आपण दाखवलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे हे लेखन मी करत आहे. अन्यथा नाडी ग्रंथांवरील चर्चा "अंधश्रद्धेला खत पाणी" या वळणावर जाते व नंतर उगाचच तट पडतात व विचारांना विकृत वळण लागते असे माझे अनुभव असल्याने या फोरमवर फक्त अशाच प्रतिसादांना उत्तरे पाठवावीत की ज्यामुळे नाडी ग्रंथकर्त्या महर्षींच्याबद्दल ज्या लोकांना आदर व श्रद्धाभाव आहे, त्यांना योग्य ते मार्ग दर्शन करता यावे. त्यांच्या शंकांना माझ्याकडून यथोचित उत्तरे दिली जावीत.
सुरवातीलीच स्पष्ट करतो की मी कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. उलट नाड़ी ग्रंथ हे थोतांडच आहेत असे म्हणून मी स्वतः या विषयाकडे सुरवातीला पहात होतो. मात्र नाडीग्रंथांची आणखी जवळून ओळख होऊ लागल्यावर हळूहळू त्या माझ्या विचारात फरक पडत पडत आता या विचारावर यावे लागले की जर आपल्याकडून माहिती न काढता ती माहिती जर जुन्या ताडपत्रावर तमिळ सारख्या सुदूर भाषेच्या कूट लिपित कोरुन लिहून येत असेल तर तो आजच्या विज्ञानाला प्रचंड मोठा धक्का आहे. प्रचलित विज्ञानाच्या, सध्याच्या विवेकवादी विचारांना, गृहित तत्वांना वेगळे विचार करायला लावायला उद्युक्त करणारा 'पुरावा" आहे.
अशी विचार करण्यची पाळी आली आहे, असे फक्त मलाच वाटत नाही. अनेक देशी व विदेशी वैज्ञानिकांना व विचारकांना वाटत आहे. त्यामुळे ओकांसारख्या सुशिक्षित वा सैनिकी पेशातील वरिष्ठ हुद्द्यावरील व्यक्तीने असे श्रद्धाळू म्हणजेच थोडक्यात हिंदू संस्कृतीच्या भोळसट व निरर्थक विषयांनी अन्य लोकांचे भ्रम दूर करण्याऐवजी त्यांना आणखी गोंधळात टाकू नये. असे सतत म्हणणाऱ्यांना माझी विनंती आहे. पुर्वमताग्रह सोडून जर आपणास नाडी ग्रंथांकडे पाहिलेत तर आपणास एक वेगळी 'अनुभूती' मिळेल. अनुभुती हा शब्द मी अशासाठी वापरतो की भौतिक व मानसिक पातळ्यांवर त्याचा पुरावा मिळतो म्हणून. असा अनेकांचा अनुभव आहे. म्हणून तो मानसिक पुरावा प्रत्येकाला मिळतो असा माझा दावा नाही. मात्र जे भौतिक - वैज्ञानिक पातळीच्या कसोट्या जितके वेळा तपासू इच्छितात त्यांनी हवे तेवढ्यावेळा त्या तपासाव्यात आणि आपापले निकर्ष काढावेत. तेंव्हा घरबसल्या बसल्या थोतांड आहे किंवा असेल असे 'हवेत गोळीबार' करणारे मत प्रदर्शन न करता शोधकार्य करावे.
या शोधकार्यात माझ्याकडून जर मदत होणार असेल तर माझी अन्य व्यवधाने सांभाळून जरूर मी आनंदाने पुढाकार घेईन.
अर्थात कसेही करून नाडी ग्रंथांना थोतांड ठरवण्याचा ज्यांनी आधीच चंग बाधला आहे. ज्यांची विशिष्ठ विचारधारेशी इमानदारी आहे. सत्य शोधनाशी ज्यांना काही देणे घेणे नाही अशा लोकाच्या वा संस्थांच्या कडून समतोल वा खऱ्या विज्ञाननिष्ठेने शोधकार्य होणार नाही. हे सर्व विदित असल्याने अशांशी मला काही देणे घेणे नाही.
हे सगळं मला 'वार्यावरची वरात' वाटते..
असे म्हणणाऱ्यांना मी अशी नम्र विनंती करतो की आपण अनुभव घ्यावा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा