भविष्य, ज्योतिष, कुंडली हे सगळं मला 'वार्यावरची वरात' वाटते.. पण आता साक्षात 'विंग कमांडर' बरोबर आहेत म्हटल्यावर एकदा अनुभव घेण्याची इच्छा आहे.. पुण्याला आलो की भेटेन.. आधी अपॉइन्ट्मेंट घ्यावी लागते का ? की अचानक आले तर चालते..
याबाबत माझ्याही काही सूचना/विनंत्या/शंका आहेत...
१. बोटांच्या ठशावरून नेमके भविष्य सांगता येते, तर विशिष्ट भागातील लोकांचे ठसे मोठ्या प्रमाणावर घेऊन डेटा बेस तयार करता येइल का ? उदा. भूकंपग्रस्त भागातील लोकांचे ठसे घेऊन संभाव्य भूकंपाचा अंदाज घेणे.. दंगल ग्रस्त भागातील भावी दंगलींचा अंदाज घेणे.
२. गुन्हेगारांचा डेटा बेस तयार करून तो पुढचा गुन्हा कधी करेल/ केलाच तर कुठे पळेल्/पळालाच तर कुठल्या नेत्याच्या घरात लपेल... अशा संभाव्य शक्यता आधी कळू शकतील का?
३. विशिष्ट रोग असणारे लोक उदा. डायबेटिस, त्यांच्यापैकी किती लोकाना/कुणाला हार्ट अटॅक येतील, मॅटर्निटी असेल तर कुठली केस अचानक कॉम्लिकेशनमध्ये जाईल हे आधी कळू शकेल का ? लहान मुलांचे ठसे घेऊन कोण कुठल्या व्यसनाला बळी पडेल याचा अंदाज घेऊन आधी उपाय करता येतील का ?
ओक साहेब,
किमान तुमच्या सारख्या सुशिक्षीत लोकानी तरी अशा अंधश्रधेचा प्रचार करु नये.
ओक साहेब ,
नाडीग्रंथ भविष्याविषयी माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .
मी स्वतः अशा प्रकारात रस घेत नाही , पण आपल्या प्राचीन शास्त्रांविषयी मला पुर्ण आदर आहे.
ह्याविषयी आणखी वाचायला आवडेल.
ओकसाहेब,मला वाटते सर्वप्रथम तर वरील अदभुत नाडी ग्रंथ भविष्याबद्दल लोकांना 'पैलतीर' मासिकातून आपणच माहिती करून दिली होती. चेन्नईला डॉ. उलगनाथन यांचेकडे आपल्याला आलेले अनुभव मी त्या मासिकात वाचले होते. आणि त्यानंतर मीदेखील कुतुहलापोटी पुण्याला वनाज कंपनीजवळ मुत्तुस्वामी यांचेकडे नाडीग्रंथ भविष्य जाणून घेण्यासाठी गेलो होतो.
अंगठ्याचा ठसा, जन्मवेळ व जन्मठिकाण ही माहिती दिल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी नाडीवाचन करण्यासाठी बोलावले होते. आणि जुजबी प्रश्नांची उत्तरे पडताळून बघितल्यावर अगस्ती ऋषींच्या नावे असलेली पट्टी वाचन सुरू झाले आणि मी उडालोच! अगदी आईवडीलांच्या नावासह त्यांचा व्यवसाय, भावाबहिणींची संख्या, त्यांचा व्यवसाय, माझ्या नोकरीचे स्वरूप, पत्नीचे नाव, मुलाचे नाव एव्हढेच नव्हे तर सगळी भूतकाळातील बारीकसारीक माहिती आणि ती पण बिनचूक तपशीलासह पट्टी वाचतांना सांगितल्या जात होती. अगदी एका आठवड्यापूर्वी झालेल्या बदलीबद्दल, तीन दिवसांपूर्वीच घेतलेल्या नव्या गाडीबद्दल पण अचूक माहिती सांगितल्या गेली. अगदी पूर्वजन्मातील माहिती पण!(अर्थात ती खरी की खोटी हे देव जाणे)
मात्र भविष्यकाळाबद्दल माहिती जी सांगीतली ती स्वतःजवळची सांगितल्यासारखे वाटले आणि खरोखरीच त्यातील बरीचशी माहिती खरी झाली नाही. पण भूतकाळातील सगळ्या गोष्टी मात्र तंतोतंत जुळल्या.
माझ्यामुळे नंतर बर्याच मित्रांनी हा अदभुत अनुभव घेतला आणि त्यांना पण असाच विलक्षण अनुभव आला.
मात्र जीवनाडी बाबत माहिती नव्हती. ती आपण करू दिलीत याबद्दल धन्यवाद. लवकरच भेट देतो.
फक्त भविष्यकाळाबाबत नाडीग्रंथ भविष्य विश्वसनीय आहे किंवा त्यासाठी वेगळ्या नाडीचे वाचन आवश्यक आहे याबाबत माहिती दिली तर बरे होईल.
बर्याच दिवसांपासून आपणाला भेटायची ईच्छा होती. आपल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधतोच आहे.
धन्यवाद!
सुप्रभात, मोहन प्यारे व अन्य मायबोलीकरांना यंदाच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सुप्रभात, आपण म्हणता तसे
मोहनप्यारेजी,
आपल्या सर्व शंकांचे उत्तर आपण नाडी ग्रंथ प्रत्यक्ष पाहिल्यावर होईल. माझी मदत हवी तर सांगा.
नाडीग्रंथप्रेमी
विंग कमांडर शशिकांत ओक (नि)
ए-४/ ४०४, गंगा हॅमलेट हौसिंग सोसायटी ,
विमान नगर पुणे. ४११०१४.
मो - ०९८८१९ ०१०४९.