परंतु त्या चित्राचे कशाबद्दल प्रमाण (यात नेमका काय चमत्कार) म्हणून काय अर्थ आहे, ते मला कळले नाही.
धनंजय यांच्या प्रतिसादाला
श्री ओक यांनी एका पट्टीचे चित्र काही संकेतस्थळांवरती प्रकाशित केले आहे.
त्यात बाणांनी दाखवलेली अक्षरे लावण्या इतपत तमिळ लिपी मला वाचता येते. (पण बाकी पट्टीतले क्वचितच एखादे अक्षर मला लागते.)
बाणाने दाखवलेली अक्षरे अशी आहेत :
१. 'च' (तमिळ लिपीमध्ये च, छ, ज, झ, स, श, ष या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
२. 'चि' (तमिळ लिपीमध्ये चि, छि, जि, झि, सि, शि, षि या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
३. 'का' (तमिळ लिपीमध्ये का, खा, गा, घा या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
४. न्
५. त (तमिळ लिपीमध्ये त, थ, द, ध या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)
असे सर्व पर्याय असले तरी बहुतेक तमिळ वाचक "ससिकान्त" किंवा (वाचक ब्राह्मण असल्यास) "शशिकान्त" असाच उच्चार करेल.
http://www.misalpav.com/node/3907
( सोम, 10/06/2008 - 07:09) . या लिपीचा आणि साहित्याचा अभ्यास तुमच्याकडून व्हावा, आणि प्रकाशन व्हावे, याबाबत शुभेच्छा.
प्राचीन तमिळचे माझे भांडवल एकदोन तिरुक्कुरळ आणि शिलप्पाधिकारम् चे इंग्रजी-अनुवादित पाठ्य इतपतच आहे (म्हणजे काहीच नाही.) तमिळच्या अभ्यासासाठी कधी वेळ मिळाल्यास ते त्रोटक वाचन पुढे चालवायचा मनसुबा प्रतीक्षा यादीत पडले आहे
तमिळ-मराठी द्वैभाषिक विद्वान सापडल्यास त्याची तुम्हाला मदत व्हावी. पट्ट्या ३५०-४०० वर्षांपूर्वीच्या आहेत, म्हणजे तंजावर येथील मराठेशाहीच्या काळातल्या. त्या काळाबद्दल ऐतिहासिक संशोधन करणारे तमिळ-मराठी दुहेरी विद्वान शोधून सापडल्यास बहुधा तुमच्या कार्याबद्दल त्यांना सांगता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा