भारतात "प्रायव्हसी लॉज्" काय म्हणतात?
बर्याच लोकांच्या न कळत व त्यांच्या लिखीत परवानगीशिवाय त्यांची खाजगी माहीती साठवण्याचा व त्याचा व्यावसायीक कारणाकरता (पैसे कमवायला) उपयोग करायचा अधिकार नाडीकेंद्रांना आहे का?
कायदा काय म्हणतो? वकील असल्याने श्री. हैयो हैयैयो यांना कदाचित आधिक माहीती असेल.
कोणी जाणकार खुलासा करु शकेल का?
सिद्ध करून दाखविता आल्यास.
सिद्ध करून दाखविता आल्यास.
बर्याच लोकांच्या न कळत व त्यांच्या लिखीत परवानगीशिवाय त्यांची खाजगी माहीती साठवण्याचा व त्याचा व्यावसायीक कारणाकरता (पैसे कमवायला) उपयोग करायचा अधिकार नाडीकेंद्रांना आहे का?
न्यायशास्त्राचा एक अभ्यासक म्हणून आणि 'वकील असल्याने मला आधिक माहीती असेल' ह्या शब्दांत आपण माझ्यावर असलेला आपला विश्वास व्यक्त केला म्हणून हा खुलासा खालीलप्रमाणे करू इच्छितो:
'असा अधिकार नाडिकेंद्रांना आहे का' हा प्रश्नः
१. ही माहिती नाडिकेंद्रांकडून लोकांच्या नकळत - लिखित परवानगीशिवाय साठविली जाते असे उदाहरणांसह सप्रमाण सिद्ध करतां आल्यास, आणि २. ही माहिती ज्यांच्याबाबतीतली आहे, त्यांच्या बाबतीत ती पूर्णत: बरोबरच आहे असेही उदाहरणांसह सप्रमाण सिद्ध करतां आल्यास, आणि ३. त्याचा व्यावसायिक कामाकरिता उपयोग केला जातो असा आरोप करून तोही उदाहरणांसह सप्रमाण सिद्ध करण्यात आल्यास
त्यानंतर विचार करता यावयाचा आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे साहजिकच चिकित्सकांच्या कक्षेत येते. तूर्तास तरी काही अनाकलनीय कारणाच्या भयापोटी आपल्या चिकित्सकमंडळींचे चिकित्साकर्म मंदावलेले दिसते.
-- तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
पण
नवीन>त्यानंतर विचार करता यावयाचा आहे.
अहो ते नाडीकेंद्रवाले असा दावा करतात ना, की त्यांच्याकडे आधीपासूनच कूटलिपीत माहीती आहे व हवी असल्यास पैसे देउन मिळवा? इतर ज्योतिषवाले निदान पत्रिकामांडून (पत्रिका मांडायचे शास्त्र गुप्त नाही आहे, त्याचा अभ्यासक ते शिकू शकतो) ग्रहस्थिती बघुन भविष्य वर्तवतात. नाडीवाले दावा करतात कि कोणीतरी आधीपासुनच सगळे वैयक्तिक ओळखुन व ती माहीती साठवून आहे. बरोबर? का काही समजण्यात चूक होते आहे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा