नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो
प्रिय वाचक, अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला. अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. अदितीबाईंना तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले. अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. याची अदितींना कल्पना नाही. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत. आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे. मात्र नाडी ग्रंथकर्त्या महर्षींची असीम कृपा असल्याने मला त्या लोकांच्या विकृत विचारांवर भाष्य करायला संकोच वा दडपण येत नाही. असे मी मानतो. एरव्ही माझ्या सारख्या शिपाईगड्याला या फंदात पडायचे कारण काय? कारण अंनिस वा तत्सम विचारकांचा निर्णायक पराभव महर्षींच्या या ग्रंथांतून झालेला आहे. मी त्याला निमित्तमात्र आहे. आता आपणांस तो हळू हळू कळतोय म्हणून असे अवस्थ वाटते इतकेच. मला सांगा की आपणही, म्हणजे प्रत्यक्ष विजुभाऊच नव्हे याचे वाचन करणाऱ्या सर्वच लोकांना उद्देशून मी म्हणतोय, नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला का नाकारता आहात? एकांनी उदाहरण दिले आहे की गॅलिलीओने त्याने बनवलेल्या दुर्बिणीतून पहायला, त्यावेळच्या तथाकथित धार्मिक नेत्यांना आग्रह केला गेला होता. त्यांनी अनुभव घ्यायला दिलेला नकार नंतर प्रतिगामीपणाचे लक्षण मानते गेले. आता नेमके या उलटे घडते आहे. नाडीग्रंथप्रेमीजन, जे या नाडीभविष्यावर विश्वास ठेवतात (मी फक्त नाडी ग्रंथांबद्दल बोलतोय सरसकट फलज्योतिषाबद्दल मला सांगायचे नाही) त्यांना पुरोगामी विचारधारेचे लोक प्रतिगामी मानतात. असे “प्रतिगामी” असा शिक्का बसलेले लोक “पुरोगामी म्हणून गौरवल्या गेलेत्या व्यक्तींना” आवर्जून भेटून सांगताहेत, “आपण याचा अनुभव घ्या व आम्हा सामान्यांना न उलगडले गेलेले कोडे सोडवायच्यासाठी मार्गदर्शन करा”. अशा वेळी त्यांनी नाडीग्रंथांच्याकडे कुत्सितपणे दुर्ल्क्षून तोंड वळवणे म्हणजे पुर्वीच्या धार्मिक नेत्यांनी केलेली चूकच ते परत उगाळत नाहीत काय? याच लोकांचा अन्य केसेसमधे अनुभव, पुन्हा अनुभव असा वारंवारितेचा नियम म्हणून अनुभवावर जोर असतो. मात्र नाडी ग्रंथाचा वारंवार अनुभव घेण्याची वेळ आली की त्यांचे पाय जड होतात. ‘काही गोष्टी फक्त तर्काने वा शाब्दिक वादाने सुटू शकत नाही. त्याला अनुभवाचे पाठबळ लागते’. असे आम्ही म्हणतोय तर ते आम्ही अनुभव घेणार नाही व घ्यायची गरजही नाही असे समर्थन करत हटून बसले आहेत. वर आम्हालाच हट्टी हा खिताब ते देतात. प्रत्येकाला माझ्यासारखेच अनुभव यावेत असे मी कधीच म्हणणार नाही. मला हे मान्य आहे की काहींना जास्त प्रभावी तर काहींना अत्यंत सामान्य अनुभव मिळतील. ते तसे का मिळतात याचा ही विचार करावा लागेल. नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत व्यक्तीची नावे व अन्य माहिती जरी कोरून येत नसेल तरीही ती येते असे मी म्हणत असेन तर ते जितके खोटे असेल तितकेच नाडीताडपट्टीत ती माहिती येत असूनही ती ताडपट्टीत लिहिलेली नाही किंवा नसतेच असे मी म्हटले तर ते खोटे असेल. अशा परिस्थितीत मला जे सत्य आहे त्याबाजूने उभे राहायला लागणार. नाही तर मी माझ्या अनुभवाशीच प्रतारणा केल्यासारखे होईल. मात्र ती प्रतारणा मी कुठल्याही वैचारिक बांधिलकीशी केलेली नसल्याने खऱ्या अर्थाने मी पुरोगामी ठरतो. भले याठिकाणी लोक मला काही का समजेनात. अंनिसवाल्यांचे सोडा. ते काही नाही करत तर नाही. कोणाच्या उगाच मागेलागून काही उपयोग नाही. पण आपण म्हणजे आपणांसारख्या सर्व मिपावरील व अन्य जागृत विज्ञानवादी पुरोगामी विचारवंतांना, विरोधकांना नाडी ग्रंथ प्रेमी अशी विनंती करताहेत की आपले भविष्य कथन म्हणून नको तर एका सुहृदाने एक पत्र आपणाला लिहिले आहे. ते वाचा. आग्रह नाही विनंती. पहा तर मग का घडते ते.. आता तर आपल्या सभासद परिवारातील एक मराठीभाषी सभासद नाडीपट्टीतील कूट तमिल वाचनासाठी प्रयत्नशील आहे. त्याने नाडी ग्रंथांचा अनुभव घेतला आहे असे त्याने आपणहून अन्य ठिकाणी नमूद केले आहे. त्यामुळे भाषेचा वा लिपीच्या अडथळ्याचा प्रश्न फार गहन राहिलेला नाही. त्यामुळे अंनिसवाले पुढे करतात ती नेहमीची लंगडी सबब की ‘तमिल जाणकार मिळत नाही हो नाही तर नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती’ आता पुढे करता येणार नाही. जेंव्हा आपण आपली व संबंधिताची नावे व अन्य माहिती नाडी पट्टीतून आलेली वाचाल तेंव्हा कार्यकारणभावाला, इच्छा स्वातंत्र्याला मानवी जीवनात काही स्थान आहे का नाही, कर्मविपाक व पुनर्जन्मसिंद्धातावर विचार करायला नाडी महर्षी लावतील तेंव्हा मात्र पुर्वविचारधारांमुळे बेचैन व्हायला होईल...
परदेशातील लोकांच्या नाड्या
याचे वाचन करणाऱ्या सर्वच लोकांना उद्देशून मी म्हणतोय, नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला का नाकारता आहात?
मला नाडीग्रंथाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला आवडेल. परदेशातील लोकांच्या नाड्या कुठेशी असतात ?
-- मिसळभोक्ता
नाड्या - झिप
परदेशातील लोकांच्या नाड्या कुठेशी असतात ? परदेशातील लोक आपल्या लेंग्यांना नाड्यांऐवजी बटणे-झिप लावून घेतात, सबब त्यांच्या नाड्या उपलब्ध नाहीत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
नाही, त्यांच्या कासोट्याच्या निर्या मोजाव्या लागतात
नवीनपण ते एक स्पेश्शल टेक्नीक आहे. अधिक माहितीसाठी व्यनि करा!
(सोटा)चतुरंग
मात्र नाडी
मात्र नाडी ग्रंथकर्त्या महर्षींची असीम कृपा असल्याने मला त्या लोकांच्या विकृत विचारांवर भाष्य करायला संकोच वा दडपण येत नाही
बरं बरं !
अरे वा, मी
अरे वा, मी फारच फेमस झालेली दिसत आहे. माझी 'येन-केन प्रकारेण' युक्ती सफल संपूर्ण झाली तर ...
चतुरंगस्टाईल खुद के साथ बाता: ओकसाहेब आता मला पत्र लिहीणार का काय?
अदिती
प्रयोगासाठी तयार आहे
नवीनमी स्वतः या नाडीपट्टीच्या प्रयोगासाठी गिनीपीग व्हायला तयार आहे.
ओकसाहेब, मला पुण्यात येणे शक्य आहे. अगोदर वेळ ठरवून यासाठी मी कितीही वेळा पुण्यात येईन. येणारे सर्व अनुभव मिपावर टाकूयात. यासाठी तुम्हा-आम्हावर काही अटी असाव्यात त्या मिपाकरांनी ठरवाव्या. उदा. १. प्रश्नोत्तराचे रेकॉर्डींग. २. कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षीत आहेत? ३. साक्षीदार असावेत का ? कोण असावेत ? वगैरे वगैरे
त्यासाठी गरज लागल्यास वेगळा धागा काढावा.
काय म्हणता मग ? ................. अजून कच्चाच आहे. (असे होईल का ते कळायला पण नाडीपट्टी पहावी लागेल काय?)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा