आहे.
३) महाराष्ट्राबाहेरील चौबे-पांडे, त्रिवेदी, श्रीमाली टाईप उत्तर भारतीय ज्योतिषी अशा आव्हानांना तात्काळ बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्यांना समोरील पक्ष किती बनेल व धूर्त आहे याची नीट कल्पना नाही. मात्र मराठी लोकांना विरोधकांचे छक्केपंजे चांगलेच ज्ञात आहेत.
४) हुशारी हा निकष लावण्यातील त्यांची ‘हुशारी’ लक्षात घेण्यासारखी आहे. ८० टक्केवाला ढ, ९० टक्केवाला बरा व फक्त गणितात १०० गुण मिळवणारा खरा हुशार असे म्हणून ‘मार्कशीट’ वरून हुशारीची प्रतवारी करून / पाडून ज्योतिषीय अंदाज खोटे पाडण्यासाठी खेळी म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.
५) या ऐवजी असे निकष असावेत की जे तात्काळ व प्रत्यक्ष पडताळता येतील शिवाय ज्योतिषशास्त्रातही त्याची पडताळणी करण्यासाठी विशिष्ट असे आडाखे उपलब्ध असतील. (सहज सुचले म्हणून - आंधळा, पाय वा अन्य अवयव तुटका, पोलिओ, पांढरे कोडवाला व्यक्ती)
६) जो जिंकेल त्याला काय मिळणार?
अंनिस आणि पार्टी ही परिक्षा जिंकणार हे ठरवून ठेवलेले उत्तर असल्याने ‘ज्योतिषाचा धंदा कायदेशीररित्या बंद करावा’ ही अट स्वाभाविकपणे मान्य करायला लावणे ही त्यातली मेख आहे. ९० टक्यांखाली उत्तरे बरोबर आली तर ती लढाई ‘अनिर्णित’ झाली असून जोवर अंनिसकडून तिचा ‘निकाल’ लागत नाही तोवर ती खेळली पाहिजे, असा धर्मराजाला शेवटपर्यंत द्यूत खेळायला भाग पाडणारा व त्याला पुरते नागवले जाण्याला प्रवृत्त करणारा हा आधुनिक शकुनीमामांचा घाट आहे.
७) पण याही परिस्थितीत ज्योतिषांनी ही परिक्षा जिंकली तर?
अशी अट घालता येईल - अंनिस व त्यांच्या विचारांच्या जगातील सर्व संस्थांतर्फे ‘पराजयपत्र’ दिले जावे. शिवाय यापुढे अन्य कुठल्याही प्रांतात, नव्हे जगात कुठेही जर कोणी अशी परिक्षा करण्याची शक्कल काढेल तर त्याला डॉ. नारळीकर व डॉ. दाभोलकर त्यांच्या अखत्यारीतील सर्व ज्योतिषशास्त्र विरोधी संस्था जातीने ज्योतिषशास्त्राच्या बाजूने लढतील व ज्योतिष ‘शास्त्र’ कसे आहे याचे प्रात्यक्षिक करून त्यावेळच्या विरोधकांची तोंडे बंद करतील. असा लेखी ‘कबूलनामा’ त्यांनी द्यायला हवा. तसे काही न करता जर ही परिक्षा केली जाणार असेल तर ती क्रिकेटच्या कसोटी सामन्याप्रमाणे एक न संपणारी कसोटी ची मालिकाच ठरेल.
८) भविष्य काळात जर सर्व अटी मंजूर झाल्या तर अशा परिक्षेसाठी प्राचार्य अद्वयानंद गळतगे. मु. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. पिन – ५९१२६३. (फोन ०८३३८-२९३३९९ व मो. ०९८८६६७८१८३) यांना अन्य पंचांसमावेत नियुक्त केले जावे. ते पंच बनण्यासाठी अत्यंत लायक असण्याची दोन कारणे आहेत.
१. पूर्वी सांगलीत गिरिश शहांच्यातर्फे अशा तऱ्हेच्या ज्योतिष शास्त्राच्या कसोटीसाठी प्रा. अद्वयानंद गळतग्यांनी पंच म्हणून काम करण्याचे उत्स्फूर्तपणे मान्य केले होते. ‘त्यावेळी डॉ दाभोलकरांनी शहांना आव्हान देऊन पलायन केले’ असे वर्णन त्यांनी त्यांच्या ‘विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन’ या अंनिसच्या फसलेल्या मोहिमांवर आधारित पुस्तकात केले आहे.
२. प्राचार्य अद्वयानंद गळतग्यांनी १२-१३ वर्षापूर्वी डॉ. नारळीकरांना शास्त्रीय कसोटी करण्याला आवाहन करण्यासाठी लागोपाठ पाच सविस्तर पत्रे पाठवून मनधरणी केली होती. (ती पाचही पत्रे ‘बोध अंधश्रद्धेचा’ पुस्तकात समाविष्ट आहेत) त्यावेळी त्यांनी दाद दिली नव्हती. कदाचित त्यामुळे त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली असेल. कारण आता ते म्हणतात की बऱ्याच काळापासून त्यांच्या मनात असे करण्याचे घाटत होते!
-
सहमत
आपल्याप्रमाणेच मीही फलज्योतिष किंवा नाडीभविष्याचा समर्थक नाही. किंबहुना नाडीभविष्याबद्दल घाटपांडे यांनी विचारलेले प्रश्न तर्कशुद्ध आहेत आणि नाडीभविष्यवाले त्यांना समर्पक उत्तर न देऊन नाडीभविष्याची हानी करत आहेत हे माझे मत आहे. तसेच फलज्योतिषचिकित्सक पण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे टाळून फलज्योतिषचिकित्सेची हानीच करत आहेत. पुनरावृत्ती टाळण्यासाठी जुन्या लेखांचे संदर्भ देतो असे कारण ते देतात पण किती लेख ते पुन्हा पुन्हा या आणि दुसर्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करत आहेत याचा काही हिशेब आहे का? जोतिराव फुल्यांचे ज्योतिषविषयक विचार मिसळपावावर प्रसिद्ध केल्यावर इथे दुवा देऊन भागले असते पण इथेही तो लेख प्रसिद्ध केलाच. नाडीभविष्यवाल्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. माझा आक्षेप याला नाही. लेखकाची मर्जी. फक्त पुनरावृत्ती टाळणे हे कारण त्यांनी थोडक्यात आणि स्पष्ट उत्तरे देण्याचे टाळण्यासाठी पुढे करायला आक्षेप आहे कारण पुनरावृत्तीचे लेखकाला वावडे नाही. मलाही नाही. ब्रह्मसूत्रात "आवृति: असकृत् उपदेशात्|" असे एक ब्रह्मसूत्र आहे. गोषवारा अर्थ असा की "उपदेशाची पुनरावृती आवश्यक असते" (मला संस्कृत येत नाही तज्ज्ञांनी चुकले असल्यास योग्य अर्थ सांगावा).
विनायक
अंशतः सहमत
नाही. ते प्रतिसादाच्या उस्फुर्ततेवर अवलंबुन असते.
खर॑ तर तो मी पुर्वीच उपक्रमावर् प्रसिद्ध करावयास हवा होता. पण ते आळशीपणामुळे राहुन गेले. पर्स्पेक्टीव च्या निमित्ताने तो प्रसिद्ध केला एवढेच. उपक्रमींन अन्यत्र शोधावा लागु नये म्हणुन तातडीने इथेच प्रसिद्ध केला. दुवा क्लिकण्यापेक्षा पुढ्यात थेट उपलब्ध झाला तर सहजपणे वाचले जाते असा अनुभव आहे. अर्थात काही लोक दुवा क्लिकण्याचे कष्ट घेतात हा भाग वेगळा.
पुनरावृत्तीच वावडे नाही हे मान्य. काही वेळा काही लोकांसाठी पुनरावृत्ती हा दोष असतो तर काही वेळा काही लोकांसाठी तो पुनर्प्रत्ययाचा आनंद देतो. रेडिमेड उत्तरांपेक्षा दिलेल्या संदर्भातुन वाचकांनीच उत्तरे शोधावीत हा 'अमके वाचावे, तमके वाचावे ' सांगण्याचा उद्देश. शिवाय व्यक्ती म्हणुन आमचे काही पुर्वग्रह,गुणदोष आहेतच की
अवांतर-नाडीग्रंथाचा एकदा तरी अनुभव घ्यायला हरकत नाही. अगदी कॉमन मॅन म्हणुन कुणीही तो घ्यावा.
प्रकाश घाटपांडे
दुवा
मग तुम्हीच का दिला नाहीत तो दुवा तुमच्या लेखात? उगाचच ब्राह्मणांना झोडपणारा महात्मा वगैरे शब्दांचे डोलारे उभे करण्यापेक्षा एक दुवा देऊन काम झाले नसते का? प्रकाश घाटपांडे चिवट आहेत म्हणून त्यांनी लगेच तो लेखच इथे दिला. त्यात तुम्ही म्हंटलेले असे काही दिसलेच नाही, म्हणून राग आला का? झाकली मूठ झाकलेलीच राहण्यात फायद्याचे असते असे काहिसे असावे बहुदा.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
प्रक्रिया
चिकित्सा ही वैज्ञानिक दृष्टीकोण अवलंबण्याची प्रक्रिया आहे
प्रकाश घाटपांडे
शतशः धन्यवाद.
नमस्कार,
प्रथमत: उत्तरे देण्याचे करून माझ्यासारह्या तटस्थ उपक्रमकरांना उपकृत करणेबद्दल शतशः धन्यवाद.
आपण येथे लिहिलेली प्रतिक्रिया आणि त्यावर माझे उत्तर येथून पुढे.
अवांतर :
तूर्तास आपल्या चिकित्साकार्यामध्ये आणि आपल्या तथाकथित (त्रुटीपूर्ण?) वैज्ञानिक दृष्टीकोण अवलंबण्याच्या प्रक्रियापद्धतिमध्ये(?) विशेष रस आला असल्यामुळे नाडिज्योतिषाव्यतिरिक्त आपले इतर चिकित्सक विचार अभ्यासण्याचा मानस आहे. त्यावरही प्रश्न पडलेच तर तेही विचारण्याची मुभा असावी. उत्तरे देण्यास आपण सिद्ध असाल अशी आशा करू इच्छितो.
-
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
योग्य प्रश्न
श्री. हैयो हैयैयो यांनी योग्य (प्रति)प्रश्न विचारले आहेत. आणि त्याची उत्तरे चिकित्सकांपेक्षा नाडीअभ्यासक जास्त अधिकारवाणीने देऊ शकतील असे वाटते.
तेव्हा त्याची उत्तरे नाडीशात्राचे अभ्यासक/समर्थक देतील का?
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
धन्यवाद.
धन्यवाद.
श्री. ऋषिकेश सर, आपणांस मी येथे विचारलेले (प्रति)प्रश्न योग्य वाटले ह्याचे समाधान आहे. धन्यवाद. आपण म्हणतां तसे ह्या प्रश्नांची उत्तरे नाडिवाचक लोक अधिकारवाणीने देऊ शकतीलही. परंतु मी येथे आधीच म्हटल्याप्रमाणे; एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व चिकित्सकांस मान्य नसल्यास 'ती तशी अस्तित्त्वात नाही' असे सिद्ध करणे हे चिकित्सकाचे उत्तरदायित्त्व ठरते. नाडिग्रंथांच्याबाबतीत 'अस्तित्त्व दाखवा' असे आपण म्हणाल, तर नाडिवादी मंडळी अस्तित्त्व दाखविण्यास सिद्ध आहेतच. परंतु मग ती चिकित्सा कशी होणार?
थोडक्यात काय, तर सदरील प्रश्नांची उत्तरे नाडिग्रंथवादींनी दिली, तर त्यावर तुमचा विश्वास बसणार आहे काय? आणि जर तुमचा तसा विश्वास बसणार असेल, तर मग चिकित्सकांचे आणि त्यांच्या तथाकथित चिकित्साकांडाचे महत्त्व ते काय? चिकित्साकर्म हे आपण समजतो तेवढे सोपे नाही. बहुधा 'नाडिग्रंथ हे थोतांड आहे' असा शोध लागल्याच्या हर्षानंदामध्ये, माझ्यासारखी (तटस्थ) मंडळी प्रश्ने विचारण्यास धजावतील (नारळीकरांच्याकडून परिक्षण मिळवूनदेखील) ह्या शक्यतेकडे चिकित्सकमहोदयांचे दुर्लक्ष झाले असावे असे वाटते!
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
सहमत् आहे
ओकांचे नाडी ग्रंथांवरील माहिती मिळवण्याचे काम, त्यांनी स्वतः घेतलेले वेगवेगळ्या नाडीग्रंथांचे अनुभव या बाबी सकारात्मक आहेत. त्यांच्या मताशी सहमत नसणे ही बाब भिन्न आहे. ओकांचे लेखन आपल्याला खालील दुव्यांवर पहाता येईल
http://marathi.mywebdunia.com/authors/c2hhc2hpb2Fr/articles/latest/?
प्रकाश घाटपांडे
सहमत नसणे ही बाब.
सहमत नसणे ही बाब.
श्री. ओक सरांचे नाडिग्रंथांवरील माहिती मिळवण्याचे काम, त्यांनी स्वतः घेतलेले वेगवेगळ्या नाडीग्रंथांचे अनुभव या बाबी काहीही असू शकतात. त्यांच्या मताशी आपण सहमत असलेच पाहिजे असा मला आग्रह नाही. एखाद्याच्या मतांशी सर्वसकटपणे प्रत्येकाने सहमत असणे शक्य नसते हे भान मी ठेवून आहो. विशेषतः चिकित्सकाने इतर कोणाच्याही-काहीही मतांशी सर्वसकटपणे सहमति अथवा असहमति दर्शविणे हे चिकित्सेसाठी योग्य नव्हे कारण असे केल्याने ती चिकित्सा ही मताधारित होण्याचा धोका असतो. पर्यायाने चिकित्सकाच्या स्वतःच्याच चिकित्साकार्याचे महत्त्व संपुष्टात येते. असो.
एखाद्याच्या मतांशी आपण वैयक्तिकरित्या सहमत नसाल, तर काही प्रत्यवाय नाही. परंतु एक चिकित्सक ह्यादृष्टीने आपण असहमत असाल, तर आपण स्वतः माहिती मिळविणे, स्वतः वेगवेगळे अनुभव घेणे हे कष्ट करून ह्यावर आधारित सार्थ उदाहरणे देऊन आपण कां असहमत आहात, ते स्पष्ट करणारे सार्थ आणि शास्त्रीय निष्कर्ष मांडणे आवश्यक ठरते.
सध्यापुरते श्री. ओक सरांचे लेखन विचारात घेत नाही. कारण आपण त्यांच्या लेखांची चिकित्सा केली असे मला आपल्या लेखांवरून वाटत नाही.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
ओकांचे लेखन
ओकांचे लेखन हे विचारात घेतल्या शिवाय नाडीग्रंथाच्या माहिती आधारे केलेल्या दावा वजा अनुभवाची चिकित्सा करता येत नाही .
ओकांच्या लेखना शिवाय
अमृततुषार - आत्मानंद ,यशवंत प्रकाशन पुणे
नाडी ग्रंथ एक अभ्यास - शांताराम आठवले अंजली पब्लिशिंग हाउस पुणे
ही पुस्तके जुनी आहेत व उपलब्ध आहेत
प्रकाश घाटपांडे
श्री. ओक ह्यांचे लेखन आणि इतर.
श्री. ओक ह्यांचे लेखन आणि इतर.
आपल्या ह्या विधानास सुसंगत अशा माझ्या काही शंका आहेत.
असे आपण आता सर्वांसमोर मान्य करता, परंतु आपल्या लेखाचा प्रारंभच मात्र आपण "नाडी ज्योतिष हे नेमके काय शास्त्र आहे याचा ओझरता उल्लेख सुद्धा जुन्या ज्योतिषग्रंथात आढळत नाही" अशा वाक्याने करता. वरील पुस्तकांचा शोध आपणांस नव्यानेच लागला असेल असे आपली 'चिकित्सक' ही पदवी अवलोकिता जाणवत नाही. आपल्या चिकित्सेत मांडल्या जाण्यार्या विचारांच्या सोयीसाठी ही माहिती आपण पूर्वी दडवून ठेवली होती असे कोणी आरोपिल्यास आपले काय म्हणणे आहे?
तेंव्हा एकुणात, आपल्या चिकित्सेवर (आणि त्यातून मांडलेल्या सिद्धांतावर) आम्ही काय म्हणून विश्वास ठेवावा?
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
चिकित्सक मत
दोन्ही चा प्रयत्न केला आहे. ओकांच्या पुस्तकातुनच् नाडीग्रंथाचा व त्यातील चमत्कारांचा प्रथमतः परिचय होतो . नाडीग्रंथ ओकांमुळे विशेष लोकप्रिय झाले. अगोदर लोकांना अनुभव घ्यायला मद्रास प्रांतात जावे लागे आता महाराष्ट्रातही नाडीकेंद्र झाली आहेत.
हा प्रश्न टिपीकल आहे. तुम्ही ज्योतिषी व्यक्तीची चाचणी घेत आहात कि ज्योतिषशास्त्र या विषयाची असा प्रश्न ही चाचणीत विचारतात. चुकला तर ज्योतिषी चुकला कारण ती व्यक्ती आहे आन बरोबर आल तर फलज्योतिष बरोबर आल कारण ते शास्त्र आहे असा युक्तीवाद नेहमी ज्योतिषी करतात.
वाटते ना! उपाय म्हणजे इतरांनीही ओकांची पुस्तके वाचावीत आणि नाडीग्रंथाचा अनुभव घेउन त्याची चिकित्सा करावी
चौथ्या. प्रथम जातक नंतर् भाविक समर्थक नंतर अभ्यासक नंतर चिकित्सक. कारण विचार करण्याच्या पद्धतीत हळु हळु बदल झाला.म्हणुनच पुस्तक लिहावेसे वाटले.
केवळ मताधारित नाही तर तर्क, अनुभव व अभ्यास या आधारित तो प्रवास झाला.
उत्तर क्रमांक २ नुसार
ग्रंथ शब्द हा जुन्या म्हणजे आर्यभट वराहमिहिर भास्कराचार्य .. अशा जुन्या ग्रंथकारांच्या ग्रंथांबद्दल आहे. वर उल्लेखलेली पुस्तके जुनी म्हणजे १९६७-७० च्या काळातील आहेत. ओकांच्या पुस्तकापेक्षा जुनी अशा अर्थाने.
विश्वास ठेउच नये कारण आपणही स्वतः चिकित्सा करावी व नंतर मत बनवावे. कुणी तरी सांगतय म्हणून ते प्रमाण मानण्यापेक्षा त्याचा फक्त संदर्भ म्हणुन वापर करुन स्वतः चिकित्सा करावी असा संशयवाद सांगतो. चमत्काराच्या मागचा कार्यकारण भाव उघड झाल्यावर चमत्कार हा चमत्कार राहत नाही.
प्रकाश घाटपांडे
बापरे! हैयो हैयैयो!
बापरे! हैयो हैयैयो! असे तुम्हाला खरेच वाटते आहे काय? प्रकाश घाटपांडे ह्यांनी आणखी नक्की काय करायला हवे? आणखी किती वेळा किती ठिकाणी एखाद्याने दगडावर डोके आपटायचे!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
होय.
होय.
होय मला खरेच असे वाटते.
आपण ज्याला डोके आपटणे म्हणतां त्यास ते चिकित्सा म्हणतांत, म्हणून मीही चिकित्सा म्हणतो.
निदान त्यांच्याच स्वतःच्या चिकित्सेची पूर्ति होईपर्यंत तरी श्री. घाटपांडे सर ह्यांनी माझ्या प्रश्नांस समर्पक आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत अशी माझी त्यांच्याकडे नम्र विनंती आहे.
धन्यवाद.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
अंगठ्याच्या ठशाच्या युनिकनेस बाबत...
अंगठ्याचे ठसे युनिक असतात ह्या मधे एक् गृहितक दडलेलं आहे असं मला वाटतं.
ते असं की ठसे तपासणार्या सर्व संस्था ठश्यांचे ठराविक पैलूच (स्टँडर्ड पॅरॅमिटर्स) तपासत असतील्.
पोलीस आणि नाडीवाले ठश्यांचे वेगवेगळे पैलू तपासत असतील् तर् "अंगठ्याचे ठसे युनिक असतात. म्हणून नाडीपट्टी पण एकच असली पाहिजे" या विधानाला अर्थ रहात नाही. असं जर विधान करायचच असेल तर् नाडीवाले ठश्यांमधे काय बघतात हे आधी माहित करून् घेतलं पाहिजे.
उद्या जर नाडीवाले असं म्हणाले की आम्ही फक्त रेषांची जाडीच् बघतो आणि रेषांची जाडी समान असलेले अनेक ठसे असू शकतात तर त्यात चूक काय्? भले त्यांची ठसे बघण्याची पद्धत रूढ अर्थाने अशास्त्रीय, नॉन् स्टँडर्डाइज्ड् असेल पण् त्यांचा युक्तिवाद खोडून् काढता येत् नाही आणि "ठश्यांच्या युनिकनेस" चा मुद्दापण गळून पडतो.
अर्थात हे माझं मत आहे..
ठराविक पैलू.
ठराविक पैलू.
श्री. भटका सर ह्यांनी एक महत्त्वाचे गृहितक येथे मांडले आहे. त्याची सत्यासत्यता काय हा विचार नंतर करता येईल. तूर्तास, ह्या गोष्टीवर आता विचार करून कुणी एक व्यक्ति आपले स्वतःचे असे स्वतंत्र मत मांडू शकते ह्याचे समाधान आहे. परंतु हे कार्य चिकित्सकमंडळींकडून पूर्वीच होणे अपेक्षित होते.
ते तसे त्यांच्याकडून झाले असते, तर निश्चितच अधिक समाधान झाले असते.
-
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
मुद्दा
१) आंगठ्याचा ठसा युनिक असतो
२) नाडीपट्टी युनिक असते. पट्टीवरील वर्णन केलेली व्यक्ती एकमेव असते
३) आंगठ्याचा ठसा हे पट्टी हुडकायचे साधन असते. आंगठ्याच्या ठशावरुन कुठले निकष लाउन हुडकायची हे तो सांगत नाही.आंगठ्याच्या ठशाचा माग काढत जर तो पट्टी पर्यंत पोहोचत असेल तर इतर प्रश्न का विचारायला लागतात? म्हणजे केवळ आंगठ्याचा ठशावरुन तुमची पट्टी शोधुन तुमचे भुत भविष्य वर्तमान त्यात असते असे सांगणे हे संशयास्पद आहे.
समांतर- पाच हजार वर्षापुर्वी ऋषी मुनींनी तुमचे नांव, तुमच्या बायकोचे नांव, वडिलांचे नांव, तुमची कुंडली ही लिहुन ठेवली आहे हे आपणास विश्वसनीय वाटते का?
प्रकाश घाटपांडे
नंदन निलेकणींशी बोलायला हवे.
खरेच की काय? नंदन निलेकणी ह्यांनी केंद्र सरकारच्यायुनीक आयडी प्रकल्प" style="text-decoration: none; color: rgb(0, 51, 255);"> युनीक आयडी ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ह्या नाडीवाल्यांची मदत घेता येईल काय? कुणीतरी निलेकणींशी बोलायला हवे. प्रचंड प्रमाणात खर्च वाचेल असे म्या अडाण्याला वाटते. नाडीच्या मदतीने येत्या पिढ्यांचे युनीक आयडीही काढून ठेवता येईल. कृपया जाणकारांनी ह्यावर भाष्य करावे, ही विनंती.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
समांतर चिकित्सा.
समांतर चिकित्सा.
उपक्रम सारख्या संकेतदळावर अशा प्रकारे अपरिपूर्ण माहिती देवून, एखाद्या विषयावर लोकांची मते मागवून त्यावर आधारून आपले विचार मांडणे ह्याला समांतर चिकित्सा म्हणतांत कां?
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
तुम्हाला माझा मुद्दा खरच समजला का?
>>१) आंगठ्याचा ठसा युनिक असतो.
परत तेच. कुठल्या निकषांसाठी ठसा युनिक असतो? आता तुम्हाला समजेल अश्या भाषेत मांडतो.. समजा माझ्या सोयीसाठी मी "अंगठ्याच्या ठश्याची रुंदी" हा एकच निकष वापरत असेन तर् एकच रुंदी असलेले अनेक ठसे मिळतील. अश्या परिस्थीतीत "अंगठ्याचा ठसा युनिक असतो" असा तुम्ही कितीही टाहो फोडलात तरी माझ्या लेखी त्याची किंमत शुन्य. कारण एकच रुंदी असलेले १० ठसे माझ्या समोर पडले आहेत्. म्हणूनच जर नाडीवाले पोलिस वापरतात तसले कुठलेच निकष वापरत नसतील् तर् "अंगठ्याचा ठसा युनिक असतो" या विधानाला अर्थ रहात नाही.
नाडीवाले ठसे तपासण्यासाठी कुठले निकष वापरतात हे तर् आधी माहित करून् घ्या..ते निकष चुकीचे असतील्, अत्यंत बिनडोक् असतील् पण् तो वेगळा मुद्दा झाला
"नाडीवाल्यांचे ठश्यांसाठीचे निकष्" माहीत नसताना अजूनही जर तुम्ही "आंगठ्याचा ठसा युनिक असतो." हाच मुद्दा ताणणार असाल तर् नाईलाजाने असं म्हणावं लागेल् की एकतर् तुम्हाला अजुनही मुद्दा पूर्णपणे समजला नाही आहे किंवा तुम्ही "बायस्ड" आहात.
"समांतर- पाच हजार वर्षापुर्वी ऋषी मुनींनी तुमचे नांव, तुमच्या बायकोचे नांव, वडिलांचे नांव, तुमची कुंडली ही लिहुन ठेवली आहे हे आपणास विश्वसनीय वाटते का?"
हा प्रश्न मला विचारायच कारण समजलं नाही..माझं उत्तर काहीही असलं तरी वरील मुद्याशी त्याचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. म्हणून् या प्रश्नाकडे दुर्लक्ष.
यत्र् तत्र नाडी
थोडक्यात नाडी वाल्या कडून त्याबद्दल माहीती मीळायाला हवी.
ज्योतिष
डेरेन ब्रोवुनचे एक ज्योतिरश्यावर आधारीत सुन्दर चलचीत्र.
दुवा :ज्योतिष" style="text-decoration: none; color: rgb(0, 51, 255);">ज्योतिष
भारतात "प्रायव्हसी लॉज्" काय म्हणतात?
बर्याच लोकांच्या न कळत व त्यांच्या लिखीत परवानगीशिवाय त्यांची खाजगी माहीती साठवण्याचा व त्याचा व्यावसायीक कारणाकरता (पैसे कमवायला) उपयोग करायचा अधिकार नाडीकेंद्रांना आहे का?
कायदा काय म्हणतो? वकील असल्याने श्री. हैयो हैयैयो यांना कदाचित आधिक माहीती असेल.
कोणी जाणकार खुलासा करु शकेल का?
सिद्ध करून दाखविता आल्यास.
सिद्ध करून दाखविता आल्यास.
न्यायशास्त्राचा एक अभ्यासक म्हणून आणि 'वकील असल्याने मला आधिक माहीती असेल' ह्या शब्दांत आपण माझ्यावर असलेला आपला विश्वास व्यक्त केला म्हणून हा खुलासा खालीलप्रमाणे करू इच्छितो:
'असा अधिकार नाडिकेंद्रांना आहे का' हा प्रश्नः
१. ही माहिती नाडिकेंद्रांकडून लोकांच्या नकळत - लिखित परवानगीशिवाय साठविली जाते असे उदाहरणांसह सप्रमाण सिद्ध करतां आल्यास, आणि
२. ही माहिती ज्यांच्याबाबतीतली आहे, त्यांच्या बाबतीत ती पूर्णत: बरोबरच आहे असेही उदाहरणांसह सप्रमाण सिद्ध करतां आल्यास, आणि
३. त्याचा व्यावसायिक कामाकरिता उपयोग केला जातो असा आरोप करून तोही उदाहरणांसह सप्रमाण सिद्ध करण्यात आल्यास
त्यानंतर विचार करता यावयाचा आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे साहजिकच चिकित्सकांच्या कक्षेत येते. तूर्तास तरी काही अनाकलनीय कारणाच्या भयापोटी आपल्या चिकित्सकमंडळींचे चिकित्साकर्म मंदावलेले दिसते.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
पण
>त्यानंतर विचार करता यावयाचा आहे.
अहो ते नाडीकेंद्रवाले असा दावा करतात ना, की त्यांच्याकडे आधीपासूनच कूटलिपीत माहीती आहे व हवी असल्यास पैसे देउन मिळवा? इतर ज्योतिषवाले निदान पत्रिकामांडून (पत्रिका मांडायचे शास्त्र गुप्त नाही आहे, त्याचा अभ्यासक ते शिकू शकतो) ग्रहस्थिती बघुन भविष्य वर्तवतात. नाडीवाले दावा करतात कि कोणीतरी आधीपासुनच सगळे वैयक्तिक ओळखुन व ती माहीती साठवून आहे. बरोबर? का काही समजण्यात चूक होते आहे?
करेक्ट !
नाडीकेंद्रवाले असा दावा करतात ना, की त्यांच्याकडे आधीपासूनच कूटलिपीत माहीती आहे व हवी असल्यास पैसे देउन मिळवा?
अगंठ्याचा छाप, जन्मतारीख आणि पैसे दिल्यावर नाडीपट्टीवर भाकिते उमटत असतील असे वाटते.
तो पर्यंत कुटलिपीतील भाकिते अन्य कुणाला वाचता येत नसतील असे वाटते. च्यायला अवघड होत चालला हा विषय. अनुभव घेतला नसल्याने हा प्रकार ढोंग आहे, असे आत्ताच म्हणनार नाही. बाकी चालू द्या....!
-दिलीप बिरुटे
वाटणे, अनुभव आणि चिकित्सा.
वाटणे, अनुभव आणि चिकित्सा.
चिकित्सेत जोपर्यंत तसे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या 'वाटण्याला' काही महत्त्व नाही.
ह्या विषयाकडे माझ्यासारखे तटस्थ दृष्टिकोनातून बघा, सोपा वाटू लागण्याची एक शक्यता आहे!
आपल्या निर्मल प्रतिक्रियेचे स्वागत आहे. आपल्यासारखेच मत आमचे चिकित्सक मंडळींचे होते, तर समाधान झाले असते.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
अहो तोच तर विषय आहे!
अहो तोच तर विषय आहे!
त्यांचा तो दावा खोडून काढणे ही सर्वथा चिकित्सकांच्या कार्यकक्षेतील बाब आहे.
त्यांचा तथाकथित दावा समजण्यात आपल्याकडून काहीएक चूक होत नाही असे मला माझ्या समजुतीवरून वरकरणी वाटते आहे. परंतु 'त्यांचेकडे आधीपासूनच कूटतमिळलिपीत माहिती उपलब्ध आहे' हा दावा सत्य आहे की असत्य ह्याची चिकित्सकांकडून शास्त्रशुद्धरित्या पडताळली गेली तर तेथून पुढचा आपण म्हणतां तसा विचार करता येतो.
चिकित्सकांकडून काय चिकित्साकर्म झाले आहे, ते एवढ्यावरूनच ओळखावे, आणि त्या चिकित्साविचारांवर काय विश्वास ठेवावा, ह्याचा विचार व्हावा.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
चमत्कार.
चमत्कार.
नमस्कार,
श्री. ओक सर ह्यांनी लिहिलेल्या ’भरकटलेली चर्चा’ ह्या लेखांत ’धनंजय ह्यांनी पट्टीत शशिकांत हे नाव कसे लिहिलेले आहे ह्याचे प्रात्यक्षिक देवून लिखाणाला दुजोरा दिला आहे’ असे लिहिले आहे. ह्यातील तमिळ अक्षरांबाबत आणि त्यांच्या लेखनाबाबत श्री. धनंजय सर ह्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या माहिती देवून मला काही प्रश्न विचारले होते. त्यावरील बरीच चर्चा आणि उत्तरे ह्या विषयास सुसंगत असल्याकारणाने त्या प्रश्नांची उत्तरे येथे खालीलप्रमाणे देणे करतो आहे.
श्री. धनंजय सर मला असे लिहितांतः
येथे श्री. धनंजय सरांचे लिहिणे संपते आणि ह्यावर मी माझे मत व्यक्त करणे त्यांना अपेक्षित आहे.
त्यांच्या म्हणण्यांप्रमाणे ’चमत्कार’ ह्या शब्दाची एक विशिष्ट अशी व्याख्या सर्वमान्य होईपर्यंत तर्क सर्वथा निष्फल आहे. वाचकांस माझे मत ह्यापेक्षा थोडेसे भिन्न वाटेल, परंतु ते तसे भिन्न नाही. येथे माझे मत मी एका उदाहरणाद्वारे नोंदवू इच्छितो जेणेकरून मला काय म्हणावयाचे आहे ते वाचकांस सुलभ शब्दांत कळणे शक्य होईल.
कोणत्या घटनेस अथवा वस्तुस सिद्ध होईपर्यंत 'चमत्कार' असे संबोधावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. उदाहरणार्थ : रैट बंधुंनी प्रथमत: विमान उडविले असता त्यास आरंभी सामान्य जनते कडून ’चमत्कार’ (Miracle) असे संबोधण्यात आले होते. येथे ह्या उदाहरणापुरते पाहिले तर असे लक्षात येईल की वास्तविक पाहता ’विमान उडवणे’ हा सामान्यजनांसाठी जोपर्यंत ते कसे उडते हे शास्त्रीयरित्या कळत नाही केवळ तोपर्यंतच चमत्कार होऊ शकतो.
तात्पर्य काय की 'चमत्कार' आहे अथवा नाही ह्या विषयास बाजूला ठेवून एकदा का त्यामागील कारणमीमांसा अभ्यासिली गेली की त्यातील ’चमत्कृती’ संपुष्टात येते.
नाडिग्रंथ आणि नाडिज्योतिष ह्याबाबतसुद्धा ह्याप्रकारचा कारणमीमांसेचा अभ्यास होणे थोडे कठीण वाटत असले, तरी आवश्यक आहे. असा अभ्यास झाला आणि कारणमीमांसा तथा कार्यपद्धति कळली, तर पुढे चमत्काराचे अस्तित्त्व मान्य करावयाचे की अमान्य करावयाचे हे ठरविता येईल. हा अभ्यास तटस्थ चिकित्सकांकडूनच होणे शक्य आहे. 'चमत्कार' अस्तित्त्वांत नसतो असे विधान ठोकून देवून केवळ विरोधाकरिता विरोध करून त्यांस ’चिकित्सा’ केली असे म्हणणार्या चिकित्सकांकडून असा अभ्यास होणे कदापि शक्य नाही.
असो. मी "चमत्कारा"ला दुजोरा दिला होता असे श्री. धनंजय सर ह्यांना अंधुक आठवते त्याबद्दलः
येथे झालेल्या चर्चेमध्ये श्री. ओक सर ह्यांनी 'हा घ्या चमत्काराचा पुरावा' असा प्रतिसाद नोंदवला होता. त्यातील तमिळ अक्षरांबाबत मी माझे मत नोंदवले आहे. ह्या नोंदविलेल्या मतामध्ये मी कोणत्याही चमत्कारास दुजोरा दिला असे मला वाटत नाही. इतर कोणास वाटत असल्यास तसे मला कळवावे. श्री. ओक सरांनी जे प्रकाशचित्र चढविले आहे, त्यात त्यांनी 'चमत्काराचा पुरावा' असे म्हणून तमिळ अक्षरांस निर्देशिले आहे. एक अधिवक्ता म्हणून ती अक्षरे (चमत्कारास बाजूस ठेवून) पुरावा म्हणून विचारात घेतली जाऊ शकतांत असे माझे मत आहे.
नाडिग्रंथ आणि नाडिज्योतिष हे माझ्यामते चमत्कार आहेत काय, ह्या प्रश्नाचे उत्तर वाचकांस माझे वरील विवेचन वाचून आपसूकच उमगेल असे वाटते.
--
हैयो हैयैयो!
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
श्री. धनंजय सर आणि माझ्यामधील संवाद - १.
श्री. धनंजय सर आणि माझ्यामधील संवाद - १.
श्री. धनंजय सरांनी माझ्या एका प्रतिसादातील एका वाक्यावर आपत्ती दर्शवून मला येथे वैयक्तिकरित्या लिहिले होते. त्यावरील बरीच चर्चा आणि उत्तरे ह्या विषयास सुसंगत असल्याकारणाने त्या प्रश्नांची उत्तरे येथे खालीलप्रमाणे देणे करतो आहे.
---श्री. धनंजय सरांची खरड १.---
---खरड १ समाप्त.---
***खरड १स माझे उत्तर १.***
नमस्कार,
समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केल्यास हा प्रकार अजिबात कठीण नाही.
ह्या प्रश्नाचे उत्तर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून द्यावयाचे झाल्यास, जोपर्यंत त्रुटी आढळतात तोपर्यंत चिकित्सापूर्ति झाली असे मला सामान्यतः वाटत नाही. एखाद्या शास्त्रीय सिद्धांतात आपणांस त्रुटी आढळल्या, तर आपण तो शास्त्रीय सिद्धांत मान्य कराल काय? त्या विषयाचा सर्वांगपरिपूर्ण अभ्यास केला गेल्याशिवाय तो त्रुटीपूर्ण सिद्धांत मान्य करणे कोणत्या शास्त्रीय निकषांस मान्य आहे ह्याचे उदाहरण देवून त्या उदाहरणाचे विवेचन करून सिद्धता समजावून सांगावी.
येथे काही वाद आहे असे मला वाटत नाही, आणि वाद असलाच, तर तो टोकाचा नाही. आपण ज्याला 'वाद' असे म्हणतां त्याला मी 'आग्रह' असे म्हणतो. चिकित्साशास्त्र प्रत्यक्ष अनुभूतिस अमान्य करते असे आपले म्हणणे आहे काय?
येथे एक प्रश्न आपणाकरिता : लेखकाची मते वैयक्तिक असती तर आपणांस आपण म्हणतां तसे वाटले असते काय? येथे अनेक सदस्यांनी आपापली वैयक्तिक मते विविधप्रकारे मांडली आहेत, आणि मी त्यांच्या त्या वैयक्तिक मतांबद्दल एक चकार शब्ददेखील बोललेलो नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. प्रत्येक मनुष्याची सर्वच्या सर्व मते एकसारखी असणे शक्य नाही हा सिद्धांत मी जाणून आहो.
ह्याचे उत्तर 'मान्य आहे' असे आहे. अनुमानास प्रमाण म्हणून अमान्य केल्यास भयंकर तोटे होऊ शकतात ह्याबद्दल कोणाचे दुमत असू नये. परंतु हे प्रमाण सर्वसकट लागू करतांना समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून एका गोष्टीचा विचार होणे आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, प्रयोगशाळेतली तत्त्वे ही प्रयोगशाळेबाहेर (विशेषत: समाजशास्त्रात) सर्वसकटरित्या लागू होत नाहीत. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून (आठवा : जनहितार्थ) चिकित्सा करताना समाजशास्त्रीय तत्त्वे विचारात घेणे अधिक सयुक्तिक ठरते. असो.
जोपर्यंत आपले सिद्धांत त्रुटीपूर्ण आहेत, तोपर्यंत ते सर्वमान्य होणे शक्य नाही हे लक्षात घेवून आपल्या वैयक्तिक अनुमानास 'चिकित्सा' अथवा 'सिद्धांत' असे शब्दप्रयोग करून संपूर्ण समाजावर आग्रही रीतिने लादणे हे योग्य नव्हे. आपल्या सिद्धांतातल्या त्रुटी जर कोणी दाखवून दिल्या, तर पलायनवाद स्वीकारणे हेही योग्य नव्हे. आपल्या मतांमध्ये-सिद्धांतांमध्ये कमतरता असेल, आणि जर कोणी तसे दाखवून दिले, तर लेखकाने ते प्रांजलपणे मान्य केलेच पाहिजे, कारण चिकित्सा ही आग्रही नसते. येथे तर मला केवळ दुराग्रह दिसतो आहे. आपण पाहिलेच असेल माझ्या प्रश्नांकडे कसे चक्कन् दुर्लक्ष करण्यात आले होते ते!
असो. लेखकाने 'नाडिशास्त्र थोतांड आहे' हे आपले वैयक्तिक मत आहे असे प्रतिपादन केले असते तर त्यांचे मत विचारात घेण्याचे काहीएक कारण नव्हते. परंतु 'चिकित्सा' हा शब्दप्रयोग आणि पुस्तक लिहिणे - आग्रही मते आक्रमक पद्धतीने मांडणे - नारळीकरांसारख्या मान्यवरास बोलावून परिक्षण लिहून घेणे असे कर्म(!) ह्यामुळे ह्या चिकित्सेवर चिकित्साविचार करणे भाग पडते.
मला एक विशेष आश्चर्य राहून राहून वाटते ते असे, की नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाला सुद्धा, मला पडतात तसे साधेसरळ प्रश्न पडले नसतील काय? अर्थात, आपणांस पडद्यामागच्या हालचालींचा नुसता वेधच घेता येतो!
पण प्रत्यक्षात दिसतात त्या गोष्टीही काही कमी बोलत नाहीत!!!
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
हैहैयो चे विचार मुद्देसुद आहेत
प्रतिसाद संपादित.
श्री. धनंजय सर आणि माझ्यामधील संवाद - २.
श्री. धनंजय सर आणि माझ्यामधील संवाद - २.
खरड १स मी दिलेल्या उत्तरावर श्री. धनंजय सरांनी खरड २ लिहून काही नवे प्रश्न उपस्थित केले, ते आणि त्यावर माझे विचार येणेप्रमाणे:
---श्री. धनंजय सरांची खरड २:---
---खरड २ समाप्त---
***खरड २स माझे उत्तर २.***
- आता कसे बोललात! खरे आहे, चिकित्सकाला ह्याविषयीचे ज्ञान होणे एवढे जरी झाले तरी ते चिकित्सेसाठी महत्त्वाचे आहे. हे ज्ञान झाल्यास चिकित्सा योग्य मार्गाने चाललेली आहे असे एका अर्थाने म्हणता येते. कारण मग ही चिकित्सा दुराग्रही न होता लवचिक होते. समाजशास्त्रीय विचारांमध्ये खरा चिकित्सक ’मी म्हणतो तेच आणि तेवढेच सत्य आहे, त्याशिवाय सत्य काहीच नाही आणि किंबहुना मी म्हणतो त्याशिवाय सारे असत्य आहे.’ असे विधान करूच शकत नाही. त्याचे कारण ’कुठलेही ज्ञान कधीही पूर्ण नसते, कारण जितके समजू तितके अधिक समजण्यालायक आहे’ हे ज्ञान होय. तरीही त्याने असे विधान केलेच, तर ते स्वीकारण्यापूर्वी त्या विधानाचा सर्वांगपरिपूर्ण चिकित्साअभ्यास होणे आवश्यक आहे.
येथे चिकित्सेच्या नावाखाली आपणांस वर म्हटल्याप्रमाणे अत्यंत टोकाचा ’मी म्हणतो तेच खरे’ असा विचार अत्यंत आग्रही आणि आक्रमक पद्धतिने मांडलेला प्रथमदर्शनात दिसेल. ह्या सिद्धांतात ’सर्वज्ञता मिळण्यापूर्वी कार्य करण्यास दिशा देणारे सर्वाधिक ठोस नियम’ जे काही असावेत ते मुख्यत: ठिसूळ माहितीवर आधारीत असावेत असा माझा प्राथमिक अंदाज (लेखकाचे लेख वाचून) झाला होता. माझा अंदाज चुकीचाही असू शकतो, असा विचार करून लेखकांस विचारावे असे म्हणून मी काही प्रश्न विचारले तेंव्हा लेखकाने दिलेल्या ब-याचशा उत्तरांवरून असे लक्षात आले की त्यांचा सिद्धांत हा मुख्यत: ऐकीव माहितीवर आधारलेला, ठोस स्वानुभवाचा संपूर्ण अभाव असलेला, आणि अभ्यासशून्य आणि त्यामुळे एकुणात त्रुटीपूर्ण असा आहे. आता त्रुटीमध्ये सुधारणा होऊ शकतात, आणि त्या तशा केल्या गेल्या, तर सिद्धांतास अधिक प्रखर प्रामाण्य येते असे माझे मत आहे. (आपण दिलेल्या दोन उदाहरणांवरून आपलेही तसेच मत असावे असे सामान्यत: वाटते.) पण हे ह्या लेखकांस कोण सांगणार? येथे तर शुद्ध हेकेखोरपणा दिसतो आहे.
असो. लेखकाचा श्री. ओक ह्यांच्या मतांशी व्यक्तिगत वाद होता किंवा आहे असे त्यांनी लिहिलेल्या 'बहुरंगी वग' नामक लेखावरून वाटते. चिकित्सा ही अशी व्यक्तिगत पातळीवर उतरली की मग तिचे महत्त्व फोल होऊन बसते असे मला वाटते. ह्याबाबतीत आपले मत माझ्यापेक्षा भिन्न आहे काय?
- - -
- - -
प्रथमत: ह्या विषयापुरते बोलावयाचे झाले तर चिकित्सेमध्ये ’वाटणे’ चालणार नाही, ’असणे’, किंवा ’नसणे’ हे माहिती-उदाहरणे-पुराव्यांसहित हवे असणार आहे. वरील विधान हे चिकित्सकाकडून केले गेले असल्यास, जोपर्यंत ह्या विधानास अभ्यासपूर्ण माहिती-उदाहरणे-पुरावे इत्यादींसहीत पुष्टी मिळत नाही, तोपर्यंत ते विधान जसेच्या तसे स्वीकारणे हे चिकित्सेस योग्य नाही. सामान्यजनांनी सामान्यगणितावर आधारून हेच विधान केले, तर एकवेळ त्याबाबतीत सामान्य दृष्टिकोनातून वेगळा विचार केला जाऊ शकतो. परंतु एकदा कां चिकित्सा असे म्हटले, की त्या विषयाचे सामान्यपण संपुष्टांत येते. त्यामुळे सामान्यगणितातली सामन्य अथवा असामान्य अनुमाने ही चिकित्सेमध्ये चालत नाहीत.
ह्या विधानांबद्दल मी काही टिप्पणी करण्यापूर्वी सदर चिकित्साकांडाचे लेखक काय म्हणतांत हे बघणे योग्य ठरेल.
ह्यावरून आपणांस काय म्हणावयाचे आहे त्याचा बोध होत नाही. चांगले अनुभव आले म्हणजे विश्वास ठेवावयाचा कां? असे असेल तर चिकित्सेची आवश्यकता ती काय?
आपण काय किंवा मी काय, एका व्यक्तीस एकट्यास चिकित्सा करावयाची म्हटले, तर अनुभव घेण्यास द्यावे लागणारे मूल्य हे अधिक वाटणारच. परंतु पाठीमागे (पाठीशी नव्हे!) जर एखादी पुरस्कर्ती संस्था भरभक्कमपणे उभी असेल, तर त्या मूल्याची काळजी करणे आपले काम नसते! कसे म्हणतां?
भविष्य सांगण्याचे शेकडो प्रकार काय आणि ते मनोरंजनाचे साधन आहेत की नाहीत किंवा कसे हा ह्या विषयासंदर्भात चर्चिण्याचा विषय नव्हे. आपले वैयक्तिक अनुमान आणि त्याच्या सत्यासत्यतेबद्दल ह्या ठिकाणी विचार करणे व्यर्थ आहे.
जर माझ्या पाठीशी (पाठीमागे नव्हे!) एखादी पुरस्कर्ती संस्था भरभक्कमपणे उभी असेल, तर मला आपले आमंत्रण स्वीकारण्यास स्वारस्य वाटू शकण्याची शक्यता आहे.
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
चिकित्सा म्हणजे काय
तुम्ही म्हणता :
हा प्रकार उदाहरणासह समजावून सांगता काय?
"असणे" आणि "नसणे" या गोष्टी जवळजवळ नेहमी वैयक्तिक अनुमानितच असतात. (सामान्य भाषेत "मला वाटते" अशा प्रकारची वाक्ये.) प्रत्यक्ष नसतात. प्रत्यक्ष म्हणजे फक्त डोळ्यांपुढील रंगीबेरंगी ठिपके, कानांमध्ये गुंजन करणारे क्षणाक्षणाचे ध्वनी, जिभेवर या क्षणी भासणारी चव, घ्राणेंद्रियाला या क्षणी येणारा वास, त्वचेला या क्षणी जाणवणारी संवेदना, वगैरे. या सर्वांची स्मृतीसुद्धा अनुमानितच असते, प्रत्यक्ष नसते. म्हणजे या क्षणापूर्वी मला समोर काही प्रकाशमान निळेपांढरे दिसले होते, (संगणकाचा "उपक्रम" पडदा), ते स्मरलेले दृश्य आता या क्षणी दिसणार्या दृश्याशी समसमान आहे, हे पडताळून बघायचे प्रत्यक्ष नसूनवैयक्तिक अनुमान आहे.
ज्ञानेंद्रियातून दिसणारे ठिपके, आवाज, चवी वास, हे आहेत-नाहीत असे प्रत्यक्ष सांगणारी ज्ञानेंद्रिये माझ्यापाशी आहेत. पण त्या सर्व संवेदनांच्या मिळून बनणार्या वस्तू - उदाहरणार्थ "संगणक" किंवा "कागद" किंवा "मनुष्य" माझ्यासमोर "आहे/नाही" (= "असणे" आणि "नसणे") असे सांगणारे कुठलेच ज्ञानेंद्रिय मला नाही. समोरचा विशिष्ट आकाराचा रंगीत ठिपक्यांचा समूह जो आहे, कानांना ऐकू येणारा ध्वनी त्या पिंडातूनच येत आहे (त्याच्या मागून नव्हे), आणि त्या ध्वनीचा "शब्दार्थ" माझ्या स्मरणात असलेल्या शब्दार्थासारखाच आहे, ही सगळी वैयक्तिक अनुमाने आहेत. म्हणूनच "समोर उभा असलेला मनुष्य माझ्याशी बोलत आहे" असे मी अनुमानाने म्हणतो.
वैयक्तिक अनुमान नकारणारे तुमचे ज्ञानशास्त्र मला मुळीच समजत नाही. असे ज्ञानशास्त्र मला लुळे पाडेल. अर्थातच मी ते मानण्यास तयार नाही.
कदाचित तुमचे शब्द मला समजले नसतील. म्हणून मला लुळे न पाडणार्या चिकित्सेचे उदाहरण द्यावे. वैयक्तिक अनुमान नसलेली चिकित्सा (म्हणजे वैयक्तिक अनुमाने नसलेली माहिती, उदाहरणे आणि पुरावे) हे काय प्रकार आहेत, हे त्या उदाहरणावरून मला समजेल.
सर्वज्ञता कधीच मिळणार नाही, तरी चिकित्सा संपवण्यासाठी निकष असतात. "फ्लोजिस्टॉन सिद्धांत" लेखामध्ये त्याचे उदाहरण मी समजावून सांगितलेले आहे. फ्लोजिस्टॉन सिद्धांताच्या नंतर आलेल्या सिद्धांतामध्ये सर्वज्ञता नव्हती. म्हणून काही फ्लोजिस्टॉन सिद्धांत सत्यासत्य शोधण्याच्या योग्य राहिलेला नाही. पण तुम्ही म्हणता :
"सर्व", "परिपूर्ण" वगैरे प्रकार "सर्वज्ञता" याच्यातच मोडतात. आणि ही कधी येणे नाही. नेमका काय चिकित्सा अभ्यास (चिकित्सा म्हणजे असते तरी काय?) झाला की तो सर्वांगपरिपूर्ण झाला असे म्हणता येईल?
सामान्यगणित हे मी बर्यापैकी ठोस सिद्धांत मानणार आहे. आणि सामान्यगणिताची अनुमाने चिकित्सेमध्ये वापरण्यास मला काहीच चूक वाटत नाही. (मी जर असे म्हटले "सामान्यगणित वापरणे चूक नाही", तर तुम्ही म्हणाल की धनंजय म्हणतो : "’मी म्हणतो तेच आणि तेवढेच सत्य आहे, त्याशिवाय सत्य काहीच नाही आणि किंबहुना मी म्हणतो त्याशिवाय सारे असत्य आहे.’". ही तर गडबड झाली. "वाटत नाही" असा शब्दप्रयोग तुम्ही व्यवहारात चालवून घेतला तरच संवाद कुठे जाऊ शकेल.)
एखाद्या भाजीवाल्याकडून सुटे पैसे घेताना आमचा वाद झाला - "अमुक सुटे देणे आहे", समजा. आता किती पैसे कोणी द्यायचे त्याबद्दल खरे-खोटे ठरवायचे आहे. म्हणजे आली चिकित्सा. तर वजाबाकी हे एक सामान्यगणितातले वैयक्तिक अनुमान ग्राह्य नाही, असे कोणी म्हटल्यास वाईट परिस्थिती येईल. सुट्या पैशांबद्दलच्या वादाची चिकित्सा करून खरेखोटे सोडवण्यासाठी म्हणजे वजाबाकीचे गणित चालणार नाही, तर कसला माहितीपूर्ण अभ्यास, उदाहरणे आणि वैयक्तिक अनुमाने नसलेले पुरावे चालणार आहेत? आणि चिकित्सा चालू ठेवायची ती कोठवर - भाजी शिजवायची केव्हा? मती आणि कार्यशक्ती कुंठित करणारी असली चिकित्सेची व्याख्या अंगीकारणे नकोच. हे विचारी माणसासाठी कार्यसाधन नसून विषप्राशन आहे.
फसलेल्या चिकित्साकांडाची समाप्ती आणि तेथून पुढे.
फसलेल्या चिकित्साकांडाची समाप्ती आणि तेथून पुढे.
१. चिकित्सेमध्ये माहिती-उदाहरणे-पुरावे ह्यांचे महत्त्व ते काय?
सर्वप्रथमत: आपण समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करतो आहोत हे ध्यानात घ्यावे. असे केल्यास येथे लागू करावे लागणारे नियम आणि प्रयोगशालेत लागू करावे लागणारे नियम हे एकमेकांपेक्षा वेगळे असणे आवश्यक असते असे आपणास जाणवेल. असे झाल्यास विचारातील अस्ताव्यस्तता नाहीशी होऊन विषयकेंद्रित विचार होतील. असे लिहिण्याचे कारण असे, की आपण जी उदाहरणे देता, ती बहुतेकवेळा विषयास सोडून आणि बहुधा व्यक्तिकेंद्रित असतांत असे माझे मत होते आहे. असो.
’जगातील सर्व लोकांच्या नाडीपट्ट्या सामान्य क्षेत्रफळाच्या इमारतीत मावण्यासारख्या नाहीत’ ह्या आपल्या वाक्यावर मी "चिकित्सेमध्ये ’वाटणे’ चालणार नाही, ’असणे’, किंवा ’नसणे’ हे माहिती-उदाहरणे-पुराव्यांसहित हवे असणार आहे." असे प्रतिपादन केले आहे. पुढे "वरील विधान हे चिकित्सकाकडून केले गेले असल्यास, जोपर्यंत ह्या विधानास अभ्यासपूर्ण माहिती-उदाहरणे-पुरावे इत्यादींसहीत पुष्टी मिळत नाही, तोपर्यंत ते विधान जसेच्या तसे स्वीकारणे हे चिकित्सेस योग्य नाही." असेही म्हटले आहे. आता हा प्रकार आपणांस समजण्यासाठी म्हणून उदाहरणासह समजावून सांगतो.
आपल्याच वाक्यातून एक उदाहरण घेवून सांगावयाचे झाले तर, ’जगातील सर्व लोकांच्या नाडीपट्ट्या सामान्य क्षेत्रफळाच्या इमारतीत मावण्यासारख्या नाहीत’ ह्या वाक्यात ’नसणे’ आहे. हे वाक्य चिकित्सेत घेतले गेल्यास चिकित्सकाने ते पुढील प्रकारे मांडावे अशी माझी सर्वसाधारण अपेक्षा आहे. : ’मी अमुक दिवसापासून अमुक दिवसापर्यंत अमुक इतक्या केंद्रांना भेटी दिल्या. (दिनांक/वेळ/केंद्रांची संख्या/ह्यास पुरावा) प्रत्येक केंद्रामध्ये अमुकशे जातकांच्या बाबतीतले तथाकथित भविष्यकथन अनुभविले. (ह्यास पुरावा) त्यातील काही लोकांच्या पट्ट्या सापडू शकल्या, परंतु काहींच्या पट्ट्या सापडू शकल्या नाहीत. (ह्यास पुरावा) ज्या लोकांच्या पट्ट्या अमुक केंद्रात सापडू शकल्या नाहीत त्यांच्या पट्ट्या इतरत्र कुठेही सापडणार नाहीत ह्या गोष्टीची मी अनेक नाडिवाचकांकडून खात्री करून घेतली आहे. (ह्यास पुरावा) तात्पर्य काय, की जगातील सर्व लोकांच्या नाडीपट्ट्या सामान्य क्षेत्रफळाच्या इमारतीत मावण्यासारख्या नाहीत असे माझे मत झाले आहे. ह्या माझ्या मताच्या पुष्ट्यर्थ मी पूर्वी दिलेल्या पुराव्यांसह पुढील पुरावे पूरक म्हणून देतो आहे. पुरावा १, पुरावा २..... इत्यादि. म्हणून निष्कर्ष असा : (निष्कर्ष)’
ह्याहीउपर, कोणी ह्या निष्कर्षाबाबत चिकित्सकांस माहिती विचारली, तर उत्तरे देता यावीत ह्याकरिता त्याच्याकडे ही सर्व माहिती तक्तास्वरूपात उपलब्ध असणे अतिआवश्यक आहे. थोडक्यात काय, तर चिकित्सक हा काय आधारावर अमुक निष्कर्षास येतो हे विचारल्यास समाधानकारक उत्तरे देता येतील एवढा स्वानुभव त्याच्याकडे असणे आवश्यक आहे.
चिकित्साशास्त्रातील एका मताप्रमाणे, स्वत: चिकित्सेस एक प्रामाण्य येण्याकरिता निष्कर्षाबाबत केल्या जाणार्या विधानाची मांडणी शास्त्रशुद्ध रीतीने शक्यतो स्वानुभवाधारित अशी केली जावी. चिकित्सेमध्ये मांडलेल्या निष्कर्षास जोपर्यंत अभ्यासपूर्ण माहिती-उदाहरणे-पुरावे इत्यादींसह पुष्टी मिळत नाही, तोपर्यंत तो निष्कर्ष जसाच्या तसा स्वीकारणे हे चिकित्सेसाठी सर्वथा अयोग्य होय. विचार केला असतां आपल्या असे लक्षात येईल की येथे नाडिशास्त्रापुरते पहावयाचे झाल्यास, बसलेल्या ठिकाणी बुद्धीवाद करून शक्याशक्यतेची कितीही गणिते मांडली तरी ती निरर्थक होत. कारण उदाहरणादाखल आपल्या हाती काहीही माहिती-पुरावे नाहीत. आणि त्यातूनही असा बुद्धीवाद कोणी केलाच, तर त्यास चिकित्सा असे न संबोधिता ’माझ्या बुद्धीच्या जोरावर असे प्रतिपादन करतो आहे’ असे म्हणून मोकळे व्हावे; म्हणजे निदान चिकित्सेवर प्रश्नोत्तरे तरी होणार नाहीत.
तात्पर्य: बुद्धीनिष्ठांनी कितीही बुद्धीवाद केला तरी तो जर सामान्य बुद्धीला पटेल अशा पद्धतीने मांडला, तरच सामान्यजनांच्या पचनी पडतो. म्हणून हे लक्षात घेता, चिकित्सेमध्ये ’असणे’ किंवा ’नसणे’ हे माहिती-उदाहरणे-पुराव्यांसहित हवे असणार आहे. ते तसे नसल्यास चिकित्सेस मृतप्राय समजावे. मी येथे दिलेली उदाहरणे अभ्यासून आपणांस हे तात्पर्य मान्य आहे काय ते कळवावे.
२. आता, वैयक्तिक अनुमानाबद्दल :- प्रथमत: "असणे" आणि "नसणे" या गोष्टी नेहमी वैयक्तिक अनुमानित असतात असे आपण जे सोदाहरण सिद्ध करून दाखविले आहे त्यास माझी मान्यता आहे. मी चिकित्सेमध्ये वैयक्तिक अनुमाने असणे नाकारतो असा आपला ग्रह झाला असल्याकारणे आपण हा प्रश्न ह्याप्रकारे उपस्थित करतां आहात हे मी जाणून आहो. ह्याबाबत मी आधीही सांगितले आहे, आणि आताही खुलासा करून सांगतो. कोठलेही ज्ञानशास्त्र वैयक्तिक अनुमानास नाकारित नाही, कारण तसे नाकारल्यास आपण म्हणतां तसे ते ज्ञानशास्त्र लुळे पडते. कोणीही सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा मनुष्य असे वैयक्तिक अनुमानाचे अस्तित्त्व नाकारणारे ज्ञानशास्त्र मानणारच नाही. त्यामुळे आपणही तसे मानत नसाल ह्यात काही विशेष नाही. मुळात मी आपणांस ’वैयक्तिक अनुमानास नाकारणारे ज्ञानशास्त्र अस्तित्त्वात आहे’ असे मला दाखवून द्यावे अशी विनंती करेन.
मी वर लिहिल्याप्रमाणे मी चिकित्सेमध्ये वैयक्तिक अनुमानांचे असणे नाकारित नाही. चिकित्सेमध्ये वैयक्तिक अनुमाने असू शकतात - असावीत. परंतु जेथे ती असतात, तेथे ती तशी आहेत ह्याचा खुलासादेखील स्पष्ट शब्दांत करणे आवश्यक असते. त्याचसह माहिती-उदाहरणे-पुरावे इत्यादी गोष्टी सिद्धतेसाठी दिल्या गेल्या, तर त्या चिकित्सेस प्रामाण्य येते. आपण हा लेख वाचावा आणि लेखकाने कुठे स्पष्ट शब्दांत असा खुलासा केला आहे ते मला सप्रमाण दाखवून द्यावे. आपले अनुभव हे फुटकळ आणि एकांगी असल्याचे लेखकाने कोठेही स्पष्टपणे म्हटलेले दिसत नाही. आपल्या चिकित्सेमध्ये वैयक्तिक अनुमाने समाविष्ट आहेत असेदेखील कोठेही स्पष्टपणे म्हटलेले दिसत नाही. (ते माझ्या आणि लेखकाच्या प्रश्नोत्तरांतून थोडेअधिक सिद्ध होते.) तरीही आपली मते ह्याप्रकारे संपूर्ण समाजावर आक्रमक आणि आग्रही रीतिने लादणे हे योग्य आहे काय हे कृपया सांगावे. येथे एक लक्षात घ्यावे, की ज्ञानशास्त्र वैयक्तिक अनुमानास नाकारत जरी नसले, तरी जोपर्यंत वैयक्तिक अनुमानास पुष्ट्यर्थ इतर माहिती नाही, तोपर्यंत ते वैयक्तिक अनुमानांस परिपूर्णत्त्वही देत नाही.
आपण लेखकाची लेखनशैली आणि भाषाशैली बारकाव्याने अभ्यासिलीत तर आपणांस एक गोष्ट दृष्टीपथास येईल ती अशी : लेखकाने एक अशी शैली विकसीत करून उपयोजिली आहे, की लेखकाच्या तथाकथित चिकित्साविचारांचे वाचन केल्यास सामान्यजनांस असे प्रतीत व्हावे की लेखक म्हणतांत तेच सत्य आहे, किंबहुना त्याशिवाय इतर काही सत्य नाही. स्वत: लेखकास तसे म्हणण्याची आवश्यकता राहत नाही. लेखकाने स्वत:चा लेख अशा एका वळणावर आणून सोडला आहे, जेथे वाचकास असे प्रतीत व्हावे, की लेखकाने बहुधा अपार परिश्रम घेवून, अनेक जातकांचा अभ्यास करून सदर विचार मांडला असावा. आणि एकदा का असा विचार झाला की तो वाचक फसला असे समजावे. परंतु ह्या चिकित्सेत वापरल्या गेलेल्या वैयक्तिक अनुमानांना व्यक्तिगत वादाचा रंगही आहे हे चाणाक्ष वाचकास लगेचच उमगेल. कारण अशी ही रंगीत वैयक्तिक अनुमाने ही चिकित्सेमध्ये कितीही विद्वत्तापूर्ण पद्धतीने मांडली गेली असली आणि ती अक्षरश: खरी वाटत असली, तरी त्यात ठिसूळपणा आहे हे कळावयास काळ जावा लागत नाही.
येथे स्वत: चिकित्सक आपण श्री. ओक ह्यांच्या दावा वजा अनुभवाची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करतो आहोत असे स्पष्ट करतांत. त्यातून ते आपले निष्कर्ष केवळ मताधारितच नाहीत, तर तर्क, अभ्यास आणि अनुभवसिद्ध आहेत असेही म्हणतात. ह्यात एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो असा : एकदा कां मताधारिततेचा शिक्का चिकित्सेवर बसला, की तर्काचे आणि अभ्यासाचे महत्त्व संपुष्टात येते, कारण 'परपक्षखंडनाकरिता आपण केली ती चिकित्सा' असा विचार होतो. चिकित्सेचा प्रवास आधी विचार, मग अनुभव आणि मग तर्काभ्यासादि होणे चिकित्साशास्त्रास अपेक्षित आहे. केवळ मतास विरोध म्हणून विचार आणि म्हणून वेगळे मत असा प्रवास चिकित्साशास्त्रास मान्य नाही. राहता राहतो तो अनुभव. ह्या अनुभवाबद्दल विचारता आपले चिकित्सक मात्र आपणाला सोयीचे तेवढ्याच प्रश्नांना उत्तरे देतात. जेथे आपल्या सोयीचे होत नाही तेथे ते उत्तरे द्यावयाचे टाळतात. ह्या पद्धतीचे कारण मला काही अजून उमगले नाही. लेखकाची भूमिका पाहता ते स्पष्ट होणे इथून पुढे शक्यही नाही, कारण लेखकाने मुळात चिकित्सा केलेलीच नाही असे आता माझे मत निश्चित झाले आहे. अर्थात, तो येथे वेगळा विषय आहे, असो.
ह्यापुढे जावून लेखक ’नाडीग्रंथ ओकांमुळे विशेष लोकप्रिय झाले. अगोदर लोकांना अनुभव घ्यायला मद्रास प्रांतात जावे लागे आता महाराष्ट्रातही नाडीकेंद्र झाली आहेत.’ अशी विधाने करतांत. ह्या विधानांचा कितीही सरलतेने अर्थ घ्यावयचा म्हटले तरीही लेखकाचे लेख आणि इतर पूरक लेखन - विशेषत: 'बहुरंगी वग' वाचल्यानंतर मात्र एकूण संदर्भ पूर्णतः बदलतात. ’नाडीग्रंथ ओकांमुळे विशेष लोकप्रिय झाले’ असे म्हटल्यावर चिकित्सकामुळे ते लोकप्रिय झाले नाहीत याचा चिकित्सकांस खेद आहे असे म्हणावयाचे आहे असा काहींचा समज होण्याची शक्यता आहे. ’अगोदर लोकांना अनुभव घ्यायला मद्रास प्रांतात जावे लागे आता महाराष्ट्रातही नाडीकेंद्र झाली आहेत’ असे म्हटल्यावर श्री. ओक ह्यांस जे महत्त्व मिळते आहे, ते ह्यांना सहन होत नाही असाही एखाद्याचा समज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेच इतर कितीही अपसमज होण्याची शक्यता असते, आणि हे सर्व चिकित्सेस स्वत:स अपायकारक आहे.
तात्पर्य : चिकित्सेमध्ये वैयक्तिक अनुमानांस व्यक्तिगत वादाचा रंग पुसला गेला, की चिकित्साद्रोह होतो आणि अशी चिकित्सा ही व्यर्थ ठरते. मी येथे दिलेली उदाहरणे अभ्यासून आपणांस हे तात्पर्य मान्य आहे काय ते कळवावे.
३. सर्वांगपरिपूर्ण चिकित्साअभ्यास :- चिकित्सा संपवण्यासाठीचे असे काही निकष असतात हे आपण मान्य करता. तर अशा निकषांचे पालन करून चिकित्सा संपविण्यापूर्वी ज्या गोष्टींबद्दल विचार करणे सहजशक्य आहे, त्या गोष्टींबद्दल योग्यप्रकारे विचार केला गेला आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे हे आपणांस मान्य नाही काय? एकवेळ आपण तसे मान्य करत नसालही, परंतु तसे पाहणे आवश्यक आहे हे माझे आग्रही वैयक्तिक मत आहे. त्यास मी माझ्यापुरते ’सर्वांगपरिपूर्ण चिकित्साअभ्यास’ असे संबोधितो. उदाहरणादाखल हाच विषय घेवून माझे म्हणणे सोपे करून सांगतो ते असे : येथे नाडिग्रंथ ह्या विषयाची चिकित्सा करतांना सदर चिकित्सकाने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सर्वथा दुर्लक्ष केले आहे. उदा. नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय हा मुद्दा विचारता लेखकास काहीही सबल पुराव्यासह सांगता येत नाही. त्यामुळे लेखन केले गेले असल्यास ते कोणत्या लिपीमध्ये कोणत्या भाषेमध्ये असते, आणि त्या भाषेस काही व्याकरण आहे काय, व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा; ह्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते. असे असता, नाडिपट्टींमध्ये संबंधित जातकाचे नांव, त्याच्या जन्मदात्यांचे नांव, त्याचे जातकम (कुंडली/पत्रिका) तथा वैयक्तिक माहितीचा उल्लेख असतो काय ह्या दाव्यास कसे खोडून काढावे हे लेखकास कळत नाही. वास्तविक पाहता, ह्या भागावरील शोध घेणे हे त्यातील भाकितांबाबत काही मते बनविण्यापूर्वी आवश्यक आहे. आणि त्यामुळे ह्या विषयावरचा लेखकाचा चिकित्सा नामक अभ्यास हा सर्वांगपरिपूर्ण आहे असे मला मान्य करता येत नाही.
थोडक्यात काय, तर लेखकाने नाडिशास्त्राचे केवळ ’ज्योतिष’ हे एकच अंग लक्षात घेतले आहे असे येथे स्पष्ट होते. ह्याप्रकरणांत जोपर्यंत भाषा-व्याकरण-लिपी ह्या विषयांवर अभ्यास होत नाही तोपर्यंत नाडिग्रंथ प्रकरणांस चिकित्सकाकडून संपूर्ण न्याय मिळतो असे आपणांस वाटते काय? आपण एका पट्टीतील काही अक्षरे स्वत: वाचू शकला आहात, ती साक्षीस ठेवून सांगावे. लेखक स्वत: फलज्योतिषचिकित्सक आहेत म्हणून त्यांनी तेवढेच अंग लक्षात घेतले असे ह्या चिकित्साकांडातून सुटण्यासाठी कोणी म्हटले, तरी चिकित्सक म्हणून वरील विषयाची एवढी महत्त्वाची अंगे त्यांनी सर्वसकटपणे दुर्लक्षावी ह्यातच ह्या चिकित्सेचे फोलपण सामावले आहे.
४. सामान्य अनुमानांचे गणित : राहता राहीली बाब सामान्य अनुमाने वापरण्याची. आपण चिकित्सा करण्यासाठी काय अनुमाने वापरावीत अथवा काय वापरू नयेत हा सर्वथा आपला प्रश्न आहे. त्या चिकित्सेचे निष्कर्ष किती प्रमाणामध्ये स्वीकारावेत हे स्वीकारणा-याने ठरवायचे आहे. त्यामुळे एखादे अनुमान आपण वापरणार असाल, आणि ते वापरताना ते वापरणे चूक नाही असे म्हणत असाल, तर मी श्री. धनंजय ’मी म्हणतो तेच आणि तेवढेच सत्य आहे, त्याशिवाय सत्य काहीच नाही आणि किंबहुना मी म्हणतो त्याशिवाय सारे असत्य आहे.’ असे म्हणतात असे कदापि म्हणणार नाही. कारण तेच की चिकित्सा करण्यासाठी काय अनुमाने वापरावीत अथवा काय वापरू नयेत हा सर्वथा आपला प्रश्न आहे. परंतु जर आपण आपली चिकित्सा संपवून आपणास जे ज्ञान झाले आहे, तेच आणि तेवढेच सत्य आहे त्याशिवाय सत्य काहीच नाही आणि किंबहुना आपण म्हणतां त्याशिवाय सारे असत्य आहे असे प्रतिपादन आग्रही आणि आक्रमक पद्धतीने करावयास लागलात, तर मात्र आक्षेपाचा आवाज सर्वप्रथम माझ्याकडून उठविला जाईल ह्यात शंका बाळगू नये.
५. चिकित्सा म्हणजे असते तरी काय?: हा सर्वथा वेगळ्या अभ्यासाचा विषय होय. एका चिकित्सकाने केलेल्या चिकित्सेचा नुसता अभ्यास करू जाता आपली मती आणि कार्यशक्ती कुंठित होते म्हणून आपण बिचकत असाल, तर स्वतः चिकित्सा ही किती शास्त्रशुद्ध असणे आवश्यक असते हे मी आपणांस वेगळे सांगणे नकोच! तरीही ह्या विषयाच्या अनुषंगाने येथे काही मते मांडली आहेतच. ह्याउपरही स्पष्टीकरण हवे असल्यास कळवावे, चिकित्साशास्त्रावर एक वेगळा लेख लिहिण्याचा विचार करतां येईल.
चिकित्सा आणि सामान्यजन ह्या दोहो गोष्टींचा एकत्रितरित्या विचार करतां समाजशास्त्राचे असे म्हणणे असते की, सहसा सामान्यजन स्वत: चिकित्सा करण्याच्या भांगडीत पडत नाहीत आणि ते अशा प्रकारच्या परसिद्ध चिकित्सेस प्रमाण मानतात. येथे ह्या विषयापुरता विचार करावयाचा झाल्यास असे लक्षात येते, की आपण समजतो तितकेसे चिकित्साकर्म सोपेसुलभ नाही. कितीही तर्कशुद्ध आणि बुद्धिनिष्ठ असली तरी स्वत: चिकित्सक मंडळींच्याही मनामध्ये विविध श्रद्धा आणि पूर्वग्रह ठाण मांडून बसलेले असतात. (आपल्या चिकित्सकाने एक व्यक्ती म्हणून स्वत:चे काही पूर्वग्रह, गुणदोष आहेतच असे प्रांजलपणे मान्यही केले आहे. ते बहुधा प्रश्नांचा मारा थांबविण्याकरिता मान्य केले असावे कारण अद्यापपावेतो त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर न देण्यातच धन्यता मानली आहे, अर्थात तो विषय येथे निराळा आहे.) तर असे हे पूर्वग्रह आणि विविध श्रद्धा ह्या चिकित्सेमध्ये, विषयाच्या मूलभूत अभ्यासाच्या आड येतात. एकतर चिकित्सा करताना संपूर्णतः परस्परविरोधी असे दृष्टीकोन स्वीकारले जाऊ शकतात. येथेही नाडिग्रंथवादी आणि नाडिग्रंथविरोधक असे दोन मुख्य दृष्टीकोन परस्परविरोधीच आहेत. म्हणजे आता काय पुराव्यांच्या आधारे चिकित्सा झाली आहे त्या पुराव्यांचे अर्थ आणि संदर्भ तटस्थपणे शोधणे आवश्यक आहे. आपल्या चिकित्सकांनीही त्यांनी केलेल्या चिकित्सेवर विश्वास न ठेवता स्वत:च चिकित्सा करावी असा अनाहुत सल्ला देवून ह्या चर्चेतून पलायन केलेले आहेच, त्यावरून स्वत:च्या चिकित्सेवरील त्यांचा आत्मविश्वास किती ठाम आहे हेही दिसते. खरे पाहता, त्यांनी 'माझ्या चिकित्सेवर विश्वास ठेवू नये आणि स्वत:च चिकित्सा करावी' असे जेंव्हा म्हटले आहे, तेंव्हाच हे सारे फसलेले चिकित्साकांड समाप्त झाले आहे. आता होणारा सारा काथेकूट (पक्षी: विषयांतर) हा केवळ चिकित्सा म्हणजे काय आणि ती कशी असावी ह्या विषयावर होतो आहे; जो ह्या विषयास न्याय देणार नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. खरे पाहता प्रत्येक विषयाची चिकित्सा कशी असावी ह्याची कसोटी त्या विषयावरूनच निश्चित होऊ शकते - ती विषयानुरुप बदलूही शकते. येथे आपल्या चिकित्सक लेखकांचा प्रवासही ’हळूहळू विचार बदलू शकतात’ ह्या मतापर्यंत झालेला आहेच!
तेंव्हा तुम्ही-आम्ही मिळून नाडिग्रंथांवर चिकित्सा कशी करावयाची ह्याबद्दल तटस्थ दृष्टीकोनातून मुद्दे काढूया.
माझे येथून पुढील प्रश्न हे नाडिविरोधक आणि नाडिग्रंथवादी ह्या दोहोंसाठी एकत्रितरित्या असणार आहेत.
haiyohaiyaiyo@gmail.com
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
अय्यो!
वाचून दमले की हो मी. उपक्रम आणि मिसळपावावरील नाडीपट्टीचे प्रतिसाद लेख एकत्र करून कागदावर छापल्यास किती क्षेत्रफळ व्यापतील असा उद्योग कोणाला तरी लावू या का? खालील प्रतिसाद "आ बैल मुझे मार" प्रमाणे होऊ नये अशी इच्छा आहे.
असो. एक वाचले - त्यावरून वाटते ते लिहीत आहे.
>त्यातून ते आपले निष्कर्ष केवळ मताधारितच नाहीत, तर तर्क, अभ्यास आणि अनुभवसिद्ध आहेत असेही म्हणतात. ह्यात एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो असा : एकदा कां मताधारिततेचा शिक्का चिकित्सेवर बसला, की तर्काचे आणि अभ्यासाचे महत्त्व संपुष्टात येते, कारण 'परपक्षखंडनाकरिता आपण केली ती चिकित्सा' असा विचार होतो.
एखाद्याने अनुभव घेतले तर त्याचे मत बनतेच. ते झाले गॄहितक. असे गृहितक योग्य आहे किंवा नाही, हे पुराव्यांच्या आधारे बघता येते. आता जर पुरावे गृहितकाच्या बाजूने असले, तर गृहितक सिद्ध होणार. जर नसले, तर गृहितक चूक. म्हणजे परत अनुभव घेणे यावे. यात प्रथमदर्शनी किंवा अनुभवाधिष्ठित मत तयार होणे की क्रिया चुकीची नाही, तर अपेक्षितच आहे. ते मत बरोबर आहे का चूक हे पुराव्यांआधारे ठरते. तर्क आणि अभ्यास यांचे महत्त्व मत बनल्यामुळे संपुष्टात येत नाही, तर तर्क आणि अभ्यास (पुरावे गोळा करणे, त्यांचे संकलन करणे इ.) कसे केले जातात हे पाहणे महत्त्वाचे असे वाटते. आणि असे पुरावे गोळा करण्याची पद्धत (किंवा चिकित्सा) चूक आहे असे जरी एकवेळ धरले, तरी केवळ म्हणून असा तर्क आणि अभ्यास परपक्षखंडनासाठीच केला जात आहे हेही एक गृहितक येथे आहे. हे गृहितक बहुदा चुकीचे आहे (कारण चिकित्सा तुम्ही म्हणता तशी योग्य तर्हेने केलेली नसू शकते, पण म्हणून तिच्यामागचे गृहितक सिद्ध होत नाही, त्यासाठी श्री. घाटपांडे यांचे आधीचे इतर काम, लेखन आणि तत्सम अनेक पुरावे गोळा करावे लागतील.
मूलतः कुठच्याही माणसाच्या संबंधित संशोधनाचा उपयोग हा बहुसंख्य मानवांचे आयुष्य (इतरांना किंवा पृथ्वीला कमीतकमी त्रास होऊन) सुखकर, आणि आनंदी करण्यासाठी व्हावा असे वाटते. आणि नाडीपट्टी-विरोधकांचा हेतू याबाबतीत पैसे मिळवण्याचा नसावा, किंवा प्रसिद्धी मिळवण्याचा नसावा असे एक गृहितक बांधून पहायला हरकत नाही. तेही तपासण्यालायक असावे असे वाटते. असो.
श्री. घाटपांडे यांनी त्यांच्या (तुम्ही वर दिलेल्या) प्रतिसादात म्हटले आहे तेवढे पाहून आपण (म्हणजे तुम्ही/मी किंवा कोणास हा विषय महत्त्वाचा वाटतो त्यांनी) संशोधनाची दिशा ठरवावी. खालील प्रतिसादात मी त्यांची चिकित्सा पद्धती तुम्ही स्विकारावी किंवा त्यावर आधारित निष्कर्ष स्विकारावे असे म्हटल्यासारखे दिसले नाही.
>>तेंव्हा एकुणात, आपल्या चिकित्सेवर (आणि त्यातून मांडलेल्या सिद्धांतावर) आम्ही काय म्हणून विश्वास ठेवावा?
>विश्वास ठेउच नये कारण आपणही स्वतः चिकित्सा करावी व नंतर मत बनवावे. कुणी तरी सांगतय म्हणून ते प्रमाण मानण्यापेक्षा त्याचा फक्त संदर्भ म्हणुन वापर करुन स्वतः चिकित्सा >करावी असा संशयवाद सांगतो. चमत्काराच्या मागचा कार्यकारण भाव उघड झाल्यावर चमत्कार हा चमत्कार राहत नाही.
>प्रकाश घाटपांडे
वा !
सर्व चर्चा तसेच हैयो हैयैयो आणि धनंजय संवाद एकदम वाचनीय आहे.
हैयो हैयैयो,
आपली लेखन शैली मला आवडली. धनंजय आणि आपल्या वाक्यांत अर्थाचा नेमकेपणा आणि व्यापकता असली तरी अनावश्यक शाब्दिक फुगवटा नसतो.
मी जाणून आहो, सर्वसकट, हे वाक् प्रयोग आवडले :)
--लिखाळ.
कुणी चड्डीचीही चर्चा करा रे
खूप झालं नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी,नाडी, नाडी, नाडी, नाडी, नाडी!
कृपया कुणी अर्ध्या चड्डीचीही चर्चा करावी. आमच्या आवडीचा विषय आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
गुंडी
नाडी-नाडी फार झाले, आता गुंडीच्या महत्त्वावर सुद्धा चर्चा व्हावी असे वाटते ;)
अवांतरः खरं तर या नाडी-गुंदीवरून १ विनोद आठवला होता:
जर बटनाला मराठीत गुंडी म्हणतात तर झिप ला काय म्हणणार?
उत्तर- घसरगुंडी!!
उत्तम लेख
मुळ् च्चिकित्सकाचा लेखही वाचला आणि इथली त्यावरची चर्चाहि वाचली. हा लेख उत्तम झाला आहे. मला स्वतहच्या किंवा आमच्या ह्यांच्या भविष्याबद्दल् चिन्ता अज्जिबात नाहिच्चे तरिपण एकदा नुस्ता अनुभव घेण्यासाठी नाडिकेंद्राला जाणारच् आहे. आमच्या ह्यांचे मन वळवायला हा लेख अतिउत्तम् !!!!!
---सौ. बक्कुबाई बिलंदर
नाडी अनुभव -स्फुट
नवीनसाताऱ्याचे श्री. ओंकार पाटील यांनी स्वत: चेन्नईच्या आसपासच्या नाडीकेंद्रांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला आहे व तो किर्लोस्कर मासिकाच्या दिवाळी (१९९६) अंकात प्रसिद्ध केला आहे तसेच अं.नि.स.ने प्रकाशित केलेल्या प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या पुस्तकातही त्याचा समावेश केला आहे. त्यांचा तो विविध नाडीकेंद्रांच्या अनुभवांवर आधारित लेख मुळातूनच वाचला पाहिजे. नाडी-पट्टी शोधून काढण्याच्या बहाण्याने पृच्छकाला अक्षरश: शेकडो प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घ्यायची आणि नंतर नाडी-पट्टी वाचण्याचा देखावा करीत तीच माहिती त्याला ऐकवायची असा प्रकार इथे चालतो. ओंकार पाटलांच्याकडून त्यांची जन्म-वेळ अशीच त्या नाडीवाचकाने त्यांच्याकडून काढून घेतली आणि तिच्यावरून तामिळी पद्धतीची कुंडली बनवून त्यांना दिली पण भासवले मात्र असे की ती कुंडली पट्टीतच लिहिलेली होती.
एक अध्यात्मिक साधक श्री आत्मानंद यांनी भारतातल्या विविध नाडी केन्द्रांचे स्वत: अनभव घेतले होते. १९६७ साली यशवंत प्रकाशन, कुमठेकर रोड, पुणे ३० यांनी प्रकाशित झालेल्या 'अमुत तुषार ` या पुस्तकात त्यांनी आपले हे अनुभव व साधार टीका नमूद केली आहे. ते म्हणतात,'' थोडा वेळ असे गृहीत धरु या की पूर्वीचे ऋषीमुनी द्रष्टे होते व त्यांनी लोककल्याणासाठी असे नाडीग्रंथ लिहून ठेवले आहेत.अर्थात त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीला हेही दिसले असेल की त्या नाडया पुढे कोणाच्या हातात पडणार आहेत व ते त्यांच्या स्वार्थाकरिता व जनतेला लुबाडण्याकरिता कसा उपयोग करणार आहेत? त्यांचा उद्देश लोककल्याणाचा होता. अशा स्वार्थ साधू व जनतेला अमाप लुबाडणाऱ्या लोकास मदत करण्याचा खास नव्हता.त्यांच्या दिव्य दृष्टीला हे खात्रीन दिसले असलेच पाहिजे. त्या ग्रंथाचे भवितव्य त्यांच्या नजरेस आले असते तर त्यांनी ते ग्रंथ अशा लोकांच्या हाती पडू देण्यापेक्षा त्यांच्या समोरच नष्ट करून टाकलेले त्यांना परवडले असते. ``
पुस्तकाच्या 'पुरवणी` त आत्मानंद हे आपल्या निकटच्या स्नेह्याचा पुढील अनुभव नमूद करतात:- मद्रास कडील भागात ते गेले असता तेथील एका नाडी ग्रंथात महाराष्ट्रीयन माणसाची कुंडली इंग्रजी भाषेत व लिपीत ऋषींचे नावे कोरलेली आढळली. मग त्यावेळी जर इंग्रजी भाषेचे ज्ञान होते तर मराठी भाषेचे नक्कीच असले पाहिजे. मग ते ताडपत्र मराठीत न लिहिता इंग्रजीत का लिहिले होते? याचा अर्थ एकच की ते लिहिणारास इंग्रजी येत होते पण मराठी येत नव्हते. नाडी ग्रंथ लिहिण्याचा कारखाना हा आजही चालू आहे हे सिद्ध होते.
दुसऱ्या एका अनुभवात एक प्रसिद्ध नाडीवाले त्यांच्या कडे असलेले ताडपत्र घेवून आले. स्नेह्यांनी ऐकण्याकरता दोघा तिघांना मुददाम बोलावले होते. नाडीवाले वाचन करीत असताना पुष्कळवेळा असे वाचून दाखवतात की हे वाचन चालू असताना अमुक अमुक बसलेले असतील, व असा उल्लेख आला की ऐकणारा चकित होतो. या नाडी वाल्याने सहज म्हणून कोण कोण बसले आहेत त्याची चौकशी केली व स्नेह्यांनी अनवधाने सांगून टाकले. हे लक्षात ठेवून ती नाडी वाचताना ओघात त्यानी तेच नांव वाचून दाखविले. यावरून त्यांना थोडा संशय आला व ते नांव कोठे लिहिले आहे. ते दाखविण्यास सांगितले. ते तामीळ लिपीत असल्याने त्यानी ते पान काढून ठेवण्यास सांगितले, हेतू हा की नंतर कोणाकडून तरी ते वाचून घेता येईल. त्याप्रमाणे नाडीवाल्याने कबूल केले. इतक्यात जेवणाची वेळ झाली म्हणून स्नेही जेवण्यास गेले व जेवून येईपर्यंत नाडीग्रंथधारकाने ते पान काढून ठेवले होते. ते त्यांस वाचून दाखवण्यास सांगितले. त्यावेळी असे आढळून आले की नाडीवाले प्रथम कुंडली वाचली त्यावेळी त्यांच ते नाव पहिल्या पाच सहा श्लोकात वाचले गेले होते व आता ते शेवटी शेवटी वाचले गेले. यावरून स्नेह्यांना संशय आला. तपास केला तेव्हा असे आढळून आले की नाडीवाले यानी स्नेह्र्याच्या गैरहजेरीत त्यांचे गडयाकडून थोडी कोळशाची भुकटी व खोबरेल तेल मागून घेतले होते. व टेबलावरील लोखंडी टोच्याने त्यानी काही कारागिरी केली होती. स्नेह्यांनी ते पान ठेवून घेतले व एन्लार्ज फोटो काढून तज्ञाकडून तपासून घेतले, त्यावेळी त्याना नुसते ते नावंच नाही तर मधील तीन ओळी सबंध नवीन घातलेल्या आढळल्या.
======
वरील उदाहरणे केवळ नमुन्या पुरती आहेत. मुंबईत त्याकाळात (१९६०-६५) आलिशान हॉटेल मधे राहुन केवळ एका पत्र्याच्या ट्रंकमध्ये नाडी/ भृगुसंहिता ठेउन या वर मजबुत धंदा करणारे शास्त्री होतेच. एक छायाशास्त्री तर सुर्याच्या प्रकाशात जातकाची छाया मोजुन त्यावरुन कुंडली बनवणारे होते. एकदा ढगाळ वातावरण होते तर महाशयांनी खोलीतल्या बल्ववर जातकाची छाया मोजुन कुंडली बनवली होती.
'या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदशन होत राहील यात शंका नाही.' हेच जर मर्यादित पट्टया लाखो लोकांना कशा पुरतात याचे रहस्य असेल तर इथे आमची मतीच कुंठीत होते. वर्तमानपत्रातील बारा राशीच भविष्य हे काही लोकांना व्यक्तिगत भाकीत सुद्धा वाटत असत. भारतात नउ कोटी लोकांचे तेच भाकित असते.
अनुभव आणि...!!
नवीनअनुभव आणि...!!
घाटपांडे सार, आपले स्वानुभव आणि दत्तकानुभव सत्य असतीलही हो, परंतु आम्ही न्यायशास्त्राभ्यासक पडलो ना! कोणी कितीही आणि काहीही बढाया मारल्या तरी आम्ही तावूनसुलाखून तपासून घेणारच! असो. आपल्या चिकित्सेचे महत्त्व माझ्याकडून कसे स्पष्ट केले गेले ते सांगतो. मी नाडिग्रंथवाद्यांसाठी प्रश्नावली करणार असे म्हणून काही मते मागविली होती. अनेकांनी अत्यंत उत्साहवर्धक मते पाठविली, ती आपण माझ्या खरडवहीमध्ये वाचू शकता. ही मते वाचून माझा उत्साह दुणावला ह्यात शंका बाळगू नये. परंतु इथल्या एका मान्यवर सदस्याने मला माझ्या वरील प्रतिसादात दिलेल्या ईमेलवर व्यक्तिगतरित्या लिहून स्वत:चे मत कळविले. ते मत वाचून मात्र अक्षरश: निरुत्साह झाला.
ते मत थोडक्यात (माझ्या शब्दांत) असे : ते म्हणतात - तुम्ही चिकित्सेची जी चिकित्सा केलीत त्यामुळे माझ्या विचारांना चालना मिळाली. तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे अगदी व्यवस्थित आहेत. आपण स्वतः नाडिज्योतिषाचा प्रत्यक्षानुभव घेतल्याचे ते पुढे कळवतात, आणि तरीही 'आपण नाडिज्योतिषावर विश्वास ठेवत नाही असे मला publicly maintain करणे आवश्यक आहे' असे म्हणतांत, आणि असे म्हणण्याचे कारण 'मी विज्ञाननिष्ठ असून मला माझ्या भूमिकेमध्ये बदल करणे योग्य वाटत नाही कारण माझी आजपर्यंतची भूमिका तीच होती' असेही कळवतात. ह्याउपर कडी म्हणजे, 'कृपया हे बोलणे आपल्यापुरतेच ठेवा' अशी कळकळयुक्त विनंतीही करतात. आणि हे संभाषण मी उघड करेन अशी भीति बहुधा बाळगून असल्यामुळे स्वत:चे नांवही ते स्पष्ट करित नाहीत! केवढी ती भीति!! असो. आता जर एका (विज्ञाननिष्ठ) व्यक्तीचे म्हणणे असे असू शकते, तर इतरांचेही असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही ना? मला असा एकजण भेटला, तुम्हाला अनेकजण भेटले असतील! आता समाजामध्ये जोपर्यंत असे खायचे दात - दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, तोपर्यंत ह्या सर्व पारदर्शकताशून्य चिकित्सेला आणि चर्चेला काही अर्थच उरत नाही!!
हीच विज्ञाननिष्ठ मंडळी तुम्हा-आम्हाला ही अशी ठकवतात! आणि मग दुकानदारांची दुकाने बंद कां होत नाहीत म्हणून बोंबा ठोकत फिरत राहतात!!!
आणि पुढे लिहितात, 'चालू द्या तुमची चिकित्सा!'
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
हीच गोची
नवीनअनेक चळवळींमधे हीच गोची होती. एकदा भुमिका घेतली की त्यात बदल करणे समाजमनाला रुचत नाही. प्रतिमा तयार झाल्यावर त्याला तडा जाउ नये म्हणुन अंतर्विसंगती पचवाव्या लागतात. कधी समाजच तुम्हाला तस करु देत नाही. तुज आहे तुज पाशी मधे आचार्यांची जशी गोची होते जे काकाजी समजु शकतात तशीच . "नाही नाही आपण आचार्य आहात..."
राजकीय पक्षात पक्षनिष्ठा या तत्वाखाली होणारी घुसमट व्यक्तिमत्वाचा कोंडमारा करते. मग त्यातुन सोडवणुकीचे मार्ग शोधताना काही 'काळजी' आपल्या 'अस्तित्वासाठी' घ्यावी लागते.ज्योतिषाला विरोध करणारे लोक सुद्धा भविष्य पहातात. कधी उत्सुकते पोटी तर कधी नैराश्ये पोटी. ती पण माणसेच आहेत.
एक प्रसंग आठवतो. आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये एका कार्यकर्ता मित्राने निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही एक 'माणूस' च आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली.
अजुन एक प्रसंग अगदी अलिकडला
ग.प्र. प्रधान उर्फ प्रधान मास्तर हे साधना साप्ताहिकात लिखाण करतात. आता वयपरत्वे स्वतःचा वाडा संस्थेला दान करुन ते हडपसरला साधना ट्र्स्टच्या एका खोलीत रहायला गेले. त्यांच्या एका लेखात अज्ञेयवादाकडे झुकणारा कल आमच्या एका अंनिसच्या बुद्धिवादी मित्राला ( हल्लि आम्ही विवेकवादी शब्द वापरतो) खटकला. तो म्हणाला " प्रधान मास्तर ही तसलेच शेवटी. त्यांचा विवेकवाद डळमळीत झाला. वय झाले म्हणून काय झाले. शेवटपर्यंत कट्टर रहाणारे रॅशनालिस्ट होतेच कि काही लोक."
प्रकाश घाटपांडे
पळवाट!
नवीनपळवाट!
ही 'गोची' चिकित्सकासाठी 'पळवाट' मात्र होता कामा नये!
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
प्रवाह
नवीनमाणसांचा मते ही अनुभवातुन, विचारातुन बदलतात. बदलणे म्हणजे तत्त्वचुती नव्हे. god is truth म्हणणारे गांधीजी truth is god असे आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणु लागले . आपले मत पुर्वीच्या मतापेक्षा वेगळे असल्यास ताजे मत ग्राह्य धरावे असा ही उल्लेख गांधीजी करतात. अगोदर 'तस' म्हणत होतात आता 'अस' म्हणताय म्हणजे तुम्ही लबाड आहात अस म्हणता येईल का?
एखाद्याचा प्रवास अस्तिकते कडुन नास्तिकते कडे वा उलट वा अज्ञेयवादाकडे असा होउ शकतो. मताशी ठाम असण्याचा आग्रह हा मत बदलले तरी पुर्वीच्या मताशी ठाम रहाण्याचा आग्रहात असतो त्यावेळी तो दुराग्रह होतो.
आश्चर्यकारक व अतर्क अनुभव आल्यावर अचंबित होण हा मानवी स्वभाव आहे. त्यामागची कारणमिमांसा समजल्यावर् / पटल्यावर आपण विचारपुर्वक मत तयार करतो. अर्थात हे मत म्हणजे काळ्या दगडावरची रेघ /अंतिम सत्य अस मानणे म्हणजे एका वैचारिक नशेत असल्यासारखे असते. म्हणुन आम्ही 'अंतिम' नावाची भानगड मानत नाही
कधी कधी अज्ञानात देखील आनंद असतो.(तात्पुरता का होईना)
प्रकाश घाटपांडे
नवा प्रतिसाद पाठवा