भरकटलेली चर्चा
भरकटलेली चर्चा .
वाचक हो,
माझा नाडीग्रंथावरील लेखनाचा मूळ हेतू भाग 6 मधे बोध अंधश्रद्धा पुस्तकाची निर्मिती कशी व का झाली हे नोंदवायचा होता. त्यात एक माहिती म्हणून त्यातील मलपृष्ठवरील अवतरणे उद्धृत केली होती. मी कोणाला तेंव्हा किंवा आत्ता आव्हान दिलेले नव्हते व आज ही देत नाही. त्यामुळे आजून कच्चा किंवा खडूस किंवा अन्य कोणालाही नाडी भविष्य पहायचे असेल तर त्यांना सोईच्या नाडी केंद्रात जाऊन जरूर पहावे. जसे अन्य असंख्य लोक पाहतात. त्यांनी त्यांची वही व कॅसेट मिळवून व नाडी पट्टीचा फोटो उपलब्ध करून त्यातील मजकुरची चिकित्सा करून निश्कर्ष काढावा व तो लोकांसमोर मांडावा. नाडी भविष्य न पाहता कोणी चर्चा करीन म्हटले तर ते अशास्त्रीय व तर्काला धरून नाही इतकेच माझे म्हणणे आधीपासून होते, आजही आहे.
या उप्पर धनंजय यांनी नाडी पट्टीत शशिकांत हे नाव कसे लिहिलेले आहे. याचे प्रात्यक्षिक असे म्हणून माझ्या नावाच्या उल्लेखाला फोटोतून वाचून -एक तमिळ भाषा समजणारा म्हणून - लिखाणाला दुजोरा दिला आहे. मात्र त्यांना त्या नावांच्या उल्लेखाशिवाय मागील पुढील संदर्भ सांगितले जाणे अपेक्षित आहे. ते या पटलावरील तज्ञांनी सादर केले तर फोटोमधील शशिकांत या नावाशिवाय अन्य नावांचे व इतर माहितीचा खुलासा होईल असे वाटते. तरी माझी तमिळ जाणकार लोकांना विनंती आहे की त्यांनी पुढाकार घेऊन त्या फोटोतील अन्य मजकुराचा खुलासा करावा. तो संपुर्ण फोटो स्कॅन करून, वही व कॅसेट मी त्यांना द्यायला आनंदाने तयार आहे. असे शोधकार्य व्हावे हीच माझी आजवरची इच्छा आहे. ती आज या माध्यामाद्वारे संपन्न होईल अशी आशा वाटते.
तसे झाले तर मला पुढील भागांचे लिखाण करायला हुरुप येईल.
- 29 वाचने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा