शतशः धन्यवाद.
प्रेषक हैयो हैयैयो (शुक्र, 09/04/2009 - 14:52)
शतशः धन्यवाद.
नमस्कार,
प्रथमत: उत्तरे देण्याचे करून माझ्यासारह्या तटस्थ उपक्रमकरांना उपकृत करणेबद्दल शतशः धन्यवाद.
आपण येथे लिहिलेली प्रतिक्रिया आणि त्यावर माझे उत्तर येथून पुढे.
- माझा प्रश्न: 1. नाडिकेंद्रांमध्ये पट्टी शोधण्यासाठी आपल्या अंगठ्याचा छाप का द्यावा लागतो?
- आपले उत्तरः नाडी वाल्यांच्या मते आंगठयाचा छाप हा पट्ट्यांची बंडले शोधण्यासाठी उपयोगी असतो
- आपल्या उत्तरावर प्रतिसादः - ह्या विधानास काही स्वानुभवसिद्ध पुरावे आहेत काय? एक चिकित्सक ह्या नात्याने आपल्याकडून आपले स्वत:चे स्वानुभवाधारित मत अपेक्षित आहे. कृपया सिद्ध (रेडिमेड्) उत्तरे देणे टाळावे.
- माझा प्रश्न: 2. तो तसा दिल्यानंतरसुद्धा आपणांस काही प्रश्न का विचारले जातात?
- आपले उत्तरः एकसारख्या वर्णनाच्या अनेक व्यक्ती असु शकतात त्यातुन नेमकी हीच् ती व्यक्ती हे निश्चित करण्यासाठि त्याचा वापर् होतो. अधिक माहिती ओकांच्या पुस्तकात दिले आहे. उदा. बाकी वर्णन जमले पण बायकोचे नाव आईचे नाव इ जुळले नाही तर ती म्हणजे पट्टीतील व्यक्ती नव्हे असे समजुन ती पट्टी बाजुला करुन दुसरी पट्टी घेतली जाते.
- आपल्या उत्तरावर प्रतिसादः - आपण श्री. ओक सरांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीवर विसंबून उत्तर देता आहात असे प्रथमदर्शनी दिसते. कुठलेही चिकित्साकार्य ह्याप्रकारे दत्तक अनुभवांवर सिद्ध होते हे मान्य करता येणे तत्त्वतः शक्य होत नाही. माझ्या मते चिकित्सकाने स्वतःच्या चिकित्साकार्यावर इतर कोणाही मान्यवंतांच्या (अथवा महात्म्यांच्या) व्यक्त-अव्यक्त मतांचा प्रभाव पडू देऊ नये. ह्या गोष्टीस कारण असे की त्यामुळे आपली मते अस्ताव्यस्त होतात असा चिकित्साशास्त्राचा प्राथमिक सिद्धांत आहे. पुन्हा एकदा हेच सांगणे की आपण एक चिकित्सक, आणि त्या नात्याने आपल्याकडून आपली स्वत:ची स्वानुभवाधारित मते अपेक्षित आहेत.
- माझा प्रश्न: 3. ते तसे विचारावे लागतात असे नाडिवाचकाने सांगितले, तर ते तसे का विचारावे लागतात असे आपण त्यांना विचारले काय?
- आपले उत्तरः वरील प्रमाणे
- आपल्या उत्तरावर प्रतिसादः - वरील प्रमाणे
- माझा प्रश्न: 4. पोलीसखात्याच्या अंगुलीमुद्रातज्ज्ञांची कार्यपद्धति आणि जे स्वत:स ’अंगुलीमुद्रातज्ज्ञ’ असे म्हणवून घेत नाहीत अशा नाडिवाचकाची कार्यपद्धति ह्यात काही साम्य अथवा अंतर आहे काय?
- आपले उत्तरः एक अंगठयाचा ठसा हा दुसऱ्या सारखा कधीच नसतो हे सर्वसामान्य लोकांना माहित आहे. त्यामुळे आंगठयाच्या ठशाचे महत्व जाणीवपूर्वक जतन केले आहे. त्या अंगठयाच्या ठशाचे वर्णन नाडीपटटीत येते. त्यामुळे अंगठयाचा ठसा ही अगस्ती नाडी साठी महत्वाची गोष्ट बनते. जर ठसा युनिक आहे व त्याच्या वरुन त्यांना बंडलाच सॉर्टिंग करता येते तर वर्णनावरुन पट्टी का ठरवता येउ नये? पट्टीतील व्यक्ती तीच आहे का यासाठी प्रश्न विचारावे लागतातच ना!
- आपल्या उत्तरावर प्रतिसादः - 'अंगठ्याच्या ठशाचे वर्णन नाडिपट्टीत येते' ह्या विधानास काही स्वानुभवसिद्ध पुरावे आहेत काय?
- माझा प्रश्न: 5. ह्या दोन पद्धती वेगळ्या आहेत अथवा नाहीत हे सिद्ध करण्यापूर्वीच दोहोंना एकाच परिमाणाने मोजणे हे चिकित्सेच्या दृष्टीने कसे योग्य ठरते?
- आपले उत्तरः हा सिद्ध करण्यापुर्वीच्याच प्रक्रियेचा भाग आहे. संशयाचा भाग म्हणा हव तर. आंगठ्याच्या ठशाचा नेमका काय उपयोग व रोल हे जाणुन घेण्यासाठी आपण ओकांची पुस्तके वाचलीत का?
- आपल्या उत्तरावर प्रतिसादः - जोपर्यंत 'अंगठ्याच्या ठशाचे वर्णन नाडिपट्टीत येते' ह्या विधानास काही स्वानुभवसिद्ध पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत आपले प्रस्तुत उत्तर तार्किकदृष्ट्या अर्धवट ठरते. 'सिद्ध करण्यापूर्वीच्या प्रक्रीयेचा भाग आहे' ह्या विधानास काही स्वानुभवसिद्ध पुरावे आहेत काय? 'संशयाचा भाग' असे म्हणणे आपल्या चिकित्साकार्यास आणि आपले सिद्धांत सिद्ध करण्यास किती सहाय्यक अथवा उपयोगी ठरते? मी श्री. ओक सरांची पुस्तके वाचलेली नाहीत. आपले चिकित्साकार्य हे शास्त्रीय असल्याचे सिद्ध झालेच तर त्याबाबत त्यांचे काय म्हणणे आहे हे मी नंतर इच्छा होईल तसे तेंव्हा वाचेन.
अवांतर :
तूर्तास आपल्या चिकित्साकार्यामध्ये आणि आपल्या तथाकथित (त्रुटीपूर्ण?) वैज्ञानिक दृष्टीकोण अवलंबण्याच्या प्रक्रियापद्धतिमध्ये(?) विशेष रस आला असल्यामुळे नाडिज्योतिषाव्यतिरिक्त आपले इतर चिकित्सक विचार अभ्यासण्याचा मानस आहे. त्यावरही प्रश्न पडलेच तर तेही विचारण्याची मुभा असावी. उत्तरे देण्यास आपण सिद्ध असाल अशी आशा करू इच्छितो.
-
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा